Monday 22 August 2016

मध्यरात्र व पाऊस

सध्या श्रावण महिना व सणवार जोरात सुरु आहेत . अश्या श्रावण महिन्यात येणारे अनुभव आपल्याला सर्वगुणसंपन्न करून जातात . नुकताच मी ऑफिस मधून घरी आलो होतो . दिवसभर कंमिटमेंट्सनि मन आणि शरीर  पिळून काढले होते . पण  काय करणार ?कंमिटमेंट्स कधीच संपत नसतात .. 
डिनर नंतर उद्या कायकाय करणार ह्याची उजळणी करत बसलो होतो . 
उजळणी करता करता मध्यरात्रीचे १२. कधी आले समजलंच नाही .. 
  जस जस घड्याळाचा काटा कासवाच्या गतीने पुढे जात होता तस तसं मला आलेला थकवा हळूहळू कमी होत होता . मी एकटाच माझ्या खोलीत बसलो होतो . मी latenight गिटार संगीत लावले होते . जशी रात्र वाढत जात होती तशी  निरव शांतता व संगीत  आणखीन गद्गद होत गेली . मी अशी निरव शांतता पहिल्यांदाच अनुभवत होतो .कासवाच्या गतीने पुढे सरकणारा काटा,रातकिडयांच्या चरचर आवाज,रिकामे झालेले रस्ते,हळूहळू शांत होणारे कुत्रांचे आवाज ,इंच एवढी देखील न हलणारी झाडांची पाने ,पटापट बंद होणारे फ्लॅट मधले दिवे ,मधूनच येणारे वटवाघूळ चा आवाज अशी शांतता माझ्या मनाला हुरहूर लावत होती. काय होती ती शांतता ?अशी शांतता पाहून मला एका सिनेमा मधली ओळ आठवली . '"निली निली सी खामोशिया कहे राही हें बस तुम हो यह सिर्फ मे हू मेरी संस  धडकणें ऑर मे "'. 
अश्या निरव हुरहूर लावणाऱ्या शांततेत अचानक ढगांचा गडगडाट होऊन पाऊस आला . श्रावण महिन्यात निसर्ग आणि पाऊस ह्या दोघांना attitude च ग्रहण लागलं की काय ?असा प्रश्न पडतो .. ऊन पाऊसाचा खेळ हा दिवसभर सुरु असतो .. जसा पाऊस वाढत गेला तसा गारठा वाढत गेला . 
अश्या वातावरणात मी एका जागी बसूच शकत नव्हतो . हातातील लॅपटॉप बंद करून मी गॅलरी उघडली मध्यरात्री १. ला . निसर्गाचा दानशूरपणा मी पुरेपूर अनुभवत होतो . मी फ्लॅट ची गची च दार उघडले . विजांचा कडकडाट ,ढगांचा गडगडाट ,माझे संगीत ,हुडहुडी लावणारा गारठा,लाल मातीचा सुगंध,एका सुरात पडणारा पाऊस,मुंगीच्या वेगाने पुढे जाणारा घड्याळाचा काटा व मी आणि माझ्या हातातली कॉफी ... मी बराचवेळ एकटक पावसाचा आनंद घेत होतो . पडणारा पाऊस व निसर्ग जणू काही मला हेच सांगत होते . 
"कुठलीच गोष्ट कायमची कधीच नसते यश ,अपयश,ह्या एका नाण्याच्या २ बाजू आहेत.माझ्यासारखा मोकळा ढाकळा मनसोक्त राहा "'.. ह्या पावसानं मला परमोच असा आनंद मिळून दिला . 

पाऊस काय थांबत नव्हता आणि माझा पाय हालत नव्हता . पण मला दुसऱ्यादिवशी च्या कंमिटमेंट्स होत्या . परत असा अनुभव घ्यायचाच असा ठरवून शांतपणे मी निद्राधीन झालो . 

तर मित्रांनो कसा वाटलं लेख प्रतिक्रिया नक्की कळवा . 

वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत . 

कौशिक श्रोत्री 





9 comments:

Anonymous said...

Good one but some Charoli would have added some flavor to it :)

Unknown said...

Appreciated

Sujeet Soundattikar said...

There is enough scope for improvement...but nice attempt.

Unknown said...

Very good ...

Storytellerkaushik said...

THANKS

Storytellerkaushik said...

TY

Storytellerkaushik said...

TY

Vivek Desai said...

Nicely written :)

Storytellerkaushik said...

ty

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...