।। श्री गणेशाय नमः ।।
श्रीसरस्वत्यै नमः ।
श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः ।
श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
श्रीकुलदेवतायै नमः ।
श्रीपादश्रीवल्लभाय नमः ।
श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ।
ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना
गिरिजाकुमरा ।
जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥
जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥
हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो
का वारा उसळे ।
त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥
त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥
तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन
।
किंवा उदित प्रभारमण । तैसे तेज फाकतसे ॥३॥
किंवा उदित प्रभारमण । तैसे तेज फाकतसे ॥३॥
विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश
धरिलासी ।
नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥
नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥
चतुर्भुज दिससी निका ।
विशालाक्षा विनायका ।
प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्ने करूनिया ॥५॥
प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्ने करूनिया ॥५॥
तुझे चिंतन जे करिती । तया
विघ्ने न बाधती ।
सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥
सकळाभीष्टे साधती । अविलंबेसी ॥६॥
सकळ मंगल कार्यासी । प्रथम
वंदिजे तुम्हासी ।
चतुर्दश विद्यांसी । स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥
चतुर्दश विद्यांसी । स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥
वेद शास्त्रे पुराणे । तुझेचि
असेल बोलणे ।
ब्रह्मादिकि या कारणे । स्तविला असे सुरवरी ॥८॥
ब्रह्मादिकि या कारणे । स्तविला असे सुरवरी ॥८॥
त्रिपुर साधन करावयासी । ईश्वरे
अर्चिले तुम्हासी ।
संहारावया दैत्यांसी । पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥
संहारावया दैत्यांसी । पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥
हरिहर ब्रह्मादिक गणपती ।
कार्यारंभी तुज वंदिती ।
सकळाभीष्टे साधती । तुझेनि प्रसादे ॥१०॥
सकळाभीष्टे साधती । तुझेनि प्रसादे ॥१०॥
कृपानिधी गणनाथा । सुरवरादिका
विघ्नहर्ता ।
विनायका अभयदाता । मतिप्रकाश करी मज ॥११॥
विनायका अभयदाता । मतिप्रकाश करी मज ॥११॥
समस्त गणांचा नायक । तूचि
विघ्नांचा अंतक ।
तूते वंदिती जे लोक । कार्य साधे तयांचे ॥१२॥
तूते वंदिती जे लोक । कार्य साधे तयांचे ॥१२॥
सकळ कार्या आधारू । तूचि कृपेचा
सागरू ।
करुणानिधि गौरीकुमरू । मतिप्रकाश करी मज ॥१३॥
करुणानिधि गौरीकुमरू । मतिप्रकाश करी मज ॥१३॥
माझे मनींची वासना । तुवा
पुरवावी गजानना ।
साष्टांग करितो नमना । विद्या देई मज आता ॥१४॥
साष्टांग करितो नमना । विद्या देई मज आता ॥१४॥
नेणता होतो मतिहीन । म्हणोनि
धरिले तुझे चरण ।
चौदा विद्यांचे निधान । शरणागतवरप्रदा ॥१५॥
चौदा विद्यांचे निधान । शरणागतवरप्रदा ॥१५॥
माझिया अंतःकरणीचे व्हावे ।
गुरुचरित्र कथन करावे ।
पूर्णदृष्टीने पहावे । ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥
पूर्णदृष्टीने पहावे । ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥
आता वंदू ब्रह्मकुमारी । जिचे
नाम वागीश्वरी ।
पुस्तक वीना जिचे करी । हंसवाहिनी असे देखा ॥१७॥
पुस्तक वीना जिचे करी । हंसवाहिनी असे देखा ॥१७॥
म्हणोनि नमतो तुझे चरणी ।
प्रसन्न व्हावे मज स्वामिणी ।
