॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
जय जया सिद्धमुनि । तू तारक
भवार्णी ।
सुधारस आमुचे श्रवणी । पूर्ण
केला दातारा ॥१॥
गुरुचरित्र कामधेनु । ऐकता
न-धाये माझे मन ।
कांक्षीत होते अंतःकरण । कथामृत
ऐकावया ॥२॥
ध्यान लागले श्रीगुरुचरणी ।
तृप्ति नव्हे अंतःकरणी ।
कथामृत संजीवनी । आणिक निरोपावे
दातारा ॥३॥
येणेपरी सिद्धासी । विनवी शिष्य
भक्तीसी ।
माथा लावूनि चरणांसी । कृपा भाकी
तये वेळी ॥४॥
शिष्यवचन ऐकोनि । संतोषला
सिद्धमुनि ।
सांगतसे विस्तारोनि । ऐका श्रोते
एकचित्ते ॥५॥
ऐक शिष्या शिकामणी । धन्य धन्य
तुझी वाणी ।
तुझी भक्ति श्रीगुरुचरणी ।
तल्लीन झाली परियेसा ॥६॥
तुजकरिता आम्हांसी । चेतन जाहले
परियेसीं ।
गुरुचरित्र आद्यंतेसी । स्मरण
जाहले अवधारी ॥७॥
भिल्लवडी स्थानमहिमा । निरोपिला
अनुपमा ।
पुढील चरित्र उत्तमा । सांगेन
ऐका एकचित्तें ॥८॥
क्वचित्काळ तये स्थानी ।
श्रीगुरु होते गौप्येनि ।
प्रकट जहाले म्हणोनि । पुढे
निघाले परियेसा ॥९॥
वरुणासंगम असे ख्यात ।
दक्षिणवाराणसी म्हणत ।
श्रीगुरु आले अवलोकित ।
भक्तानुग्रह करावया ॥१०॥
पुढें कृष्णातटाकांत । श्रीगुरू
तीर्थे पावन करीत ।
पंचगंगगासंगम ख्यात । तेथें
राहिले द्वादशाब्दे ॥११॥
अनुपम्य तीर्थ मनोहर । जैसें
अविमुक्त काशीपुर ।
प्रयागसमान तीर्थ थोर । म्हणोनि
राहिले परियेसा ॥१२॥
कुरवपुर ग्राम गहन । कुरूक्षेत्र
तोंचि जाण ।
पंचगंगासंगम कृष्णा । अत्योत्त्म
परियेसा ॥१३॥
कुरुक्षेत्रीं जितके पुण्य ।
तयाहूनि अधिक असे जाण ।
तीर्थे अस्ती अगण्य़ । म्हणोनि
राहिले श्रीगुरू ॥१४॥
पंचगंगानदीतीर । प्रख्यात असे
पुराणांतर ।
पांच नामे आहेति थोर । सांगेन
ऐका एकचित्तें ॥१५॥
शिवा भद्रा भोगावती । कुंभीनदी
सरस्वती ।
' पंचगंगा' ऐसी ख्याति । महापातक संहारी
॥१६॥
ऐसी प्रख्यात पंचगंगा । आली
कृष्णेचिया संगा ।
प्रयागाहूनि असे चांगा ।
संगमस्थान मनोहर ॥१७॥
अमरापुर म्हणिजे ग्राम । स्थान
असे अनुपम्य ।
जैसा प्रयागसंगम । तैसे स्थान
मनोहर ॥१८॥
वृक्ष असे औदुंबर । प्रत्यक्ष
जाणा कल्पतरु ।
देव असे अमरेश्वर । तया संगमा
षटकूळी ॥१९॥
जैसी वाराणसी पुरी ।
गंगाभागीरथी-तीरी ।
पंचनदींसंगम थोरी । तत्समान
परियेसा ॥२०॥
अमरेश्वरसंनिधानी । आहेति चौसष्ट
योगिनी ।
शक्तितीर्थ निर्गुणी । प्रख्यात
असे परियेसा ॥२१॥
अमरेश्वरलिंग बरवे । त्यासी
वंदुनि स्वभावे ।
पुजितां नर अमर होय । विश्वनाथ
तोचि जाणा ॥२२॥
प्रयागी करितां माघस्नान । जें
पुण्य होय साधन ।
शतगुण होय तयाहून । एक स्नाने
परियेसा ॥२३॥
सहज नदीसंगमांत । प्रयागसमान असे
ख्यात ।
अमरेश्वर परब्रह्म वस्तु । तया
स्थानी वास असे ॥२४॥
याकारणें तिये स्थानी ।
कोटितीर्थे असती निर्गुणी ।
वाहे गंगो दक्षिणी । वेणीसहित
निरंतर ॥२५॥
अमित तीर्थे तया स्थानी । सांगता
विस्तार पुराणीं ।
अष्टतीर्थ ख्याति जीण । तया
कृष्णातटाकांत ॥२६॥
