॥ श्रीगणेशाय नमः ॥
शिष्योत्तम नामकरणी । लागे
सिद्धाचे चरणी ।
विनवीतसे कर जोडोनि । भक्तिभावे
करूनिया ॥१॥
जय जयाजी सिद्ध मुनि । तूचि तारक
भवार्णी ।
तूचि होसी ब्रह्मज्ञानी ।
अविद्यातिमिरभास्कर ॥२॥
मायामोहरजनीत । होतो आपण
निद्रिस्त ।
कृपासागर श्रीगुरुनाथ । जागृत
केले आम्हांसी ॥३॥
तिमिरहरण भास्करु । मज भेटलासी
गुरु ।
कडे केले भवसागरु । चिन्मयात्मा
सिद्ध मुनि ॥४॥
ऐसे म्हणोनि सिद्धासी । विनवी
भावभक्तीसी ।
गुरुमूर्ति संतोषी । अभयकर देतसे
॥५॥
पुढे चरित्र केवी झाले ।
विस्तारावे स्वामी वहिले ।
आमुते स्वामी कृतार्थ केले ।
ज्ञानामृत प्राशवून ॥६॥
कथामृत ऐकता श्रवणी । तृप्ति न
होय अंतःकरणी ।
निरोपावे विस्तारोनि म्हणोनि
चरणी लागला ॥७॥
सिद्ध म्हणे नामधारका । पुढील
कथा झाली निका ।
एकचित्ते तुम्ही ऐका । ज्ञान होय
समस्तांसी ॥८॥
गाणगापुरी असता श्रीगुरु । महिमा
वाढली अपरंपारु ।
बोलता असे विस्तारु । तावन्मात्र
सांगतसो ॥९॥
महिमा एकेक सांगता । विस्तार
होईल बहु कथा ।
अवतार श्रीहरी साक्षाता । कवण
शके वर्णावया ॥१०॥
तया गाणगापुरात । होता विप्र
वेदरत ।
विरक्त असे बहुश्रुत । कर्ममार्गे
वर्ततसे ॥११॥
न घेतला प्रतिग्रह त्याणे ।
परान्नासी न वचे नेणे ।
मिथ्या वाचे नेणे । अनुवाद आपण न
करीच ॥१२॥
नित्य शुष्क भिक्षा करी । तेणे
आपुले उदर भरी ।
तयाची नारी असे घरी । क्रोधवंत
परियेसा ॥१३॥
याचकवृत्ति तो ब्राह्मण । कंठी
संसार सामान्यपणे ।
अतीत- अभ्यागताविणे । न घेई अन्न
प्रत्यही ॥१४॥
तया ग्रामी प्रतिदिवसी । विप्र
येती समाराधनेसी ।
सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी ।
मिष्टान्न घालिती परियेसा ॥१५॥
समस्त जावोनि भोजन करिती । तया
विप्रवनितेप्रती ।
येऊनि गृही स्तुति करिती । अनेक
परीची पक्वान्ने ॥१६॥
ऐकोनि तया विप्रनारी । नानापरी
दुःख करी ।
परमेश्वरा श्रीहरी । म्हणोनि
चिंती मनात ॥१७॥
कैसे दैव आपुले हीन । नेणे
स्वप्नी ऐसे अन्न ।
दरिद्री पतीसी वरून । सदा कष्ट
भोगितसे ॥१८॥
पूर्वजन्मीचे आराधन । तैसा
आपणासी पति हीन ।
सदा पाहे दरिद्रपण । वर्ततसो
देवराया ॥१९॥
समस्त विप्र स्त्रियांसहित ।
नित्य परान्नभोजन करीत ।
पूर्वजन्मीचे सुकृत । केले होते
समस्ती ॥२०॥
आपुला पति दैवहीन । कदा नेणे
परान्नभोजन ।
काय करावे नारायण । म्हणोनि
चिंती मनात ॥२१॥
वर्तता ऐसे तया स्थानी । आला
विप्र महाधनी ।
अपरपक्ष करणे मनी । म्हणोनि आला
परियेसी ॥२२॥
तया स्थानी विप्रासी । क्षण दिले
परियेसी ।
सवे त्यांच्या स्त्रियांसी ।
आवंतिले तिही परियेसा ॥२३॥
देखोनि ते विप्रवनिता । पतीजवळी
आली त्वरिता ।
सांगती झाली विस्तारता । आमंत्रण
ब्राह्मणाचे ॥२४॥
अनेक परीची पक्वान्ने । देताती
वस्त्रे परिधाने ।
अपार दक्षिणाद्रव्यदाने । देताती
ऐके प्राणेश्वरा ॥२५॥
याते स्वामी अंगीकारणे । अथवा
आपण निरोप देणे ।
कांक्षा करिते माझे मन । अपूर्व
अन्न जेवावे ॥२६॥
ऐकोनि तियेचे वचन । निरोप देत
ब्राह्मण ।
सुखे जावे करी भोजन । आपणा न घडे
म्हणतसे ॥२७॥
निरोप घेउनी तये वेळी । गेली तया
गृहस्थाजवळी ।
आपण येऊ भोजनकाळी । म्हणोनि पुसे
तयासी ॥२८॥
विप्र म्हणे तियेसी । आम्ही
सांगू दंपतीसी ।
बोलावी आपुल्या पतीसी । तरीच
आमुच्या गृहा यावे ॥२९॥
ऐकोनि तयाचे वचन । झाली नारी
खेदे खिन्न ।
विचार करी आपुले मन । काय करावे
म्हणोनिया ॥३०॥
म्हणे आता काय करणे । कैसे दैव
आपुले उणे ।
बरवे अन्न स्वप्नी नेणे ।
पतीकरिता आपणासी ॥३१॥
विचारोनि मानसी । आली
नृसिंहगुरूपासी ।
नमन करी साष्टांगेसी । अनेकापरी
विनवीतसे ॥३२॥
म्हणे स्वामी काय करणे । बरवे
अन्न कधी नेणे ।
आपुले पतीसी सांगणे । आवंतणे
बरवे येतसे ॥३३॥
सांगू म्हणती दंपतीसी । माझा पति
नायके वचनासी ।
न वचे कधी परान्नासी । काय करू
म्हणतसे ॥३४॥
स्वामी आता कृपा करणे । माझ्या
पतीते सांगणे ।
बरवी येताती आमंत्रणे ।
अन्नवस्त्र देताती ॥३५॥
ऐकोनि तियेचे वचन ।
श्रीगुरुमूर्ति हास्यवदन ।
बोलावूनिया तत्क्षण । सांगती तया
द्विजासी ॥३६॥
श्रीगुरु म्हणती तयासी । जावे
तुम्ही आवंतणेसी ।
तुझे स्त्रियेचे मानसी । असे
मिष्टान्न जेवावे ॥३७॥
तिचे मनींची वासना जाण । तुवा
पुरवावी कारण ।
सदा दुश्चित अंतःकरण ।
कुलस्त्रियेचे असो नये ॥३८॥
ऐकोनि श्रीगुरूचे वचन । नमन करी
तो ब्राह्मण ।
विनवीतसे कर जोडून । परान्न आपणा
नेम असे ॥३९॥
गुरुवचन जो न करी । तोचि पडे
रौरवघोरी ।
निरोप तुमचा माझ्या शिरी । जाईन
त्वरित म्हणतसे ॥४०॥
पुसोनिया श्रीगुरूसी । आले
दंपत्य आवंतणेसी ।
आनंद झाला बहुवसी । तया
विप्रस्त्रियेते ॥४१॥
पितृनाम उच्चारोन । संकल्प करी
तो ब्राह्मण ।
अनेक परीचे मिष्टान्न । वाढिती
तया दंपतीसी ॥४२॥
भोजन करिता समयासी । दिसे विपरीत
तियेसी ।
श्वान सूकर येउनी हर्षी । समागमे
जेविताती ॥४३॥
कंटाळले तिचे मन । उठली आपण
त्यजुनी अन्न ।
जे जेवीत होते ब्राह्मण । तया
समस्तांसी सांगतसे ॥४४॥
ऐसेपरी पतीसहित । आली नारी
चिंताक्रांत ।
पतीस सांगे वृत्तान्त ।
श्वानउच्छिष्ट जेविलेती ॥४५॥
स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण ।
तुझे नि आपुले दैव हीन ।
घडले आपणासी परान्न । उच्छिष्ट
श्वानसूकरांचे ॥४६॥
ऐसे म्हणोनि स्त्रियेसी । आली
दोघे श्रीगुरुपासी ।
नमन केले परियेसी । ऐका श्रोते
एकचित्ते ॥४७॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । कैसे
सुख परान्नासी ।
सदा दुखविसी पतीसी । पुरले तुझे
मनोरथ ॥४८॥
ऐसे वचन ऐकोनि । लागे नारी
श्रीगुरुचरणी ।
विनवीतसे कर जोडूनि । क्षमा करणे
स्वामिया ॥४९॥
मंदमति आपणासी । दोष घडविले
पतीसी ।
नेले आपण परान्नासी । क्षमा करणे
स्वामिया ॥५०॥
चिंता करी द्विजवरू । म्हणे
स्वामी काय करू ।
दोष घडला अपारू । व्रतभंग झाला
म्हणोनि ॥५१॥
परान्न न घ्यावे म्हणोनि ।
संकल्प होता माझे मनी ।
मिळाली सती वैरिणी । दोष आपणा
घडविला ॥५२॥
ऐकोनि तयाचे वचन । श्रीगुरु
म्हणती हासोन ।
पुरविली स्त्रियेची वासना । आता
तिचे मन धाले ॥५३॥
कधी न वचे परान्नासी । वर्तेल
तुझ्या वाक्यासरसी ।
न करी चिंता मानसी । दोष तुज
नाही जाण ॥५४॥
आणिक एक सांगे तुज । जेणे धर्म
घडती सहज ।
अडला असेल एखादा द्विज ।
देवपितृकर्माविणे ॥५५॥
कोणी न मिळती विप्र त्यासी ।
जावे तेथे भोजनासी ।
जरी तेथे तू न जासी । अनंत दोष
असे जाण ॥५६॥
श्रीगुरूचे वचन ऐकोन । साष्टांगी
करी नमन ।
विनवीतसे कर जोडून । विनंति माझी
परियेसा ॥५७॥
अन्न घ्यावे कवणा घरी । घडतील
दोष कवणेपरी ।
जाऊ नये कवणा घरी । निरोपावे
स्वामिया ॥५८॥
विप्रवचन ऐकोन । श्रीगुरु सांगती
विस्तारोन ।
सावधान करून मन । ऐका श्रोते
सकळिक ॥५९॥
श्रीगुरु म्हणती विप्रासी । अन्न
घ्यावया घरे पुससी ।
गुरुभुवनादिकी हर्षी । जेवावे
शिष्यवर्गा घरी ॥६०॥
वैदिकादि विद्वज्जन । मातुळ
आपुला श्वशुर जाण ।
सहोदरादि साधुजन । तया घरि
जेवावे ॥६१॥
अडला विप्र ब्राह्मणाविण ।
त्याचे घरी घ्यावे अन्न ।
करावे गायत्रीजपन । दोष जाती
अवधारा ॥६२॥
विप्र म्हणे श्रीगुरूसी । विनंत
माझी परियेसी ।
निषिद्ध अन्न आम्हासी । कवण्या
घरी जेवू नये ॥६३॥
श्रीगुरु सांगती ब्राह्मणासी ।
अन्नवर्जित घरे ऐसी ।
अपार असे स्मृति चंद्रिकेसी ।
ऋषिसंमते सांगेन ॥६४॥
नित्य मातापितयांसी । सेवा घेती
अतिदोषी ।
जाऊ नये तया घरांसी । धनलोभिष्ठ
द्विजांघरी ॥६५॥
कलत्र पुत्र कष्टवोनि । धर्म करी
विप्रालागोनि ।
अन्ननिषेध तया भुवनी । दोष घडती
जेविल्या ॥६६॥
गर्विष्ठ चित्रक शस्त्रधारी ।
विप्र जाण मल्लयुद्ध करी ।
वीणा वाद्य ज्याचे घरी । न
घ्यावे अन्न ब्राह्मणाने ॥६७॥
बहिष्कारी विप्राघरी ।
याचकवृत्तीने उदर भरी ।
अन्न वर्जावे तया घरी ।
आत्मस्तुति परनिंदक ॥६८॥
बहुजन एक अन्न करिती । पृथक्
वैश्वदेव न करिती ।
वर्जावी अन्ने विप्रजाती ।
महादोष बोलिजे ॥६९॥
गुरु म्हणोनि समस्तांसी । आपण
मंत्र उपदेशी ।
शिष्य रहाटे दुर्वृत्तींसी ।
त्या गुरुघरी जेवू नये ॥७०॥
क्रोधवंत ब्राह्मण असे । अन्न न घ्यावे
त्या गृही ऐसे ।
स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे ।
