॥ श्रीगणेशाय नमः ॥
नामधारक
विनवी सिद्धासी । कथा सांगितली आम्हांसी ।
म्लेंच्छराजें
श्रीगुरुसी । होतें नगरासी नेलें ॥१॥
तेथोन आले
गाणगाभुवना । पुढील वर्तल्या निरुपणा ।
सांगा
स्वामी कृपाघना । गुरुचरित्र आम्हांसी ॥२॥
सिद्ध
म्हणे ऐक वत्सा । कथा असे अतिविशेषा ।
ऐकतां
जाती सकळ दोषा । चिंतिलें काम्य पाविजे ॥३॥
राजाची
भेट घेऊनि । श्रीगुरु आले गाणगाभुवनीं ।
योजना
करिती आपुल्या मनीं । गुप्त रहावें म्हणोनिया ॥४॥
प्रगट
झालों बहुवसी । राजा आला भेटीसी ।
उपजली
भक्ति म्लेंच्छासी । नाना जाती येतील ॥५॥
म्हणोनि
आतां गुप्त व्हावें । लोकमतें निघोनि जावें ।
पर्वतयात्रा
म्हणोनि भावें । निघाले श्रीगुरु परियेसीं ॥६॥
गुप्त
राहिले गाणगापुरीं । प्रगट दाविलें लोकाचारीं ।
निघाले
स्वामी पर्वतगिरीं । शिष्यांसहित अवधारा ॥७॥
भक्तजन
बोळवित । चिंता करीत अत्यंत ।
श्रीगुरु
संबोखिती समस्त । रहावविती अतिप्रीतीनें ॥८॥
दुःख
करिती सकळ जन । लागताती श्रीगुरुचरण ।
स्वामी
आम्हांतें सोडून । केवी जातां यतिराया ॥९॥
भक्तजनांची
तूं कामधेनु । आम्ही बाळक अज्ञानु ।
होतासि
आम्हां निधानु । सोडोनि जातां श्रीगुरु ॥१०॥
नित्य
तुझें करितां दर्शन । दुरितें जाती निरसून ।
जी जी
कामना इच्छी मन । त्वरित पावे स्वामिया ॥११॥
बाळकातें
सोडोनि माता । केवी जाय अव्हेरितां ।
तूं आमुचा
मातापिता । नको अव्हेरुं म्हणताती ॥१२॥
ऐकोनि
नानापरी विनंति । हांसते झाले श्रीगुरुमूर्ति ।
संबोखिती
अतिप्रीतीं । न करा चिंता म्हणोनि ॥१३॥
आम्ही
असतों याचि ग्रामीं । नित्य स्नान अमरजासंगमीं ।
वसों
माध्यान्हीं मठधामीं । गुप्तरुपें अवधारा ॥१४॥
जे भक्त
असती माझ्या प्रेमीं । त्यांतें प्रत्यक्ष दिसों आम्ही ।
लौकिकमतें
अविद्याधर्मीं । बोल करितों श्रीशैलयात्रा ॥१५॥
प्रातःस्नान
कृष्णातीरीं पंचनदी वृक्ष औदुंबरीं ।
अनुष्ठाना
बिंदुक्षेत्रीं । माध्यान्हीं येतों भीमातटीं ॥१६॥
अमरजासंगमीं
स्नान करोनि । पूजा घेऊं मठीं निर्गुणीं ।
चिंता न
करा अंतःकरणीं । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥१७॥
ऐसें
सांगती समस्तांसी । संदेह न धरावा मानसीं ।
गाणगाभुवनीं
अहर्निशीं । वसों आम्ही त्रिवाचा ॥१८॥
जे जे जन
भक्ति करिती । त्यांसी आमुची अतिप्रीति ।
मनकामना
पावती । सिद्धवाक्य असे आमुचें ॥१९॥
अश्वत्थ
नव्हे कल्पवृक्ष । संगमीं असे प्रत्यक्ष ।
तुमच्या
मनीं जें अपेक्ष । त्वरित होय पूजितां ॥२०॥
कल्पवृक्षातें
पूजोनि । मग यावें आमुचे स्थानीं ।
पादुका
ठेवितों निर्गुणी । पूजा करा मनोभावें ॥२१॥
विघ्नहर
चिंतामणी । त्यातें पूजितां एकमनीं ।
चिंतिलें
फळ तत्क्षणीं । लाभे तुम्हां अवधारा ॥२२॥
समस्त
विघ्नांचा अंतक । पूजा तुम्हीं विनायक ।
अष्टतीर्थें
असती विशेख । आचरावीं मनोभावें ॥२३॥
संतोषकारक
आम्हांप्रती । त्रिकाळ करावी आरती ।
भक्तजन
जें इच्छिती । त्वरित होय अवधारा ॥२४॥
ऐसें
सांगोनि तयांसी । निघालें स्वामी परियेसीं ।
भक्त
परतोनि मठासी । आले चिंतित पायांतें ॥२५॥
चिंतित
निघती मठांत । तेथें दिसती श्रीगुरुनाथ ।
लोक झाले
