Wednesday 24 May 2017

पुस्तक विश्लेषण - दोस्त

ह्या महिन्यामध्ये अनुभव संपन्न करणारे वपु काळे ह्यांचे  पुस्तक दोस्त विकत घेतले . पुण्यामध्ये हे पुस्तक विकत घेताना क्रॉस वर्ड चा काउंटर वरचा कॅशियर माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता . 
''सर खरे सांगू मराठी मध्ये असे लेखणीसंपन्न असलेले पुस्तक कुणीच तरुण वर्ग घेत नाही त्यांचा ओढा त्या चेतन भगत प्रकारच्या इंग्रजी पुस्तकांकडे आहे''. 
मी त्याला स्मितहास्य करीत बाहेर पडलो . स्वारगेट वरून नीता वोल्वो मधून कोल्हापूर  ला येताना पुस्तकाचे पहिले पान वाचण्यास घेतले व त्याचा शेवट करत कोल्हापूर  कधी आले समजलेच नाही . 
 पुस्तकामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी,संसारात रमलेले ... अशी ही माणसे आहेत.
या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच घडणारी व आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात व पुस्तक वाचताना असे  असते प्रसंग आपल्या आयुष्यात देखील घडलेले असतात आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात.
छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व हातोटी  साध्या सोप्या संवादातून व भाषेतून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी व त्यात वाचकाला पूर्णपणे गुंतवून ठेवण्याची हातोटी ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.खूप सोप्या भाषेमध्ये देखील कथा व स्टोरी लिहिता येऊ शकते व फुलवता देखील येऊ शकते हा   मला पुस्तक वाचत असताना मोठा अनुभव मिळाला. 
कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.विशेषतः स्पर्शज्ञान व शेवटची कथा दोस्त डोळ्यातून वाचताना अक्षरशः पाणी काढते व आपला अनुभव समृद्ध करते . 
सर्व नवख्या लेखकांनी व सर्वानी अवश्य वाचावे . 
५ स्टार्स ... 
कौशिक 
९९२१४५५४५३

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...