जेवू नये तया घरी ॥७१॥
धनगर्वी तामसाघरी । कृपण
निर्द्रव्य व्यभिचारी ।
दांभिक दुराचारी विप्राघरी ।
अन्न तुम्ही वर्जावे ॥७२॥
पुत्रा पतीते सोडोनि । वेगळी असे
जे ब्राह्मणी ।
वर्जावे अन्न साधुजनी । महादोष
बोलिजे ॥७३॥
स्त्रीजित असे एखादा जरी । विप्र
सुवर्णाकार करी ।
सदा बहु याचक जरी । तया घरी न
जेवावे ॥७४॥
खळ राजसेवकाघरी । लोह काष्ठ छेदन
करी ।
वस्त्रधुत्या रजकाघरी । दान
विप्रे घेऊ नये ॥७५॥
मद्यपान नराघरी । याचने
उदरपूर्ति करी ।
वेश्मी सहजार असे नारी । दान
विप्रे न घ्यावे ॥७६॥
तस्करविद्या असे ज्यासी ।
द्वारपाळकाघरी परियेसी ।
न घ्यावे अन्न कुटिलासी । महादोष
बोलिजे ॥७७॥
द्रव्य घेउनी शूद्राकरी । अध्ययन
सांगे द्विजवरी ।
अन्न वर्जावे तया घरी । घोडी
विकी जो ब्राह्मण ॥७८॥
भागवतकीर्तन नाही घरी ।
द्यूतकर्मी अतिनिष्ठुरी ।
स्नानावीण भोजन करी । तया घरी
जेवू नये ॥७९॥
न करी संध्या सायंकाळी । दान न
करी कदा काळी ।
पितृकर्म वर्जिता कुळी । तया घरी
न जेवावे ॥८०॥
दंभार्थाने जो जप करी । अथवा
कापट्यरूपे जरी ।
द्रव्य घेवोनि जप करी । तया घरी
जेवू नये ॥८१॥
ऋण देऊन एखाद्यासी । उपकार दावी
परियेसी ।
द्रव्य सांची कलत्रेसी । तया घरी
जेवू नये ॥८२॥
विश्वासघातकी नराघरी । अनीति
पक्षपात करी ।
स्वधर्म सांडी दुराचारी ।
पूर्वजमार्ग सोडिल्या घरी ॥८३॥
विद्वज्जन ब्राह्मण साधूसी ।
एखादा करी अति द्वेषी ।
अन्न वर्जावे तुम्ही हर्षी । तया
घरी जेवू नये ॥८४॥
कुळदैवत माता पिता । सोडोनि जाय
जो परता ।
आपुलाले गुरूसी निंदिता । जेवू
नये तया घरी ॥८५॥
गोब्राह्मणवध करी । स्त्रीवधु नर
असे जरी ।
अन्न घेता दोष भारी । श्रीगुरु
म्हणती विप्रासी ॥८६॥
आशाबद्ध सदा नरु । धरूनि राहे
एका द्वारु ।
दान देता वर्जी जरु । जेवू नये
तया घरी ॥८७॥
समस्त जातीस करी शरण । तोचि
चांडाळ होय जाण ।
घेऊ नये त्याचे अन्न । नमन न करी
विप्रासी ॥८८॥
आपुल्या कन्याजामातेसी । क्रोधे
करून सदा दूषी ।
न घ्यावे अन्न त्या घरासी ।
निपुत्राचे घरी देखा ॥८९॥
पंचमहायज्ञ करी आपण । जेवी आणिकाचे
घरी अन्न ।
परपाक करी तया नाम जाण । तया घरी
जेवू नये ॥९०॥
विवाह झाला असता आपण ।
पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण ।
स्थालीपाकनिवृत्ति नव जाणे । न
जेवावे तया घरी ॥९१॥
घरचे अन्न दूषण करी । परान्नाची
स्तुति करी ।
अन्न वर्जावे तया घरी । श्वपच
नाम तयाचे ॥९२॥
भाणसपणे उदर भरी । अन्न घेता तया
घरी ।
डोळे जाती अवधारी । आंधळा होय
अल्पायुषी ॥९३॥
बधिर होय शरीरहीन । स्मृतिमेघा
जाय जाण ।
धृतिशक्ति जाय जाण । माणसाचे घरी
जेवू नये ॥९४॥
गृहस्थधर्मे असे आपण । दानधर्म न
करी जाण ।
अद्वैतशास्त्र बोलू जाणे । तया
घरी जेवू नये ॥९५॥
परगृही वास आपण । परान्न जेवी जो
ब्राह्मण ।
त्याचे जितुके असे पुण्य ।
यजमानासी जाय देखा ॥९६॥
तया यजमानाचे दोष । लागती त्वरित
भोजनस्पर्श ।
त्याचिकारणे निषिद्ध असे ।
परान्न तुम्ही वर्जावे ॥९७॥
भूदान गोदान सुवर्णदान ।
गजवाजीरत्नदान ।
घेता नाही महादूषण । अन्नदाना
अतिदोष असे ॥९८॥
समस्त दुष्कृत परान्नासी । घडती
देखा ब्राह्मणासी ।
तैसेचि जाणा परस्त्रियेसी । संग
केलिया नरक होय ॥९९॥
परगृही वास करिता । जाय आपुली
लक्ष्मी त्वरिता ।
अमावास्येसी परान्न जेविता ।
मासपुण्य जाय देखा ॥१००॥
अगत्य जाणे परान्नासी । न
बोलाविता जाय संतोषी ।
जाता होती महादोषी । शूद्रे
बोलाविता जाऊ नये ॥१॥
आपुल्या कन्येच्या घरासी । जाऊ
नये भोजनासी ।
पुत्र झालिया कन्येसी । सुखे
जावे अवधारा ॥२॥
सूर्यचंद्रग्रहणेसी । दान घेऊ
नये परियेसी ।
जात अथवा मृतसूतकेसी । जाऊ नये
परियेसा ॥३॥
ब्राह्मणपणाचा आचार । कवण रहाटे
द्विजवर ।
तैसे जरी करिती नर । त्यासी कैचे
दैन्य असे ॥४॥
समस्त देव त्याचे होती । अष्ट
महासिद्धि साधती ।
ब्राह्मणकर्मै आचरती । कामधेनु
तया घरी ॥५॥
विप्र मदांधे व्यापिले ।
आचारकर्मे सांडिले ।
याचिकारणे दरिद्री झाले ।
स्वधर्म नष्ट होऊनिया ॥६॥
विप्र विनवी स्वामीसी । आमुची
विनंति परियेसी ।
सकळ आचारधर्मासी । निरोपावे
दातारा ॥७॥
श्रीगुरुमूर्ति कृपासागरु ।
त्रिमूर्तीच्या अवतारु ।
भक्तजनांच्या आधारु । निरोपावे
आचार ब्राह्मणाचे ॥८॥
श्रीगुरु म्हणती तयासी ।
ब्राह्मणाचा आचार पुससी ।
सांगेन ऐक विस्तारेसी । पूर्वी
ऋषि आचरले जे ॥९॥
नैमिषारण्यी समस्त ऋषि । तप
करिती बहु दिवसी ।
आला पराशर ऋषि । म्हणोनि समस्त
वंदिती ॥११०॥
समस्त ऋषि मिळोन । विनविताती कर
जोडून ।
ब्राह्मणाचे आचरण । केवी करावे
म्हणती ते ॥११॥
आता आम्ही आचार करितो । तेणे
संशय मनी येतो ।
ब्रह्मऋषि तुम्ही म्हणूनि पुसतो
। तुमचा उपदेश आम्हा व्हावा ॥१२॥
गुरुमुखेवीण मंत्र । ग्राह्य
नव्हे हो पवित्र ।
तैसा श्रीगुरु तू सत्पात्र ।
आचार आम्हा सांगावे ॥१३॥
पराशर म्हणे ऋषींसी । सांगेन
आचार तुम्हासी ।
जेणे होय अप्रयासी । सर्व सिद्धि
पावती ॥१४॥
ब्राह्ममुहूर्ती उठोनि ।
श्रीगुरुस्मरण करोनि ।
मग ध्याव्या मूर्ति तिन्ही ।
ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥१५॥
मग स्मरावे नवग्रह । सूर्यादि
केतूसह ।
सनत्कुमार-सनक-सनंदन-सह ।
स्मरावे तये वेळी ॥१६॥
सह-नारद तुंबरु देखा । स्मरावे
सिद्ध योगी देखा ।
सप्त समुद्र असती जे का ।
स्मरावे सप्त पितृदेवता ॥१७॥
सप्त ऋषीते स्मरोनि । सप्त
द्वीपे सप्त भुवनी ।
समस्त नामे घेऊनि । ऐसे म्हणावे
प्रातःस्मरण ॥१८॥
मग उठावे शयनस्थानी । आचमन करोनि
दोनी ।
लघुशंकेसी जाऊनि । शौचाचमन करावे
॥१९॥
पराशर म्हणे ऋषींसी । ऐका
आचमनविधीसी ।
सांगतसे विस्तारेसी । जे जे समयी
करणे ऐका ॥१२०॥
स्नानापूर्वी अपर दोनी । उदक
प्राशिता येणेचि गुणी ।
निजता उठता समयी दोनी । आचमने
करावी ॥२१॥
अधोवायुशब्द झालिया । वोखटे
दृष्टी देखिलिया ।
दोन्ही वेळा आचमूनिया । शुचि
व्हावे परियेसा ॥२२॥
भोजनापूर्वी अपर दोनी । जांभई
आलिया शिंकलिया दोनी ।
लघुशंकाशौची दोनी । आचमन करावे
॥२३॥
जवळी उदक नसेल जरी । श्रोत्राचमन
करा निर्धारी ।
स्पर्श करावा अक्ष श्रोत्री ।
येणे पवित्र परियेसा ॥२४॥
ब्राह्मणाचे उजवे कानी । सप्त
देवता असती निर्गुणी ।
त्यासी स्पर्शिता तत्क्षणी ।
आचमनफळ असे देखा ॥२५॥
श्लोक । अग्निरापश्च चंद्रश्च
वरुणार्कैद्रवायवः ।
विप्रस्य दक्षिणे कर्णे नित्यं
तिष्ठन्ति देवताः ॥२६॥
टीका । त्या देवतांची नावे ऐका ।
सांगेन ऋषि सकळिका ।
अग्नि आप वरुणार्का । वायु इंद्र
चंद्र असती ॥२७॥
लघुशंकाचमन करोनि । तूष्णीम
स्नान करा सुमनी ।
बैसावे शुचि आसनी । अरुणोदय होय
तव ॥२८॥
गायत्रीमंत्रजपाव्यतिरिक्त ।
वरकड जपावे पवित्र ।
प्रगट होता अरुणोदित ।
बहिर्भूमीसी जाईजे ॥२९॥
यज्ञोपवीत कानी ठेवोनि । डोईल
पालव घालूनि ।
नैऋत्य दिशे जाऊनि । अधोमुखी
बैसावे ॥१३०॥
दिवसा बसावे उत्तरमुखी । रात्री
बैसावे दक्षिणमुखी ।
मौन असावे विवेकी । चहूकडे पाहू
नये ॥३१॥
सूर्यचंद्रनक्षत्रांसी । पाहू
नये नदी-आकाशी ।
स्त्रीजन लोक परियेसी । पाहू नये
कवणाते ॥३२॥
शौचाविणे कांस घाली । कांस न
काढी लघुशंकाकाळी ।
त्यासी होय यमपुरी अढळी । नरक
भोगी अवधारा ॥३३॥
अगत्य घडे उदकावीण । करूनिया
गंगास्मरण ।
मृत्तिकेने शौच करणे । भक्षणादि
वर्जावे ॥३४॥
बर्हिर्भूमि जावयासी । ठाऊ कैसा
परियेसी ।
ऐका समस्त तत्परेसी । म्हणे
पराशर सर्वाते ॥३५॥
न बैसावे भूमीवरी । बैसिजे
पानगवतावरी ।
हिरवी पर्णे करावी दुरी ।
वाळल्या पानी बैसावे ॥३६॥
जे ब्राह्मण उभ्या मुतती ।
त्यांसी ऐका कवण गति ।
त्यांचे रोमे अंगी किती ।
तावत्काळ वर्षे नरकी पडती ॥३७॥
मळविसर्जन करूनि । उठावे हाती
शिश्न धरूनि ।
जळपात्रापासी जाऊनि । शौच करावे
परियेसा ॥३८॥
मृत्तिकाशौच करावयासी । मृत्तिका
आणावी तुम्ही ऐसी ।
वारुळ मूषकगृह परियेसी । नदीमधील
आणु नये ॥३९॥
ज्या मार्गी लोक चालती । अथवा
वृक्षाखालील माती ।
देवालय क्षेत्रतीर्थी । मृत्तिका
आपण वर्जावी ॥१४०॥
वापी कूप तडागात । मृत्तिका
आणिता पुण्य बहुत ।
उदक करी घेऊनि प्रोक्षित ।
मृत्तिका घ्यावी शौचासी ॥४१॥
