बराच गजबजाट ऐकू
येत होता.लांबून बऱ्याच दोन-चाकी गाड्या विचित्र हॉर्न वाजवत वेगात येत होत्या आणि
त्याच वेगाने जात होत्या.शेजारी बरेच कॉफीशॉप दिसत होते.एकएक कॉफी शॉप ओलांडत
दुचाकीस्वार निघाला होता.त्याला घाई दिसत होती.एकएक गल्ली त्याला दिसत होती.गाली
क्रमांक.१...२...३...४.....असे करत तो ९व्या गल्लीजवळ आला.तिथे आल्यावर त्याने परत
यु-टर्न घेतला आणि तो परत मागे फिरला.आणि चौथ्या गल्लीजवळ आला.तिथून परत त्याने टर्न
घेतला आणि एकएक घर शोधत पुढे जाऊ लागला.
आजूबाजूला मोठे
बंगले होते.त्यावर सुचनांचा पाऊस होता.एका बंगल्यावर लिहिले होते ‘बेल न वाजवता आत
येणे.’ दुसऱ्या बंगल्यावर ‘सुज्ञ माणसे
दुपारी वामकुक्षी घेतात.’ पुढे गेल्यावर तिसऱ्या बंगल्यावर ‘कुत्रापासून नाही तर
माणसापासून सावध राहा.’
तो दुचाकीस्वार
एकएक सूचना पाहत जात होता.त्याला प्रचंड हसू येत होते.अखेर तो गल्लीमध्ये शेवटचा
असलेल्या बंगल्याजवळ थांबला.त्याची गाडी त्याने बाहेर पार्क केली आणि तो गेटजवळ
थांबला.गेटला लागून वॉचमनचे केबिन होते.
दुचाकीस्वार, “साहेब
आहेत का?’’
वॉचमन, “आपण
कोण?’’
दुचाकीस्वार,“मी
साहेबांचा लांबचा पाव्हना.फोन केला आहे साहेबांना.’’
वॉचमनने इंटरकॉमवर
फोन लावला.आणि काही वेळात फोन ठेवला.
वॉचमन,“तुंम्ही
साहेबांच्या अगदी वेळेत आला आहात.जावा.’’
दुचाकीस्वार
बंगल्यात गेला.त्याने वेळ पाहिली.दुपारचे दोन वाजले होते.तो बंगला निरखू
लागला.बंगल्यात दोन महागड्या चारचाकी होत्या आणि दोन अत्यंत महागड्या दोन चाकी होत्या.
बंगल्याला लागून
जिना होता.तो चालत जिने चढू लागला आणि पहिल्या मजल्यावर गेला.तिथे गेल्यावर त्याला
बंद खोली आणि बेल दिसली.तिथे त्याला सूचना दिसली.
“दुपारी बेल
वाजवू नये.दारावर टकटक करावे.’’
त्याने दारावर
टकटक असा आवाज केला.
दार उघडले गेले.
समोर ४५ वर्षाचा
माणूस उभा होता.बहुतेक गडी असावा.
दुचाकीस्वार, “साहेब
आहेत का?’’
“या.बसा आहेत.’’
दुचाकीस्वार
बंगल्यात हॉलमध्ये गेला.बंगला मोठा वाटत होता.हॉलमध्ये महागडे फर्निचर दिसत
होते.तिथे तो दुचाकीस्वार बसला.
तेवढ्यात साहेब
आले.त्यांनी हॉलमध्ये असलेला ‘ए.सी’ सुरु केला.पांढरेकेस,अंगभर पांढऱ्या रंगाचे
कपडे,हातात नॅपकीन आणि...धीरगंभीर डोळे.५५-५७ वर्षाचे साहेब असावेत.तो दुचाकीस्वार
साहेबांकडे पाहत होता.
साहेब आल्यावर
तो दुचाकीस्वार उभा राहिला.
“अरे.बस..बस..राहुल.’’
राहुल बसला.
साहेब, “अगं,एकतीस
का...राहुल आलाय.आपल्याकडे.’’
साहेबांचे बोलणे
ऐकून साहेबांच्या सौ पळतपळत बाहेर आल्या.
“कसा आहेस
राहुल?’’
“मजेत
काकू.काकांना बरेच दिवस भेटलो नाही.म्हणून आलो.’’