राहोनिया माझिये वाणी । ग्रंथी रिघू करी आता ॥१८॥
राहोनिया माझिये वाणी । ग्रंथी रिघू करी आता ॥१८॥
विद्या वेद शास्त्रांसी । अधिकार
जाणा शारदेशी ।
तिये वंदिता विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥१९॥
तिये वंदिता विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥१९॥
ऐक माझी विनंती । द्यावी आता
अवलीला मती ।
विस्तार करावया गुरुचरित्री । मतिप्रकाश करी मज ॥२०॥
विस्तार करावया गुरुचरित्री । मतिप्रकाश करी मज ॥२०॥
जय जय जगन्माते । तूचि विश्वी
वाग्देवते ।
वेदशास्त्रे तुझी लिखिते । नांदविशी येणेपरी ॥२१॥
वेदशास्त्रे तुझी लिखिते । नांदविशी येणेपरी ॥२१॥
माते तुझिया वाग्बाणी । उत्पत्ति
वेदशास्त्रपुराणी ।
वदता साही दर्शनी । त्यांते अशक्य परियेसा ॥२२॥
वदता साही दर्शनी । त्यांते अशक्य परियेसा ॥२२॥
गुरूचे नामी तुझी स्थित । म्हणती
नृसिंहसरस्वती ।
याकारणे मजवरी प्रीति । नाम आपुले म्हणूनी ॥२३॥
याकारणे मजवरी प्रीति । नाम आपुले म्हणूनी ॥२३॥
खांबसूत्रींची बाहुली जैसी ।
खेळती तया सूत्रासरसी ।
स्वतंत्रबुधि नाही त्यांसी । वर्तती आणिकाचेनि मते ॥२४॥
स्वतंत्रबुधि नाही त्यांसी । वर्तती आणिकाचेनि मते ॥२४॥
तैसे तुझेनि अनुमते । माझे
जिव्हे प्रेरीमाते ।
कृपानिधि वाग्देवते । म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥
कृपानिधि वाग्देवते । म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥
म्हणोनि नमिले तुझे चरण । व्हावे
स्वामिणी प्रसन्न ।
द्यावे माते वरदान । ग्रंथी रिघू करवी आता ॥२६॥
द्यावे माते वरदान । ग्रंथी रिघू करवी आता ॥२६॥
आता वंदू त्रिमूर्तीसी ।
ब्रह्माविष्णुशिवांसी ।
विद्या मागे मी तयासी । अनुक्रमे करोनी ॥२७॥
विद्या मागे मी तयासी । अनुक्रमे करोनी ॥२७॥
चतुर्मुखे असती ज्यासी । कर्ता
जो का सृष्टीसी ।
वेद झाले बोलते ज्यासी । त्याचे चरणी नमन माझे ॥२८॥
वेद झाले बोलते ज्यासी । त्याचे चरणी नमन माझे ॥२८॥
आता वंदू ह्रषीकेशी । जो नायक
त्या विश्वासी ।
लक्ष्मीसहित अहर्निशी । क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥
लक्ष्मीसहित अहर्निशी । क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥
चतुर्बाहु नरहरी । शंख चक्र गदा
करी ।
पद्महस्त मुरारी । पद्मनाभ परियेसा ॥३०॥
पद्महस्त मुरारी । पद्मनाभ परियेसा ॥३०॥
पीतांबर असे कसियेला । वैजयंती
माळा गळा ।
शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ॥३१॥
शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ॥३१॥
आता नमू शिवासी । धरिली गंगा
मस्तकेसी ।
पंचवक्त्र दहा भुजेसी । अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥
पंचवक्त्र दहा भुजेसी । अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥
पंचवदने असती ज्यासी । संहारी जो
या सृष्टीसी ।
म्हणोनि बोलती स्मशानवासी । त्याचे चरणी नमन माझे ॥३३॥
म्हणोनि बोलती स्मशानवासी । त्याचे चरणी नमन माझे ॥३३॥
व्याघ्रांबर पांघरून । सर्वांगी
असे सर्पवेष्टण ।
ऐसा शंभु उमारमण । त्याचे चरणी नमन माझे ॥३४॥
ऐसा शंभु उमारमण । त्याचे चरणी नमन माझे ॥३४॥
नमन समस्त सुरवरा । सिद्धसाध्यां
अवधारा ।
गंधर्वयक्षकिन्नरा । ऋषीश्वरा नमन माझे ॥३५॥
गंधर्वयक्षकिन्नरा । ऋषीश्वरा नमन माझे ॥३५॥
वंदू आता कविकुळासी । पराशरादि
व्यासांसी ।
वाल्मीकादि सकळिकांसी । नमन माझे परियेसा ॥३६॥
वाल्मीकादि सकळिकांसी । नमन माझे परियेसा ॥३६॥
नेणे कवित्व असे कैसे । म्हणोनि
तुम्हा विनवितसे ।
ज्ञान द्यावे जी भरवसे । आपुला दास म्हणोनि ॥३७॥
ज्ञान द्यावे जी भरवसे । आपुला दास म्हणोनि ॥३७॥