आवळ्याएवढे गोळे करावे ।
लिंगस्थानी एक लावावे ।
अपानद्वारी पाच स्वभावे । एकैका
हस्तासी तीन सप्ते ॥४२॥
एकैक पायासी सात वेळ । मृत्तिका
लावावी सकळ ।
आणिक सांगेन समय केवळ । ऋषि
समस्त परियेसा ॥४३॥
या मृत्तिका शौचविधान ।
मूत्रशंकेसी एक गुण ।
बहुर्भूमीसी द्विगुण ।
मैथुनाअंती त्रिगुण देखा ॥४४॥
आणिक प्रकार असे देखा । करावे
येणेप्रमाणे ऐका ।
जितुके करणे गृहस्थ लोका ।
द्विगुण करावे ब्रह्मचारी ॥४५॥
त्रिगुण करावे वानप्रस्थे ।
चतुर्गुण करावे यती समस्ते ।
न्यून पूर्ण करावे यापरते ।
धर्मसिद्धि होय देखा ॥४६॥
येणे प्रकारे करा दिवसी । रात्री
याच्या अर्धैसी ।
संकटसमयी या अर्धैसी । मार्गस्थे
अर्ध त्याहुनी ॥४७॥
व्रतबंध झालिया ब्राह्मणासी ।
हाच आचार परियेसी ।
हाचि उपदेश चहू वर्णासी ।
शौचविधि बोलिला ॥४८॥
शौच केलियानंतरी । चूळ भरावे
परिकरी ।
ब्राह्मणे आठ भरी । क्षत्रिये
सहा परियेसा ॥४९॥
वैश्ये चार शूद्रे दोनी वेळ ।
येणे विधि भरा चूळ ।
अधिक न करावे केवळ । म्हणे पराशर
ऋषि ॥१५०॥
चूळ भरावे आठ वेळा । आचमावे तीन
वेळा ।
शुचिस्थानी बैसून निर्मळा ।
कुळदेवता स्मरावी ॥५१॥
तूष्णीम् आचमन करावे । नाम घेता
चोवीस ठावे ।
आतळावे पुनः आचमावे । त्याचा
विधी सांगेन ॥५२॥
विप्रदक्षिणतळहाती । पाच तीर्थे
विख्यात असती ।
जे बोलिले असे श्रुती । सांगेन
तीर्थ अवधारा ॥५३॥
अंगुष्ठमूळ तळहातेसी । अग्निब्रह्मतीर्थ
परियेसी ।
तर्जनी अंगुष्ठ मध्यदेशी ।
पितृतीर्थ असे जाण ॥५४॥
चतुर्थ अंगुलीचे वरी । देवतीर्थ
अवधारी ।
कनिष्ठिका भागोत्तरी । ऋषितीर्थ
परियेसा ॥५५॥
तर्पण देवापितृऋषि । जे स्थानी
तीर्थै करावी हर्षी ।
आचमन ब्रह्मतीर्थेसी । करा
ब्राह्मण विद्वज्जन ॥५६॥
ब्रह्मतीर्थे आचमने तिन्ही ।
केशव नारायण माधव म्हणोनि ।
देवतीर्थ उदक सांडोनि । गोविंद
नाम उच्चारावे ॥५७॥
विष्णु मधुसूदन हस्त धुवोनि
दोन्ही । त्रिविक्रम वामन गाला स्पर्शोनि ।
बिंबोष्ठ तळहस्ते स्पर्शोनि ।
श्रीधर नाम उच्चारावे ॥५८॥
पुनरपि हस्त ह्रषीकेशी । पद्मनाभ
पादद्वय स्पर्शी ।
सव्य हस्त पंचांगुलीसी । दामोदर
शिखास्थानी ॥५९॥
चतुरंगुलि पृष्ठदेशी । संकर्षण
घ्राणेसी ।
तर्जनी आणि अंगुष्ठेसी । म्हणावा
वासुदेव प्रद्युम्न ॥१६०॥
अंगुष्ठ अनामिकेसी । नेत्रस्पर्श
श्रोत्रेसी ।
कनिष्ठिका अंगुष्ठेसी । अच्युत
नाभी म्हणावे ॥६१॥
पंचांगुली उपेंद्र देखा । हरी
श्रीकृष्ण भुजा एका ।
पाच अंगुली विधिपूर्वका । येणे
विधी स्पर्शावे ॥६२॥
विधी संध्याकाळी । आणिक करावे
वेळोवेळी ।
अशौच अथवा संकटकाळी । असती
विधाने ती ऐका ॥६३॥
देवतीर्थे तिन्ही घ्यावे । हस्त
प्रक्षाळा गोविंद नावे ।
मुख प्रक्षाळोनि मंत्र म्हणावे ।
संध्याव्यतिरिक्त येणेपरी ॥६४॥
विधान आणिक सांगेन । देवतीर्थे
तिनी घेऊन ।
गोविंदनामे हस्त धुवून । चक्षु
श्रोत्र स्पर्शावे ॥६५॥
शूद्रादि ओवाळियासी । स्पर्श
होता परियेसी ।
आचमनविधि ऐसी । गुरु म्हणती
ब्राह्मणाते ॥६६॥
भिजोनि आलिया पाउसात ।
द्विराचमने होय पुनीत ।
स्नान भोजनी निश्चित । द्विराचमन
करावे ॥६७॥
फलाहार भक्षण करिता । अथवा आपण
उदक घेता ।
आला असेल स्मशानी हिंडता
द्विराचमने शुद्ध होय ॥६८॥
उदक नसे जवळी जरी । श्रोत्राचमन
करा निर्धारी ।
आणिक असे एक परी । तूष्णीम आचमन
करावे ॥६९॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ।
आचमनविधि आहे ऐसी ।
जे करिती भक्तीसी । दैन्य कैचे
तया घरी ॥१७०॥
आता सांगेन विधान । करावया
दंतधावन ।
समस्त पर्वणी त्यजून । प्रतिपदा
षष्ठी वर्जावी ॥७१॥
न करावे नवमीद्वादशीसी ।
शनयर्कमंगळवारेसी ।
श्राद्धकाळी विवाहदिवसी । करू
नये दंतधावन ॥७२॥
कंटकवृक्षशाखेसी । ताडमाडकेतकीसी
।
खर्जूरनारिकेलशाखेसी । केलिया
जन्म चांडाळयोनी ॥७३॥
खदिरकरंजाआघाडेसी ।
औदुंबरार्कवटशाखेसी ।
अथवा वृक्ष करवंदेसी । पुण्य
वृक्ष ऐका तुम्ही ॥७४॥
विप्रे द्वादशांगुलेसी ।
नवांगुले क्षत्रियासी ।
षडांगुले वैश्यशूद्रांसी ।
दंतधावन काष्ठ आणावे ॥७५॥
दंतधावन काष्ठेसी । तोडिता
म्हणावे मंत्रासी ।
आयुः प्रज्ञा नाम परियेसी ।
म्हणोनि काष्ठ तोडावे ॥७६॥
दंतधावन करोनि ऐसे । काष्ठ
टाकावे नैऋत्य दिशे ।
चूळ भरोनि द्वादश । द्विराचमन करावे
॥७७॥
मग करावे प्रातःस्नान । तेणे होय
सर्व साधन ।
तेजोबलाआयुष्यवर्धन ।
प्रातःस्नान केलिया ॥७८॥
प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश । सकळ
दैवते होती वश ।
सौभाग्य सुख होती हर्ष ।
प्रातःस्नान केलिया ॥७९॥
यती तापसी संन्यासी । त्रिकाळ
करावे स्नानासी ।
ब्रह्मचारी विधींसी । एक वेळ
करावे ॥१८०॥
नित्य केलिया पापनाश असे । करावे
याचि कारणे हर्षे ।
गृहस्थे वानप्रस्थे विशेषे ।
प्रातर्मध्याह्नी करावे ॥८१॥
अशक्य संकट आले जरी । अथवा न
मिळे निर्मल वारि ।
स्नान करावयाचि परी । सांगेन ऐका
ब्राह्मणहो ॥८२॥
अग्निस्नान भस्मस्नान । अथवा करावे
वायुस्नान ।
करा विधीने मंत्रस्नान ।
आपोहिष्ठा मंत्राने ॥८३॥
आणिक स्नानफळे असती । ज्यास असेल
भावभक्ति ।
गुरुदेवता दर्शनमात्री ।
तीर्थस्नानफळ असे ॥८४॥
अथवा दर्शन मातापिता । चरणतीर्थ
भक्तीने घेता ।
अंगावरी प्रोक्षिता ।
तीर्थस्नानफळ असे ॥८५॥
अथवा भिजेल पर्जन्यांत । उभा
राहोनि वारा घेत ।
किंवा बैसावे गोधुळीत । स्नानफळ
असे देखा ॥८६॥
स्पर्श चांडाळा होता । जलस्नाने
होय शुचिता ।
शूद्राचा स्पर्श होता । उपस्नान
करावे ॥८७॥
दृढ असे तनु आपुले । स्नान मुख्य
करावे जले ।
संधि-विग्रह-साकडे पडले ।
उषःस्नान करावे ॥८८॥
प्रातःस्नान करावयासी । शीतोदक
उत्तम परियेसी ।
अशक्तता असेल देहासी । उष्णोदके
करावे ॥८९॥
स्वभावे पवित्र असे उदक । वरी
झालिया अग्निसंपर्क ।
पवित्र झाले उदक अधिक ।
गृहस्थासी मुख्य असे ॥१९०॥
उष्णोदके स्नान करिता । शीतोदक
करा मिश्रित ।
मध्ये करावे आचमन तत्त्वता ।
संकल्प तेथे म्हणावा ॥९१॥
घरी स्नान करिता देखा । अघमर्षण
तर्पण नव्हे निका ।
वस्त्रे पिळू नये ऐका । आपुले
हस्ते करूनिया ॥९२॥
पुत्रोत्साह संक्रांतीसी ।
श्राद्धकाळ मृतदिवसी ।
न करावे स्नान उष्णोदकेसी ।
अमावास्या पौर्णिमा ॥९३॥
स्नान करिता बांधा शिखा ।
दर्भहस्ती सूर्याभिमुखा ।
मौन असावे विवेका । कवणासवे न
बोलावे ॥९४॥
आपोहिष्ठा मंत्रेसी । गायत्री
तीन म्हणा सुरसी ।
येणेपरी स्नानोदकासी ।
अभिमंत्रावे ब्राह्मणे ॥९५॥
प्रथम शीतोदक घेऊनि । पश्चात उष्णोदक
मिळवोनि ।
स्नान करावे प्रतिदिनी ।
गृहस्थांनी घरी देखा ॥९६॥
अवधूत मंत्र म्हणत । वस्त्र
उकलावे त्वरित ।
उद्यंत मंत्र जपत । वस्त्र
सूर्यासी दाखवावे ॥९७॥
आचमन करूनि आपण देवस्यत्व मंत्र
जपोन ।
धूत वस्त्र नेसून । आणिक मंत्र
जपावे ॥९८॥
आवहंती वितन्वती मंत्रे ।
वस्त्रे नेसावी पवित्र ।
द्विराचमन करावे तंत्रे । वस्त्र
पिळोनि आचमन कीजे ॥९९॥
आता मंत्रस्नान करणे । सांगेन
त्याची विधाने ।
आपोहिष्ठादि मंत्राने ।
प्रोक्षावे शरीरावरी ॥२००॥
पाद मुर्ध्नी ह्रदयस्थानी ।
मूर्ध्नीं ह्रदय पाद प्रोक्षोनि ।
करावे तुम्ही मार्जनी ।
आपोहिष्ठा मंत्रेसी ॥१॥
ऐसे स्नान करोनि । पुनः आचमन
करोनि ।
मानसस्नान विधींनी । करावे ऐका
भक्तीने ॥२॥
नारायण विष्णूमूर्तीसी । स्नान
करावे भक्तीसी ।
चतुर्भुज अलंकारेसी । ध्यान
केलिया मानसन्मान ॥३॥
अपवित्रः पवित्रो वा । येणे
मंत्रे हरि ध्यावा ।
उदके देहे प्रोक्षावा । स्नानफळ
अवधारा ॥४॥
मंगलस्नानविधा । सांगेन ऐका
ब्राह्मण ।
रविवारी निषेध जाण । ज्वर होय
अंगासी ॥५॥
नदीतीरी असे नरु । अशक्त असे
शरीरु ।
गंगास्मरणे निर्धारु ।
आर्द्रवस्त्रे अंग पुसावे ॥६॥
कांतिहानि सोमवारासी । मंगळवारी
मृत्यु परियेसी ।
लक्ष्मी पावे बुधवारेसी । धनहानि
गुरुवारी ॥७॥
शुक्रवारी पुत्रघात । शनिवारी
अखिल संपत ।
जाणा ऐसे निश्चित । मंगलस्नान
करावे ॥८॥
नदीस्नान प्रवाहमुखी । घरी
प्रातःसूर्याभिमुखी ।
संध्याकाळी पश्चिममुखी । स्नान
करावे अवधारा ॥९॥
स्नान करिता नदीसी । अघमर्षण
करावे परियेसी ।
नमोऽग्नयेऽप्सुमते मंत्रेसी ।
नदीस्नान करावे ॥२१०॥
यदपांक्रूर मत्रेंसी । उदक