राहुलच्या हातात
पुस्तक होते.साहेबांच्या सौ पुस्तकाकडे पाहत होत्या.
सौ,“नवीन
पुस्तक.’’
राहुल, “हो.’’
साहेब,“कसे आहे
रे पुस्तक?’’
राहुल, “मस्त
आहे.तुमच्यासाठी गिफ्ट.खास.व्यवसाईक लोकांना खूप चांगले.’’
राहुलने
साहेबांना पुस्तक दिले.
साहेब, “मनापासून
धन्यवाद राहुल.’’
सौ, “राहुल काही
घेणार का?’’
राहुल, “नको.’’
सौ, “लाजतोस काय?’’
राहुल, “नाही.तसे
काही नाही.’’
साहेब, “राहुलला
एकवाटी आमरस दे.’’
राहुल, “चालेल.’’
सौ आमरस आणायला स्वयंपाघरात
गेल्या.
राहुल घर पाहू
लागला.
राहुल, “काका.घर
सुंदर आहे.’’
साहेब, “न
पाहताच कसे काय सुंदर आहे म्हणतोस.चल पूर्ण घर दाखवतो.’’
साहेब त्याला आधी
बाल्कनीमध्ये घेऊन गेले.बाल्कनी मोठी होती.तिथे दोन झोपाळे दिसत होते.
साहेब, “इथे
आम्ही दोन झोपाळे बांधलेले आहेत.इथे येऊन सर्वांना मोकळी हवा मिळते.हृदयाला चांगली
असते मोकळी हवा.तेवढीच सध्या फुकट मिळते.फुकट गोष्ट सोडायची नाही.आणि चहा
पिण्यासाठी आणि पुस्तक वाचण्यासाठी बाल्कनीसारखी जागा नाही.बाकी आमच्या दोन २५
लाखाच्या गाड्या आम्ही पार्क करून ठेवतो.दोन्ही बाल्कनीमधून दिसत असतात.आमची नजर
देखील राहते.’’
राहुल मान डोलवत
होता.
नंतर दोघे
हॉलमध्ये आले.तिथे फर्निचर दिसत होते.मोठे झुंबर दिसत होते. एका बाजूला टेबल दिसत
होते.तिथे पुस्तक रचून ठेवलेली होती.
साहेब, “इथे
आम्ही सर्वजण एकत्र टी.व्ही पाहतो.पुस्तक वाचतो.बातम्या पाहतो.सीरियल पाहतो.शक्यतो
मी सिरीयल पाहत नाही.आमच्या सूनबाई आणि आमच्या सौ पाहतात.विरंगुळा म्हणून चित्रपट
पाहतो;जुने;राज कपूरचे;नाहीतर हल्लीचे सिनेमे....हा ‘टी.व्ही’ आम्ही डिस्काउंट
मध्ये घेतला आहे.आमचे तब्बल ५००० रुपये वाचले.आमचे नातवंड टी.व्ही पाहत असतात.
बाकी हे फर्निचर महाग आहे.आमच्या सूनबाईंचा चॉइस.हौशी आहेत खूप.हॉलमध्ये उकाडा
वाढला कि आम्ही ‘ए.सी’ लावतो.कुटुंब म्हंटले कि ए.सी आलाच.तो देखील आम्ही डिस्काउंटमध्ये
घेतला.त्यात आमचे २५०० रुपये वाचले.’’
राहुल, “(मनात)काय
माणूस आहे!फर्निचरला ५०००० खर्च करतोय आणि टी.व्ही मध्ये ५००० वाचवतोय.’’
राहुल, “सुंदर आहे
हॉल.’’
साहेब, “हे वरती
लावलेले झुंबर.ते सुद्धा सुनेने आणलंय.हौसेला मोल नाही.किंमत तब्बल ८००००.’’
राहुल ऐकत होता.
हॉलमधून दोघे
स्वयंपाघरात आले. स्वयंपाघर पाहून दोघे साहेबांच्या खोलीजवळ गेले.
साहेब, “स्वयंपाघर
आमच्या सुनबाई आणि सौंची लाडकी जागा.इथे सर्व सुविधा उपलब्ध आहे.फ्रीज आहे.ओव्हन आहे.बाकीच्या
आधुनिक सुविधा आहेत.फ्रीज आहे.तब्बल ५००००चा.त्यात रंगीत पेय देखील आहे.’’
