॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
सिद्ध
म्हणे नामकरणी । गुरुभक्तशिखामणि ।
तुझी
भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली निर्धारीं ॥१॥
पर्जन्य
येतां पुढारां । जैसा येतो सूचना वारा ।
तैसें
तुझें दैन्य-हरा । ऐकसी गुरुचरित्र कथनभेद ॥२॥
ऐसें
चरित्र कामधेनु । सांगेन तुज विस्तारोन ।
एकचित्त
करुनि मन । ऐक शिष्या नामधारका ॥३॥
कृष्णावेणीतटाकेसी
। भुवनेश्वरी-पश्चिमेसीं ।
औदुंबर
वृक्षेसीं । राहिले श्रीगुरु परियेसा ॥४॥
गौप्यरुप
असती गुरु । ठाव असे अगोचरु ।
अनुष्ठान
धुरंधरु । चातुर्मास येणेंपरी ॥५॥
सिद्धस्थान
असे गहन । भुवनेश्वरीसंनिधान ।
विशेष
श्रीगुरु राहिले म्हणोन । उत्कृष्ट जाहलें महिमान ॥६॥
ऐकोनि
सिद्धाचें वचन । नामधारक करी नमन ।
परमात्मा
श्रीगुरुराणा । कां रहावें गौप्यरुपें ॥७॥
त्यासी
काय असे तपस । भिक्षा मागणें काय हर्ष ।
संदेह
माझ्या मानसास । निवारावा दातारा ॥८॥
ऐक वत्सा
नामधारका । भिक्षा मागतो पिनाका ।
आणिक
सांगेन ऐका । दत्तात्रेय तैसाचि ॥९॥
दत्तात्रेय
त्रयमूर्ति । भिक्षुकरुपी असे दिसती ।
भक्तजनानुग्रहार्थी
। तीर्थयात्रे हिंडतसे ॥१०॥
अनुपम
तीर्थे भूमीवरी । असती गौप्य अपरांपरीं ।
श्रीगुरुमूर्ति
प्रीतिकरीं । प्रगटले भक्तांलागीं ॥११॥
भक्तजनोपकारार्थ
। तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ ।
गौप्य
व्हावया कारणार्थ । समस्त येऊनि मागती वर ॥१२॥
लपवितां
दिनकरासी । केवीं लपे तेजोराशी ।
कस्तूरी
ठेवितां जतनेसी । वास केवीं गौप्य होय ॥१३॥
आणिक
सांगेन तुज साक्षी । गुण कैसा कल्पवृक्षीं ।
जेथें
राहे तया क्षितीकांक्षी । कल्पिलें फळ तेथें होय ॥१४॥
याकारणें
तया स्थानीं । प्रगटले गुरुमुनि ।
सांगेन
तुज विस्तारुनि । एकचित्तें परियेसा ॥१५॥
करवीरक्षेत्र
नगरांत । ब्राह्मण एक वेदरत ।
शास्त्रपुराण
विख्यात । सांगे सकळ विद्वज्जनां ॥१६॥
अग्रवेदी
असे आपण । जाणे तर्क व्याकरण ।
आन्हिकप्रमाण
आचरण । कर्ममार्गी रत होता ॥१७॥
त्यासी
जाहला एक सुत । मूर्ख असे उपजत ।
दैववशें
मातापिता मृत । असमाधान होऊनियां ॥१८॥
वर्धतां
मातापित्याघरीं बाळ । वर्षे सात जाहलीं केवळ ।
व्रतबंध
करिती निश्चळ । तया द्विजकुमरकासी ॥१९॥
न ये
स्नानसंध्या त्यासी । गायत्रीमंत्र परियेसीं ।
वेद कैंचा
मूर्खासी । पशूसमान जहाला असे ॥२०॥
जेथें
सांगती अध्ययन । जाऊनि आपण शिकूं म्हणे ।
तावन्मात्र
शिकतांचि क्षण । सवेंचि विस्मृति होय त्यासी ॥२१॥
त्या