लोटावे द्विहस्तेसी ।
तीन वेळा लोटोनि हर्षी । इमं मे
गंगे जपावे ॥११॥
ऋतं च सत्यं च मंत्र जपत । स्नान
करावे गंगेत ।
नदीस्नानविधि ख्यात । करा तुम्ही
विप्रवर्ग ॥१२॥
रोदनांती वमनांती । मैथुनदुःस्वप्नदर्शनांती
।
स्नानावेगळे शुद्ध न होती ।
स्नान करावे अवधारा ॥१३॥
आता वस्त्रावे विधान । सांगेन
ऐका ऋषिजन ।
ओले वस्त्रे कासेवीण । नेसू नये
गृहस्थाने ॥१४॥
रक्तादि वस्त्र जीर्ण धोत्र ।
नेसूनि जे जन जप करीत ।
ते पुण्य जाय राक्षसांप्रत । एक
धोत्र असलिया ॥१५॥
श्वेतवस्त्र ब्राह्मणासी । मुख्य
असे परियेसी ।
उपवस्त्र वहिर्वासी ।
उत्तरवस्त्र म्हणिजे तया ॥१६॥
धोत्र नेसलिया नंतरी । विभूति
लावावी परिकरी ।
मंत्रविधान-पुरःसरी । भस्म धारण
करावे ॥१७॥
भस्म शुद्ध न मिळे जरी ।
गोपीचंदन लावावे परी ।
द्वारावती मुख्य धरी । वरकड
मृत्तिका अग्राह्य ॥१८॥
न मिळे द्वारावती देखा । करा
धारण गंगामृत्तिका ।
ऊर्ध्वपुंड्र असे निका ।
विष्णुसायुज्य होय तया ॥१९॥
पुष्टिकाम असे ज्यासी । लावावे
तेणे अंगुष्ठेसी ।
ज्यासी काम असे आयुधी ।
मध्यांगुली लावावे ॥२२०॥
अन्नकाम अनामिएसी । तर्जनी काम्य
मुक्तीसी ।
जे लाविती नखेसी । महापातक घडे
तया ॥२१॥
उत्तम रुंदी दशांगुली । मध्यम नव
आष्ट अंगुली ।
सप्त सहा पंचागुली । शूर्पाकार
लावावे ॥२२॥
चतुर्थ त्रीणि द्वयांगुली । अधम
पक्ष असे बोली ।
द्वादश नामे करा भली । विष्णुनाम
उच्चारित ॥२३॥
केशव म्हणावे ललाटस्थानी । नाभी
नारायण म्हणोनि ।
माधवनामे ह्रदयस्थानी ।
कमळपुष्पाकार देखा ॥२४॥
गोविंदनामे कंठेसी । विष्णुनामे
कटिप्रदेशी ।
दक्षिणभुजा मधुसूदनेसी । नाभी
उत्तर त्रिविक्रम ॥२५॥
वामन नामे बाहु देखा । श्रीधर
दक्षिणकर्णिका ।
ह्रषीकेश वामकर्णिका । पद्मनाभ
दक्षिणकटी ॥२६॥
दामोदर शिरस्थान । ऐका
ऊर्ध्वपुंड्रविधान ।
पापे जाती जळोन । गोपीचंदन
लाविता ॥२७॥
द्वारावती लावोनि । लावा भस्म
त्रिपुंड्रांनी ।
हरिहर संतोषोनि । साधे भुक्ति
मुक्ति देखा ॥२८॥
विवाहादि शोभन दिवसी ।
देवताकृत्य श्राद्धदिवसी ।
अभ्यंगानंतर सूतकेसी । गोपीचंदन
वर्जावे ॥२९॥
ब्रह्मयज्ञतर्पणासी । कुश सांगेन
विस्तारेसी ।
आहेत दश प्रकारेसी । नामे सांगेन
विख्यात ॥२३०॥
दूर्वा उशीर कुश काश । सकुद
गोधूम व्रीहि मौजीष ।
नागरमोथा दर्भ परियेसा । दश दर्भ
मुख्य असती ॥३१॥
नित्य आणावे दूर्वैसी । जरी न
साधे आपणासी ।
श्रावण भाद्रपदमासी । संग्रह
संवत्सरी करावा ॥३२॥
चारी दूर्वा विप्रासी । त्रीणि
क्षत्रिय-वैश्यासी ।
एक नेमिली शूद्रासी । चतुर्वर्णी
धरावे ॥३३॥
या दूर्वेची महिमा । सांगता असे
अनुपमा ।
अग्रस्थानी असे ब्रह्मा । मूळी
रुद्र मध्ये हरि ॥३४॥
अग्रभागी चतुरंगुल । ग्रंथी मूळी
द्वयांगुल ।
धारण करावे ब्रह्मकुळे । याची
महिमा थोर असे ॥३५॥
चक्र धरोनि विष्णु देखा । दैत्य
पराभवी ऐका ।
ईश्वर त्रिशूल धरिता देखा । राक्षसांतक
केवी होय ॥३६॥
इंद्र वज्रायुध धरिता ।
दैत्यगिरी विभांडी तत्त्वता ।
तैसे ब्राह्मण दूर्वा धरिता ।
पापदुरिते पराभवती ॥३७॥
जैसे तृणाचे बणवीसी ।
अग्निस्पर्श होता नाशी ।
तेवी आलिया पापराशि ।
दर्भस्पर्शै जळती देखा ॥३८॥
ब्रह्मयज्ञ जपसमयी । ग्रंथि
बांधावी कुशाग्री ।
वर्तुळाकार भोजनसमयी । धरावी
ब्राह्मणे भक्तीने ॥३९॥
कर्म आचरता दूर्वैसी । ग्रंथि
बांधावी परियेसी ।
अग्निस्पर्श कर्पूराशी । पाप
नाशी येणेपरी ॥२४०॥
एकादशांगुल प्रादेशमात्र ।
द्विदल असावे पवित्र ।
नित्य-कर्मासी हेच पवित्र ।
द्विदल जाणा मुख्य असे ॥४१॥
जपहोमादि दानासी । स्वाध्याय
पितृकर्मासी ।
सुवर्णरजतमुद्रिकेसी । कुशावेगळे
न करावे ॥४२॥
देवपितृकर्मासी देख । रजत करावे
सुवर्णयुक्त ।
तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका ।
सुवर्ण धरावे अनामिकेसी ॥४३॥
मुद्रिका असावी खड्गपात्री ।
कनिष्ठिकांगुली पवित्री ।
ग्राह्य नव्हे जीवंतपित्री ।
तर्जनांगुली मुद्रिका ॥४४॥
योगपट उत्तरी देखा ।
तर्जनीस्थानी रौप्यमुद्रिका ।
पायी न घालाव्या पादुका ।
गयाश्राद्ध न करावे ॥४५॥
नवरत्न मुद्रिका ज्याचे हाती ।
पापे त्यासी न लागती ।
एखादे रत्न असता हाती ।
मुद्रिका पवित्र ब्राह्मणासी ॥४६॥
प्रातःसंध्येच विधान । सांगेन
ऐका ऋषिजन ।
नक्षत्र असतांचि प्रारंभून ।
अर्घ्य सूर्योदयी द्यावे ॥४७॥
सूर्योदय होय तव । जप करीत उभे
असावे ।
उदयसमयी अर्घ्य द्यावे ।
तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ ॥४८॥
ऋषि पुसती पराशरासी । संध्या
करावया विधि कैसी ।
विस्तारोनि आम्हांसी । सांगावे
जी स्वामिया ॥४९॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ।
सांगेन संध्याविधिसी ।
ऐका तुम्ही तत्परेसी ।
पराशरस्मृतीसी असे ॥२५०॥
गायत्रीमंत्र जप करिता । शिखा
बांधावी तत्त्वता ।
आसन घालावे निरुता । दर्भपाणि
होउनी ॥५१॥
देवतीर्थे द्विराचमन । विष्णुनाम
स्मरोन ।
प्राणायाम विस्तारोन ।
न्यासपूर्वक करावे ॥५२॥
प्रणवाचा परब्रह्म ऋषि । गायत्री
नाम छंदासी ।
परमात्मा देवता परियेसी । म्हणा
प्राणायामे विनियोगः ॥५३॥
ॐ व्याह्रति सत्यज्ञानिया । नाभि
ह्रदय मूर्ध्नी स्पर्शावया ।
व्याह्रति सप्त अतिशया ।
प्रत्येक देवता ऋषि सांगेन ॥५४॥
व्याह्रति सप्तस्थानासी । ऐका
असे प्रजापति ऋषि ।
प्रत्येक देवता परियेसी । सप्त
नामे देवांची ॥५५॥
अग्निर्वायु गुरुः सूर्य ।
वरुणेंद्र विश्वदेव ।
सप्त व्याह्रति सप्त देव । छंद
सप्त सांगेन ॥५६॥
गायत्री आणि उष्णिका । अनुष्टुप्
बृहती पंक्ति पंचम ऐका ।
त्रिष्टुप् जगती छंद विशेखा ।
प्राणायामे विनियोगः ॥५७॥
ॐ भूः पादन्यास । ॐ भुवः जानु स्वः गुह्य ।
ॐ महः नाभि स्थान स्पर्शा । जनो
ह्रदय तपो कंठ ॥॥५८॥॥
ॐ भू र्ह्रदयाय नम इति । ॐ भुवः शिरसे स्वाहेति ।
ॐ स्वः शिखायै वषडिति । ॐ तत्सवितुर्वरेण्यं कवचाय हुं
॥२६०॥
ॐ भर्गोदेवस्य धीमहि नेत्रत्रयाय
वोषट् । धियोयोनः प्रचोदयात् अस्त्राय फट् ।
ॐ भूर्भु०इति दिग्बंधः । ऐसे षडंग
करावे ॥६१॥
प्राणायामे विनियोगः म्हणुनि ।
आपोस्तन स्पर्शोनि ।
ज्योतिर्नेत्रस्पर्शस्थानी । रसो
जिव्हामृतललाटे ॥६२॥
प्राणायाम करावयासी । प्रजापति
म्हणती ऋषि ।
देवतानामे परियेसी ।
ब्रह्माग्निवायु सूर्य असे ॥६३॥
ब्रह्मभूर्भुवःस्वः म्हणुनि ।
प्राणायाम करा तिन्ही ।
त्रिपदा गायत्री जप कोणी ।
जपणारासी सर्व सिद्धि ॥६४॥
गायत्रीची अधिदेवता ।
ब्रह्माग्निवायु सविता ।
ऋषि ब्रह्मा असे ख्याता । सप्त
लोकन्यास सांगेन ॥६५॥
पादन्यास भुर्लोक । भुवः जानु
अतिविशेख ।
स्वः गुह्य असे लोक । नाभिन्यास
महर्लोक ॥६६॥
जनो ह्रदय तपो ग्रीवे । भ्रुवोर्ललाटे
सत्यलोक म्हणावे ।
ऐसे शिरस्थान बरवे । सत्यलोक
म्हणती तयासी ॥६७॥
गायत्रीची प्रार्थना करूनि ।
प्राणायाम करा विधींनी ।
ब्रह्मचारी गृहस्थानी ।
पंचांगुली धरा परमेष्ठी ॥६८॥
वानप्रस्थ संन्यासी यती ।
अनामिकाकनिष्ठिकांगुष्ठेसी ।
ओंकारादि वायुपूरकेसी । दक्षिणनासापुटे
चढवावे ॥६९॥
वामनासापुटी विसर्जोनि । करा
प्राणायाम तिन्ही ।
येणेचि विधी करा मुनि ।
त्रिकालसंध्या कर्मै ॥२७०॥
आता करावे मार्जनेसी । सांगेन
ऐका समस्त ऋषि ।
जैसे अति स्मृतिचंद्रिकेसी ।
तेणे विधी सांगतो ॥७१॥
आपोहिष्ठेति सूक्तेसी ।
सिंधुद्वीप ऋषि गायत्री छंदेसी ।
आपोदेवता मार्जनासी । हा म्हणावा
विनियोग ॥७२॥
येणे मंत्रे म्हणोन । कुशपवित्रे
करा मार्जन ।
यस्य क्षयाय मंत्रे जाण । आपुले
पाद प्रोक्षावे ॥७३॥
आपोजनयथा मंत्रेसी । प्रोक्षावे
आपुल्या शिरसी ।
सूर्यश्चेति मंत्रेसी । उदक
प्राशन करावे ॥७४॥
हिरण्यवर्णसूक्तेसी । मार्जन
करावे परियेसी ।
द्रुपदादिवेति मंत्रेसी ।
घ्राणोनि उदक सोडावे ॥७५॥
आचमने करोनि दोन । मार्जनविधान
सांगेन ।
वामहस्ती पात्र धरून । मार्जन
करा विशेषी ॥७६॥
औदुंबर सुवर्ण रजत । काष्ठाचेही
असे पवित्र ।
ऐसे असे निर्मळ पात्र । वामहस्ती
उदक बरवे ॥७७॥
मृण्मय अथवा द्विमुख पात्र ।
भिन्न पात्र ते जाण अपवित्र ।
ते अग्राह्य देवपितरा । श्रीगुरु
म्हणती ब्राह्मणासी ॥७८॥
मार्जनसंख्या सांगेन ऐका । शिरसी
अष्ट पादे नवका ।
