सदरचे पुस्तक हे निखळ मैत्री व कॉलेज मधल्या राजकीय निवडणुकीचे वातावरण ह्यावर आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या तरुण पात्रांच्या आयुष्यावर कथानक आहे.पुस्तकाची सुरवात अतिशय रंजक आहे.कॉलेज चे निवडणुकीचे वातावरण,जात ह्या विषयावरून केलं जाणारे तरुण मुलांचं brainwash,पुढच्या आयुष्याचा विचार न करता अश्या संमोहनाच्या आहारी जाणारी पिढी ह्यावर परखडपणे भाष्य केलं गेलं आहे.त्याचबरोबर मैत्री कशी निखळ असू शकते ह्यावर ही नेमकेपणाने भाष्य केलं आहे.रघु,जय,ख्रिस,रुही,मेघा ह्या पात्रांची निखळ मैत्री व रघु हे पात्र संकटात सापडले असताना त्याला त्या संकटातून बाहेर काढणारे त्याचे मित्र हा प्रवास खिळवून ठेवणारा आहे.मला एक गोष्ट जाणवली की सध्याच्या तरुण पिढीने कुठल्याही खोट्या संमोहनाच्या आहारी न जाता सत्य पडताळून पुढे जावे.कॉलेज चे वातावरण,मैत्रीचे रुसवे फुगवे अतिशय सुंदरपणे लिहिले आहेत. लेखक मूळचे अभियंता असल्याने माझी ह्या पुस्तक वाचनाची उत्सुकता वाढली होती.कथेचा प्रवास हा प्रचंड सुसाट आहे जो पूर्ण पुस्तक वाचून झाल्याशिवाय थांबत नाही.
माझ्याकडून 👍👍👍👍👍
परीक्षण-कौशिक श्रोत्री
No comments:
Post a Comment