Friday, 24 November 2017

मंतरलेली थंडी...

रात्रीचे १०.०० वाजले होते.हुडहुडी थंडीची नुकतीच सुरवात झाली होती.कधीच थंडी चा फारसा लवलेश ही नसलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये थंडी चे जोरदार आगमन झाले होते.रस्त्यांवर जागोजागी शेकोटी करून नागरिक ऊब मिळवत होते.गरमागरम पोहे आणि चहाचा आस्वाद घेण्यासाठी कॉलेज चे विद्यार्थी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून बाहेर पडले होते.पुन्हा पुन्हा नवतारुण्याचा अनुभव देणाऱ्या आणि विचारांना प्रणयरम्य बनवणाऱ्या ह्या गुलाबी थंडी मध्ये इचलकरंजी चा तरुण उद्योजक के.के इचलकरंजी पासून १७ किलोमीटर लांब असलेल्या लक्ष्मी वसाहतीमध्ये आपल्या foundry मध्ये निघाला होता.अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे के.के आपल्या foundry मध्ये निघाला होता.अंतर खूप लांब असल्यामुळे लवकर पोहोचण्यासाठी के.के साहेबांनी नवी कोरी करकरीत BMW गाडी बाहेर काढली.साहेबांना गाडयांची खूप आवड असल्यामुळे त्यांच्याकडे दर सहा महिन्याला नवीन गाडी सेवेसाठी हजर होती.बरोबर १०.००ला साहेब त्यांच्या सांगली रोडच्या घरातून बाहेर पडले आणि पार्वती वसाहती च्या मार्ग लक्ष्मी वसाहतीकडे निघाले.Driver ला सुट्टी असल्यामुळे गाडी चा ताबा के.के साहेबांकडे होता.गाडी ६० किलोमीटर च्या वेगाने निघाली होती. भर थंडी मध्ये के.के साहेब अंगात घट्ट बसणारा आणि पिळदार दंडाचे खुलेआम प्रदर्शन करण्यासाठी मदत करणारा being human चा शर्ट आणि रात्र असतानाही देखील डोळ्यांवर fast track चे sunglasses परिधान करून सुसाट वेगाने निघाले होते.सलमान खान चे उपजत भक्त असल्यामुळे त्यांच्याकडे सलमान च्या गाण्यांचा प्रचंड साठा होता. अगदी हुबेहूब सलमान सारखी शरीरयष्टी,पिळदार दंड,हातात bracelet आणि कायम मुलींच्या संदेशांनी भरलेला Iphone 7S आणि सलमान ची गाडी मध्ये सतत सुरु असणारी गाणी...ह्यामुळे बऱ्याच तरुणी के.के साहेबांवर जीव ओवाळून टाकत असत.
गाडी पार्वती वसाहत ओलांडून लक्ष्मी वसाहतीकडे निघाली होती.सलमान खान चे hello सिनेमा चे गाणे ‘’bang bang bang bang bang zamana bole boom boom boom boom diwana bole’ ऐकत रस्त्यावर कुणीही नसल्यामुळे साहेबांनी गाडीचा वेग वाढवला.बरोबर गाडी १०.२५ वाजता लक्ष्मी वसाहतीच्या जवळ आली. मुख्य वसाहतीमध्ये प्रवेश करत असताना साहेबांचं आजूबाजूला लक्ष गेले व त्यांनी गाडी जोरात ब्रेक मारून थांबवली. वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून जवळ २५ वर्षाची तरुणी थंडी मध्ये कुडकुडत उभारली होती.ती तरुणी गाडीजवळ आली.साहेबांनी गाडीची काच उघडली.काच उघडल्यावर गुलाबी थंडी चा झोत गाडीमध्ये शिरला.
के.के,’’एवढ्या रात्री तुम्ही इथे...’’
ती,’’ मी जवळच राहते. माझे वडील लक्ष्मी वसाहतीमध्ये foundry मध्ये काम करतात. त्यांना डबा द्यायचा होता. त्यांनी मला  प्रवेशद्वारापासून जवळ थांबण्यासाठी सांगितले होते. पण अजून आले नाहीत.’’