यस्य क्षयाय स्नान भुमिका ।
येणेपरी मार्जन ॥७९॥
आपः पुनन्तु मंत्रेसी ।
प्राशनोदक माध्याह्नेसी ।
अग्निश्चेति मंत्रेसी ।
सायंसंध्या करावी ॥२८०॥
प्राशनांती तुम्ही ऐका ।
द्विराचमन करा निका ।
आघ्राण करुनी सांडिजे ऐका । एक
आचमन करावे ॥८१॥
अर्घ्य द्यावयाचे विधान । सांगेन
ऐका ऋषिजन ।
गोश्रृंगाइतुके आकारोन । अर्घ्य
द्यावे मनोभावे ॥८२॥
गायत्रीमंत्र जपोनि ।
सायंप्रातर्द्यावी तिन्ही ।
हंसःशुचिषेति माध्याह्नी ।
अर्घ्य द्यावे अवधारा ॥८३॥
प्रातर्माध्याह्नी उभे बरवे ।
सायं अर्घ्य बैसोनि द्यावे ।
आचमन त्रिवारी करावे । करी
प्रदक्षिणा असावादित्य ॥८४॥
अर्घ्य द्यावयाचे कारण । सांगेन
कथा विस्तारोन ।
राक्षस मंदेह दारुण । तीस कोटि
आहेती देखा ॥८५॥
सूर्यासवे युद्धासी। नित्य
येतीपरियेसी ।
संदेह पडे देवांसी । सूर्या होईल
अपजय ॥८६॥
अपजय येता सूर्यासी । उदयास्तमान
न होय परियेसी ।
कर्मै न चालती ब्राह्मणांसी ।
स्वाहास्वधाकार न चाले ॥८७॥
स्वाहास्वधाकार रहाती । समस्त
देवांस उपवास होती ।
सृष्टि राहिली न होय उत्पत्ति ।
म्हणोनि उपाय रचियेला ॥८८॥
याचि कारणे अर्घ्य देती । तीचि
वज्रायुधे होती ।
जावोनि दैत्यांसी लागती ।
पराभविती प्रतिदिवसी ॥८९॥
दैत्य असती ब्रह्मवंश । त्यांसी
वधिलिया घडती दोष ।
प्रदक्षिणा करिता होय नाश ।
असावादित्य म्हणोनिया ॥२९०॥
ब्रह्महत्येचिया पातकासी ।
भूमिप्रदक्षिणा दोष नाशी ।
चार पावले फिरता कैसी ।
भूमिप्रदक्षिणा पुण्य असे ॥९१॥
संध्या करावयाचे स्थान । सांगेन
ऐका फलविधान ।
घरी करिता प्रतिदिन । एकचि फळ
अवधारा ॥९२॥
दश फळ ग्रामाबाहेर देखा । नदीस
केलिया शताधिका ।
पुष्करतीरी सहस्त्र ऐका ।
गंगासुरनदी कोटिफल ॥९३॥
सुरापान दिवा मैथुन । अनृतादि
वाक्ये पापे जाण ।
संध्या बाहेर करिता क्षण । जळती
दोष तात्काळी ॥९४॥
स्थाने असती जप करावयासी ।
विस्तारे सांगेन तुम्हासी ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ।
एकचित्ते परियेसा ॥९५॥
जप केलिया घरी ऐका । एकचि फल असे
देखा ।
बाहेर द्विगुणी फल अधिका ।
नदीतीरी त्रिगुण फल ॥९६॥
गोस्थळ वृंदावन देखा । दशगुण फल
अधिका ।
अग्निहोत्रस्थानी निका । शतगुणफल
अधिक असे ॥९७॥
तीर्थदेवता सन्निधानी ।
सहस्त्रफल असे निर्गुणी ।
शतकोटि फल हरिसन्निधानी ।
ईश्वरसंनिधानी अनंत फल ॥९८॥
जप करिता आसनासी । विधिनिषेध आहे
परियेसी ।
सांगेन ऐका तत्परेसी । पुण्य पाप
बोलिले असे ॥९९॥
काष्ठासनी बैसोनि जरी । जप करिता
मनोहरी ।
दुःख भोगी निरंतरी । अभागी पुरुष
तो होय ॥३००॥
पल्लवशाखांसी बसता । सदा होय
दुश्चिता ।
वस्त्रासनी दरिद्रता । पाषाणासनी
व्याधि होय ॥१॥
भस्मासनी व्याधिनाश । कंबलासनी
सुखसंतोष ।
कृष्णाजिनी ज्ञानप्रकाश ।
व्याघ्रचर्मी मोक्षश्री ॥२॥
कुशासनी वशीकरण । सर्व रोगांचे
उपहरण ।
पापे जाती पळोन । आयुःप्रज्ञा
अधिक होय ॥३॥
ओ इत्येक्षारकमंत्री । जपावा
तुम्ही पवित्री ।
ध्यान करावे गायत्री । समस्त
पापे हरती देखा ॥४॥
गायत्रीचे स्वरूप आता । अभिवन
असे वर्णिता ।
रक्तांगी वास रक्ता । हंस वाहन
असे देखा ॥५॥
अकार ब्रह्मा अधिदेवता । चतुर्भुजा
चतुर्वक्त्रा ।
कमंडलु अक्षसूत्रा । चाटु धरिला
असे करी ॥६॥
ऋग्वेद असे समागमी ।
अग्निहोत्रफल आवाहयामि ।
मग आयातु वरदा देवी । म्हणावे
ऐका ब्राह्मणाने ॥७॥
त्या मंत्रासी ऋषि देवता ।
गायत्रीसदृश असे ख्याता ।
प्रातःसंध्या तुम्ही करिता ।
विधि तुम्हा सांगेन ॥८॥
गायत्री देवता गायत्री अनुष्टुप
छंदः । ॐ आदित्य देवता देवा ।
हे प्रातःसंध्या म्हणता भेद ।
गायत्री देवता गायत्री छंदः ॥९॥
गायत्री आवाहने विनियोगः । ही
माध्याह्नसंध्या म्हणावी ।
सविता देवता गायत्री छंदः । सरस्वती
आवाहने विनियोगः ॥३१०॥
प्रातःसंध्येचे ध्यान । सांगेन
ऐका तुम्ही गहन ।
रक्तांगी रक्तवसन । हंसासनी आरूढ
असे ॥११॥
चतुर्बाहु चतुर्मुखी । कमंडलु
धरिला विशेखी ।
अक्षसूत्र चाटु हस्तकी ।
ऋग्वेदसहित अग्निहोत्र ॥१२॥
ऐसे ध्यान करोनि । मग म्हणावे
अक्षरज्ञानी ।
एकचित्ते असा ध्यानी । श्रीगुरु
म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥
ओंकार शिखामावाहयामि ।
छंदऋषीनावाहयामी ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि
॥१४॥
ऐसे म्हणोनि प्रातःकाळी । संध्या
करावी सुवेळी ।
आता सांगेन माध्याह्नकाळी ।
ध्यान आवाहनपूर्वक ॥१५॥
अभिभुरो सावित्रीध्यान ।
यौवनस्था माध्याह्न ।
सांगेन ऐका ऋषिजन । एकचित्ते
परियेसा ॥१६॥
श्वेतांगी श्वेतवस्त्र । वाहन
असे वृषभ पवित्र ।
उकार रुद्रगण दैवत । पंचमुखा असे
देखा ॥१७॥
वरद अभयहस्त देखा ।
रुद्राक्षमाळा त्रिशूलधारका ।
यजुर्वेद असे देखा । अग्निष्टोम
फल जाणा ॥१८॥
ओंकारशिखामावाहयामि । छंदऋषीनावाहयामि
।
श्रियमावाहयामि । ह्रियमावाहयामि
॥१९॥
आता सायंसंध्या ध्यान । सांगेन
ऐका विधान ।
एकचित्ते ऐका वचन । ध्यानपूर्वक
सांगेन ॥३२०॥
अभिभूरो सरस्वती वृद्धा । जाणावी
तुम्ही सायंसंध्या ।
कृष्णांगी कृष्णवस्त्रपरिधाना ।
गरुडवाहन असे देखा ॥२१॥
मकार विष्णुदेवता । चतुर्भुज
शंखचक्रधृता ।
गदापद्मधारणहस्ता । सामवेदसहित
जाणा ॥२२॥
वाजपेयफल जाण । सायंसंध्या असे
ध्यान ।
करावे ऐका तुम्ही ब्राह्मण ।
म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥२३॥
ओंकारशिखामावाहयामि ।
छंदऋषीनावाहयामि ।
श्रियमावाहयामि । बलमावाहयामि
॥२४॥
पंचशीर्षोपनयने विनियोगः ।
प्रणवस्य परब्रह्म ऋषिः ।
परमात्मा देवता । गायत्री छंदः
॥२५॥
उदात्तस्वरित स्वरः अग्निर्वायुः
सूर्यदेवता । गायत्री त्रिष्टुप् जगती छंदः ।
ब्रह्माविष्णुमहेश्वरादेवताः ।
ऋग्यजुःसामानि स्वरूपाणि ॥२६॥
आहवनीयाग्निगार्हपत्य ।
दक्षिणाग्निउपस्थानानि ।
पृथिव्यंतरिक्षं द्यौस्तत्त्वानि
। उदात्तानुदात्तस्वरितस्वराः ॥२७॥
पीतविद्युतश्वेतवर्णी ।
प्रातर्मध्याह्नतृतीयसवनानि ।
विश्वतजसप्राज्ञस्वरूपिणी ।
जागृतीस्वपन्सुषुप्त्यवस्था ॥२८॥
ऐसे त्रिपदा गायत्रीसी ।
सांगितले त्रिविध ध्यानासी ।
आता विधान जपासी । सांगेन ऐका
एकचित्ते ॥२९॥
ममोपात्तदुरितक्षयद्वारा ।
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जपे विनियोगः ।
ॐ अं नाभौ । वं ह्रदये मं कंठे
॥३३०॥
भूः अक्षरमंत्रासी । गायत्री असे
छंदेसी ।
अग्निर्देवता परिएय्सी ।
विश्वामित्र ऋषि देखा ॥३१॥
षड्ज स्वर श्वेत वर्ण ।
पादस्पर्श उच्चारोन ।
प्राणायामे विनियोगून । दुसरी
व्याह्रति म्हणावी ॥३२॥
भुवः अक्षरमंत्रासी । उष्णिक्
नाम छंदासी ।
वायुर्देवता परियेसी । भृगु ऋषि
असे जाण ॥३३॥
असे रूप श्यामवर्ण । पादस्पर्श
रूप उच्चारोन ।
करा तुम्ही ऐसे ध्यान ।
जानूमध्ये न्यासावे ॥३४॥
प्राणायाम विनियोग म्हणोनि ।
न्यास करावे भक्तिभावनी ।
स्वः व्याह्रति म्हणोनि । ध्यान
करा भक्तीने ॥३५॥
स्वः व्याह्रतिमंत्रासी । म्हणा
अनुष्टुप् छंदासी ।
सविता देवता परियेसी । भारद्वाज
ऋषि जाण ॥३६॥
स्वर गांधार पीतवर्णा । कंठी
स्पर्शोन मंत्र म्हणा ।
प्राणायामे विनियोग जाणा । तृतीय
व्याह्रतिमंत्रासी ॥३७॥
ॐ महः मंत्रासी । बृहती छंदासी ।
बृहस्पति देवता परियेसी । वसिष्ठ
ऋषि निर्धारे ॥३८॥
मध्यम स्वर पिशंग वर्ण । ऐसे करा
तुम्ही ध्यान ।
वेगे म्हणा नाभी स्पर्शोन ।
प्राणायामे विनियोगः ॥३९॥
जन मंत्र उच्चारासी । म्हणा
पंक्ति छंदासी ।
वरुण देवता गौतम ऋषि । पंचम स्वर
असे जाण ॥३४०॥
रूप असे नीलवर्ण । करा न्यास
ह्रदयस्थान ।
प्राणायामे विनियोगून । जनः पंच
न्यास ऐसे ॥४१॥
तपः मंत्र न्यासासी । त्रिष्टुप्
छंद परियेसी ।
ईश्वर देवता कश्यप ऋषि । धैवत
स्वर परियेसा ॥४२॥
असे आपण लोहवर्ण । स्पर्श करावे
कंठस्थान ।
प्राणायामे विनियोगून । न्यास
करावा ब्राह्मणहो ॥४३॥
सत्यं म्हणतसे मंत्रासी । करावे
जगती छंदासी ।
विश्वेदेव अंगिरस ऋषि । निषाद
स्वर जाणावा ॥४४॥
रूप असे कनकवर्ण । भ्रुवोर्ललाटा
स्पर्शून ।
प्राणायामे विनियोगून । न्यास
करावा भक्तीने ॥४५॥
इतुके न्यास करोनि । हस्त ठेवा
शिरस्थानी ।
ध्यान करा विधानी । सांगेन ऐका
ब्राह्मणहो ॥४६॥
शिरस्थान स्पर्शासी । म्हणा
अनुष्टुप् छंदासी ।