विस्मित । म्हणती वस्तु त्रैमूर्ति ॥२६॥
यासी
म्हणती जे नर । ते पावती यमपूर ।
सत्य
बोलिले निर्धार । न कळे महिमा आम्हांसी ॥२७॥
सवेंचि
पाहतां न दिसे कोणी । प्रेमळ भक्त देखती नयनीं ।
यापरी
गौप्यरुप धरोनि । राहिले श्रीगुरु मठांत ॥२८॥
दृष्टान्त
दाखविला भक्तांसी । पातले आपण श्रीपर्वतासी ।
पाताळगंगातीरासी
। राहिले स्वामी परियेसा ॥२९॥
शिष्यांतें
निरोपिती अवधारा । पुष्पांचें आसन त्वरित करा ।
जाणें असे
पैलतीरा । ऐक्य होऊं मल्लिकार्जुनीं ॥३०॥
निरोप
देतां श्रीगुरुमूर्ति । आणिलीं पुष्पें शेवंती ।
कुमुदें
कल्हारें मालती । कर्दळीपर्णें वेष्टोनि ॥३१॥
आसन केलें
अतिविचित्र । घातलें गंगेमध्यें पात्र ।
शिष्यां
सांगती वेगवक्र । जावें तुम्ही गृहासी ॥३२॥
दुःख करीत
येत सकळी । यांसी सांगती श्रीगुरु चंद्रमौळी ।
गाणगाग्रामीं
असों जवळी । भाव न धरावा दुजा तुम्ही ॥३३॥
लौकिकमतें
आम्ही जातों । ऐसें दृष्टान्तीं दिसतों ।
भक्तजनां
घरीं वसतों । निर्धार धरा मानसीं ॥३४॥
ऐसें
भक्तां संबोखोनि । उठले श्रीगुरु तेथोनि ।
पुष्पासनीं
बैसोनि । निरोप देती भक्तांसी ॥३५॥
कन्यागतीं
बृहस्पति । बहुधान्य संवत्सरी ख्याति ।
सूर्य
चाले उत्तर दिगंतीं । संक्रांति कुंभ परियेसा ॥३६॥
शिशिर ऋतु
माघमासीं । असितपक्ष प्रतिपदेसी ।
शुक्रवारीं
पुण्यदिवसीं । श्रीगुरु बैसले निजानंदीं ॥३७॥
श्रीगुरु
म्हणती शिष्यांसी । जातों आम्ही निज मठासी ।
पावतां
खूण तुम्हांसी । प्रसादपुष्पें पाठवितों ॥३८॥
येतील
पुष्पें जाती शेवंती । घ्यावा प्रसाद तुम्हीं भक्तीं ।
पूजा
करावी अखंड रीतीं । लक्ष्मी वसों तुम्हां घरीं ॥३९॥
आणिक
सांगेन एक खूण । गायनीं करी जो माझे स्मरण ।
त्याचे
घरीं असे जाण । गायनप्रीति आम्हांसी ॥४०॥
नित्य जें
जन गायन करिती । त्यांवरी माझी अतिप्रीति ।
तयांचे
घरी अखंडिती । आपण असों अवधारा ॥४१॥
व्याधि न
होय त्यांचे घरीं । दरिद्र जाय त्वरित दुरी ।
पुत्रपौत्र
श्रियाकरीं । शतायुषी नांदतील ॥४२॥
ऐकतील
चरित्र माझें जरी । वाचतील नर निरंतरी ।
लक्ष्मी
राहे त्यांचे घरीं । संदेह न धरावा मनांत ॥४३॥
ऐसें
सांगोनि भक्तांसी । श्रीगुरु जहाले अदृशी ।
चिंता
करिती बहुवशी । अवलोकिती गंगेंत ॥४४॥
ऐशी चिंता
करितां थोर । तटाकीं पातले नावेकर ।
तिहीं
सांगितला विचार । श्रीगुरु आम्हीं देखिले ॥४५॥
शिष्यवर्गासी
मनोहर । व्यवस्था सांगती नावेकर ।
होतों
आम्ही पैलतीर । तेथें देखिले मुनीश्वर ॥४६॥
संन्यास
वेष दंड हातीं । नामें श्रीनृसिंहसरस्वती ।
निरोप
दिधला आम्हांप्रती । तुम्हां सांगा म्हणोनि ॥४७॥
आम्हांस
आज्ञापिती मुनि । आपण जातों कर्दळीवनीं ।
सदा वसों
गाणगाभुवनीं । ऐसें सांगा म्हणितलें ॥४८॥
भ्रांतपणें
दुःख करितां । आम्हीं देखिलें दृष्टान्ता ।
जात असतां
श्रीगुरुनाथा । सुवर्णपादुकां त्यांचे चरणीं ॥४९॥
निरोप
सांगितला तुम्हांसी । जावें आपुल्या स्थानासी ।
सुखी
असावें वंशोवंशीं । माझी भक्ति करोनि ॥५०॥
प्रसादपुष्पें
आलिया । घ्यावीं शिष्यें काढोनिया ।
ऐसें
आम्हां सांगोनिया । श्रीगुरु गेले अवधारा ॥५१॥
ऐसें
सांगती नावेकर । समस्त राहिले स्थिर ।