के.के,’’तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला जिथे जायचे तिथे सोडतो. रात्र खूप झाली आहे. मी पण ऑफिसमध्ये निघालो आहे’’.
ती,’’ ठीक आहे.’’

के.के नी गाडीचा दुसरा दरवाजा उघडला. ती गाडी मध्ये बसली आणि दोघे निघाले.
ह्यावेळेस मात्र के.के नं गाडीचा वेग ५० किलोमीटर वर आणला.बाहेर पसरलेली बोचरी थंडी मी म्हणत होती.रात्रीचे १०.३०झाले होते.रस्त्यावर एक चीटपाखरू देखील दिसत नव्हते.भयाण शांतता पसरत चाललेली होती.अश्या भर रात्री लक्ष्मी वसाहतीमध्ये ही तरुणी कशी काय एकटी उभी राहते असा प्रश्न के.के ला पडला पण त्याने तो गांभीर्याने घेतला नाही कारण त्याला समोर office चे काम दिसत होते.अभियांत्रिकी व्यवसाय के.के साहेबांचा ध्यास होता.अजून foundry यायला ८ किलोमीटर अंतर पार करायचे होते.तरुणी के.के च्या शेजारी बसली होती.गाडी मध्ये बसताना तिला अप्रूप वाटत होते. ती पहिल्यांदाच नव्या गाडीमध्ये बसली होती.मंद आवाजामध्ये सुरु असलेले इंग्रजी गाणे, जवळ असलेला iphone आणि शेजारी बसलेले तरुण तडफदार उद्योजक..ती प्रत्येक गोष्ट न्याहाळत होती.एव्हाना ती गाडी मध्ये बसल्यावर के.के नी sunglasses काढले होते.ह्या तरुण उद्योजकाची प्रत्येक गोष्ट ती टिपत होती. त्याचे पिळदार शरीर,त्याचे कपडे,त्याचाiphone,त्याची उंची,त्याची छाती असे भारदस्त व्यक्तिमत्व पाहून मनातल्या मनात तिचे जोरदार विचार चालू होते.के.के च्या मनात फक्त foundry मध्ये कशा सुधारणा करता येतील हाच विचार चालू होता.त्याचबरोबर त्यानेही हळूच एका डोळ्याने शेजारी बसलेल्या तरुणीकडे नजर टाकली.५ फुट ८ इंच उंची,गोरा वर्ण,सामान्य पेहेराव,निळे डोळे आणि चेहऱ्यावर शांततेचे प्रसन्न भाव..के.के एका डोळ्याने त्या तरुणीकडे पाहतच राहिला.तिच्या चेहऱ्यावरचे निरव शांततेचे भाव आणि तिचे डोळे त्याला पाहताच पसंद पडले होते.आजवर भरपूर मुली के.के च्या मागे लागत होत्या.मुली मागे लागण्यामध्ये खूप कारणं होती.आज वर के के नी खूप मुली पाहिल्या होत्या पण ह्या मुलीकडे पाहून त्याला काहीतरी खटकत होते.त्याला मुली भेटल्या की जोरदार बडबडायला सुरवात करत होत्या पण ही तरुणी शांत कशी काय...?
ती,’’ गाणं सुंदर आहे’’.
सलमान खान ची गाणी संपून आता गोल्डन saxophone ची हुरहूर लावणारी गाणी सुरु होती.
के.के,’’ तुम्हाला महिती आहे हे गाणं..’’.
ती,’’ हो, हे गोल्डन saxophone चे गाणे आहे.मी कॉलेज ला असताना ऐकत होते’’.
के.के(आश्चर्यचकित होऊन),’’cool!
ती,’’This song is close to my heart”.
तिचे अनपेक्षित इंग्रजी ऐकून के के ला धक्का बसला.
के.के,’’ तुम्हाला इंग्रजी येते...’’
ती,’’ हो...का?
के.के,’’ मी सहज विचारले’’.
ती मंद हसली.बराच वेळ निशब्दपणे दोघे निघाले होते.
