Sunday 26 November 2017

पुस्तक परिचय-रहस्य

अगदी नावाप्रमाणे पुस्तकाची कथा थ्रिल्लर आणि रहस्यमयी आहे. कथेची सर्व पाश्वभुमी मुंबई पोलीस आणि ते बुलेट च्या वेगाने सोडवत असलेले केसेस ह्या गोष्टींभोवती फिरते. कथेची सुरवात बॉलिवूड च्या एका सौंदर्यवतीच्या केस ने होते जी केस मुंबई पोलीस सहज सोडवतात. सौंदर्यवती च्या केस नंतर मुंबई मध्ये बऱ्याच घडामोडी घडतात. एकाच दिवशी मुंबई मध्ये एका पाठोपाठ एक किलिंग्स होतात ज्यामुळे मुंबई पोलीस चक्रावून जातात. त्या केसेस सोडवत जात असताना पोलिसांना नाकीनऊ येते. प्रत्येक केस चा खोलवर तपास करत असताना पोलिसांना कासवाच्या गतीने क्लू मिळत जातात आणि प्रकरणाची गुंतागुंत वाढत जाते. सहज दिसणारी केस ची व्याप्ती भलीमोठी होत वेगळ्याच दिशेने वळण घेते आणि शेवट आपल्याला भंडावून सोडतो. कथा अतिशय वेगवान आणि सुसाट आहे जी कुठेही अडखळत नाही .कथेचे मुख्य पात्र इन्स्पेक्टर भाटवडेकर,राऊत ,मोडक ह्यांचं पात्र अतिशय दमदारपणे उभे केले आहे.कथा आणि भाषेचा सुसाट वेग आपल्याला एका बैठकीमध्ये पुस्तक वाचन संपवण्यास भाग पडतात जे मी एका बैठकीमध्ये वाचून संपवले.थ्रिल,रहस्य,गूढता आणि पोलिसांची दुनिया अनुभवण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
लेखक:-हर्षद बर्वे 
माझ्याकडून फर्स्ट क्लास
©
परीक्षण:-कौशिक
इचलकरंजी.


No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...