Friday 29 September 2017

Judwa 2 review

कथाशून्य,अतिअभिनय,अतिकर्कश नाच,1980 च्या काळाप्रमाणे 2017 ला वागण्याचा केला गेलेला फसवा प्रयत्न....

थोडक्यात.....

शोरूम मध्ये नवी कोरी original करकरीत बुलेट असताना ही देखील ती न घेता third hand बुलेट घेऊन तिला जरा उगीच रंग देऊन त्याची अवस्था ही न पाहता girlfriend  ला इंप्रेस करण्याच्या केलेला केविलवाणा प्रयत्न....
माझ्याकडून 100 पैकी 20 मार्क
Storytellerkaushik....

Monday 25 September 2017

वल्ली डे...

मध्यरात्रीचे साडेतीन वाजले होते.समस्त वस्त्रनगरी झोपलेली होती.रस्ते निर्मनुष्य झाले होते.तुरळक कुत्र्यांचा व खटाकक ... छटाक...  असा पॉवरलूम चा आवाज सोडल्यास रस्त्यावर भयाण शांतता पसरलेली  होती.घड्याळाचा काटा मुंगीच्या वेगाने पुढे जात होता. एक प्रकारचे गूढ वातावरण पसरले होते.ह्या गूढ वातावरणामध्ये  चंद्र ही शांतता  आणखीन गूढ करत  होता. हळूहळू गूढ  शांतता शहरावर ताबा मिळवत होती.
अचानक कुत्र्यांचा भुंकण्याचा जोरजोरात आवाज आला आणि ही शांतता लुप्त झाली.Cheetah च्या  वेगाने  एक  Mercedes  Benz शहरातल्या  रस्त्यावरून  सुसाट वेगाने  ठाण्याला निघाली  होती.मध्यरात्री पसरलेल्या  भयाण शांततेचा  अक्षरशः चिरफाड करत ही गाडी वस्त्रनगरी इचलकरंजी पार करून कोल्हापूरच्या  दिशेने जात होती. इचलकरंजी चे  सुप्रसिद्ध उद्योजक डी .के आपल्या  तरुण ड्राइवर बरोबर मुंबई ला वकिलाला भेटण्यासाठी निघाले होते.डी.के  म्हणजे  व्यवसाय  आणि प्रयोगशीलता ह्यांचा घनिष्ट उगम होता.गाडीचा ताबा तरुण ड्राइवर कडे होता.मध्यरात्री ३. ००ला साहेबांनी फोन  करून  उठवलं  असल्यामुळे  तो अर्धा  जागा व अर्धा झोपेत होता आणि मनातल्या मनात डी . के साहेबांना  मनसोक्त कोल्हापूरी शिव्या घालत होता.मध्यरात्री उठून गाडी चालवण्याची त्याची पहिलीच वेळ होती . सकाळी ४. ०० वाजता  गाडी शिरोली पार करून कराडच्या दिशेने निघाली होती. डी.के साहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे ह्रितिक रोशन आणि देव आनंद ह्यांचं  अनोखं मिश्रण होतं. ह्रितिक सारखा गोरा वर्ण व तगडी शरीरयष्टी,देव आनंद स्टाइल उत्साह,सहा फूट उंची,वय ६०, १९८० काळातला लावलेला चष्मा,अनुभवाने पांढरे झालेले केस ,बोक्याची नजर असलेले गूढ डोळे,सतत तणावामुळे गौतम गंभीर झालेला चेहरा ह्यामुळे ड्राइवर डी.के साहेबांशी बोलताना खूप विचार करून बोलत होता . 
कोल्हापूर वरून गाडी कराडच्या दिशेने निघाली होती.आजचा प्रवास ड्राइवर चा कस पाहणारा होता कारण डी.के साहेबांनी नव्या गाडी च्या  gear box आणि engine मध्ये प्रचंड प्रयोग केले असल्यामुळे गियर टाकताना ड्राइवर ला दात  ओठ  खाऊन  गियर  टाकावा  लागत  होता . Mercedes वर प्रयोग करणारा हा जगातला पहिला येडा माणूस असे ड्राइव्हर ला वाटत होते . Mercedes Benz वर प्रयोग करणे म्हणजे माधुरी दीक्षित ला सिनेमा सोडून खेळामध्ये करिअर कर  असं सांगण्याचा  प्रकार होता . 