ती,’’ तुम्हाला मनापासून धन्यवाद. मी रोज रात्री लक्ष्मी वसाहतीच्या जवळ उभारलेले असते.माझ्या वडिलांना डबा द्यायचा असतो.कुणालाही मी दिसत नाही.फक्त तुम्हाला मी दिसले’’.
के.के,’’प्रत्येकाचा व्याप वाढला आहे त्यामुळे प्रत्येकाला घरी जायची घाई असते.’’
ती,’’ जशी तुम्हाला घाई आहे आत्ता..अति घाई... संकटात...’’
के.के तिच्याकडे निरखून पाहत होता.सर्वसामान्य मुलींप्रमाणे तिचे बोलणे नव्हते.प्रत्येक वाक्य ही अशी धीरगंभीर आवाजात शांतपणे इशारा देत असल्यासारखे का बोलत आहे हा विचार के.के च्या मनात आला.आधीच कामाच्या तणावामध्ये असलेल्या के.के ला हिच्या असल्या बोलण्याने कोड्यात टाकले.
के.के ला office मधून फोन वर फोन येत होते. त्यात प्रत्येक फोन वर I am on the way असं संदेश तो टाकत होता.फोन वर फोन ऐकून के.के वैतागून गेला होता.
ती,"तुम्ही तणावामध्ये आहात का...’’
के.के,’’नाही.’’
ती,’’ तुमची body language सांगत आहे. तुम्ही तणावामध्ये आहात.’’
के.के,’’काम म्हटल्यावर थोडा तणाव असतोच.’’
ती,’’मी काही मदत करू का?’’
के.के चपापला.ही तरुणी एवढ्या मोकळेपणे कशी काय बोलत आहे हा प्रश्न त्याला पडला होता.इतर मुलींपेक्षा ही तरुणी के.के ला वेगळी वाटत होती.तिचा शांत आणि धीरगंभीर परंतु तेजस्वी असलेला चेहरा के.के ने ती गाडीत बसत असताना पाहिला होता.
के.के,’’कामगारांचाच तणाव असतो foundry मध्ये...’’
ती,’’तुम्ही ज्या तणावाखाली आहात तो तणाव तुम्ही office ला गेल्यावर नाहीसा होईल आणि त्या तणावाचा अंत होईल आणि...’’.
गाडीमधले वातावरण इंग्रजी गाण्यांमुळे हुरहूर लावत होते आणि धीरगंभीर झाले होते.त्या तरुणीचे बोलणे शांत आवाजात परंतु गंभीर स्वरात होते.
के.के,’’तुम्ही काम कुठे करता?’’
ती,’’ मी engineering केले आहे.आधी मी लक्ष्मी वसाहतीमध्ये foundry मध्येच होते पण आता नाही’’.
के.के,’’cool!which foundry?’’
तिच्या उत्तरानंतर के.के ने गाडीचा वेग ४० kilometer वर आणला कारण ती त्याचाच office मध्ये काम करत होती आणि तिचे वडील के.के च्या machine शॉप ला काम करत होते.पण के.के ने तिला जाणवू दिले नाही.
के.के,’’काम का सोडले?’’
ती,’’अजून माझे बाबा तिथेच काम करतात.पण मी मुक्त झाले कायमची...’’
के.के ला कळेना ही अशी कोड्यात का बोलत आहे.
के.के,’’मुक्त झाले...’’
ती,’’ सोडले. I am free bird now.मला safety equipment’s दिले गेले नाहीत.त्यामुळे त्या दिवशी मी शॉप वर काम करत होते तेव्हा माझ्या डोक्याला जोरदार लागले. कदाचित हेल्मेट दिले असते तर लागले नसते. एवढं होऊन देखील manager ला माझी जरा देखील फिकीर झाली नाही.’’
के.के काहीच बोलला नाही.ती सांगत असलेली अगदी विरुद्ध महिती त्याला त्याचा manager देत होता.आता के.के ला स्वतःचाच राग आला.
