Monday 25 December 2017

Film review-Tiger Zinda hai

He is back again and probably he has not disappointed at all.Tiger Zinda hai is full of bunch of actions and bullets and machine guns and Salmanism....Film is based on some true incidents from Syria where team of nurses is kidnapped by powerful organization from Syria.Mission is planned by RAW to release these nurses from Syria under authority of Tiger (Salman).Story is impressive and doesn't look unrealistic.Chase sequences are superb.In state of surprise Katrina has acted very well.....Cinematography is at highest peak in movie.It will remind us disasterous situation from Syria.Salman will never let you down.Some sequences don't make any sense where Salman is carrying heavy loaded gun full of magazines just as toy.But he roars till end.
Don't think too much.... enjoy Salmanic roar.....
4 stars
Kaushik
All rights reserved

Thursday 21 December 2017

Book Review:-निर्मनुष्य, Writer:-Ratnakar Matkari

सदर कथांमध्ये गूढता आणि मानसशास्त्र ह्यांचे उत्तम मिश्रण आहे. सर्व कथा ह्या मानसशास्त्र(Human Psychology) आणि वास्तवता ह्यावर आधारित आहेत.निर्मनुष्य,शनचरी,प्रार्थना ह्या कथा अंगावर भीतीने गारठून येतात. सर्व कथांमध्ये वास्तवतेवर उभारलेले जग आणि उत्कंठा  वाढवणारी भीती  ह्यांच्याबरोबर पात्रांना मिळणारा अंतिम न्याय ह्यांचे उत्तम विश्व साकारलेले आहे.प्रत्येक कथा वाचकाला वास्तवातून उठवून वेगळ्या अनामिक,गूढ,भयप्रद प्रदेशात घेऊन जातात जिथे वाचक झपाटल्यासारखा प्रत्येक पान आणि पान उलटत जातो... प्रत्येक कथांमधून मानवी जीवनावर काही प्रमाणात भाष्य केले गेले आहे.सर्व चा सर्व कथा ह्या तरुण लेखकांसाठी कथालेखन कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण आहेत.
*****
लेखन:-कौशिक
©
Ichalkaranji
21.12.2017.

Thursday 30 November 2017

Book Review:- How I Killed my business

सदरचे पुस्तक हे लेखकाचे अनुभव आहेत.कुठलाही व्यवसाय करत असताना कुठल्या गोष्टी करू नयेत ह्यावर जास्त प्रकाश टाकला आहे. व्यवसाय करत असताना कुठल्या गोष्टी(चूका) करू नयेत हे सर्वांना महिती असणे जास्त महत्वाचे आहे.पहिल्या पानापासून व्यवसाय करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवशक्ता आहे आणि कुठल्या नाही ह्यावर जास्त जोर दिला आहे.अगदी SWOT analysis चे महत्व,कुणी व्यवसाय करावा,पायाभूत सुविधांचे महत्व,Talent ची कदर,Brand चे महत्व,मार्केटिंग,Quality comes with price चे महत्व...... आणि बऱ्याच महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.पुस्तकाचा शेवटी एका सुंदर वाक्यावर प्रकाश टाकला आहे.छंदाचे रुपांतर व्यवसायात करता आले तर वेल and गुड;पण व्यवसायाचे रुपांतर छंदात....Don't even think about it.
सर्व नवख्या उद्योजकांसाठी आणि व्यवसाय करणाऱ्या समस्त तरुण आणि तरुणींसाठी अतिशय उपयुक्त.
माझ्याकडून:-Distinction
Reviewer:- Kaushik Shrotri
©
Ichalkaranji
Writer:-Mr.Harshad Barve
Contact source:- FB Messanger

Sunday 26 November 2017

पुस्तक परिचय-रहस्य

अगदी नावाप्रमाणे पुस्तकाची कथा थ्रिल्लर आणि रहस्यमयी आहे. कथेची सर्व पाश्वभुमी मुंबई पोलीस आणि ते बुलेट च्या वेगाने सोडवत असलेले केसेस ह्या गोष्टींभोवती फिरते. कथेची सुरवात बॉलिवूड च्या एका सौंदर्यवतीच्या केस ने होते जी केस मुंबई पोलीस सहज सोडवतात. सौंदर्यवती च्या केस नंतर मुंबई मध्ये बऱ्याच घडामोडी घडतात. एकाच दिवशी मुंबई मध्ये एका पाठोपाठ एक किलिंग्स होतात ज्यामुळे मुंबई पोलीस चक्रावून जातात. त्या केसेस सोडवत जात असताना पोलिसांना नाकीनऊ येते. प्रत्येक केस चा खोलवर तपास करत असताना पोलिसांना कासवाच्या गतीने क्लू मिळत जातात आणि प्रकरणाची गुंतागुंत वाढत जाते. सहज दिसणारी केस ची व्याप्ती भलीमोठी होत वेगळ्याच दिशेने वळण घेते आणि शेवट आपल्याला भंडावून सोडतो. कथा अतिशय वेगवान आणि सुसाट आहे जी कुठेही अडखळत नाही .कथेचे मुख्य पात्र इन्स्पेक्टर भाटवडेकर,राऊत ,मोडक ह्यांचं पात्र अतिशय दमदारपणे उभे केले आहे.कथा आणि भाषेचा सुसाट वेग आपल्याला एका बैठकीमध्ये पुस्तक वाचन संपवण्यास भाग पडतात जे मी एका बैठकीमध्ये वाचून संपवले.थ्रिल,रहस्य,गूढता आणि पोलिसांची दुनिया अनुभवण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
लेखक:-हर्षद बर्वे 
माझ्याकडून फर्स्ट क्लास
©
परीक्षण:-कौशिक
इचलकरंजी.


Friday 24 November 2017

मंतरलेली थंडी...

रात्रीचे १०.०० वाजले होते.हुडहुडी थंडीची नुकतीच सुरवात झाली होती.कधीच थंडी चा फारसा लवलेश ही नसलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये थंडी चे जोरदार आगमन झाले होते.रस्त्यांवर जागोजागी शेकोटी करून नागरिक ऊब मिळवत होते.गरमागरम पोहे आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी कॉलेज चे विद्यार्थी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून बाहेर पडले होते.पुन्हा पुन्हा नवतारुण्याचा अनुभव देणाऱ्या आणि विचारांना प्रणयरम्य बनवणाऱ्या ह्या गुलाबी थंडी मध्ये इचलकरंजी चा तरुण उद्योजक के.के इचलकरंजी पासून १७ किलोमीटर लांब असलेल्या लक्ष्मी वसाहतीमध्ये आपल्या foundry मध्ये निघाला होता.अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे के.के आपल्या foundry मध्ये निघाला होता.अंतर खूप लांब असल्यामुळे लवकर पोहोचण्यासाठी के.के साहेबांनी नवी कोरी करकरीत BMW गाडी बाहेर काढली.साहेबांना गाडयांची खूप आवड असल्यामुळे त्यांच्याकडे दर सहा महिन्याला नवीन गाडी सेवेसाठी हजर होती.बरोबर १०.००ला साहेब त्यांच्या सांगली रोडच्या घरातून बाहेर पडले आणि पार्वती वसाहती च्या मार्ग लक्ष्मी वसाहतीकडे निघाले.Driver ला सुट्टी असल्यामुळे गाडी चा ताबा के.के साहेबांकडे होता.गाडी ६० किलोमीटर च्या वेगाने निघाली होती. भर थंडी मध्ये के.के साहेब अंगात घट्ट बसणारा आणि पिळदार दंडाचे खुलेआम प्रदर्शन करण्यासाठी मदत करणारा being human चा शर्ट आणि रात्र असतानाही देखील डोळ्यांवर fast track चे sunglasses परिधान करून सुसाट वेगाने निघाले होते.सलमान खान चे उपजत भक्त असल्यामुळे त्यांच्याकडे सलमान च्या गाण्यांचा प्रचंड साठा होता. अगदी हुबेहूब सलमान सारखी शरीरयष्टी,पिळदार दंड,हातात bracelet आणि कायम मुलींच्या संदेशांनी भरलेला Iphone 7S आणि सलमान ची गाडी मध्ये सतत सुरु असणारी गाणी...ह्यामुळे बऱ्याच तरुणी के.के साहेबांवर जीव ओवाळून टाकत असत.
गाडी पार्वती वसाहत ओलांडून लक्ष्मी वसाहतीकडे निघाली होती.सलमान खान चे hello सिनेमा चे गाणे ‘’bang bang bang bang bang zamana bole boom boom boom boom diwana bole’ ऐकत रस्त्यावर कुणीही नसल्यामुळे साहेबांनी गाडीचा वेग वाढवला.बरोबर गाडी १०.२५ वाजता लक्ष्मी वसाहतीच्या जवळ आली. मुख्य वसाहतीमध्ये प्रवेश करत असताना साहेबांचं आजूबाजूला लक्ष गेले व त्यांनी गाडी जोरात ब्रेक मारून थांबवली. वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून जवळ २५ वर्षाची तरुणी थंडी मध्ये कुडकुडत उभारली होती.ती तरुणी गाडीजवळ आली.साहेबांनी गाडीची काच उघडली.काच उघडल्यावर गुलाबी थंडी चा झोत गाडीमध्ये शिरला.
के.के,’’एवढ्या रात्री तुम्ही इथे...’’
ती,’’ मी जवळच राहते. माझे वडील लक्ष्मी वसाहतीमध्ये foundry मध्ये काम करतात. त्यांना डबा द्यायचा होता. त्यांनी मला  प्रवेशद्वारापासून जवळ थांबण्यासाठी सांगितले होते. पण अजून आले नाहीत.’’
के.के,’’तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला जिथे जायचे तिथे सोडतो. रात्र खूप झाली आहे. मी पण ऑफिसमध्ये निघालो आहे’’.
ती,’’ ठीक आहे.’’