उत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा
पश्चिममुखा ।
'शुक्लतीर्थ' नाम ऐका । ब्रहम्हत्यापाप दूर
॥२७॥
औदुंबर सन्मुखेसी । तीनी तीर्थे
परियेसी ।
एकानंतर एक धनुषी । तीर्थे असती
मनोहर ॥२८॥
'पापविनाशी' 'काम्यतीर्थ' । तिसरें सिध्द ' वरदतीर्थ ।
अमरेश्वरसंनिधार्थ । अनुपम्य असे
भूमंडळी ॥२९॥
पुढें संगम-षट्कुळांत ।
प्रयागतीर्थ असे ख्यात ।
' शाक्तितीर्थ' अमरतीर्थ' । कोटितीर्थ' परियेसा ॥३०॥
तीर्थे असती अपरांपर । सांगता
असे विस्तार ।
याकारणें श्रीपादगुरु । राहिले
तेथें द्वादशाब्दें ॥३१॥
कृष्णा वेणी नदी दोनी । पंचगंगा
मिळोनी ।
सप्तनदीसंगम सगुणी । काय सांगू
महिमा त्याची ॥३२॥
ब्रह्महत्यादि महापातकें । जळोनि
जातीं स्नानें एकें ।
ऐसें सिध्द्स्थान निकें ।
सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥
काय सांगूं त्यांची महिमा । आणिक
द्यावया नाहीं उपमा ।
दर्शनमातें होती काम्या ।
स्नानफळ काय वर्णू ॥३४॥
साक्षात् कल्पतरु । असे वृक्ष
औदुबरु ।
गौप्य होऊन अगोचरु । राहिले श्रीगुरु
तया स्थानी ॥३५॥
भक्तजनतारणार्थ । होणार असे
ख्यात ।
राहिले तेथें श्रीगुरुनाथ ।
म्हणोनि प्रकट जाहले जाणा ॥३६॥
असता पुढें वर्तमानीं । भिक्षा
करावया प्रतिदिनीं ।
अमरापुर ग्रामी । जाती श्रीगुरु
परियेसा ॥३७॥
तया ग्रामी द्विज एक । असे
वेदभ्यासक ।
त्याची भार्या पतिसेवक ।
पतिव्रतशिरोमणी ॥३८॥
सुक्षीण असे तो ब्राह्मण ।
शुक्लभिक्षा करी आपण ।
कर्ममार्गी आचरण । असे सात्विक
वृत्तीनें ॥३९॥
तया विप्रमंदिरांत । असे वेल
उन्नत ।
शेंगा निघती नित्य बहुत । त्याणे
उदरपूर्ति करी ॥४०॥
एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी ।
वरो न मिळे परियेसीं ।
तया शेंगांते रांधोनि हर्षी ।
दिवस क्रमी येणेंपरी ॥४१॥
ऐसा तो ब्राह्मण दरिद्री ।
याचकारणें उदर भरी ।
पंचमहायज्ञ कुसरी । अतिथि पूजी
भक्तीनें ॥४२॥
वर्तता श्रीगुरु एके दिवसीं ।
तया विप्रमंदिरासी ।
गेले आपण भिक्षेसी । नेलें
विप्रे भक्तिनें ॥४३॥
भक्तिपूर्वक श्रीगुरूसी । पूजा
करी तो षोडशी ।
घेवडे-शेंगा बहुवसी । केली होती
पत्र-शाका ॥४४॥
भिक्षा करून ब्राह्मणासी ।
आश्वासिती गुरु संतोषी ।
गेलें तुझे दरिद्र दोषी ।
म्हणोनी निघती तये वेळी ॥४५॥
तया विप्राचे गृहांत । जो का
होता वेल उन्नत ।
घेवडा नाम विख्यात । आंगण सर्व
वेष्टिलें असे ॥४६॥
तया वेलाचें झाडमूळ
श्रीगुरुमूर्ति छेदिती तात्काळ ।
टाकोनि देती परिबळें । गेले आपण
संगमासी ॥४७॥
विप्रवनिता तये वेळी । दु:ख
करिती पुत्र सकळी ।
म्हणती पहा हो दैव बळी । कैसें
अदृष्ट आपुलें ॥४८॥
आम्हीं तया यतीश्वरासी । काय
उपद्रव केला त्यासी ।
आमुचा ग्रास छेदुनी कैसी ।
टाकोनि दिल्हा भूमीवरी ॥४९॥
ऐसेपरी ते नारी । दु:ख करी
नानापरी ।
पुरुष तिचा कोप करी । म्हणे
प्रारब्ध प्रमाण ॥५०॥
म्हणे स्त्रियेसी तये वेळी । जें
जें होणार जया काळी ।
निर्माण करी चंद्रमोळी । तया