सकाळी ७.३० ला गाडी साताऱ्याजवळ  पोहोचली.ड्राइवर ला प्रचंड भूक लागली होती. त्यात आणखीन एक भर होती ती म्हणजे Mercedes सारखी गाडी असताना देखील A.C अजिबात नं लावता त्याच्या साहेबांनी त्याला गाडीच्या  काचा  उघड्या  ठेवण्यास  सांगितले होते आणि गाडीमध्ये टेप  असताना देखील तो बंद ठेवून साहेब त्यांच्याकडे असलेला radio मधून "मे जिंदगी का साथ निभाता चला गया" गाणं ऐकत सिगारेट ओढत होते.  साहेब  सतत  धूम्रपान  करत  असल्यामुळे ड्राइवर ला  बाहेरच्या हवेचा  कमी गाडीत असलेल्या  सिगारेट च्या  धुरामुळे जास्त  त्रास  होत होता.हा  प्रवास ड्राइवर चा अंत  पाहणार होता.ड्राइवर  ने  गाडी थांबवू का असे विचारल्यावर त्याच्या साहेबांनी त्याला हातानेच इशारा करत गाडी न थांबवण्याचा इशारा दिला.ड्राइवर ला प्रचंड राग आला कारण त्याचे साहेब त्याला बऱ्याचदा हातानेच इशारा देत असत व स्वतः ड्राइवर शी खूप कमी बोलत असत .सकाळी ७.५० ला डी.के साहेबांनी सातारा शहरामध्ये  एका सुप्रसिद्ध हॉटेल मध्ये ड्राइवर ला गाडी  थांबवण्यास सांगितले.दोघांनी गाडीमधून  उतरून फ्रेश होऊन सकाळच्या नाष्ट्याची ऑर्डर दिली.ड्राइवर नं  इडली सांबर व चहा मागवला व साहेबांनी डोसा मागवला.डोसा व इडली संपवून दोघे निघणार एवढ्यात डी.के साहेबांना कॉफी प्यायची हुक्की आली व पुढचा प्रसंग पाहून ड्राइवर पुरता वेडा झाला.डी.के साहेबांनी  वेटर ला २४ वेळा  कॉफी आणण्यास सांगितली .डी.के एक कप कॉफी पिणार आणि परत वेटर ला बोलवून परत कॉफी ची ऑर्डर देणार हा क्रम  २४ वेळा  चालू  होता. हॉटेल  चा मालक डोळे विस्फारून हे सर्व पाहत होता. ड्राइवर देखील पूर्ण वेडा होऊन हे दृश्य पाहत होता.वेटर ने २४ वेळा स्वयंपाघरात  जाऊन डी .के साहेबांना  कॉफी दिली होती आणि त्यांनी कॉफी २४ वेळा प्राशन केली होती.२४ वेळा  स्वयंपाघरात जाऊन वेटर देखील अर्धवेडा होत होता व त्याच्याकडे पाहून डी.के निर्विकार होते.  
 अखेर नाष्टा करून  पुढच्या प्रवासासाठी  दोघे निघाले. सकाळचे  बरोबर १०.०० वाजले होते आणि गाडी नुकतीच पुण्यात प्रवेश करत होती.वकिलाने दुपारी १२. ४५ वाजता बोलावले होते. किंचितही उसंत न घेता गाडी मुंबई च्या दिशेने निघाली. बरोबर १२. ३० ला वकिलांच्या ठाण्याच्या घराजवळ गाडी थांबली व ड्राइवर ने सुस्कारा सोडला.ड्राइवर गाडीचा दरवाजा उघडणार एवढ्यात :-
''अरे... मी महत्वाची फाईल घरीच विसरलो .आपण परत इचलकरंजी  ला घरी जाऊ ...फाईल  घेऊन  आपण परत  येऊ.मी वकील साहेबांना तसं कळवतो.''
Girl friend शी  ब्रेकअप झाल्यावर जेवढी चीड येत नाही तेवढ्या दुपटीने चीड ड्राइवर ला आली होती.ड्राइवर प्रचंड चिडला होता.त्याच्या मनात आलं हा सुप्रसिद्ध उद्योगपती साधी फाईल आणू शकत नाही... नोकरीत हाथ बांधील असल्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता .गाडीच्या शेजारी त्याला मोठा दगड दिसला .  
पण ... 
मनातल्या मनात तो विचार करत होता... 
तो दगड .... आणि ... 
डी.के  साहेब... प्रयोग केलेली Mercedes benz...आणि  मी ...  
लेखक-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क अबाधित.