ग्रामींचे विद्वज्जन । निंदा करिती सकळै जन ।
विप्रकुळीं
जन्मून । ऐसा मूर्ख उपजलासी ॥२२॥
तुझा पिता
ज्ञानवंत । वेदशास्त्रादि अभिज्ञात ।
त्याचे
पोटीं कैसा केत । उपजलासी दगडापरी ॥२३॥
जळो जळो
तुझें जिणें । पित्याच्या नामा आणिलें उणें ।
पोटीं
बांधूनि पाषाण । तळें विहीरी कां न करिसी ॥२४॥
जन्मोनियां
संसारीं । वृथा जाहलासी सूकरापरी ।
तुज गति
यमपुरीं । अनाचारें वर्तसी ॥२५॥
ज्यासी
विद्या असे ऐका । तोचि मनुष्यांमध्यें अधिका ।
जेवीं
द्रव्य असे निक्षेपिका । तैसी विद्या परियेसा ॥२६॥
ज्याचे
ह्रदयीं असे विद्या । त्यासी अखिल भोग सदा ।
यशस्वी
होय सुखसंपदा । समस्तांमध्यें पूज्य तोचि ॥२७॥
श्रेष्ठ
असे वयें थोर । विद्याहीन अपूज्य नर ।
अश्रेष्ठ
असे एखादा नर । विद्या असतां पूज्यमान ॥२८॥
ज्यासी
नाहीं सहोदर । त्यासी विद्या बंधु-भ्रातर ।
सकळिकां
वंद्य होय नर । विद्या असे ऐशागुणें ॥२९॥
एखादे
समयीं विदेशासी । जाय नर विद्याभ्यासी ।
समस्त
पूजा करिती त्यासी । विदेश होय स्वदेश ॥३०॥
ज्यासी
विद्या असे बहुत । तोचि होय ज्ञानवंत ।
त्याचे
देहीं देवत्व । पूजा घेई सकळांपाशीं ॥३१॥
एखाद्या
राज्याधिपतीसी । समस्त वंदिती परियेसीं ।
ऐसा राजा
आपण हर्षी । विद्यावंतासी पूजा करी ॥३२॥
ज्याचे
पदरीं नाहीं धन । त्याचें विद्याच धन जाण ।
विद्या
शिकावी याचिकारण । नेणता होय पशूसमान ॥३३॥
ऐकोनि
ब्राह्मणांचें वचन । ब्रह्मचारी करी नमन ।
स्वामींनीं
निरोपिलें ज्ञान । विद्याभ्यास करावया ॥३४॥
जन्मांतरीं
पूर्वी आपण । केलें नाहीं विद्यादान ।
न ये
विद्या याचि कारण । त्यासी काय करणें म्हणतसे ॥३५॥
ऐसा आपण
दोषी । उद्धरावें कृपेसीं ।
जरी असेल
उपाय यासी । निरोपावें दातारा ॥३६॥
परिहासकें
ते ब्राह्मण । सांगताति हांसोन ।
होईल
पुढें तुज जनन । तधीं येईल तुज विद्या ॥३७॥
तुज कैंचा
विद्याभ्यासु । नर नव्हेसि तूं साच पशु ।
भिक्षा
मागूनि उदर पोस । अरे मूर्खा कुळनाशका ॥३८॥
ऐसें
नानापरी नीचोत्तरेसीं । बोलती द्विज लोक त्यासी ।
वैराग्य
धरुनि मानसीं । निघाला बाळ अरण्यासी ॥३९॥
मनीं झाला
खेदें खिन्न । म्हणे त्यजीन आपुला प्राण ।
समस्त
करिती दूषण । काय उपयोग जीवूनियां ॥४०॥
जळो जळो
आपुलें जिणें । पशु झालों विद्याहीन ।
आतां
वांचोनि काय कारण । म्हणोनि निघाला वैराग्यें ॥४१॥
भिल्लवडीग्रामासी
। आला ब्रह्मचारी परियेसीं ।
अन्नोदक
नेघे उपवासी । पातला निशीं दैववशें ॥४२॥
जेथें असे
जगन्माता । भुवनेश्वरी विख्याता ।
तेथें
