२००५ ला गॉडफादर ह्या इंग्रजी सिनेमा ची हिंदी आवृत्ती आली होती .अतिशय वेगाने पुढे जाणारे कथानक ,RGV स्टाईल दिग्दर्शन ,छोट्या व लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा ,बिग बी ह्यांचा अवर्णनीय अभिनय,सिनेमॅटोग्राफी ,देह बोलींमधून व्यक्त होणार अभिनय ह्या सर्व नवीन गोष्टींमुळे नावाजला गेला होता . नंतर २००८ ला सरकरराज आला. पहिल्या भागापेक्षा संथ असूनही बिग बी अभिनयामुळे हा देखील नावाजला गेला होता .आता पुढे ह्याच मालिकेतील आलेला सिनेमा ''सरकार ३''. सरकार सुभाष नागरे (अमिताभ बच्चन )हे आपल्या २मुलांच्या माघारी आपल्या नातवाला हाताशी घेऊन मुंबई वर कसे राज्य करतात ह्या जुन्याच साच्यावर सिनेमा चे कथानक आहे . आपल्या मुलांच्या पश्चात सुभाष नागरे आपल्या नातूला (शिवा )(अमित सद्ध ) (पहिल्या भागातील के के मेनन चा मुलगा ) हाताशी धरून मुंबई वर राज्य करतात . राजकारण व सत्ताकारण करताना येणाऱ्या विरोधकांना सुभाष नागरे कसे सामोरे जातात ह्यावर सगळं सिनेमा फिरतो . इथे कथानक हे जुन्याच पद्धतीमध्ये मांडले आहे ज्यात नवीन काहीच सांगण्यासारखे नाही. खूप वेळा पुढे काय घडेल ह्याचा आधीच अंदाज येतो त्यामुळे नावीन्य पूर्णपणे संपून जाते. पण सिनेमा च्या लेखकाने सस्पेन्स व Drama खूप चांगल्या रीतीने तयार केला आहे ज्यामुळे प्रेक्षक सिनेमा पाहताना कंटाळून जात नाही . सिनेमा मध्ये मोठ्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाला काहीच वाव दिसत नाही . मनोज वाजपेयी ,यामी गौतम ,जॅकी श्रॉफ ,रोनित रॉय ,आईआजी रोहिणी हे कसलेले कलाकार असून सुद्धा त्यांचा वावर फक्त असण्यापुरता झालेला आहे. कथानक वेगवान असून सुद्धा जुन्याच पद्धतीचे आहे . नवखा अभिनेता अमित हादेखील फिका पडतो .गोविंदा गोविंदा ,साम ,दाम ,दंड ,भेद हे पाश्वसंगीत व्यक्तिरेखांना झळाळी जेऊन जाते . अभिनयाचे विद्यापीठ असलेले सरकार बिग बी ह्यांच्या अभिनयाच्या जोरावर सरकार सिनेमा संपतो . सरकार हि व्यक्तिरेखा बिग बी ह्यांनी पूर्णपणे जगली आहे.RGV ची फिल्म मेकिंग आणि creativity च्या पद्धत मला व्यक्तिशः प्रचंड आवडलेली होती .सिनेमॅटोग्राफी ,प्रसंगाप्रमाणे वाजणारे संगीत ,closeup ची पद्धत ,कमी प्रकाशात चित्रित करण्याची पद्धत मला कCreativity बद्दल खूप शिकवून गेली .सिनेमा ची कथा हि सिनेमा मध्ये अजून जान आणू शकली असती .
फक्त बिग बी व RGV Style Creativity साठी सिनेमा पाहण्यासारखा आहे .
२.५ स्टार्स .
लेखन -कौशिक श्रोत्री
©
९९२१४५५४५३
फक्त बिग बी व RGV Style Creativity साठी सिनेमा पाहण्यासारखा आहे .
२.५ स्टार्स .
लेखन -कौशिक श्रोत्री
©
९९२१४५५४५३
No comments:
Post a Comment