Friday 22 September 2017

सहज आठवलं

तुझी सुंदरता,मोहकता, गोड आवाज ह्यात मी ओला चिंब होऊन स्वतःला विसरलो.
पण......
तुझ्या attitude ने ....एका क्षणात मी स्वतःला ओळखून बाजूला झालो ☺️☺️☺️☺️☺️
कौशिक.  

Thursday 21 September 2017

Book review-निळा सावळा लेखक-जी ए कुलकर्णी

27 वर्षाचा तरुण नुकतीच करकरीत नवीकोरी बुलेट घेतो.तो बुलेट वरून प्रचंड जोशात रोड ट्रिप साठी बाहेर पडतो.तो आंबा घाटात पोहोचतो.आंबा घाटात बुलेट चा फडफड....आवाज करत तो पुढे जातो.पण आंबा घाटात वेडीवाकडी वळणं आणि चालू असलेला सुसाट पाऊस त्याच्या सहनशक्तीचा अंत पाहतात.तो आंबा घाट बुलेट वरून पूर्ण करण्यासाठी सहनशक्ती पणाला लावतो.पुढे घाट संपून त्याची बुलेटआणि तो एका खड्डायुक्त मार्गावर येतात.पुढे हा रस्ता पार करताना त्याची आणि बुलेट ची सहनशक्ती व संयमाची परीक्षा सुरू होते.मनातल्या मनात तो विचार करतो कुठे आपण उगीचच ह्या माहिती नसलेल्या दिशेने जात आहोत.अखेर पाऊस कमी होत जातो व एकदाचा हा मार्ग त्याला गणपतीपुळ्याच्या जवळ घेऊन जातो व तो मनातल्या मनात सुस्कारा....सोडतो

परीक्षण-कौशिक श्रोत्री
वितरणाचे सर्व हक्क राखीव.

Monday 18 September 2017

Film review-Bwoyzzzzzzzz

बऱ्याच दिवसांनी बाहुबली 2 नंतर आलेला उत्कृष्ट सिनेमा.ह्याची कथा पण रंजक आहे.पालक आणि मुलांच्या नात्यावर कथा स्पर्श करते.Boarding school मध्ये शिकण्यास जाणारा kabir(sumant shinde)पासून कथा सुरू होते.अतिशय शिस्तीत व अबोल आयुष्य जगणाऱ्या कबीर च आयुष्य पार्थ भालेराव(dhoongya) आणि dhirya(प्रतीक लाड) आणि graace(रितिका श्रोत्री) ह्यांच्या येण्याने बदलून जाते.Boarding school च्या विद्यार्थ्यांचे विश्व ह्यातून उत्तम दाखवले आहे.16 वरीस असताना शरीरात होणारे बदल,मुलांना मुलींविषयी आणि मुलींना मुलांच्या विषयी वाटणारे आकर्षण,त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा उत्तम रित्या दाखवला आहे.सिनेमा कुठेही कंटाळवाणा वाटत नाही(गाणी सोडून).प्रतीक लाड,पार्थ भालेराव ह्यांच्या अभिनयाने कथेमध्ये जान आणली आहे.नवखा सुमंत शिंदेच्या अभिनयाला उत्तम दाद द्यायला हवी. विद्यार्थी प्रिय शिक्षक संतोष जुवेकर चांगला लक्षात राहतो.बाकी सिनेमा पूर्ण पैसे वसूल....
३.5 मिरची माझ्याकडून.....
समीक्षण-कौशिक श्रोत्री
लिखाणाचे सर्व हक्क राखीव.

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...