पातला त्वरिता । करी दर्शन तये वेळीं ॥४३॥
न करी
स्नान संध्या देखा । अपार करीतसे दुःखा ।
देवद्वारासन्मुखा
। धरणें घेतलें तया वेळीं ॥४४॥
येणेंपरी
दिवस तीनी । निर्वाण मन करुनि ।
अन्नोदक
त्यजूनि । बैसला तो द्विजकुमर ॥४५॥
नव्हे
कांहीं स्वप्न त्यालागोनि । म्हणोनि कोपे बहु मनीं ।
म्हणे
अंबा भवानी । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥४६॥
आक्रोशोनि
तये वेळीं । शस्त्रें घेऊनियां प्रबळी ।
आपुली
जिव्हा तात्काळी । छेदूनि वाहे देवीचरणीं ॥४७॥
जिव्हा
वाहोनि अंबेसी । मागुती म्हणे परियेसीं ।
जरी तूं
मज उपेक्षिसी । वाहीन शिर तुझे चरणीं ॥४८॥
ऐसें
निर्वाण मानसीं । क्रमिता झाला तो निशी ।
स्वप्न
जाहलें तयासी । ऐका समस्त श्रोते जन ॥४९॥
"ऐक बाळा ब्रह्मचारी । नको
आक्रोशं आम्हांवरी ।
असे
कृष्णापश्चिमतीरीं । त्वरित जाय तयाजवळी ॥५०॥
औदुंबरवृक्षातळीं
। असे तापसी महाबळी ।
अवतारपुरुष
चंद्रमौळी । तुझी वांछा पुरवील" ॥५१॥
ऐसें
स्वप्न तयासी । जाहलें अभिनव परियेसीं ।
जागृत
होतांचि हर्षी । निघाला त्वरित तेथोनि ॥५२॥
निघाला
विप्र त्वरित । पोहत गेला प्रवाहांत ।
पैलतटा
जाऊनि त्वरित । देखता जाहला श्रीगुरुसी ॥५३॥
चरणांवरी
ठेवूनि माथा । करी स्तोत्र अत्यंता ।
श्रीगुरुमूर्ति
संतोषतां । आश्वासिती तया वेळीं ॥५४॥
संतोषोनि
श्रीगुरुमूर्ति । माथां हस्त ठेविती ।
ज्ञान
जाहलें त्वरिती । जिव्हा आली तात्काळ ॥५५॥
वेद-शास्त्र-पुराण
। तर्क भाषा व्याकरण ।
समस्त
त्याचें अंतःकरण । पूर्ण जाहलें तात्काळीं ॥५६॥
जैसा
मानससरोवरास । वायस जातां परियेस ।
जैसा होय
राजहंस । तैसें झालें विप्रकुमरा ॥५७॥
चिंतामणि-संपर्केसीं
। सुवर्ण होय लोह कैसी ।
मृत्तिका
पडतां जांबूनदीसी । सुवर्ण होय जेवीं देखा ॥५८॥
तैसें तया
ब्राह्मणासी । गुरुचरण होतां स्पर्शी ।
आली अखिल
विद्या त्यासी । वेदशास्त्रादि तर्क भाषा ॥५९॥
सिद्ध
म्हणे नामधारका । श्रीगुरुमहिमा ऐसी ऐका ।
जे जे
स्थानीं वास देखा । स्थानमहिमा ऐसी असे ॥६०॥
म्हणोनि
सरस्वती-गंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां होय
मनोहर । सकळाभीष्ट साधती ॥६१॥
इति
श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्ध-नामधारकसंवादे भिल्लवडीस्थानमहिमावर्णनं-मंदमतिब्राह्मणवरप्रदानं नाम
सप्तदशोऽध्यायः ॥१७॥
॥
श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या ६१ ॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
No comments:
Post a Comment