के.के नी गाडीचा दुसरा दरवाजा उघडला. ती गाडी मध्ये बसली आणि दोघे निघाले.
ह्यावेळेस मात्र के.के नं गाडीचा वेग ५० किलोमीटर वर आणला.बाहेर पसरलेली बोचरी थंडी मी म्हणत होती.रात्रीचे १०.३०झाले होते.रस्त्यावर एक चीटपाखरू देखील दिसत नव्हते.भयाण शांतता पसरत चाललेली होती.अश्या भर रात्री लक्ष्मी वसाहतीमध्ये ही तरुणी कशी काय एकटी उभी राहते असा प्रश्न के.के ला पडला पण त्याने तो गांभीर्याने घेतला नाही कारण त्याला समोर office चे काम दिसत होते.अभियांत्रिकी व्यवसाय के.के साहेबांचा ध्यास होता.अजून foundry यायला ८ किलोमीटर अंतर पार करायचे होते.तरुणी के.के च्या शेजारी बसली होती.गाडी मध्ये बसताना तिला अप्रूप वाटत होते. ती पहिल्यांदाच नव्या गाडीमध्ये बसली होती.मंद आवाजामध्ये सुरु असलेले इंग्रजी गाणे, जवळ असलेला iphone आणि शेजारी बसलेले तरुण तडफदार उद्योजक..ती प्रत्येक गोष्ट न्याहाळत होती.एव्हाना ती गाडी मध्ये बसल्यावर के.के नी sunglasses काढले होते.ह्या तरुण उद्योजकाची प्रत्येक गोष्ट ती टिपत होती. त्याचे पिळदार शरीर,त्याचे कपडे,त्याचाiphone,त्याची उंची,त्याची छाती असे भारदस्त व्यक्तिमत्व पाहून मनातल्या मनात तिचे जोरदार विचार चालू होते.के.के च्या मनात फक्त foundry मध्ये कशा सुधारणा करता येतील हाच विचार चालू होता.त्याचबरोबर त्यानेही हळूच एका डोळ्याने शेजारी बसलेल्या तरुणीकडे नजर टाकली.५ फुट ८ इंच उंची,गोरा वर्ण,सामान्य पेहेराव,निळे डोळे आणि चेहऱ्यावर शांततेचे प्रसन्न भाव..के.के एका डोळ्याने त्या तरुणीकडे पाहतच राहिला.तिच्या चेहऱ्यावरचे निरव शांततेचे भाव आणि तिचे डोळे त्याला पाहताच पसंद पडले होते.आजवर भरपूर मुली के.के च्या मागे लागत होत्या.मुली मागे लागण्यामध्ये खूप कारणं होती.आज वर के के नी खूप मुली पाहिल्या होत्या पण ह्या मुलीकडे पाहून त्याला काहीतरी खटकत होते.त्याला मुली भेटल्या की जोरदार बडबडायला सुरवात करत होत्या पण ही तरुणी शांत कशी काय...?
ती,’’ गाणं सुंदर आहे’’.
सलमान खान ची गाणी संपून आता गोल्डन saxophone ची हुरहूर लावणारी गाणी सुरु होती.
के.के,’’ तुम्हाला महिती आहे हे गाणं..’’.
ती,’’ हो, हे गोल्डन saxophone चे गाणे आहे.मी कॉलेज ला असताना ऐकत होते’’.
के.के(आश्चर्यचकित होऊन),’’cool!
ती,’’This song is close to my heart”.
तिचे अनपेक्षित इंग्रजी ऐकून के के ला धक्का बसला.
के.के,’’ तुम्हाला इंग्रजी येते...’’
ती,’’ हो...का?
के.के,’’ मी सहज विचारले’’.
ती मंद हसली.बराच वेळ निशब्दपणे दोघे निघाले होते.
ती,’’ तुम्हाला मनापासून धन्यवाद. मी रोज रात्री लक्ष्मी वसाहतीच्या जवळ उभारलेले असते.माझ्या वडिलांना डबा द्यायचा असतो.कुणालाही मी दिसत नाही.फक्त तुम्हाला मी दिसले’’.
के.के,’’प्रत्येकाचा व्याप वाढला आहे त्यामुळे प्रत्येकाला घरी जायची घाई असते.’’
ती,’’ जशी तुम्हाला घाई आहे आत्ता..अति घाई... संकटात...’’
के.के तिच्याकडे निरखून पाहत होता.सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिचे बोलणे नव्हते.प्रत्येक वाक्य ही अशी धीरगंभीर आवाजात शांतपणे इशारा देत असल्यासारखे का बोलत आहे हा विचार के.के च्या मनात आला.आधीच कामाच्या तणावामध्ये असलेल्या के.के ला हिच्या असल्या बोलण्याने कोड्यात टाकले.
के.के ला office मधून फोन वर फोन येत होते. त्यात प्रत्येक फोन वर I am on the way असं संदेश तो टाकत होता.फोन वर फोन ऐकून के.के वैतागून गेला होता.
ती,"तुम्ही तणावामध्ये आहात का...’’
के.के,’’नाही.’’
ती,’’ तुमची body language सांगत आहे. तुम्ही तणावामध्ये आहात.’’
के.के,’’काम म्हटल्यावर थोडा तणाव असतोच.’’
ती,’’मी काही मदत करू का?’’
के.के चपापला.ही तरुणी एवढ्या मोकळेपणे कशी काय बोलत आहे हा प्रश्न त्याला पडला होता.इतर मुलींपेक्षा ही तरुणी के.के ला वेगळी वाटत होती.तिचा शांत आणि धीरगंभीर परंतु तेजस्वी असलेला चेहरा के.के ने ती गाडीत बसत असताना पाहिला होता.
के.के,’’कामगारांचाच तणाव असतो foundry मध्ये...’’
ती,’’तुम्ही ज्या तणावाखाली आहात तो तणाव तुम्ही office ला गेल्यावर नाहीसा होईल आणि त्या तणावाचा अंत होईल आणि...’’.
गाडीमधले वातावरण इंग्रजी गाण्यांमुळे हुरहूर लावत होते आणि धीरगंभीर झाले होते.त्या तरुणीचे बोलणे शांत आवाजात परंतु गंभीर स्वरात होते.
के.के,’’तुम्ही काम कुठे करता?’’
ती,’’ मी engineering केले आहे.आधी मी लक्ष्मी वसाहतीमध्ये foundry मध्येच होते पण आता नाही’’.
के.के,’’cool!which foundry?’’
तिच्या उत्तरानंतर के.के ने गाडीचा वेग ४० kilometer वर आणला कारण ती त्याचाच office मध्ये काम करत होती आणि तिचे वडील के.के च्या machine शॉप ला काम करत होते.पण के.के ने तिला जाणवू दिले नाही.
के.के,’’काम का सोडले?’’
ती,’’अजून माझे बाबा तिथेच काम करतात.पण मी मुक्त झाले कायमची...’’
के.के ला कळेना ही अशी कोड्यात का बोलत आहे.
के.के,’’मुक्त झाले...’’
ती,’’ सोडले. I am free bird now.मला safety equipment’s दिले गेले नाहीत.त्यामुळे त्या दिवशी मी शॉप वर काम करत होते तेव्हा माझ्या डोक्याला जोरदार लागले. कदाचित हेल्मेट दिले असते तर लागले नसते. एवढं होऊन देखील manager ला माझी जरा देखील फिकीर झाली नाही.’’
के.के काहीच बोलला नाही.ती सांगत असलेली अगदी विरुद्ध महिती त्याला त्याचा manager देत होता.आता के.के ला स्वतःचाच राग आला.
लक्ष्मी वसाहतीच्या डोंगराजवळ आल्यावर तिने गाडी थांबवा अशी के.के ला सूचना केली.
ती,’’थांबवता का..माझे बाबा इथूनच जवळ असलेल्या मशीन शॉप ला असतात.तुमचे आभार.’’
एवढं बोलून ती मध्यरात्री ११.००ला उतरली.के.के ला तिच्याशी बोलायचे होते पण ती थांबली नाही.के.के चं office २ मिनिटांच्या अंतरावर होते.गाडी पुढे office ला निघाली.Office च्या आत आल्यावर लगेच पार्किंग मध्ये विरुद्ध दिशेने गाडी पार्क करून के.के गाडीमधून उतरला.थंडी सुसाट वेगाने पडत होती.Watchman ला कॉफी ची order देऊन के.के आपल्या office कडे निघाला.Foundry लक्ष्मी वसाहतीच्या डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे हवेतला गारवा वाढला होता.K.K manager ची त्या तरुणीच्या सांगण्यावरून जोरदार तपासणी करणार होता. फक्त सकाळची तो वाट पाहत होता.Reception च्या जवळ असलेल्या Tiffin house ज्या मध्ये office चे लोक डबा ठेवत होते तिथे के.के चे लक्ष गेले आणि तो जागचा थबकला.त्याला लाल रंगाचा डबा दिसत होता.तोच लाल डबा जो त्याने मघाशी येताना त्या तरुणीच्या हातात पाहिला होता.तो डबा दिसल्यावर त्याच्या डोक्यातील सर्व कामे नाहीशी झाली आणि त्याने watchman ला हाक मारली.
के.के,’’हा डबा कुणाचा आहे?
Watchman,’’.......’
के.के,’’ सांगा लवकर...’’
के.के चा आवाज वरच्या पट्टीवर जात होता.
‘’साहेब, खरं सांगतो मागच्या आठवड्यात आपल्या शॉप फ्लोअर वर एका engineer साहेबांच्या अंगावर मेटल पडले होते.त्यांचा डबा आहे.जो ते घेऊन गेले नाहीत.त्यात त्यांना खूप भाजले.पण त्यानंतर ते कामावरच आले नाहीत.तेव्हापासून आपल्या इथे अपघात खूप वाढत गेले आहेत.रात्रीच्या शिफ्ट ला कुणाला तरी काहीतरी होतंच आहे...’’
“ त्यांना मुलगी होती का.’’
“ साहेब, तुम्हाला महिती आहे ती...’’
“ हो, आत्ताच येताना मी तिला आपल्या office जवळ सोडले’’.
Security guard थबकला.
‘’साहेब,कसं शक्य आहे... त्यांची मुलगी आपल्याच foundry मध्ये होती. मागच्या महिन्यात शॉप फ्लोअर वर मोठा अपघात झाला होता त्यात ती...’’.
आता डोळे मोठे करायची वेळ के.के ची होती.तेवढ्यात शॉप फ्लोअर वरचा अलार्म वाजला.Security guard पळतच गेला. तो गेल्यावर के.के आपल्या office मध्ये गेला. तिथे त्याने CCTV उघडला.Foundry च्या बाहेर सर्वत्र CCTV  बसवले होते.त्यात office पासून हाकेच्या अंतरावर त्याने त्या तरुणीला सोडले होते.CCTV rewind केल्यावर समोर आलेले दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.ती तरुणी त्याला CCTV मध्ये दिसत नव्हती.ते दृश्य पाहून के.के चे heart rate वाढू लागले.त्याला प्रचंड भीती वाटू लागली.अजूनही के.के ला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.त्याने पुन्हा CCTV  तपासला.तेवढ्यात त्याच्याकडे सुरक्षा रक्षक आणखीन एका Supervisor  ची शॉप फ्लोअर वर झालेल्या अपघाताची बातमी घेऊन आला.के.के ने सुरक्षा रक्षकाला शॉप फ्लोअर वर त्वरित जाण्यास सांगितले.के.के त्वरित आपल्या गाडीजवळ गेला.त्याला त्या तरुणीचे शांत पण गंभीर आणि इशारा देत असलेल्या आवाजातले बोलणे डोळ्यासमोर येत होते.त्याचा असल्या गोष्टींवर विश्वास बसला नाही.गाडीत त्याने छोटा कॅमेरा बसवला होता.त्याचा server त्याने mobile वर सुरु करून पाहिला आणि समोरचे दृश्य पाहून तो घाबरला.CCTV मध्ये तिच्या जागेवर कुणीही दिसत नव्हते.तो जागचा हबकलाच.
के.के ला गरगर येऊ लागली.हा काय प्रकार आहे ते त्याला समजले नाही.आजुबाजुला थंडी पडत होती पण त्याच्या शरीराचे तापमान वाढत होते.काळ पूर्णपणे त्याच्याभावती फिरत असल्याचा भास त्याला होऊ लागला. त्या मुलीचे आवाज त्याला येऊ लागले.त्याचे शरीर कुणीतरी पिळून काढत आहे असे त्याला भास होऊ लागले.त्याच्या मनावर तिसऱ्या शक्तींचा ताबा येतोय का असे त्याला काही क्षण वाटू लागले.ती मुलगी, तिच्या गंभीर पण शांत असलेल्या विक्षिप्त गप्पा,"मी फक्त तुम्हालाच दिसले" हे तिचे वाक्य... सर्व गोष्टी त्याच्या समोर येऊ लागल्या.............


