सदर कथांमध्ये गूढता आणि मानसशास्त्र ह्यांचे उत्तम मिश्रण आहे. सर्व कथा ह्या मानसशास्त्र(Human Psychology) आणि वास्तवता ह्यावर आधारित आहेत.निर्मनुष्य,शनचरी,प्रार्थना ह्या कथा अंगावर भीतीने गारठून येतात. सर्व कथांमध्ये वास्तवतेवर उभारलेले जग आणि उत्कंठा वाढवणारी भीती ह्यांच्याबरोबर पात्रांना मिळणारा अंतिम न्याय ह्यांचे उत्तम विश्व साकारलेले आहे.प्रत्येक कथा वाचकाला वास्तवातून उठवून वेगळ्या अनामिक,गूढ,भयप्रद प्रदेशात घेऊन जातात जिथे वाचक झपाटल्यासारखा प्रत्येक पान आणि पान उलटत जातो... प्रत्येक कथांमधून मानवी जीवनावर काही प्रमाणात भाष्य केले गेले आहे.सर्व चा सर्व कथा ह्या तरुण लेखकांसाठी कथालेखन कसे असावे ह्याचे उत्तम उदाहरण आहेत.
*****
लेखन:-कौशिक
©
Ichalkaranji
21.12.2017.
©
Ichalkaranji
No comments:
Post a Comment