आधीन । विश्व जाण ॥५१॥
विश्वव्यापक नारायण ।
उत्पत्तिस्थितिलया कारण ।
पिपीलिकादि स्थूळ-जीवन । समस्तां
आहार पुरवीतसे ॥५२॥
'आयुरन्नं प्रयच्छति' । ऐसें बोले वेदश्रुति ।
पंचानन आहार हस्ती । केवी करी
प्रत्यही ॥५३॥
चौर्यायशी लक्ष जीवराशी । स्थूल
सूक्ष्म समस्तांसी ।
निर्माण केलें आहारासी । मग
उत्पत्ति तदनंतरें ॥५४॥
रंकरायासी एक दृष्टी । करुनि
निक्षेपण ।सकृत अथवा दुष्कृत्य जाण ।
आपुलें आपणचि भोगणें ।
पुढील्यावरी काय बोल ॥५६॥
आपुलें दैव असतां उणें ।
पुढिल्या बोलती मूर्खपणे ।
जे पेरिलें तोंचि भक्षणें । कवणावरी
बोल सांगे ॥५७॥
बोल ठेविसी यतीश्वरासी । आपलें
आर्जव न विचारिसी ।
ग्रास हरितला म्हणसी ।
अविद्यासागरी बुडोनि ॥५८॥
तो तारक आम्हांसी ।म्हणोनि आला
भिक्षेसी ।
नेलें आमुचे दरिद्रदोषी । तोचि
तारील आमुतें ॥५९॥
येणेंपरी स्त्रियेसी । संभाषी
विप्र परियेसी ।
काढोनि वेलशाखेसी । टाकीता झाला
गंगेत ॥६०॥
तया वेलाचें मूळ थोरी । जे कां
होतें आपुले द्वारी ।
काढूं म्हणुनि द्विजवरी । खणिता
झाला तया वेळीं ॥६१॥
काढितां वेलमूळासी । लाधला कुंभे
निधानेसी ।
आनंद जाहला बहुवसी । घेऊनि गेला
घरांत ॥६२॥
म्हणती नवल काय वर्तले । यतीश्वर
आम्हां प्रसन्न्न झाले ।
म्हणोनि ह्या वेला छेदिलें ।
निधान लाधलें आम्हांसी ॥६३॥
नर नव्हे तो योगीश्वर होईल
ईश्वरीअवतार ।
आम्हां भेटला दैन्यहर । म्हणती
चला दर्शनासी ॥६४॥
जाऊनि संगमा श्रीगुरुसी । पूजा
करिती बहुवसी ।
वृत्तांत सांगती तयासी । तये
वेळी परियेसा ॥६५॥
श्रीगुरु म्हणती तयासी । तुम्ही
न सांगणें कवणासी ।
प्रकट करितां आम्हांसी । नसेल
लक्ष्मी तुमचे घरी ॥६६॥
ऐसेपरी तया द्विजासी । सांगे
श्रीगुरु परियेसी ।
अखंड लक्ष्मी तुमचे वंशी ।
पुत्रपौत्री नांदाल ॥६७॥
ऐसा वर लधोन । गेली वनिता तो
ब्राह्मण ।
श्रीगुरुकृपा ऐसी जाण ।
दर्शनमात्रे दैन्य हरे ॥६८॥
ज्यासी होय श्रीगुरुकृपा ।
त्यासी कैचें दैन्य पाप ।
कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा ।
दैन्य कैंचे तया घरी ॥६९॥
दैव उणा असेल जो नरु । त्याणें
आश्रयावा श्रीगुरु ।
तोचि उतरेल पैलपारु । पूज्य होय
सकळिकांई ॥७०॥
जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी
लाधेल इह-परु ।
अखंड लक्ष्मी त्याचे घरी ।
अष्टैश्वर्ये नांदती ॥७१॥
सिध्द म्हणे नामधारकासी ।
श्रीगुरुमहिमा असे ऐसी ।
भजावे तुम्हीं मनोमानसीं ।
कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥
गंगाधराचा कुमर । सांगे
श्रीगुरुचरित्रविस्तार ।
पुढील कथामृतसार । ऐका श्रोते
एकचित्तें ॥७३॥
इति श्रीगुरुचरित्रामृते
परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे
अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय: ॥ १८ ॥
॥
श्रीपादश्रीवल्लभ-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ शुभं
भवतु ॥
॥ ओवी संख्या ७३ ॥
No comments:
Post a Comment