राहुल
स्मितहास्य करत होता.
राहुलला तिथे
ठेवलेले आंबे दिसले होते.
राहुल, “तिथे
आंबे..’’
साहेब, “हो.सुनेकडून
येतात.कोकणातून.भरपूर येतात.तिचे माहेर कोकण.अगदी कमी किमतीत.कधीकधी आम्हाला फुकट
सुद्धा मिळतात.तिच्या वडिलांकडून.फुकट कधीतरी आम्ही घेतो.आंबे मात्र सुंदर.आम्ही
रोज आमरस करून पितो.एक वाटी.’’
राहुल, “वाह!.’’
साहेब, “रोज एक वाटी.उन्हाळा
संपेपर्येंत.’’
राहुल, “काय...!’’
साहेब, “हो.नाहीतर
सर्वांचे वजन वाढते.मग ते कमी करायला खर्च.’’
राहुल ऐकत होता.
साहेब, “आता ही
आमची खोली.शेजारची आमच्या मुलाची.दोन्ही खोलीत ए.सी. आहेत.जोडून बाथरूम
आहेत.भारतीय पद्धत आणि पाश्चिमात्य पद्धत.दोन्हीची सवय असावी माणसाला.तिथे
अंघोळीला पाणी आहे.चोवीस तास.’’
राहुल ऐकत होता.उरलेल्या
दोन खोल्या साहेब त्याला दाखवत होते.दोघे शेवटच्या खोलीजवळ आले.
साहेब, “ही
संगीत रूम.आमच्या चिरंजीवांना संगीताचा नाद.बाकी त्यांना कसला नाद नाही.संगीत
म्हणजे त्यांचे जीव की प्राण.इथे सर्व वाद्य आहेत.ह्या खोलीला २ लाख रुपये खर्च
आला.आमचे चिरंजीव घरचा व्यवसाय पाहतात.रात्री घरी आले की वाद्य वाजवत बसतात.’’
दोघे दुसऱ्या
मजल्यावर असलेल्या गच्चीवर गेले.
साहेब, “ही माझी
आवडती जागा.इथे मी दुपारी ३.०० ते ३.४० वामकुक्षी घेतो.’’
साहेब, “तर....राहुल
कसे वाटले घर?आत्ता बोल.’’
राहुल, “खरंच
मस्त आहे.’’
साहेब, “असे घर
तुला बांधायचे असेल तर ७५ लाख खर्च येईल अंदाजे.’’
राहुल, “इतक्यात
नाही.काका.’’
दोघे स्वयंपाघरात
आले.
तिथे
साहेबांच्या सौ होत्या.
साहेब, “राहुल
घे आमरस.’’
सौ,’’तू
जेवलास..’’
साहेब, “तो
असणार जेवलेला.’’
राहुल काहीच
बोलला नाही.
राहुल, “काका
तुम्ही आमरास घेत...’’
साहेब, “मी जेवत
असताना घेतो.आणि आमचे स्वयंपाघर आम्ही दुपारी दोनला बंद करतो.तू दोनला आलास म्हणून
तुला आमरस मिळाला.एक वाटी.दुपारी अडीचला आला असतास तर आमचे स्वयंपाघर बंद असते.तुला
काहीच मिळाले नसते.आमच्या वेळेत आले कि भरपूर आम्ही खायला घालतो.’’
राहुल, “ठीक
आहे.’’
राहुल आमरस
संपवतो.
साहेब, “मग...राहुल
कसे सुरु आहे व्यवसाय आणि संसार.’’
राहुल, “उत्तम
काका.तुम्ही घरी या.’’
साहेब, “येतो
ना.’’
राहुल, “काकूला
देखील घेऊन या.’’
साहेब, “नक्की.’’
राहुल, “निघतो
मी.निघतो काकू.’’
साहेब, “
अगं.एकतीस का.राहुल निघाला आहे.’’
साहेबांच्या सौ
हॉलमध्ये आल्या.
सौ, “ये परत.’’
राहुल बाहेर
पडला आणि त्याच्या बाईकजवळ आला.त्याने वेळ पाहिली.दुपारचे ०३.०० वाजले होते.