"सर...सर...."
रात्रीचे ९.३० वाजले होते.के.के त्याच्या office मध्ये होता.Office चा watchman त्याला ऑफिस चा दरवाजा उघडून हाका मारत होता.दिवसभराच्या कामातून के.के ला कधी झोप आली कळलंच नाही.अत्याधुनिक office मध्ये के.के च्या laptop वर रामगोपाल वर्मा चा “डरना मना है’’ सिनेमा चे भीतीदायक पश्वासंगीत सुरु होते.सुरक्षारक्षकाने हाक मारल्यावर के.के ला जाग आली.जाग आल्यावर त्याला laptop वर चालू असलेला सिनेमा दिसला.
‘’सर,driver थांबला आहे’’
के.के नं त्याला आलोच म्हणून इशारा केला.Watchman office च्या बाहेर पडल्यावर के.के ला पडलेले स्वप्न आठवले. आपण तब्बल ३० मिनिटे झोपलो होतो ही गोष्ट त्याच्या नंतर लक्षात आली.अजून त्याच्या डोळ्यासमोर ते स्वप्न तरंगत होते.त्याने रामगोपाल वर्मा चा सिनेमा बंद केला आणि ताबडतोब त्याने दुसऱ्या दिवसाचा मिटिंग चा अजेंडा तयार केला ज्यामध्ये पहिले प्राधान्य होते सुरक्षा साहित्य खरेदी करणे आणि दुसरे प्राधान्य होते manager ला जोरदार झापणे आणि घरला घालवणे. त्याने foundry मध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांची यादी तपासली.त्यात त्याला त्याच्या स्वप्नात आलेली तरुणीचे नाव आणि फोटो आणि तिच्या वडिलांचे नाव दिसले ज्यामध्ये त्यांचा सोडून गेले म्हणून उल्लेख होता.ते स्वप्न खरं होतं का...असे के.के ला वाटू लागले. अजूनही तो अस्वस्थ होता.तो गाडीजवळ आला. पण ह्यावेळेस तो गाडीच्या मागच्या seat वर बसला आणि driver पुढच्या driving च्या जागेवर बसला.रात्रीचे १०.०० वाजले होते आणि वातावरणात चांगलाच गारवा होता.घरी जाताना त्याला पडलेले स्वप्न अजूनही त्याच्या डोळ्यासमोर तरंगत होते.गाडी 60 kilometer च्या वेगाने जात होती.जाताना के.के ला त्याच्या शेजारी एक रुमाल दिसला. त्याने तो उघडताच समोर त्याला दृश्य दिसले.

