Friday 27 October 2017

Film Review--Faster Fene

नुकताच  फास्टर  फेणे चित्रपट  पाहण्याचा  योग  आला . भा.रा .भागवत  ह्यांचं फास्टर फेणे पुस्तक  मी वाचलं नसल्यामुळे मला फास्टर फेणे ह्या पात्राविषयी जास्त माहिती नव्हती. सिनेमा अगदी नावाप्रमाणे फास्ट आहे.
बनेश फेणे ( अमेय वाघ) त्याची मेडिकल ची परीक्षा देण्यासाठी पुण्यात येतो.पुण्यात आल्यावर त्याची गाठ एका ध्येयवेड्या मुलाशी पडते. नेमका त्या  ध्येयवेडा मुलाचा मृत्यू होतो.परीक्षेच्या काही मिनिटे आधी त्या मुलाची बनेश शी गाठ पडली असल्यामुळे बनेश ला ही बाब रुचत नाही. तो पूर्णपणे  घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरवतो. घटनेचा शोध घेत असताना त्याला भा. रा. भागवत (दिलीप प्रभावळकर ),त्याची जुनी मैत्रीण अबोली(पर्ण पेठे ) आणि भूभू (शुभम मोरे) ह्यांची साथ मिळते. ह्या घटनेचा शोध घेत असताना बरेच मोठे गूढ समोर येते जे पाहून प्रेक्षक ही चकित होतात.
सिनेमाची कथा नावाप्रमाणे फास्ट आणि सुसाट आहे जी कुठेही अडखळत नाही.अमेय वाघ फास्टर फेणे च्या भूमिकेच्या पूर्ण खोलात शिरला आहे.त्याला इतर कलाकारांनी मस्त साथ दिली आहे. दिलीप प्रभावळकर भा. रा. भागवत ह्यांच्या भूमिकेत सहज छाप पडतात.इथे विशेषतः multitalented गिरीश कुलकर्णी ह्यांचा खलनायक प्रेक्षकांना मस्तपैकी घाबरून सोडतो. सिनेमा कुठेही  रेंगाळत नाही.सिनेमा सर्व बाजूनी उत्तम आहे. सिनेमाची नायिका नावापुरती आहे.सिनेमा पाहत असताना फास्टर फेणे चा चपळपणा अंगात भिनतो.  
 तर फार विचार न करता एक ताकदीच्या सुसाट शोधकथेचा आस्वाद घेण्यासाठी व फास्टर फेणे नावाच्या बुलेट ला अनुभवण्यासाठी सिनेमा नक्की पाहावा. 

परीक्षण:-कौशिक श्रोत्री,इचलकरंजी 
©

Saturday 7 October 2017

पुस्तक परीक्षण :- अंतर्बाह्य ,लेखक:- रत्नाकर मतकरी

नुकतंच  मराठी भाषेचं नवीन विषय असलेलं पुस्तक ''अंतर्बाह्य '' वाचून झालं . रत्नाकर  मतकरी ह्यांचं पुस्तक ह्या आधी मी कधीच वाचलं नसल्यामुळे सदरचे पुस्तक वाचताना मी खूप उत्साहित होतो. गूढकथाप्रेमींना  हे पुस्तक त्यांच्या विचारसरणी आणि कल्पनाशक्तीला प्रचंड खाद्य पुरवणारं आहे. गूढकथा आणि भयकथा ह्यांच्यातला फरक कथेच्या सुरवातीला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितला आहे . सदरच्या पुस्तकामध्ये सर्व कथा ह्या गूढतेने  आणि भयाने मनसोक्त घाबरून सोडतात.विशेषतः ''कोळसा '' आणि ''haunted house '' वाचत असताना प्रत्येक शब्दामध्ये गूढता आणि भय लपलेले आहे . सदरचे पुस्तक हे गूढकथा  व  भयकथा लेखकांसाठी आणि वाचकांसाठी पर्वणी आहे.
एकदा वाचाच ...
माझ्याकडून फर्स्ट क्लास ...
लेखन -कौशिक श्रोत्री ....
©

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...