राहुल, “नुसता मी...मी...दुसरे
काही सुचत नाही ह्या माणसाला.जाऊन काहीतरी खातो बाहेर.’’
विचार करत तो
निघाला.
काही
दिवसांनी:-
वेळ:-दुपारी
१.३०ची
ठिकाण:-पुण्यात कुठेतरी
“येऊ का
राहुल...?’’
साहेबांचा आवाज
आला.
राहुल, “काका.या
की.’’
साहेब राहुलच्या
घरी आले होते.राहुल आणि साहेब दोघे हॉलमध्ये बसले होते.साहेब राहुलचे घर पाहत
होते.एकएक गोष्ट पाहत होते.हॉलमध्ये ए.सी....महागडा टी.व्ही....इम्पोर्टेड
फर्निचर...
राहूल, “काका, काकू
आल्या नाहीत.’’
साहेब, “अरे ती आली
नाही.मी आलो होतो कामासाठी.खूप महत्वाचे काम होते.हे काम झाले कि माझा व्यवसाय
सुसाट.जाताजाता तुझ्याकडे आलो.’’
राहुल, “तुम्ही
असताना कुठे काम अडते काका.तुम्ही काम फत्ते करूनच जाता.’’
तेवढ्यात
राहुलची बायको हॉलमध्ये आली आणि दोघे साहेबांच्या पाया पडले.
साहेब, “अरे..असू
दे...’’
साहेब, “काय करतीस
गायत्री?’’
गायत्री, “घरगुती
मेस आहे.ती मी बघते.राहुल त्याचा व्यवसाय पाहतो.मला देखील मदत करतो.’’
साहेब, “अरे वाह!
एकंदरीत सुंदर चालू आहे.’’
राहुल आणि
गायत्री दोघे साहेबांकडे पाहून स्मितहास्य करतात.
गायत्री लगेच
स्वयंपाघरात जाते आणि साहेबांना सरबत करून आणते.तिघे सरबत पीत गप्पा मारत होते.
थोड्यावेळाने:-
राहुल, “काका..घर
बघूया.’’
साहेब, “चल.’’
दोघे घर निरखू
लागले.गायत्री स्वयंपाघरात गेली.
पूर्ण घर पाहून
झाल्यावर दोघे हॉलमध्ये बसले.
साहेब, “मस्त आहे
घर राहुल.सर्व सोयीयुक्त.साधारण किती खर्च...’’
राहुल,(स्मितहास्य
करत) “९० लाख.मी एकही रुपया खर्च केला नाही.’’
साहेब,(आश्चर्यचकित
होऊन) “कसे काय रे?’’
राहुल, “काका.लग्न
झाले तेव्हा माझ्या सासरेबुवांनी हे थ्री ‘बी.एच.के’ घर गिफ्ट म्हणून दिले.’’
साहेब, “काय
सांगतोस काय?’’
राहुल, “हो.’’
राहुल हसत हसत
उत्तर देत होता.
राहुल, “आणि मला
त्यांनी....६० लाखाची गाडी देखील दिली.मी कधीतरी ती बाहेर काढतो.’’
साहेब काहीच
बोलले नाहीत.
तेवढ्यात गायत्रीने
साहेबांना आणि राहुलला खीर आणली.
राहुल, “काका.घ्या
ना खीर.’’
साहेब, “खीर...आत्ता...’’
राहुल, “कसे आहे
काका...आम्ही दोघे दुपारी एकलाच स्वयंपाघर बंद करतो.तुम्ही लवकर आला असता तर
तुम्हाला आमरस आणि जेवण दोन्ही मिळाले असते.आमची जेवणाची वेळ १२.३० ते १.००.एक
नंतर येणाऱ्या मंडळींना आम्ही असेच काहीतरी गोड करून देतो.उपाशी ठेवत नाही...आणि काका...दुपारी
तुम्ही कमीच जेवा...त्यात तुमचे वय...तुमचा तो आजार...तुमची तब्येत....म्हणून गोड
म्हणून मस्त पेकी खीर खा..दोघे मिळून मस्त पेकी दुपारी ३.००-३.४० वामकुक्षी घेऊ.’’
साहेब खीर खात अवाक
झाले आणि राहुलकडे निर्विकार नजरेने पाहू लागले.