‘’LONG LIVE…K.K.Sir…’’

Thursday 23 November 2017

Book review-khekda, writer-ratnakar matkari

सदर कथा संग्रहामध्ये भय आणि गूढता ह्यांचे उत्तम मिश्रण केलेले आहे.हे  भय  वाचकाला मुळापासून घाबरून सोडणारे आहे  आणि गूढता  ही प्रत्येक वाचकाला कथेच्या खोलात घेऊन जाणारी आहे. काही कथा वाचत असताना अंगावर काटा उभा राहतो जो खूप वेळ टिकतो.सदर कथांमध्ये वाचकाला भयाने जखडून ठेवण्याची ताकद आहे.सर्व कथा वास्तवाला धरून पुढे जातात. खेकडा ,कळकीचे बाळ,पावसातला  पाहुणा  ह्या कथा अक्षरशः अंगावर येऊन  चावा घेतात.काही कथा इतक्या प्रभावी आहेत की त्या आपल्या आयुष्यात खरंच घडल्या आहेत काय ?असा प्रश्न पडत राहतो.
लेखक अतिशय सुप्रसिद्ध कथाकार असल्याने त्यांची पुस्तकं येणाऱ्या  कथाकारांना पारायणासमान आहेत ज्यामधून तरुण कथाकार बरेच शिकतो.
माझ्याकडून पुस्तकाला आणि कथेला *****
परीक्षण:-कौशिक  श्रोत्री
©

Book is equipped with full of offbeat stories and mystery.Mystery sometimes pinches the readers with fear. Fear of known,fear of unknown and mystery behind them is basic theme of stories.Some stories might create fear of panic within readers. Some stories look real as if they had just occurred in our life.
Writer is biggest storyteller in marathi literature.His all books are fuel for all young storytellers. He was one who inspired me to write.
5 stars*****
Written by:- Kaushik
©

Wednesday 15 November 2017

Book review~ही वाट एकटीची,लेखक-व.पू.काळे

Babi, the heroine of the novel presents the most  hardest philosophy of life in simplest yet in  effective way. Story is about guy and girl who fall in love. This love is so intense that she gives birth to child before marriage but guy whom she loved refuses to accept her and child.Later on she moves forward in life with child where she decides to grow child.This is the story of her struggle and more than that the truth that she faces alone, with courage, without bothering for side effects of the society. She gets support from a few like her, who respect the truth more than anything. She raises her child keeping faith only on the truth, but what is her future? What is the future of her child? What does she achieve at the end? The answers to all these questions are woven beautifully.
Major usp of story is writing style. Dont miss it.
5 stars from my side.
Written by...Kaushik
All rights reserved..

Sunday 5 November 2017

Film review-ITTEFAQ 2017

It is an adaption of Yashraj 1969 hit. Story begins with the chase sequence where U.K based writer Vikram(Siddharth Malhotra) is  on run where he is suspected to kill his wife. Now in order to get away from police he finds shelter in the mysterious house with mysterious women Maya(Sonakshi Sinha).Here he is apprehended where he is caught by police next to body of Maya's husband Shekhar Sinha. Soon Vikram is charged of double murder and this case is assigned to officer Dev(Akshay Khanna), who has target to solve this case in three days. While investigation he finds two sides of stories from Vikram and Maya and simple and shut down case turns out to be more critical.
Ittefaq has turned out to be no marketing strategy film. This is dare decision which is  taken by creative people of film  in today's promotion fights. As a writer  I will give 100 out of 100 marks to story since it is written in a much smoother manner than expected which doesn't require marketing and all stuff.Film is without any songs which has helped background music to give strong inputs to  the story. Background music sometimes reminded me movie Kaun(1999) written by Anurag Kashap. Much higher octane drama creates mystery of the story till the end of movie and secret which is finally out at the end is much shocking.
Good to watch multitalented Akshay Khanna after a long time. He plays role of police officer who is targeted to solve case in 3 days. His character plays interrogation process in much chilled manner.
Sonakshi is just Ok. Siddharth Malhotra has taken time to get into character of accused husband but he hits right emotions and patches to character.
Finally Akshay Khanna and the story is ultimately winner.
5 stars out of 5.
©
Kaushik Shrotri

१९६९ ला  आलेला ITTEFAQ  आणि २०१७ च्या  सिनेमा  मध्ये  रचना  सारखीच  आहे पण कथा  वेगळी आहे . लंडन चा सुप्रसिद्ध लेखक विक्रम (सिद्धार्थ मल्होत्रा ) वर स्वतःच्या  पत्नीचा हत्येचा आरोप होतो आणि तो स्वतःला पोलीसांपासून वाचवण्यासाठी एका रहस्यमयी आणि गूढ घरात शिरतो. त्या घरात त्याची गाठ माया (सोनाक्षी सिन्हा ) शी  पडते. पण  एका आरोपापासून सुटका होण्याच्या आधीच दुसरा आरोप त्याच्यावर येतो.त्या रहस्यमयी घरात शिरताच त्याला माया चा पती शेखर  चा मृतदेह दिसतो आणि तो दुसऱ्या गुन्ह्याखाली पोलीसांच्या ताब्यात जातो.ही केस देव(अक्षय खन्ना ) कडे सोपवली जाते आणि ३ दिवसात ती निकाली काढण्याचे आदेश त्याला येतात.त्याच्यासमोर विक्रम आणि माया ह्यांच्या  दोन वेगवेगळ्या कथा येतात आणि तो गोंधळून जातो आणि ३ दिवसात निकाली काढण्याची केस किचकट होऊन जाते.
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत अक्षय खन्ना सहज रुळतो. सोनाक्षी सिन्हाला का सिनेमा मध्ये घेतले कळत नाही. सिद्धार्थ मल्होत्रा ला अजून अभिनय जमला असता.
सिनेमाच्या कथेला मी १०० पैकी १०० मार्क देईन.कथा शेवटपर्येंत सस्पेन्स टिकवून  ठेवते जे सिनेमाच्या अखेरीस प्रेक्षकांना धक्का देते.सिनेमा चे पाश्वसंगीत कथेच्या गूढतेमध्ये मनसोक्त भर घालते.सिनेमाच्या creative टीम ला  मी १०० मार्क देतोय कारण सिनेमाचे कुठेही मार्केटिंग न करता कथेच्या जोरावर त्यांनी सिनेमा चे प्रदर्शन करण्याचे धाडस केले.
शेवटी सिनेमा ची कथा जिंकते...
माझ्याकडून ५ मिरच्या ....
©
कौशिक श्रोत्री

Wednesday 1 November 2017

Ocean of flying dreams...

                       

 Ocean of flying dreams.

This is the time.
To dream up and rise above the high.
Beat your fears and glorify.
These dreams might look once futile.
Keep flying…Keep flying…Keep flying.

This is the age.
To jump into the ocean of flying dreams.
Chase for the dreams until it is achieved.
Some of dreams might look strenuous.
Keep flying…Keep flying…Keep flying.

Real dreams will test your passion and the soul.
Making your move hardly possible.
Nothing is easy when you are lazy.
Life is full of one-way road.
When you are all alone.
Keep flying…Keel flying…Keep flying.

You have ability to achieve your dreams.
Grab it, live it, sense it, feel it.
Nothing looks impossible for chasers.
Make it possible and bloom.
For everyone who ever thought it was impossible.
Keep flying…Keep flying…Keep flying.