लक्ष्मी वसाहतीच्या डोंगराजवळ आल्यावर तिने गाडी थांबवा अशी के.के ला सूचना केली.
ती,’’थांबवता का..माझे बाबा इथूनच जवळ असलेल्या मशीन शॉप ला असतात.तुमचे आभार.’’
एवढं बोलून ती मध्यरात्री ११.००ला उतरली.के.के ला तिच्याशी बोलायचे होते पण ती थांबली नाही.के.के चं office २ मिनिटांच्या अंतरावर होते.गाडी पुढे office ला निघाली.Office च्या आत आल्यावर लगेच पार्किंग मध्ये विरुद्ध दिशेने गाडी पार्क करून के.के गाडीमधून उतरला.थंडी सुसाट वेगाने पडत होती.Watchman ला कॉफी ची order देऊन के.के आपल्या office कडे निघाला.Foundry लक्ष्मी वसाहतीच्या डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे हवेतला गारवा वाढला होता.K.K manager ची त्या तरुणीच्या सांगण्यावरून जोरदार तपासणी करणार होता. फक्त सकाळची तो वाट पाहत होता.Reception च्या जवळ असलेल्या Tiffin house ज्या मध्ये office चे लोक डबा ठेवत होते तिथे के.के चे लक्ष गेले आणि तो जागचा थबकला.त्याला लाल रंगाचा डबा दिसत होता.तोच लाल डबा जो त्याने मघाशी येताना त्या तरुणीच्या हातात पाहिला होता.तो डबा दिसल्यावर त्याच्या डोक्यातील सर्व कामे नाहीशी झाली आणि त्याने watchman ला हाक मारली.
के.के,’’हा डबा कुणाचा आहे?
Watchman,’’.......’
के.के,’’ सांगा लवकर...’’
के.के चा आवाज वरच्या पट्टीवर जात होता.
‘’साहेब, खरं सांगतो मागच्या आठवड्यात आपल्या शॉप फ्लोअर वर एका engineer साहेबांच्या अंगावर मेटल पडले होते.त्यांचा डबा आहे.जो ते घेऊन गेले नाहीत.त्यात त्यांना खूप भाजले.पण त्यानंतर ते कामावरच आले नाहीत.तेव्हापासून आपल्या इथे अपघात खूप वाढत गेले आहेत.रात्रीच्या शिफ्ट ला कुणाला तरी काहीतरी होतंच आहे...’’
“ त्यांना मुलगी होती का.’’
“ साहेब, तुम्हाला महिती आहे ती...’’
“ हो, आत्ताच येताना मी तिला आपल्या office जवळ सोडले’’.
Security guard थबकला.
‘’साहेब,कसं शक्य आहे... त्यांची मुलगी आपल्याच foundry मध्ये होती. मागच्या महिन्यात शॉप फ्लोअर वर मोठा अपघात झाला होता त्यात ती...’’.
आता डोळे मोठे करायची वेळ के.के ची होती.तेवढ्यात शॉप फ्लोअर वरचा अलार्म वाजला.Security guard पळतच गेला. तो गेल्यावर के.के आपल्या office मध्ये गेला. तिथे त्याने CCTV उघडला.Foundry च्या बाहेर सर्वत्र CCTV  बसवले होते.त्यात office पासून हाकेच्या अंतरावर त्याने त्या तरुणीला सोडले होते.CCTV rewind केल्यावर समोर आलेले दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.ती तरुणी त्याला CCTV मध्ये दिसत नव्हती.ते दृश्य पाहून के.के चे heart rate वाढू लागले.त्याला प्रचंड भीती वाटू लागली.अजूनही के.के ला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.त्याने पुन्हा CCTV  तपासला.तेवढ्यात त्याच्याकडे सुरक्षा रक्षक आणखीन एका Supervisor  ची शॉप फ्लोअर वर झालेल्या अपघाताची बातमी घेऊन आला.के.के ने सुरक्षा रक्षकाला शॉप फ्लोअर वर त्वरित जाण्यास सांगितले.के.के त्वरित आपल्या गाडीजवळ गेला.त्याला त्या तरुणीचे शांत पण गंभीर आणि इशारा देत असलेल्या आवाजातले बोलणे डोळ्यासमोर येत होते.त्याचा असल्या गोष्टींवर विश्वास बसला नाही.गाडीत त्याने छोटा कॅमेरा बसवला होता.त्याचा server त्याने mobile वर सुरु करून पाहिला आणि समोरचे दृश्य पाहून तो घाबरला.CCTV मध्ये तिच्या जागेवर कुणीही दिसत नव्हते.तो जागचा हबकलाच.