हर्षें
असती निर्भर । प्रसादपुष्पें पहाती ॥५२॥
इतुकिया
अवसरीं । आलीं प्रसादपुष्पें चारी ।
मुख्य
शिष्यें प्रीतिकरीं । काढोनि घेतलीं अवधारा ॥५३॥
नामधारक
म्हणे सिद्धासी । मुख्य शिष्य कोण उपदेशीं ।
विस्तारोनिया
आम्हांसी । पुष्पें कोणा लाभलीं ॥५४॥
सिद्ध
म्हणे नामधारका । शिष्य बहुत गुरुनायका ।
असती
गाणगापुरीं ऐका । गेले शिष्य आश्रमा ॥५५॥
आश्रम
घेती संन्यासी । त्यांसी पाठविलें तीर्थासी ।
तयांचीं
नामें परियेसीं । सांगेन ऐका विस्तारोन ॥५६॥
बाळकृष्णसरस्वती
। उपेंद्रमाधवसरस्वती ।
पाठविते
झाले प्रीतीं । आपण राहिले संगमीं ॥५७॥
गृहस्थधर्म
शिष्य बहुत । समस्त आपुले घरीं नांदत ।
त्रिवर्ग
आले श्रीपर्वताप्रत । चवथा होतों आपण ॥५८॥
साखरे नाम
सायंदेव । कवीश्वर-युग्में पूर्वभाव ।
नंदी
नामें नरहरी देव । पुष्पें घेतलीं चतुर्वर्गी ॥५९॥
गुरुप्रसाद
घेऊन । आले शिष्य चौघेजण ।
तींच
पुष्पें मज पूजन । म्हणोनि पुष्पें दाखविती ॥६०॥
ऐसा
श्रीगुरुचा महिमा । सांगतसे अनुपमा ।
थोडें
सांगितलें तुम्हां । अपार असे सांगतां ॥६१॥
श्रीगुरुचरित्र
कामधेनु । सांगितलें तुज विस्तारोनु ।
दुःख
दरिद्र गेलें पळोनु । ऐसें जाण निर्धारीं ॥६२॥
ऐसें
श्रीगुरुचरित्र । श्रवणीं कीर्तनी अतिपवित्र ।
सुखें
नांदती पुत्रपौत्र । लक्ष्मीवंत होती जाण ॥६३॥
धर्म अर्थ
काम मोक्ष । तयांसी लाभे प्रत्यक्ष ।
महा आनंद
उभयपक्ष । पुस्तक लिहितां सर्वसिद्धि ॥६४॥
ऐसें
सिद्धें सांगितलें । नामधारक संतोषले ।
सकळाभीष्ट
लाधलें । तात्काळिक अवधारा ॥६५॥
म्हणे
सरस्वतीगंगाधर । श्रीगुरुचरित्र अतिमनोहर ।
ऐकतां
पावती पैल पार । संसारसागरा तरोनिया ॥६६॥
श्रीगुरुचरित्र
ऐकतां । सकळाभीष्टें तत्त्वतां ।
लाधती
म्हणोनि समस्तां । ऐका म्हणे नामधारक ॥६७॥
अमृताची
असे माथणी । स्वीकारितां भाविक जनीं ।
धर्मार्थ
काम मोक्ष साधनीं । हेचि कथा ऐकावी ॥६८॥
पुत्रपौत्रां
ज्यासी चाड । त्यासी हे कथा असे गोड ।
राहे
लक्ष्मी स्थिर अखंड । श्रवणमात्रें घरीं नांदे ॥६९॥
चतुर्विध
पुरुषार्थ । लाधती श्रवणे परमार्थ ।
श्रीनृसिंहसरस्वती
गुरुनाथ । रक्षी त्यांचे वंशोवंशीं ॥७०॥
म्हणे
सरस्वतीगंगाधर । श्रोतयांसी करी नमस्कार ।
कथा ऐका
मनोहर । सकळाभीष्टें साधती ॥७१॥
मुख्य भाव
कारण । प्रेमें करितां श्रवण पठण ।
निजध्यास
आणि मनन । प्रेमें करोनि साधिजे ॥७२॥
श्रीनृसिंहसरस्वती
शंकर । त्याचे चरणीं अर्पण साग्र ।
त्याचेचि
प्रसादें समग्र । समस्त प्रजा सुखी असती ॥७३॥
ग्रंथ
ठेवावा शुद्ध स्थानीं । शुद्ध वस्त्रीं शुद्ध मनीं ।
नित्य
पूजा करोनि । ग्रंथ गृहामाजीं ठेवावा ॥७४॥
इति
श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धनामधारकसंवाद अमृत ।
गुरुसमाधि
नाम विख्यात । एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥७५॥
इति
श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे
श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः ॥५१॥
॥ ओवीसंख्या
॥७५॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु॥
No comments:
Post a Comment