Hi guys this is poem written by me on Vivekananda memorial at Kanyakumari in Oct.2017
©
Kaushik shrotri



Friday 27 October 2017

Film Review--Faster Fene

नुकताच  फास्टर  फेणे चित्रपट  पाहण्याचा  योग  आला . भा.रा .भागवत  ह्यांचं फास्टर फेणे पुस्तक  मी वाचलं नसल्यामुळे मला फास्टर फेणे ह्या पात्राविषयी जास्त माहिती नव्हती. सिनेमा अगदी नावाप्रमाणे फास्ट आहे.
बनेश फेणे ( अमेय वाघ) त्याची मेडिकल ची परीक्षा देण्यासाठी पुण्यात येतो.पुण्यात आल्यावर त्याची गाठ एका ध्येयवेड्या मुलाशी पडते. नेमका त्या  ध्येयवेडा मुलाचा मृत्यू होतो.परीक्षेच्या काही मिनिटे आधी त्या मुलाची बनेश शी गाठ पडली असल्यामुळे बनेश ला ही बाब रुचत नाही. तो पूर्णपणे  घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरवतो. घटनेचा शोध घेत असताना त्याला भा. रा. भागवत (दिलीप प्रभावळकर ),त्याची जुनी मैत्रीण अबोली(पर्ण पेठे ) आणि भूभू (शुभम मोरे) ह्यांची साथ मिळते. ह्या घटनेचा शोध घेत असताना बरेच मोठे गूढ समोर येते जे पाहून प्रेक्षक ही चकित होतात.
सिनेमाची कथा नावाप्रमाणे फास्ट आणि सुसाट आहे जी कुठेही अडखळत नाही.अमेय वाघ फास्टर फेणे च्या भूमिकेच्या पूर्ण खोलात शिरला आहे.त्याला इतर कलाकारांनी मस्त साथ दिली आहे. दिलीप प्रभावळकर भा. रा. भागवत ह्यांच्या भूमिकेत सहज छाप पडतात.इथे विशेषतः multitalented गिरीश कुलकर्णी ह्यांचा खलनायक प्रेक्षकांना मस्तपैकी घाबरून सोडतो. सिनेमा कुठेही  रेंगाळत नाही.सिनेमा सर्व बाजूनी उत्तम आहे. सिनेमाची नायिका नावापुरती आहे.सिनेमा पाहत असताना फास्टर फेणे चा चपळपणा अंगात भिनतो.  
 तर फार विचार न करता एक ताकदीच्या सुसाट शोधकथेचा आस्वाद घेण्यासाठी व फास्टर फेणे नावाच्या बुलेट ला अनुभवण्यासाठी सिनेमा नक्की पाहावा. 

परीक्षण:-कौशिक श्रोत्री,इचलकरंजी 
©

Saturday 7 October 2017

पुस्तक परीक्षण :- अंतर्बाह्य ,लेखक:- रत्नाकर मतकरी

नुकतंच  मराठी भाषेचं नवीन विषय असलेलं पुस्तक ''अंतर्बाह्य '' वाचून झालं . रत्नाकर  मतकरी ह्यांचं पुस्तक ह्या आधी मी कधीच वाचलं नसल्यामुळे सदरचे पुस्तक वाचताना मी खूप उत्साहित होतो. गूढकथाप्रेमींना  हे पुस्तक त्यांच्या विचारसरणी आणि कल्पनाशक्तीला प्रचंड खाद्य पुरवणारं आहे. गूढकथा आणि भयकथा ह्यांच्यातला फरक कथेच्या सुरवातीला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितला आहे . सदरच्या पुस्तकामध्ये सर्व कथा ह्या गूढतेने  आणि भयाने मनसोक्त घाबरून सोडतात.विशेषतः ''कोळसा '' आणि ''haunted house '' वाचत असताना प्रत्येक शब्दामध्ये गूढता आणि भय लपलेले आहे . सदरचे पुस्तक हे गूढकथा  व  भयकथा लेखकांसाठी आणि वाचकांसाठी पर्वणी आहे.
एकदा वाचाच ...
माझ्याकडून फर्स्ट क्लास ...
लेखन -कौशिक श्रोत्री ....
©

Friday 29 September 2017

Judwa 2 review

कथाशून्य,अतिअभिनय,अतिकर्कश नाच,1980 च्या काळाप्रमाणे 2017 ला वागण्याचा केला गेलेला फसवा प्रयत्न....

थोडक्यात.....

शोरूम मध्ये नवी कोरी original करकरीत बुलेट असताना ही देखील ती न घेता third hand बुलेट घेऊन तिला जरा उगीच रंग देऊन त्याची अवस्था ही न पाहता girlfriend  ला इंप्रेस करण्याच्या केलेला केविलवाणा प्रयत्न....
माझ्याकडून 100 पैकी 20 मार्क
Storytellerkaushik....

Monday 25 September 2017

वल्ली डे...

मध्यरात्रीचे साडेतीन वाजले होते.समस्त वस्त्रनगरी झोपलेली होती.रस्ते निर्मनुष्य झाले होते.तुरळक कुत्र्यांचा व खटाकक ... छटाक...  असा पॉवरलूम चा आवाज सोडल्यास रस्त्यावर भयाण शांतता पसरलेली  होती.घड्याळाचा काटा मुंगीच्या वेगाने पुढे जात होता. एक प्रकारचे गूढ वातावरण पसरले होते.ह्या गूढ वातावरणामध्ये  चंद्र ही शांतता  आणखीन गूढ करत  होता. हळूहळू गूढ  शांतता शहरावर ताबा मिळवत होती.
अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा जोरजोरात आवाज आला आणि ही शांतता लुप्त झाली.Cheetah च्या  वेगाने  एक  Mercedes  Benz शहरातल्या  रस्त्यावरून  सुसाट वेगाने  ठाण्याला निघाली  होती.मध्यरात्री पसरलेल्या  भयाण शांततेचा  अक्षरशः चिरफाड करत ही गाडी वस्त्रनगरी इचलकरंजी पार करून कोल्हापूरच्या  दिशेने जात होती. इचलकरंजी चे  सुप्रसिद्ध उद्योजक डी .के आपल्या  तरुण ड्राइवर बरोबर मुंबई ला वकिलाला भेटण्यासाठी निघाले होते.डी.के  म्हणजे  व्यवसाय  आणि प्रयोगशीलता ह्यांचा घनिष्ट उगम होता.गाडीचा ताबा तरुण ड्राइवर कडे होता.मध्यरात्री ३. ००ला साहेबांनी फोन  करून  उठवलं  असल्यामुळे  तो अर्धा  जागा व अर्धा झोपेत होता आणि मनातल्या मनात डी . के साहेबांना  मनसोक्त कोल्हापूरी शिव्या घालत होता.मध्यरात्री उठून गाडी चालवण्याची त्याची पहिलीच वेळ होती . सकाळी ४. ०० वाजता  गाडी शिरोली पार करून कराडच्या दिशेने निघाली होती. डी.के साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे ह्रितिक रोशन आणि देव आनंद ह्यांचं  अनोखं मिश्रण होतं. ह्रितिक सारखा गोरा वर्ण व तगडी शरीरयष्टी,देव आनंद स्टाइल उत्साह,सहा फूट उंची,वय ६०, १९८० काळातला लावलेला चष्मा,अनुभवाने पांढरे झालेले केस ,बोक्याची नजर असलेले गूढ डोळे,सतत तणावामुळे गौतम गंभीर झालेला चेहरा ह्यामुळे ड्राइवर डी.के साहेबांशी बोलताना खूप विचार करून बोलत होता . 
कोल्हापूर वरून गाडी कराडच्या दिशेने निघाली होती.आजचा प्रवास ड्राइवर चा कस पाहणारा होता कारण डी.के साहेबांनी नव्या गाडी च्या  gear box आणि engine मध्ये प्रचंड प्रयोग केले असल्यामुळे गियर टाकताना ड्राइवर ला दात  ओठ  खाऊन  गियर  टाकावा  लागत  होता . Mercedes वर प्रयोग करणारा हा जगातला पहिला येडा माणूस असे ड्राइव्हर ला वाटत होते . Mercedes Benz वर प्रयोग करणे म्हणजे माधुरी दीक्षित ला सिनेमा सोडून खेळामध्ये करिअर कर  असं सांगण्याचा  प्रकार होता . 
सकाळी ७.३० ला गाडी साताऱ्याजवळ  पोहोचली.ड्राइवर ला प्रचंड भूक लागली होती. त्यात आणखीन एक भर होती ती म्हणजे Mercedes सारखी गाडी असताना देखील A.C अजिबात नं लावता त्याच्या साहेबांनी त्याला गाडीच्या  काचा  उघड्या  ठेवण्यास  सांगितले होते आणि गाडीमध्ये टेप  असताना देखील तो बंद ठेवून साहेब त्यांच्याकडे असलेला radio मधून "मे जिंदगी का साथ निभाता चला गया" गाणं ऐकत सिगारेट ओढत होते.  साहेब  सतत  धूम्रपान  करत  असल्यामुळे ड्राइवर ला  बाहेरच्या हवेचा  कमी गाडीत असलेल्या  सिगारेट च्या  धुरामुळे जास्त  त्रास  होत होता.हा  प्रवास ड्राइवर चा अंत  पाहणार होता.ड्राइवर  ने  गाडी थांबवू का असे विचारल्यावर त्याच्या साहेबांनी त्याला हातानेच इशारा करत गाडी न थांबवण्याचा इशारा दिला.ड्राइवर ला प्रचंड राग आला कारण त्याचे साहेब त्याला बऱ्याचदा हातानेच इशारा देत असत व स्वतः ड्राइवर शी खूप कमी बोलत असत .सकाळी ७.५० ला डी.के साहेबांनी सातारा शहरामध्ये  एका सुप्रसिद्ध हॉटेल मध्ये ड्राइवर ला गाडी  थांबवण्यास सांगितले.दोघांनी गाडीमधून  उतरून फ्रेश होऊन सकाळच्या नाष्ट्याची ऑर्डर दिली.ड्राइवर नं  इडली सांबर व चहा मागवला व साहेबांनी डोसा मागवला.डोसा व इडली संपवून दोघे निघणार एवढ्यात डी.के साहेबांना कॉफी प्यायची हुक्की आली व पुढचा प्रसंग पाहून ड्राइवर पुरता वेडा झाला.डी.के साहेबांनी  वेटर ला २४ वेळा  कॉफी आणण्यास सांगितली .डी.के एक कप कॉफी पिणार आणि परत वेटर ला बोलवून परत कॉफी ची ऑर्डर देणार हा क्रम  २४ वेळा  चालू  होता. हॉटेल  चा मालक डोळे विस्फारून हे सर्व पाहत होता. ड्राइवर देखील पूर्ण वेडा होऊन हे दृश्य पाहत होता.वेटर ने २४ वेळा स्वयंपाघरात  जाऊन डी .के साहेबांना  कॉफी दिली होती आणि त्यांनी कॉफी २४ वेळा प्राशन केली होती.२४ वेळा  स्वयंपाघरात जाऊन वेटर देखील अर्धवेडा होत होता व त्याच्याकडे पाहून डी.के निर्विकार होते.  
 अखेर नाष्टा करून  पुढच्या प्रवासासाठी  दोघे निघाले. सकाळचे  बरोबर १०.०० वाजले होते आणि गाडी नुकतीच पुण्यात प्रवेश करत होती.वकिलाने दुपारी १२. ४५ वाजता बोलावले होते. किंचितही उसंत न घेता गाडी मुंबई च्या दिशेने निघाली. बरोबर १२. ३० ला वकिलांच्या ठाण्याच्या घराजवळ गाडी थांबली व ड्राइवर ने सुस्कारा सोडला.ड्राइवर गाडीचा दरवाजा उघडणार एवढ्यात :-
''अरे... मी महत्वाची फाईल घरीच विसरलो .आपण परत इचलकरंजी  ला घरी जाऊ ...फाईल  घेऊन  आपण परत  येऊ.मी वकील साहेबांना तसं कळवतो.''
Girl friend शी  ब्रेकअप झाल्यावर जेवढी चीड येत नाही तेवढ्या दुपटीने चीड ड्राइवर ला आली होती.ड्राइवर प्रचंड चिडला होता.त्याच्या मनात आलं हा सुप्रसिद्ध उद्योगपती साधी फाईल आणू शकत नाही... नोकरीत हाथ बांधील असल्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता .गाडीच्या शेजारी त्याला मोठा दगड दिसला .  
पण ... 
मनातल्या मनात तो विचार करत होता... 
तो दगड .... आणि ... 
डी.के  साहेब... प्रयोग केलेली Mercedes benz...आणि  मी ...  
लेखक-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क अबाधित.