उच्चार प्रजापति ऋषि । परमात्मा
देवता जाण ॥४७॥
प्राणायामे विनियोगून । मग करावे
गायत्रीध्यान ।
ॐ आपोज्योति म्हणोन । मंत्र म्हणा
भक्तीने ॥४८॥
ॐ आपोज्योतिरसोमृतं ।
ब्रह्मभूर्भुवःस्वरो ।
शिरसी येणे विधी । अंगन्यास
करावे ॥४९॥
चोवीस अक्षरे मंत्रासी । न्यास
सांगेन एकाएकासी ।
एकचित्ते परियेसी । म्हणे पराशर
ऋषि तो ॥३५०॥
या त्रिपदा गायत्रीसी । असे
विश्वामित्र ऋषि ।
देवी गायत्री छंदेसी । वर्ण
देवता सांगेन ॥५१॥
ऐसे त्रिपदा गायत्रीमंत्रासी ।
चोवीस अक्षरे परियेसी ।
पृथक् न्यास परियेसी । सांगेन
ऐक द्विजोत्तमा ॥५२॥
तवर्णाक्षर मंत्रासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
अग्नि देवता परियेसी गायत्री छंद
म्हणावा ॥५३॥
अतसीपुष्पे वर्णै जैसी । तद्रूप
वर्ण असे परियेसी ।
वायव्य कोण स्थान त्यासी ।
गुल्फन्यास करावा ॥५४॥
त्सवर्णाक्षर मंत्रासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
वायुदेवता परियेसी । देवी
गायत्री छंद देखा ॥५५॥
जंघस्थानी असे न्यास । सौम्यरूप
पिवळे सुरस ।
सर्व पापे दहती परियेस ।
त्सवर्णाचे लक्षण ॥५६॥
विवर्णनाम अक्षरासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
सोमदेवता परियेसी । देवी गायत्री
छंद देखा ॥५७॥
न्यास करावया जानुस्थान ।
इंद्रनील विद्युद्वर्ण ।
ऐसे अक्षरविधान । महारोग हरती
देखा ॥५८॥
तुवर्ण नाम अक्षरासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
विद्युद्देवता परियेसी । देवी
गायत्री छंद देखा ॥५९॥
न्यास करा जानुस्थानी । दीप्ति
असे जैसा वह्नि ।
रूप असे सौम्यपणी ।
भ्रूणहत्यापाप नाशी ॥३६०॥
र्ववर्ण अक्षरासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
सोम देवता परियेसी । देवी
गायत्री छंद देखा ॥६१॥
सुवर्णस्फटिककांति । गुह्यस्थानी
न्यास बोलती ।
समस्त अघौघ नाशती ।
रूपार्ववर्णस्थाना उत्तम ॥६२॥
रेवर्ण नाम अक्षरमंत्रासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
वरुण देवता परियेसी । देवी
गायत्री छंद देखा ॥६३॥
णिकार वृषणस्थान जाणा ।
विद्युत्प्रकाशरूपधारणा ।
बार्हस्पत्यनाम खुणा ।
अभक्ष्यपापक्षालन ॥६४॥
णिवर्णाक्षर मंत्रासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
बृहस्पति देवता परियेसी । देवी
गायत्री छंद देखा ॥६५॥
यं कटिस्थान शांताकारवर्ण ।
देहहत्यापापज्वलन ।
न्यास करावे सगुण । विद्वज्जन ब्राह्मणा
॥६६॥
यं अक्षर म्हणावयासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
तारका दैवत परियेसी । देवी
गायत्री छंद असे ॥६७॥
भकारा नाभी करा न्यास ।
कृष्णमेघवर्ण सुरस ।
पर्जन्य देवता संकाश ।
गुरुहत्यापाप नाशी ॥६८॥
भवर्ण नाम अक्षरासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
पर्जन्य देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥६९॥
र्गो अक्षरा उदर न्यास । ध्यान
रक्तवर्ण सुरस ।
इंद्र देवता परियेस । गोहत्येचे
पाप जाय ॥३७०॥
गोवर्ण नाम अक्षरासी । जाणावा
विश्वामित्र ऋषि ।
इंद्र देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥७१॥
देकारन्यास स्तनासी । गंधर्व नाम
देव परियेसी ।
स्त्रीहत्यापाप नाशी । एकचित्ते
परियेसा ॥७२॥
देवर्ण नाम अक्षरासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
गंधर्व देवता परियेसी । देवी
गायत्री छंद देखा ॥७३॥
वकार ह्रदयस्थानन्यास । शुक्ल
रूप वर्ण परियेस ।
पूषा देवता असे त्यास ।
वाणीजातपाप नाशी ॥७४॥
ववर्णाक्षर मंत्रासी । जाणावा
विश्वामित्र ऋषि ।
रुद्र देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥७५॥
स्य अक्षरा कंठन्यास । कांचनवर्ण
रूप सुरस ।
मित्र देवता परियेस ।
मार्जारकुक्कुटपाप जाय ॥७६॥
स्यवर्ण अक्षर मंत्रासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
मित्र देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥७७॥
धीकाराक्षरमंत्र दंती न्यास ।
शुक्लकुमुदसंकाश ।
त्वष्टा देवता परियेस ।
पितृहत्यापाप जाय ॥७८॥
धीवर्ण नाम अक्षरासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
विष्णु देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाण ॥७९॥
मकारन्यास तालुस्थान । पद्म
तेजोमय जाण ।
वासुदेव असे खूण । सर्वजन्मपाप
जाय ॥३८०॥
मकार वर्णाक्षरमंत्रासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
वासुदेव देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥८१॥
हिकार नासिकी करा न्यास ।
शंखवर्ण असे त्यास ।
वासुदेव देवता परियेस । सर्व पाप
हरण होय ॥८२॥
हिवर्ण नाम मंत्रासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
मेरु देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥८३॥
धिकारा नेत्रस्थानी न्यास ।
पांडुरभास संकाश ।
सोम देवता परियेस । पाणिग्रहणपाप
नाशी ॥८४॥
धिवर्ण नाम मंत्रासी । तोचि
विश्वामित्र ऋषि ।
सोमदेवता परियेसी । देवी गायत्री
छंद जाणा ॥८५॥
योकाराक्षर मंत्रासी ।
भुवोर्मध्ये न्यासिजे त्यासी ।
रक्तगौरवर्ण रूपेसी ।
प्राणिवधपाप जाय ॥८६॥
योकाराक्षर नामाक्षरासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
यमदेवता परियेसी । देवी गायत्री
छंद जाणा ॥८७॥
योकार ललाटस्थानी न्यास । रूप
रुक्मांभसंकाश ।
सर्व पाप होय नाश । भक्तिपूर्वक
न्यासावे ॥८८॥
योवर्णाक्षर मंत्रासी । तोचि
विश्वामित्र ऋषि ।
विश्वे देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥८९॥
नकारा उदित प्राङ्मुखा ।
सूर्यासमान तेज देखा ।
आश्विनौ देवता असे निका ।
विराजमान परियेसा ॥३९०॥
नकाराक्षर वर्णासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
अश्विनौ देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥९१॥
प्रकाराक्षरन्यास करोनि दक्षिणे
। रूप असे नीलवर्ण ।
प्रजापति देवता जाण ।
विष्णुसायुज्य पाविजे ॥९२॥
प्रवर्णाक्षर मंत्रासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
प्रजापति देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥९३॥
चोकार वर्ण मंत्रासी । न्यासिजे
तया पश्चिम भागासी ।
कुंकुमरूपवर्ण त्यासी ।
सर्वदेवपदवी पाविजे ॥९४॥
चोकार वर्ण मंत्राक्षरासी ।
जाणावा विश्वामित्र ऋषि ।
सर्व देवता परियेसी । गायत्री
देवी छंद जाणा ॥९५॥
दकाराक्षराचा उत्तरे न्यास ।
शुक्लवर्ण रूप सुरस ।
करावे तुम्ही ऐसे न्यास ।
कैलासपद पाविजे ॥९६॥
दकाराक्षर मंत्रासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
रुद्र देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥९७॥
याकार मूर्धास्थानी न्यास ।
सुवर्णरूप सुरस ।
ब्रह्मस्थाना होय वास । श्रीगुरु
म्हणती ब्राह्मणासी ॥९८॥
यावर्णाक्षर मंत्रासी । असे
विश्वामित्र ऋषि ।
ब्रह्म देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥९९॥
तकार न्यास शिखास्थानी । निरुपम
वैष्णवभुवनी ।
विष्णुरूप धरोनि । वैकुंठवास होय
जाणा ॥४००॥
तकार वर्णाक्षरमंत्रासी । जाणा
विश्वामित्र ऋषि ।
विष्णु देवता परियेसी । देवी
गायत्री छंद जाणा ॥१॥
ऐसे चोवीस अक्षरमंत्रासी । न्यास
करावे विधींसी ।
हस्त ठेवोनिया शिरासी । आणिक
न्यास करावे ॥२॥
शिरस्थानी न्यासासी । म्हणावे
अनुष्टुप् छंदासी ।
ख्याति प्रजापति ऋषि । परमात्मा
देवता जाणा ॥३॥
प्राणायामे विनियोग म्हणोनि । ओं
आपोस्तन स्पर्शोनि ।
ज्योतिर्नेत्र स्पर्शोनि ।
रसोजिह्वा न्यासावे ॥४॥
अमृतेति ललाटेसी । मूर्घ्नि
स्पर्शोनि ऐसी ।
ब्रह्मभूर्भुवःस्वरोमासी । न्यास
करा येणे विधी ॥५॥
इतुके न्यास करोनि । गायत्री
त्रिवार म्हणोनि ।
व्यापक न्यास करोनि । करशुद्धि
करा तीन वेळा ॥६॥
भुः० स्वः० विन्यसोनि ।
गायत्रीच्या दश पदांनी ।
दशांगुली न्यासोनि । पादप्रमाण
करावे ॥७॥
अंगुष्ठमूल धरोनि । कनिष्ठिका
स्पर्शोनि ।
उभय हस्त न्यासोनि । दशपादांगुली
न्यासावे ॥८॥
चोवीस अक्षरमंत्रासी ।
अंगुलिन्यास करा हर्षी ।
तर्जनीमूलादारभ्येसी ।
कनिष्ठिकापर्यंत ॥९॥
द्वादशाक्षरी अकैक हस्त । करावे