के.के ला गरगर येऊ लागली.हा काय प्रकार आहे ते त्याला समजले नाही.आजुबाजुला थंडी पडत होती पण त्याच्या शरीराचे तापमान वाढत होते.काळ पूर्णपणे त्याच्याभावती फिरत असल्याचा भास त्याला होऊ लागला. त्या मुलीचे आवाज त्याला येऊ लागले.त्याचे शरीर कुणीतरी पिळून काढत आहे असे त्याला भास होऊ लागले.त्याच्या मनावर तिसऱ्या शक्तींचा ताबा येतोय का असे त्याला काही क्षण वाटू लागले.ती मुलगी, तिच्या गंभीर पण शांत असलेल्या विक्षिप्त गप्पा,"मी फक्त तुम्हालाच दिसले" हे तिचे वाक्य... सर्व गोष्टी त्याच्या समोर येऊ लागल्या.............


"सर...सर...."
रात्रीचे ९.३० वाजले होते.के.के त्याच्या office मध्ये होता.Office चा watchman त्याला ऑफिस चा दरवाजा उघडून हाका मारत होता.दिवसभराच्या कामातून के.के ला कधी झोप आली कळलंच नाही.अत्याधुनिक office मध्ये के.के च्या laptop वर रामगोपाल वर्मा चा “डरना मना है’’ सिनेमा चे भीतीदायक पश्वासंगीत सुरु होते.सुरक्षारक्षकाने हाक मारल्यावर के.के ला जाग आली.जाग आल्यावर त्याला laptop वर चालू असलेला सिनेमा दिसला.
‘’सर,driver थांबला आहे’’
के.के नं त्याला आलोच म्हणून इशारा केला.Watchman office च्या बाहेर पडल्यावर के.के ला पडलेले स्वप्न आठवले. आपण तब्बल ३० मिनिटे झोपलो होतो ही गोष्ट त्याच्या नंतर लक्षात आली.अजून त्याच्या डोळ्यासमोर ते स्वप्न तरंगत होते.त्याने रामगोपाल वर्मा चा सिनेमा बंद केला आणि ताबडतोब त्याने दुसऱ्या दिवसाचा मिटिंग चा अजेंडा तयार केला ज्यामध्ये पहिले प्राधान्य होते सुरक्षा साहित्य खरेदी करणे आणि दुसरे प्राधान्य होते manager ला जोरदार झापणे आणि घरला घालवणे. त्याने foundry मध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांची यादी तपासली.त्यात त्याला त्याच्या स्वप्नात आलेली तरुणीचे नाव आणि फोटो आणि तिच्या वडिलांचे नाव दिसले ज्यामध्ये त्यांचा सोडून गेले म्हणून उल्लेख होता.ते स्वप्न खरं होतं का...असे के.के ला वाटू लागले. अजूनही तो अस्वस्थ होता.तो गाडीजवळ आला. पण ह्यावेळेस तो गाडीच्या मागच्या seat वर बसला आणि driver पुढच्या driving च्या जागेवर बसला.रात्रीचे १०.०० वाजले होते आणि वातावरणात चांगलाच गारवा होता.घरी जाताना त्याला पडलेले स्वप्न अजूनही त्याच्या डोळ्यासमोर तरंगत होते.गाडी 60 kilometer च्या वेगाने जात होती.जाताना के.के ला त्याच्या शेजारी एक रुमाल दिसला. त्याने तो उघडताच समोर त्याला दृश्य दिसले.

‘’LONG LIVE…K.K.Sir…’’

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...