Friday 22 September 2017

सहज आठवलं

तुझी सुंदरता,मोहकता, गोड आवाज ह्यात मी ओला चिंब होऊन स्वतःला विसरलो.
पण......
तुझ्या attitude ने ....एका क्षणात मी स्वतःला ओळखून बाजूला झालो ☺️☺️☺️☺️☺️
कौशिक.  

Thursday 21 September 2017

Book review-निळा सावळा लेखक-जी ए कुलकर्णी

27 वर्षाचा तरुण नुकतीच करकरीत नवीकोरी बुलेट घेतो.तो बुलेट वरून प्रचंड जोशात रोड ट्रिप साठी बाहेर पडतो.तो आंबा घाटात पोहोचतो.आंबा घाटात बुलेट चा फडफड....आवाज करत तो पुढे जातो.पण आंबा घाटात वेडीवाकडी वळणं आणि चालू असलेला सुसाट पाऊस त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहतात.तो आंबा घाट बुलेट वरून पूर्ण करण्यासाठी सहनशक्ती पणाला लावतो.पुढे घाट संपून त्याची बुलेटआणि तो एका खड्डायुक्त मार्गावर येतात.पुढे हा रस्ता पार करताना त्याची आणि बुलेट ची सहनशक्ती व संयमाची परीक्षा सुरू होते.मनातल्या मनात तो विचार करतो कुठे आपण उगीचच ह्या माहिती नसलेल्या दिशेने जात आहोत.अखेर पाऊस कमी होत जातो व एकदाचा हा मार्ग त्याला गणपतीपुळ्याच्या जवळ घेऊन जातो व तो मनातल्या मनात सुस्कारा....सोडतो

परीक्षण-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.

Monday 18 September 2017

Film review-Bwoyzzzzzzzz

बऱ्याच दिवसांनी बाहुबली 2 नंतर आलेला उत्कृष्ट सिनेमा.ह्याची कथा पण रंजक आहे.पालक आणि मुलांच्या नात्यावर कथा स्पर्श करते.Boarding school मध्ये शिकण्यास जाणारा kabir(sumant shinde)पासून कथा सुरू होते.अतिशय शिस्तीत व अबोल आयुष्य जगणाऱ्या कबीर च आयुष्य पार्थ भालेराव(dhoongya) आणि dhirya(प्रतीक लाड) आणि graace(रितिका श्रोत्री) ह्यांच्या येण्याने बदलून जाते.Boarding school च्या विद्यार्थ्यांचे विश्व ह्यातून उत्तम दाखवले आहे.16 वरीस असताना शरीरात होणारे बदल,मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांच्या विषयी वाटणारे आकर्षण,त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा उत्तम रित्या दाखवला आहे.सिनेमा कुठेही कंटाळवाणा वाटत नाही(गाणी सोडून).प्रतीक लाड,पार्थ भालेराव ह्यांच्या अभिनयाने कथेमध्ये जान आणली आहे.नवखा सुमंत शिंदेच्या अभिनयाला उत्तम दाद द्यायला हवी. विद्यार्थी प्रिय शिक्षक संतोष जुवेकर चांगला लक्षात राहतो.बाकी सिनेमा पूर्ण पैसे वसूल....
३.5 मिरची माझ्याकडून.....
समीक्षण-कौशिक श्रोत्री
लिखाणाचे सर्व हक्क राखीव.

Friday 25 August 2017

विघ्नहर्ता

          विघ्नहर्ता
तुझ्या आगमनाची लागली होती ओढ.
तुझ्या येण्याने समस्त आसमंत झाले गोड.
तुझ्या स्वागतासाठी सर्व विभागलेले झाले एक.
सर्व कुटुंबांचा तु विघ्नहर्ता.
मोरया,मोरया,मोरया.

तु सर्व विद्यार्थ्यांचा गुरू.
तु सर्व तरुणांचा मार्गदर्शक.
तु सर्व कलाकारांचा दैवत.
तुच गुरू,तुच माता,तुच पिता,तुच मित्र.
मोरया,मोरया,मोरया.

तुझ्या नावाचा महिमा आहे आभाळाएवढा मोठा.
तुझ्या जयजयकारापुढे ध्वनी होतो छोटा.
तुझ्या नावानं सर्व विघ्न क्षणात होतात नाहीशी.
तुझ्या येण्याने सर्व जीवन झाले गोडधोड.
तुझा महिमा आहे समस्त शब्दांच्याहून थोर.
गणपती बाप्पा मोरया.

लेखक-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.