न्यास सुनिश्चित ।
षडंगन्यास समस्त । प्रणवासहित
करावे ॥४१०॥
ॐ भूः हिरण्यात्मने ।
अंगुष्ठाभ्यां नमः ।
ॐ भुवः प्रजापत्यात्मने ।
तर्जनीभ्यां नमः ॥११॥
ॐ स्वः सूर्यात्मने मध्यमाभ्यां
नमः ।
ॐ महः ब्रह्मात्मने अनामिकाभ्यां
नमः ।
ॐ जनः, ॐ तपः ॐ सत्यं, कनिष्ठिकाभ्यां नमः ।
प्रचोदयात् करतलकरपृष्ठाभ्यां
नमः ॥१२॥
ॐ तत्सवितुः अंगुष्ठाभ्यां
ह्रदयाय नमः ।
वरेण्यं तर्जनीभ्यां शिरसे
स्वाहा ।
भर्गोदेवस्य मध्यमाभ्यां शिखायै
वषट् ।
धीमहि अनामिकाभ्यां कवचाय हुं
॥१३॥
धियोयोनः कनिष्ठिकाभ्यां
नेत्रत्रयाय वौषट् ।
प्रचोदयात् करतलकरपृष्ठाभ्यां
अस्त्राय फट् ।
उभयहस्तांगुलिन्यासं कुर्यात् ।
अथ षडंगन्यासः ॥१४॥
ॐ भूः हिरण्यात्मने ह्रदयाय नमः
। ॐ भुवः प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा ।
ॐ स्वः सूर्यात्मने शिखायै वौषट्
। ॐ महः ब्रह्मात्मने कवचाय हुं ॥१५॥
ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यं, सोमात्मने । नेत्रत्रयाय वौषट्
।
प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय
फट् । ॐ तत्स० ह्रदयाय नमः ॥१६॥
ॐ वरेण्यं शिरसे स्वाहा
।भर्गोदेवस्य शिखायै वौषट् । धीमहि कवचाय हुं ।
धियोयोनः नेत्रत्रयाय वौषट् ।
प्रचोदयात अस्त्राय फट् ॥१७॥
षडंगन्यास करोनि । अंगन्यास
दशस्थानी ।
त्यांची नावे सांगेन कानी ।
एकचित्ते अवधारा ॥१८॥
पादजानुकटिस्थानी ।
नाभिह्रदयकंठभुवनी ।
तालुनेत्र स्पर्शोनि । ललाटशिरी
दशस्थान ॥१९॥
गायत्रीमंत्राच्या दहा पदांसी ।
दशस्थान अंगन्यासासी ।
तत्सवितुर्वरेण्येसी ।
भर्गोदेवस्य पंचम स्थान ॥४२०॥
धीमहि म्हणजे षष्ठ स्थान । धियो
सप्तम स्थान जाण ।
योकारो अष्टम अंगन्यास पूर्ण ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥२१॥
नकार नवम मंत्रस्थान ।
प्रचोदयात् दहावे जाण ।
अंगन्यास येणे गुण । करा तुम्ही
द्विजोत्तमा ॥२२॥
चतुर्विशति अक्षरांसी । करावे
अंगन्यासासी ।
पादांगुष्ठस्पर्श हर्षी ।
शिखादारभ्य न्यासावे ॥२३॥
अंगुष्ठाभ्यां नमः । त्सं
गुल्फयोर्नमः ।
विं जंघर्योर्नमः । तुं
जानुभ्यां नमः ॥२४॥
व ऊरुभ्यां नमः । रें गुह्याय
नमः ।
णीं वृषणाय नमः । यं कटिभ्यां
नमः ॥२५॥
भं नाभ्यै नमः । र्गौ उदराय नमः
।
दें स्तनाभ्यां नमः । वं ह्रदयाय
नमः ॥२६॥
स्यं कंठाय नमः । धीं दंतेभ्यो
नमः ।
मं तालवे नमः । हिं नासिकायै नमः
॥२७॥
धिं नेत्राभ्यां नमः । यों
भ्रुवोर्मध्याय नमः ।
यों ललाटाय नमः । नः प्राङ्मुखाय
नमः ॥२८॥
प्रं दक्षिणमुखाय नमः । चों
पश्चिममुखाय नमः ।
दं उत्तरमुखाय नमः । यां
मूर्ध्ने नमः । तं शिखायै वषट् ॥२९॥
ऐसे न्यास करोनि । पुनः
पादांगुष्ठ धरोनि ।
कटिपर्यंत न्यासोनि ।
ऊर्ध्वन्यास करावे ॥४३०॥
तकारा अंगुष्ठस्थान । त्सकार
गुल्फ असे स्थान ।
विकार जंघास्थान । ऐका ब्राह्मणा
म्हणती गुरु ॥३१॥
तुकार जानूर्वकार ऊरवे । वकार
गुह्यपूर्वक स्पर्श ।
णिकारा वुषणस्थान बरवे । तुकार
कटिस्थान न्यास ॥३२॥
शिखा धरोनि पादपर्यंत । करावे
न्यास उतरत ।
त्याते सांगेन आदिअंत । एकचित्ते
परियेसा ॥३३॥
तं नमः शिकायै विन्यस्य । यां
नमः मुर्ध्नि विन्यस्य ।
दं नमः उत्तरशिखायां न्यस्य । चो
नमः पश्चिमशिखायां ॥३४॥
प्रं नमः दक्षिणशिखायां । नं नमः
प्राङ्मुखे ।
यो नमः ललाटे । यो नमः
भ्रुवोर्मध्यी ॥३५॥
धिं नमः नेत्रत्रये । हिं नमः
नासिकयोः ।
मं नमः तालौ । धी नमः दंतेषु
॥३६॥
स्यं नमः कंठे । वं नमः ह्र्दये
। दें नमः स्तनयोः ।
र्गौ नमः उदरे । भं नमः नाभौ
॥३७॥
प्रणवादि नमोत न्यास करावे ।
आकार नाभी उकार ह्रदये ।
मकार मुखे नकार ललाटे । मकर
शिरसि हस्तेन नमस्कृत्वा ॥३८॥
अथ मुद्रासंपुटप्रकारी ।
चतुर्विशति अवधारी ।
सांगेन त्यांचा विस्तार परी ।
ऐका ब्राह्मण एकचित्ते ॥३९॥
श्लोक । सुमुखं संपुटं चैव विततं
विस्तृतं तथा ।
द्विमुखं त्रिमुखं चैव
चतुःपंचमुखं तथा ॥४४०॥
षण्मुखाधोमुखं चैव व्यापकांजलिकं
तथा ।
शकटं यमपाशं च ग्रंथितं
चोल्मुकोल्मुकम ॥४१॥
प्रलंबं मुष्टिकं चैव
मत्स्यकूर्मो वराहकम् ।
सिंहाक्रांतं महाक्रांतं मुद्गरं
पल्लवं तथा ॥४२॥
एता मुद्रा न जानाति गायत्री
निष्फला भवेत् ।
एता मुद्रास्तु कर्तव्या गायत्री
सुप्रतिष्ठिता ॥४३॥
अस्यार्थः । सुमुखं ॥१॥ संपुटं
॥२॥ विततं ॥३॥
विस्तृतं ॥४॥ द्विमुखं ॥५॥
त्रिमुखं ॥६॥
चतुर्मुखं ॥७॥ पंचमुखं ॥८॥
षण्मुखं ॥९॥
अधोमुखं ॥१०॥ व्यापकांजलिकं ॥११॥
शकटं ॥१२॥ यमपाशं च ॥१३॥
ग्रंथितं ॥१४॥
चोल्मुकोल्मुकं ॥१५॥ प्रलंबं
॥१६॥
मुष्टिकं ॥१७॥ मत्स्यः ॥१८॥
कूर्मः ॥१९॥ वराहः ॥२०॥
सिंहाक्रांतं ॥२१॥ महाक्रांतं
॥२२॥
मुद्गरं ॥२३॥ पल्लवं ॥२४॥
मुद्राविण गायत्रीमंत्र । जप
करितां सर्व व्यर्थ ।
या कारणे करावे पात्र ।
मुद्रापूर्वक जप करावा ॥४४॥
गौप्प्य करावा मुद्रायुक्त ।
प्राणायाम करा निश्चित ।
समस्त पापक्षयार्थ । म्हणोनि
अष्टोत्तरीय संकल्पावे ॥४५॥
या गायत्रीप्रथमपादासी । म्हणा
ऋग्वेद असे ऋषि ।
भूमितत्त्व परियेसी । ब्रह्मा
देवता त्रिष्टुप् छंद ॥४६॥
द्वितीयपाद गायत्रीसी । यजुर्वेद
असे ऋषि ।
रुद्रदेवता
प्राणापानव्यालतत्त्वेसी । जगती म्हणा अहर्निशी ॥४७॥
गायत्री तृतीयपादासी । ऋग्यजुः
सामतत्त्व परियेसी ।
विष्णु देवता त्रिष्टुप छंदेसी ।
समस्तपापक्षयार्थ विनियोग ॥४८॥
भूमिस्तंभ परियेसी । गायत्री
छंदासी ।
म्हणावे ब्रह्मपदासी । ब्रह्मा
दैवत जाणावे ॥४९॥
गायत्रीचे ध्यान । सांगेन तुम्हा
विधान ।
एकचित्ते करा पठण । श्रीगुरु
म्हणती ब्राह्मणासी ॥४५०॥
श्लोक ।
मुक्ताविदुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां
तत्त्वार्थवर्णात्मिकाम् ।
गायत्री वरदाभयांकुशकशां शुभ्रं
कपालं गदां शंखं चक्रमथारविदयुगलं हस्तैर्वहन्ती भजे ॥५१॥
ऐसे ध्यान करोनि । जप करावा
नासिकाग्रनयनी ।
अंती षडंग न्यासोनि । जप करा
येणेपरी ॥५२॥
गायत्रीमंत्राची प्रशंसा ।
एकचित्ते परियेसा ।
मंत्रनाम असे विशेषा । अक्षरे
दोनी पाप हरे ॥५३॥
मकार म्हणजे आपुले मन । त्रकार
नाम आपुला प्राण ।
मन प्राण एकवटोन । जप करावा
एकचित्ते ॥५४॥
जप म्हणजे अक्षरे दोनी ।
प्रख्यात असती त्रिभुवनी ।
जकार जन्म विच्छेदोनि । पकारे
जन्मपाप दुरी ॥५५॥
चारी वेदांस मूळ एका ।
गायत्रीनाम नाशी पातका ।
याचि कारणे करावा निका ।
वेदपठणफळ असे ॥५६॥
ऐसा मंत्र न जरी जपे नर । वृथा
जन्म जैसा सूकर ।
जप करा हो निर्धार । चिंतिले फल
पाविजे ॥५७॥
न करावा उदकी बैसोन । त्वरित होय
प्रज्ञाहीन ।
याचि कारणे सांगेन विस्तारोन ।
अग्नि तीनि विप्रमुखी ॥५८॥
आहवनीय गार्हपत्य । दक्षिणाग्नि
तिसरा विख्यात ।
अग्निउदकसंपर्कै त्वरित । तेजत्व
जाय अग्नीचे ॥५९॥
या कारणे उदक वर्जोनि । बैसिजे
उत्तम आसनी ।
हस्तस्पर्शी नाभिस्थानी । जपावा
माळ धरोनिया ॥४६०॥
उभेनी जपावा प्रातःकाळी । बैसोनि
कीजे माध्याह्नकाळी ।
अथवा उभा ठाकोनि । उभय पक्षी
करावा ॥६१॥
माध्याह्नी ह्रदयस्थानी । जपावा
माळ धरोनि ।
हस्त मुखे स्पर्शोनि । सायंकाळी
जपावा ॥६२॥
बैसोनि जपावा सायंकाळी । पहावा
वृक्ष निर्मळी ।
जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्रानयनी
जपावा ॥६३॥
ब्रह्मचारी गृहस्थासी । जप
नेमिला अष्टोत्तरेसी ।
वानप्रस्थ संन्यासी यासी ।
सहस्त्र मुख्य करावा ॥६४॥
संधिविग्रह होय जरी ।
अष्टाविंशति तरी करी ।
अशक्ति होय जरी । दहा वेळ जपावा
॥६५॥
उत्तम पक्ष मानसी । मध्यम गौप्य
सुमुखेसी ।
अक्षरे प्रगट वाक्येसी । कनिष्ठ
पुकार परियेसा ॥६६॥
त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि
न म्हणावी परियेसी ।
म्हणता होय महादोषी । महानरक
अवधारा ॥६७॥
पृथक करोनि त्रिपदासी । जपा
मंत्र अतिहर्षी ।
ब्रह्महत्यादि पापे नाशी । अनंत
पुण्य लाधिजे ॥६८॥
अंगुष्ठजपे एक पुण्य ।
पर्वांगुलीने दशगुण ।
शंखमणीने होय शतगुण । प्रवालमाला
सहस्त्रफळ ॥६९॥
स्फटिकमणि दहासहस्त्र । मौक्तिके
पुण्य लक्षाधिक ।
पद्माक्षी निर्गुण जप । दशलक्ष
पुण्य असे ॥४७०॥
कोटुगुणे सुवर्णमाला । कुश
रुद्राक्ष अनंतफला ।
जप करा नित्य काळा । गौप्यमाला
धरोनिया ॥७१॥
गौप्यमाला करकमळी । जप करा
