सदरचे पुस्तक हे एक प्रकारचं चमत्कारच आहे.भुलभुलैय्या नावातच चमत्कार वाटावा अशी ही कथा आहे. ह्या पुस्तकामध्ये १७ कथा आहेत. ह्या कथांमध्ये तोचतोच पणा जरा देखील जाणवत नाही.
व.पु.काळेंच्या कथांमध्ये मध्यमवर्गीय जीवन केंद्रित असतं.भुलभुलैय्या मध्ये सध्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबाला आपल्या आयुष्यात आनंद कसा मिळवता येईल यावर अत्यंत चमत्कारिक पद्धतीने भाष्य केलं आहे.
मात्र कथेमध्ये कुठेही वाचकाला बोचरी जाणीव होत नाही. व.पुंच्या खोडकर व मिश्किल लिखाणामुळे वाचक कथेमध्ये गुंतून जातो. ह्यामध्ये ब्रह्मदेवाचा बाप आणि प्रचिती ह्या कथांमध्ये व.पु.काळेंनी कल्पनाशक्तीचा शेवट केला आहे . सर्वांच्या सर्व कथा मनाला स्पर्श व आनंद मिळवून देतात . एका लिखाणामुळे जर वाचकांच्या घरात व आयुष्यात आनंद निर्माण होत असेल तर ह्यातच लेखकाचं यश आहे. नवख्या लेखकांनी व.पु.काळेंच्या सर्व पुस्तकांची पारायण करावीत .
५ स्टार्स .......
लेखन -कौशिक श्रोत्री '
©
No comments:
Post a Comment