Monday 21 August 2017

Book review- Through Thick and Thin, Writer-Mr.Vivek Deshpande(Retired Deputy Commissioner,Maharashtra Police)

Day-to-day life of police department is always on the path of fire. Police department and the army are two pillars of the nation. Common person cannot witness day-to-day activities of army but he is able to witness day-to-day activities of police department. I was once fascinated in school towards dress code of Maharashtra Police.
Through thick and thin is written by Mr.Vivek Deshpande (Retired Deputy Commissioner Maharashtra Police). This book is about his entire 35 years of journey and his thick and thin experiences in the Police department. It is always fascinating to watch all the police officers on the duty. Any other departments rarely receive respect, honour, dignity received by the police department currently. Being an police officer is not an easy job. We have been looking continuously through media or Bollywood, where police personnel are insensitive, atrocious, dominating and political. We do hear most of insensitive news about police department through newspaper.
Writer has shown real side of the khaki men on duty. He has also shared his real on duty experiences. He has also shared about conditions in which police officers are working. Hard to imagine that police department works for 24*7.  Every working engineer in private sector has some of paid holidays in his offer letter while police officers are offered leaves very rarely and yet all police officers work passionately for 24*7. This book is inspiration for anyone who wants to understand what it takes to be police officer in the India.
5 stars from my side.
Reviewer:- Kaushik Shrotri
© Kaushik Shrotri

Tuesday 1 August 2017

पुस्तक परीक्षण-Our story needs no filter लेखक-सुदीप नगरकर

सदरचे पुस्तक हे निखळ मैत्री व कॉलेज मधल्या राजकीय निवडणुकीचे वातावरण ह्यावर आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या तरुण पात्रांच्या आयुष्यावर कथानक आहे.पुस्तकाची सुरवात अतिशय रंजक आहे.कॉलेज चे निवडणुकीचे वातावरण,जात ह्या विषयावरून केलं जाणारे तरुण मुलांचं brainwash,पुढच्या आयुष्याचा विचार न करता अश्या संमोहनाच्या आहारी जाणारी पिढी ह्यावर परखडपणे भाष्य केलं गेलं आहे.त्याचबरोबर मैत्री कशी निखळ असू शकते ह्यावर ही नेमकेपणाने भाष्य केलं आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या पात्रांची निखळ मैत्री व रघु हे पात्र संकटात सापडले असताना त्याला त्या संकटातून बाहेर काढणारे त्याचे मित्र हा प्रवास खिळवून ठेवणारा आहे.मला एक गोष्ट जाणवली की सध्याच्या तरुण पिढीने कुठल्याही खोट्या  संमोहनाच्या आहारी न जाता सत्य पडताळून पुढे जावे.कॉलेज चे वातावरण,मैत्रीचे रुसवे फुगवे अतिशय सुंदरपणे लिहिले आहेत. लेखक मूळचे अभियंता असल्याने माझी ह्या पुस्तक वाचनाची उत्सुकता वाढली होती.कथेचा प्रवास हा प्रचंड सुसाट आहे जो पूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय थांबत नाही.

माझ्याकडून 👍👍👍👍👍

परीक्षण-कौशिक श्रोत्री

Wednesday 19 July 2017

पुस्तक परीक्षण - भुलभुलैय्या , लेखक - व.पु.काळे

सदरचे पुस्तक हे एक प्रकारचं  चमत्कारच आहे.भुलभुलैय्या  नावातच चमत्कार  वाटावा  अशी ही कथा आहे. ह्या पुस्तकामध्ये १७ कथा  आहेत. ह्या  कथांमध्ये  तोचतोच पणा  जरा देखील  जाणवत  नाही.
व.पु.काळेंच्या कथांमध्ये मध्यमवर्गीय जीवन केंद्रित  असतं.भुलभुलैय्या मध्ये  सध्याच्या  मध्यमवर्गीय  कुटुंबाला आपल्या आयुष्यात आनंद कसा मिळवता येईल यावर अत्यंत चमत्कारिक पद्धतीने भाष्य केलं आहे. 
मात्र  कथेमध्ये कुठेही वाचकाला बोचरी जाणीव होत नाही. व.पुंच्या खोडकर व मिश्किल लिखाणामुळे वाचक कथेमध्ये गुंतून जातो. ह्यामध्ये ब्रह्मदेवाचा बाप आणि प्रचिती ह्या कथांमध्ये व.पु.काळेंनी कल्पनाशक्तीचा  शेवट केला आहे . सर्वांच्या सर्व कथा मनाला स्पर्श व आनंद मिळवून देतात . एका लिखाणामुळे जर वाचकांच्या घरात व आयुष्यात आनंद निर्माण होत असेल तर ह्यातच लेखकाचं यश आहे. नवख्या लेखकांनी व.पु.काळेंच्या सर्व पुस्तकांची पारायण करावीत .
५ स्टार्स ....... 
लेखन -कौशिक श्रोत्री '
©   

Tuesday 4 July 2017

Long Reverence Walk


Endless foot began on the pilgrim walk.
Guided with fearless mind and pure heart.
This walk is gonna be a long.
 Filling the memories with Reverence for God.
 It's a Long Walk............

This walk is test of their faith.
Changing climate and long distance wait.
They keep moving forward with chant of God.
It's a Long Walk..........

It’s Strong Reverence in mind for God.
These unknown foots come for walk.
Changing their heart and the soul with chant of God.
Moving together with discipline and patience.
Free from nasty talks and fights.
It's a Long Walk..........

Walk is long here.
Each step is just a beginning.
This ends with the Chandrabhaga River.
God is waiting for them.
To hear the beautiful chant.
On Occasion of Ashadi.
''Vitthal Vitthal Jai Hari Vitthal.....................''





Saturday 1 July 2017

Book Review- The Boy who loved, Writer-Durjoy Dutt.


The novel is diary of teenager where he describes how he faced the difficulties that life threw at him. This plot that takes you back to 1998-2000. Story is all about boy named Raghu and his family. It begins with plot where Raghu is facing much bigger emotional trauma in his life. This trauma keeps Raghu away from emotion basket. Later on he gets fascinated when he meets girl named Brahmi.  He is getting involved with Brahmi in much extent. But Life throws him into deep end with worst fears.
I liked much writing plot since it is written in most realistic manner. I found writing flow was getting disturbed in middle of story. Sometimes story looked like an extended pages. I thought last some pages could be edited. Story focuses on confused teenagers, uncertain about love and at the same time trying to cope up with guilt. The novel describes his daily confusion with life and his family. The turn off in the novel is a sad ending which I personally feel doesnt justify the story. It could be represented in some other way.
It is good fictional book.  Though I am fan of writer, it could be much better with compact style.
2.5 Stars from my side. 
©

Written by-Kaushik Shrotri

Saturday 10 June 2017

Book Review-Spy


I had been biggest fan of Mr. Paulo Coelho after reading his novel Alchemist. I was inspired from his writing style of Alchemist. But this new book Spy.................................
The spy is one of such Novel; it is based on the story of Margaretha Geertruida better known by the stage name Mata Hari Dutch dancer told in Mata Hari’s voice through her final letter. Her only crime was to be an independent woman. When Mata Hari arrived in Paris she was penniless. Within months she was the most celebrated woman in the city. As a dancer, she shocked and delighted audiences; as a courtesan, she bewitched the era’s richest and most powerful men. But as paranoia consumed a country at war, Mata Hari’s lifestyle brought her under suspicion. In 1917, she was arrested in her hotel room and accused of espionage. 
While reading most of readers do feel that Mata Hari is telling her story to the world where most of them get connected to her. Story is deep involving from starting of book which keeps reader involved in it. But later on they may lose involvement since there are lots of letters which may lose attention of readers. The moment she gets arrested we couldn't find exact reason why she was arrested during World War and leaves behind much unanswered questions about Mata Hari. Story seems to be gone out of track after 2nd half.As reader I was disappointed with book since I admired writer a lot. 
I'd recommend this book only for those who can take reading hard hitting reality and the vagaries of women hood.
Impressive writer but disappointedL
2 stars from my side
Reviewer- Kaushik
9921455453
©


Monday 5 June 2017

Book review- Despite Love

Book review- Despite Love
                                                Written by- Siddharth Shrivastav

Creativity, storytelling, writing are god gifted tools. Neither any institute nor any book can give you guidance about how to be perfect storyteller and write a perfect story. Creativity and art has no age limit and bounding time.
Recently I purchased this book and I finished it in just 3 hours. Let me go through this book. This book is about story of young guys Smriti, Rishabh, Amita, Ashish, Ankit and Aradhya. Smriti loved Rishabh and Rishabh too loved her. Their relationship is under path of fire. Meanwhile Smriti was looking to take a break break from their relationship but it was hard for Rishabh. Aradhya, Ankit, Amita, Ashish are their close friends. But Smriti never realized that this break would be forever taking her away from him. Rishabh is shattered as he loses the love of his life in mysterious circumstances. He couldn’t accept reality so easily.
As investigation leads further Rishabh loses his other friend. This case turns out to be complicated. Till the things were getting clean and Rishabh is getting ready to taste his life again he loses his one more friend.
Whats going on? Is this Case getting worst with time? Who is Criminal? Do Aradhya, Ankit, Amita, Ashish co-relate with them? What will happen to Rishabh?

