‘आबाजी,मागं
हो!’
आबाजीने मागं
पाहिले तो, आपल्या धारकर्यांसह शिवाजीराजे धावत येत होते.राजांच्या हातात तळपती
तलवार होती.
राजांच्या
आज्ञेनुसार आबाजी बाजूला झाला.बाजी आणि शिवाजीराजे एकमेकांसमोर उभे होते.
शिवाजीराजांच्या
भवती धारकऱ्यांचे कडे होते.मशालधारी दोन्ही बाजूला उभे होते.
बाजी प्रथमच
शिवाजीराजांना पाहत होते.
वय तीस,जिरेटोप
घातलेली,शिवगंधाने विशाल कपाळ रेखलेले,तेजस्वी वेध घेणारे डोळे बाजी पाहत होते.तीस
वर्षाचे वयाचे भान त्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.नजरेत भीतीचा लवलेशही दिसत नव्हता.चेहऱ्यावर
तेज दिसत होते.
बाजी
शिवाजीराजांचे रूप निरखत होते.
.....
हेलकावे
घेणाऱ्या पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते.पालखीवर झाकलेल्या अलवानामुळे
राजांना काही दिसत नव्हते.
बाजींचा आवाज
येत होता, ‘चला’
चला!
कुठं जायचं?
........
रणजीत देसाई ह्यांचे लिखाण
आणि...बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज....ह्यांच्या पावनखिंड
मोहिमेचा पराक्रम अनुभवण्यासाठी अवश्य वाचाच.
No comments:
Post a Comment