निश्चली ।
सौख्य पावे अनंत फळी । श्रीगुरु
म्हणती ब्राह्मणाते ॥७२॥
जप करिता नुल्लंघिजे मेरु ।
उल्लंघिता पाप बोलिले अपारु ।
प्राणायाम केलिया त्रिवारु ।
मेरुलंघनपाप जाय ॥७३॥
गायत्रीजप तीन दिवस । प्रत्यही
करावा एकादश ।
सर्व पातके होती नाश ।
त्रिरात्रीचे पाप जाय ॥७४॥
अष्टोत्तरशत जप करिता । अघोर
पातक जाय त्वरिता ।
करोनि सहस्त्र जप एकाग्रता ।
उपपातके नासती ॥७५॥
महापातकादि दोषासी । कोटि जप
करावा परियेसी ।
जे जे कर्म इच्छिसी । त्वरित होय
अवधारा ॥७६॥
जप करावा मन दृढे । न पहावे मागे
पुढे ।
शूद्रादिक यातीकडे । संभाषण न
करावे ॥७७॥
द्रव्य घेवोनि एखाद्यासी । जपता
होय अनंतदोषी ।
चांडाळयोनीत भरवसी । जन्म पावे
परियेसा ॥७८॥
कंडू नये शरीर आपुले । नेणता जरी
इतुके घडले ।
श्रोत्राचमन करा वहिले । दोष
नाही अवधारा ॥७९॥
ब्राह्मणाचे दक्षिणकर्णी । सप्त
देवता ऐका निर्गुणी ।
स्पर्श करिता तत्क्षणी । पापे
जाती परियेसा ॥४८०॥
दृष्टी पडता चांडाळासी ।
द्विराचमने शुद्ध होसी ।
संभाषण झालिया पतितासी ।
आचमनस्नान करावे ॥८१॥
जपता निद्रा येई जरी । अधोवायु
जांभई आलियावरी ।
क्रोधरूपे जपता जरी । पापरूपे
अवधारा ॥८२॥
मौन्य करावे हे उत्तमी । अगत्ये
बोलिजे संधिविषयी ।
तद्विष्णो मंत्र जपता कर्मीं ।
पापे जाती सकळिक ॥८३॥
नेणता घडे इतुके जरी । आचमन
करावे श्रोत्री ।
अग्नि सूर्यधेनुदर्शन करी ।
विष्णुमंत्र जपावा ॥८४॥
ऐसा जप करावा विधीने । मनकामना
होय पूर्ण ।
ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि
सांगे पराशर ॥८५॥
गायत्री जपावी ऐशी । प्रातःकाळी
म्हणा मित्रस्य ऋषि ।
उदुत्यं मंत्र माध्याह्नेसी ।
इमं मे वरुण सायंकाळी ॥८६॥
शाखापरत्वे मंत्र असती । म्हणावे
विधि जैसे असती ।
गोत्र प्रवर म्हणा भक्ती ।
वृद्धाचाराप्रमाणे ॥८७॥
चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा
करावी सगुणी ।
गोत्र प्रवर उच्चारोनि । नमस्कार
करा परियेसा ॥८८॥
ऐसी संध्या करून । मग करावे
औपासन ।
सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु
म्हणती ब्राह्मणासी ॥८९॥
साय्म्प्रातवेला दोन्ही । औपासन
करावे सगुणी ।
मिळोनि न करावे द्विजजनी ।
सर्वांनी पृथक् पृथक् हेचि जाणा ॥४९०॥
न करावे वेळणी आळंद्यात ।
भूमीवरी न करा नित्य ।
स्थंडिली करावे विहित । अथवा
उदके सारवावे ॥९१॥
कुंडी स्थापोनि अग्नीसी । करावे
नित्य उपासनेसी ।
वारा घालो नये त्यासी । हाते
पर्णी आणि सुपे ॥९२॥
व्याधिष्ठ पर्णवाते होय । सुपे
दरित्र धनक्षय ।
मुखे फुंकिलिया आयुष्य जाय ।
हस्तमूली होय मृत्यु ॥९३॥
फुंकणी अथवा विंझण्यासी । वायु
घालावा अग्नीसी ।
काष्ठे समृद्धि परियेसी । ज्वलित
असावा अग्नि देखा ॥९४॥
ज्वाला निघती जये स्थानी । आहुति
घालावी तया वदनी ।
समिधा आणाव्या ब्राह्मणी ।
शूद्रहस्ते घेऊ नये ॥९५॥
समिधा पुष्पे दूर्वा देखा । आणो
नये शूद्रे ऐका ।
होमद्रव्ये होती विशेखा । सांगेन
नावे परियेसा ॥९६॥
साळी सावे नीवार । तंदुल असती
मनोहर ।
गोधूम जव निर्धार । यावनाळ मुख्य
असे ॥९७॥
साठी दाणे मिति प्रमाण । आहुति
मुख्य कारण ।
अधिक न कीजे अथवा न्यून ।
घृतसंपर्क करावे ॥९८॥
घृत नसेल समयासी । तिल पवित्र
होमासी ।
तिळांचे तैल परियेसी । तेही
पवित्र असे देखा ॥९९॥
औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ
तर्पण करी ।
सांगेन विधि अवधारी । श्रीगुरु
म्हणती ब्राह्मणासी ॥५००॥
मुख्य सकळ प्रातःकर्म सारोनि ।
ब्रह्मयज्ञ करावा माध्याह्नी ।
उपासनादि कर्मै करोनि । मग करावा
ब्रह्मयज्ञ ॥१॥
उदकसन्निध मुख्य स्थानी । करावे
तर्पण ब्राह्मणी ।
प्राणायाम तीन करोनि । विद्युदसि
मंत्र जपावा ॥२॥
दूर्वा घेऊनि दक्षिण करी ।
पूर्वमुख अथवा उत्तरी ।
बसावे वाम पादावरी । दक्षिण पाद
ठेवोनि ॥३॥
उभयहास्तसंपुटेसी । ठेवावे
दक्षिण जानुवासी ।
म्हणावे तीन प्रणवांसी । मग
म्हणावे ऋचाक्षर ॥४॥
ॐ भू० ऐसे म्हणोनि । त्रिपदा
गायत्री उच्चारोनि ।
तत्स० म्हणोनि । मग जपावी दश
वेळा ॥५॥
स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसी
।
अनध्याय होय तया दिवसी । एक ऋचा
म्हणा पन्नासा ॥६॥
तोही नये एखाद्यासी । मंत्र
म्हणावा विशेषी ।
नमो ब्रह्मणे मंत्रासी । तीन
वेळा जपावा ॥७॥
वृष्टिरासि मंत्रासी । जपोनि
स्पर्शावे उदकासी ।
तर्पण करावे परियेसी । ऐक
ब्राह्मणा एकचित्ते ॥८॥
ब्रह्मयज्ञ करावयासी । द्रव्य
दर्भ परियेसी ।
वसुरुद्रआदित्यांसी । तृप्त
समस्त देव पितर ॥९॥
एखादे दिवसी न घडे जरी । अथवा
होय समय रात्री ।
जप करावा गायत्री । वेदपठण फल
असे ॥५१०॥
देवतर्पण कुशाग्रेसी ।
मध्यस्थाने तृप्त ऋषि ।
मुळे पितृवर्गासी । तर्पण करावे
परियेसा ॥११॥
न करावे तर्पण पात्रात । करावे
आपण उदकात ।
भूमीवरी घरी नित्य । निषिद्ध असे
करू नये ॥१२॥
दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण
करावे अवधारी ।
विधियुक्त भक्तिपुरःसरी ।
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥१३॥
तीळ धरोनि आपुल्या करी । तर्पण
करावे अवधारी ।
ठेवो नये शिळेवरी । भूमी
काष्ठपात्री देखा ॥१४॥
रोमकूपादि स्थानी देखा । तीळ
ठेविता पावती दुःखा ।
तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध
बोलली स्थाने पाच ॥१५॥
घरी तर्पण करावयासी । तीळ
अग्राह्य परियेसी ।
करावे आपण उदकासी । ऐका समस्त
ऋषिजन ॥१६॥
श्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण
ऋषिजनांसी ।
कृष्णवर्ण पितरांसी । तीळतर्पण
करावे ॥१७॥
यज्ञोपवीती सव्ये देवांसी ।
निवीती करावी ऋषींसी ।
अपसव्य पितरांसी । तर्पण करावे
येणे रीती ॥१८॥
देवासी अंजुलि एक । ऋषींसी
अंजुलिद्वय सम्यक ।
पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण
ऐसे करावे ॥१९॥
स्त्रियांसी अंजुलि एक देखा ।
व्यतिरिक्त बंधूसी एक ।
सपत्नी आचार्य नामिका ।
द्वयांजुलि करावे ॥५२०॥
देवब्रह्मऋषीश्वरांसी । अक्षता
मुख्य तर्पणासी ।
कृष्णतिलतर्पण पितरांसी । अनंत
पुण्ये परियेसा ॥२१॥
आदित्य शुक्रवारेसी । प्रतिपदा
मघा नक्षत्रासी ।
षष्ठी नवमी एकादशीसी । तिलतर्पण
करू नये ॥२२॥
अथवा विवाह उपनयनासी ।
जन्मनक्षत्र जन्मदिवसी ।
आपुल्या घरी शुभदिवसी । तिलतर्पण
करू नये ॥२३॥
जधी न करी तिलतर्पण । उदके मुख्य
करा जाण ।
मुद्रिका हस्ती सुवर्ण ।
दर्भपवित्रे करावे ॥२४॥
पाय न धुता मंगलस्नान । तिलावीण
करिता तर्पण ।
श्राद्ध करी दक्षिणेविण । निष्फल
असे अवधारी ॥२५॥
निषिद्ध बोलिले ज्या दिवसी ।
तर्पण करावे उदकेसी ।
दिपवाळी चतुर्दशीसी । करावे
तर्पण परियेसा ॥२६॥
अंगारक कृष्ण चतुर्दशीसी । करावे
तर्पण परियेसी ।
यमाचे नावे विधींसी । यज्ञोपवीत
सव्याने ॥२७॥
एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि
देऊनि ।
यमाचे नाव उच्चारोनि । तर्पण
करावे भक्तीने ॥२८॥
यमाची नावे त्रयोदशी । सांगेन
ऐका विस्तारेसी ।
यम धर्मराजा परियेसी । मृत्यु
अंतक चौथा जाणा ॥२९॥
वैवस्वत काल देखा । सर्वभूतक्षय
ऐका ।
आठवा औदुंबरनामिका । नीलाय
परमेष्ठी दहा जाणा ॥५३०॥
वृकोदर चित्ररेखा । चित्रगुप्त
त्रयोदशिका ।
प्रत्येक नामे म्हणोनि एकेका ।
नदीत द्यावे परियेसा ॥३१॥
समस्त पातके नासती । रोगराई न
पीडिती ।
अपमृत्यु कधी न येती । ग्रहपीडा
न बाधे ॥३२॥
शुक्लपक्षी माघमासी । तर्पण
करावे अष्टमीसी ।
भीष्मनामे परियेसी । वर्षपातके
परिहरती ॥३३॥
ऐसे तर्पण करोनि । सूर्यनामे
अर्घ्यै तिन्ही ।
द्यावी समस्त द्विजजनी । म्हणे
नृसिंहसरस्वती ॥३४॥
सिद्ध म्हणे नामधारकासी ।
कृपामूर्ति स्वामी कर्मविधिसी ।
सांगता झाला ब्राह्मणासी ।
येणेपरी विहिताचार ॥३५॥
म्हणे सरस्वतीगंगाधर । ऐसा
ब्राह्मणांचा आचार ।
वर्तता होय मनोहर । सर्वाभीष्टे
साधतील ॥३६॥
इति श्रीगुरुचरित्रामृत ।
नामधारक शिष्य संवादत ।
वेदोपनिषदमतितार्थ ।
आचारनिरूपणाध्याय हा ॥५३७॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः
॥३६॥
॥ ओवीसंख्या ॥५३७॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
No comments:
Post a Comment