Despite Love is a perfect engrossing tale of love, suspense, intrigue and passion that keeps you on the edge till the very end. After reading this book it was unbelievable that it is written by author whose age is just 17. Writing is god-gifted tool which has no age limit. Language used in book is very very simple. There are not much complex words used while writing hence it makes easier to read for all readers. While reading you cannot predict what will happen in next scene? Author has generated much curiosity and drama about story. Author has well described story of all characters after their graduation days. Writing is done in decent flow and well prescribed manner.
I will give distinction for this book. Author who writes his first book at age of 17 has definitely great future in writing.It is decent story of Love, suspense and thriller that all readers will enjoy.
©
Reviewer- Kaushik Shrotri(कौशिक विद्याधर श्रोत्री )
9921455453





Wednesday 31 May 2017

I will Fly

   
It's now my time to rise above high.
To achieve dreams and glorify.
When my fate seemed to be worked.
It smashed all my dreams.

Throwing me to sinking ship.
When my friend was sensation.
And I was covered with frustration.
When world thinks I am dud.
I will Fly I will Fly

I will work again on all my dreams.
Those are smashed away to the sinking ship.
This dreams looked impossible for once
Yet I will Fly I will Fly.

I have got my life once.
I will rejoice it with full of endurance.
This downfall will not change my love towards life.
I will Fly I will Fly

Studies will only make my career I was told.
I will follow my passion which I loved.
No matter I face the hurdle.
I won't stop moving forward and forward and forward.
I will rise above ashes to the skies.
I will Fly I will Fly.

Kaushik 
9921455453
All rights reserved


Tuesday 30 May 2017

Film review-Sachin a billion dreams

मुंबई मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेला एक अवलिया,आई वडिलांचे असलेले घट्ट संस्कार व घरचा पाठिंबा पाठीशी घेऊन रमाकांत आचरेकर सरांच्या शिकवणी मध्ये तयार होत आपले स्वप्न व ध्येय चिकाटीने व मेहनतीने व कुठल्याही वाद व टगेगिरी न करता पूर्ण करता येते हा विश्वास निर्माण करणारा भारतीय क्रिकेट चा बाहुबली सचिन तेंडुलकर चा जीवन प्रवास अजिबात चुकवू नये,
५ मिरची
कौशिक
9921455453

Wednesday 24 May 2017

पुस्तक विश्लेषण - दोस्त

ह्या महिन्यामध्ये अनुभव संपन्न करणारे वपु काळे ह्यांचे  पुस्तक दोस्त विकत घेतले . पुण्यामध्ये हे पुस्तक विकत घेताना क्रॉस वर्ड चा काउंटर वरचा कॅशियर माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता . 
''सर खरे सांगू मराठी मध्ये असे लेखणीसंपन्न असलेले पुस्तक कुणीच तरुण वर्ग घेत नाही त्यांचा ओढा त्या चेतन भगत प्रकारच्या इंग्रजी पुस्तकांकडे आहे''. 
मी त्याला स्मितहास्य करीत बाहेर पडलो . स्वारगेट वरून नीता वोल्वो मधून कोल्हापूर  ला येताना पुस्तकाचे पहिले पान वाचण्यास घेतले व त्याचा शेवट करत कोल्हापूर  कधी आले समजलेच नाही . 
 पुस्तकामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी,संसारात रमलेले ... अशी ही माणसे आहेत.
या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच घडणारी व आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात व पुस्तक वाचताना असे  असते प्रसंग आपल्या आयुष्यात देखील घडलेले असतात आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात.
छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व हातोटी  साध्या सोप्या संवादातून व भाषेतून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी व त्यात वाचकाला पूर्णपणे गुंतवून ठेवण्याची हातोटी ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.खूप सोप्या भाषेमध्ये देखील कथा व स्टोरी लिहिता येऊ शकते व फुलवता देखील येऊ शकते हा   मला पुस्तक वाचत असताना मोठा अनुभव मिळाला. 
कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.विशेषतः स्पर्शज्ञान व शेवटची कथा दोस्त डोळ्यातून वाचताना अक्षरशः पाणी काढते व आपला अनुभव समृद्ध करते . 
सर्व नवख्या लेखकांनी व सर्वानी अवश्य वाचावे . 
५ स्टार्स ... 
कौशिक 
९९२१४५५४५३

Monday 15 May 2017

सिने परीक्षण सरकार ३

२००५ ला गॉडफादर ह्या इंग्रजी सिनेमा ची हिंदी आवृत्ती आली होती .अतिशय वेगाने पुढे जाणारे कथानक ,RGV स्टाईल दिग्दर्शन ,छोट्या व लक्षात राहणाऱ्या  व्यक्तिरेखा ,बिग बी ह्यांचा अवर्णनीय अभिनय,सिनेमॅटोग्राफी ,देह बोलींमधून व्यक्त होणार अभिनय ह्या सर्व नवीन गोष्टींमुळे नावाजला गेला होता . नंतर २००८  ला सरकरराज आला. पहिल्या भागापेक्षा संथ असूनही बिग बी अभिनयामुळे हा देखील नावाजला गेला होता .आता पुढे ह्याच मालिकेतील आलेला  सिनेमा ''सरकार ३''. सरकार सुभाष नागरे (अमिताभ बच्चन )हे आपल्या २मुलांच्या माघारी आपल्या नातवाला हाताशी घेऊन मुंबई वर कसे राज्य करतात ह्या जुन्याच साच्यावर सिनेमा चे कथानक आहे . आपल्या मुलांच्या पश्चात सुभाष नागरे आपल्या नातूला (शिवा )(अमित सद्ध ) (पहिल्या भागातील के के मेनन चा मुलगा ) हाताशी धरून मुंबई वर राज्य करतात . राजकारण व सत्ताकारण करताना येणाऱ्या विरोधकांना सुभाष नागरे कसे सामोरे जातात ह्यावर सगळं सिनेमा फिरतो . इथे कथानक हे जुन्याच पद्धतीमध्ये मांडले आहे ज्यात नवीन काहीच सांगण्यासारखे नाही. खूप वेळा पुढे काय घडेल ह्याचा आधीच अंदाज येतो त्यामुळे नावीन्य पूर्णपणे संपून जाते. पण सिनेमा च्या लेखकाने सस्पेन्स व Drama खूप चांगल्या रीतीने तयार केला आहे ज्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहताना कंटाळून जात नाही . सिनेमा मध्ये मोठ्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाला काहीच वाव दिसत नाही . मनोज वाजपेयी ,यामी गौतम ,जॅकी श्रॉफ ,रोनित रॉय ,आईआजी रोहिणी हे कसलेले कलाकार असून सुद्धा त्यांचा वावर फक्त असण्यापुरता झालेला आहे. कथानक वेगवान असून सुद्धा जुन्याच पद्धतीचे आहे . नवखा अभिनेता अमित हादेखील  फिका पडतो .गोविंदा गोविंदा ,साम ,दाम ,दंड ,भेद हे पाश्वसंगीत व्यक्तिरेखांना झळाळी जेऊन जाते .  अभिनयाचे विद्यापीठ असलेले सरकार बिग बी ह्यांच्या अभिनयाच्या जोरावर सरकार सिनेमा संपतो . सरकार हि व्यक्तिरेखा बिग बी ह्यांनी पूर्णपणे जगली आहे.RGV ची फिल्म मेकिंग आणि creativity च्या पद्धत मला  व्यक्तिशः प्रचंड आवडलेली  होती .सिनेमॅटोग्राफी ,प्रसंगाप्रमाणे वाजणारे संगीत ,closeup ची पद्धत ,कमी प्रकाशात चित्रित करण्याची पद्धत मला कCreativity  बद्दल  खूप शिकवून गेली .सिनेमा ची कथा हि सिनेमा मध्ये अजून जान आणू शकली असती .
फक्त बिग बी व RGV Style Creativity साठी सिनेमा पाहण्यासारखा आहे .
२.५ स्टार्स .

लेखन -कौशिक श्रोत्री
©
९९२१४५५४५३

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...