न कळे ग्रंथप्रकार । नेणे
शास्त्रांचा विचार ।
भाषा नये महाराष्ट्र । म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥
भाषा नये महाराष्ट्र । म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥
समस्त तुम्ही कृपा करणे । माझिया
वचना साह्य होणे ।
शब्दब्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥
शब्दब्युत्पत्तीही नेणे । कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥
ऐसे सकळिका विनवोनि । मग ध्याइले
पूर्वज मनी ।
उभयपक्ष जनकजननी । माहात्म्य पुण्यपुरुषांचे ॥४०॥
उभयपक्ष जनकजननी । माहात्म्य पुण्यपुरुषांचे ॥४०॥
आपस्तंबशाखेसी । गोत्र कौंडिण्य
महाऋषि ।
साखरे नाम ख्यातिशी । सायंदेवापासाव ॥४१॥
साखरे नाम ख्यातिशी । सायंदेवापासाव ॥४१॥
त्यापासूनि नागनाथ । देवराव
तयाचा सुत ।
सदा श्रीसद्गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥
सदा श्रीसद्गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥
नमन करिता जनकचरणी । मातापूर्वज
ध्यातो मनी ।
जो का पूर्वज नामधारणी । आश्वलायन शाखेचा ॥४३॥
जो का पूर्वज नामधारणी । आश्वलायन शाखेचा ॥४३॥
काश्यपाचे गोत्री । चौंडेश्वरी
नामधारी ।
वागे जैसा जन्हु अवधारी । अथवा जनक गंगेचा ॥४४॥
वागे जैसा जन्हु अवधारी । अथवा जनक गंगेचा ॥४४॥
त्याची कन्या माझी जननी ।
निश्चये जैशी भवानी ।
चंपा नामे पुण्यखाणी । स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥
चंपा नामे पुण्यखाणी । स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥
नमिता जनकजननीसी । नंतर नमू
श्रीगुरुसी ।
घाली मति प्रकाशी । गुरुचरण स्मरावया ॥४६॥
घाली मति प्रकाशी । गुरुचरण स्मरावया ॥४६॥
गंगाधराचे कुशी । जन्म झाला
परियेसी ।
सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावे निरंतर ॥४७॥
सदा ध्याय श्रीगुरुसी । एका भावे निरंतर ॥४७॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । करी
संतांसी नमस्कार ।
श्रोतया विनवी वारंवार । क्षमा करणे बाळकासी ॥४८॥
श्रोतया विनवी वारंवार । क्षमा करणे बाळकासी ॥४८॥
वेदाभ्यासी संन्यासी । यती
योगेश्वर तापसी ।
सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥४९॥
सदा ध्याती श्रीगुरुसी । तयांसी माझा नमस्कार ॥४९॥
विनवितसे समस्तांसी । अल्पमती
आपणासी ।
माझे बोबडे बोलांसी । सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥
माझे बोबडे बोलांसी । सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥
तावन्मात्र माझी मति । नेणे
काव्यव्युतपत्ति ।
जैसे श्रीगुरु निरोपिती । तेणे परी सांगत ॥५१॥
जैसे श्रीगुरु निरोपिती । तेणे परी सांगत ॥५१॥
पूर्वापार आमुचे वंशी । गुरु
प्रसन्न अहर्निशी ।
निरोप देती माते परियेसी । चरित्र आपुले विस्तारावया ॥५२॥
निरोप देती माते परियेसी । चरित्र आपुले विस्तारावया ॥५२॥
म्हणे ग्रंथ कथन करी । अमृतघट
स्वीकारी ।
तुझे वंशी परंपरी । लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥
तुझे वंशी परंपरी । लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥
गुरुवाक्य मज कामधेनु । मनी नाही
अनुमानु ।
सिद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥
सिद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥
त्रैमूर्तीचा अवतार । झाला
नृसिंहसरस्वती नर ।
कवण जाणे याचा पार । चरित्र कवणा न वर्णवे ॥५५॥
कवण जाणे याचा पार । चरित्र कवणा न वर्णवे ॥५५॥
चरित्र ऐसे श्रीगुरुचे । वर्णू न
शके मी वाचे ।
आज्ञापन असे श्रीगुरुचे । म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥
आज्ञापन असे श्रीगुरुचे । म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥
ज्यास पुत्रपौत्री असे चाड ।
त्यासी कथा हे असे गोड ।
लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनी परियेसा ॥५७॥
लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनी परियेसा ॥५७॥
ऐशी कथा जयाचे घरी । वाचिती
नित्य प्रेमभरी ।
श्रियायुक्त निरंतरी । नांदती पुत्रकलत्रयुक्त ॥५८॥
श्रियायुक्त निरंतरी । नांदती पुत्रकलत्रयुक्त ॥५८॥
रोग नाही तया भुवनी । सदा
संतुष्ट गुरुकृपेकरोनि ।
निःसंदेह साता दिनी । ऐकता बंधन तुटे जाणा ॥५९॥
निःसंदेह साता दिनी । ऐकता बंधन तुटे जाणा ॥५९॥
ऐसी पुण्यपावन कथा । सांगेन ऐक
विस्तारता ।
सायासाविण होय साध्यता । सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥
सायासाविण होय साध्यता । सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥
निधान लाधे अप्रयासी । तरी कष्ट
का सायासी ।
विश्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥
विश्वास माझिया बोलासी । ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥
आम्हा साक्षी ऐसे घडले । म्हणोनि
विनवितसे बळे ।
श्रीगुरुस्मरण असे भले । अनुभवा हो सकळिक ॥६२॥
श्रीगुरुस्मरण असे भले । अनुभवा हो सकळिक ॥६२॥
तृप्ति झालियावरी ढेकर । देती
जैसे जेवणार ।
गुरुमहिमेचा उद्गार । बोलतसे अनुभवोनि ॥६३॥
गुरुमहिमेचा उद्गार । बोलतसे अनुभवोनि ॥६३॥
मी सामान्य म्हणोनि । उदास व्हाल
माझे वचनी ।
मक्षिकेच्या मुखांतुनी । मधु केवी ग्राह्य होय ॥६४॥
मक्षिकेच्या मुखांतुनी । मधु केवी ग्राह्य होय ॥६४॥
जैसे शिंपल्यांत मुक्ताफळ । अथवा
कर्पूर कर्दळ ।
विचारी पा अश्वत्थमूळ । कवणापासावउत्पत्ति ॥६५॥
विचारी पा अश्वत्थमूळ । कवणापासावउत्पत्ति ॥६५॥
ग्रंथ कराल उदास । वाकुड कृष्ण
दिसे ऊस ।
अमृतवत निघे त्याचा रस । दृष्टि द्यावी तयावरी ॥६६॥
अमृतवत निघे त्याचा रस । दृष्टि द्यावी तयावरी ॥६६॥
तैसे माझे बोलणे । ज्याची चाड
गुरुस्मरणे ।
अंगिकार करणार शहाणे । अनुभविती एकचित्ते ॥६७॥
अंगिकार करणार शहाणे । अनुभविती एकचित्ते ॥६७॥
ब्रह्मरसाची गोडी । अनुभवितां
फळें रोकडी ।
या बोलाची आवडी । ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥
या बोलाची आवडी । ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥
गुरुचरित्र कामधेनु । ऐकता होय
महाज्ञानु ।
श्रोती करोनिया सावध मनु । एकचिते परियेसा ॥६९॥
श्रोती करोनिया सावध मनु । एकचिते परियेसा ॥६९॥
श्रीगुरुनृसिंहसरस्वती । होते
गाणगापुरी ख्याति ।
महिमा त्यांचा अत्यद्भुती । सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥
महिमा त्यांचा अत्यद्भुती । सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥
तया ग्रामी वसती गुरु । म्हणोनि
महिमा असे थोरु ।
जाणती लोक चहू राष्ट्रु । समस्त जाती यात्रेसी ॥७१॥
जाणती लोक चहू राष्ट्रु । समस्त जाती यात्रेसी ॥७१॥
तेथे राहोनि आराधिती । त्वरित
होय फलप्राप्ति ।
पुत्र दारा धन संपत्ति । जे जे इच्छिले होय जना ॥७२॥
पुत्र दारा धन संपत्ति । जे जे इच्छिले होय जना ॥७२॥
लाधोनिया संताने । नामे ठेविती
नामकरणे ।
संतोषरूपे येऊन । पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥
संतोषरूपे येऊन । पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥
ऐसे असता वर्तमानी । भक्त एक
’नामकरणी’ ।
कष्टतसे अति गहनी । सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥
कष्टतसे अति गहनी । सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥
ऐसा मनी व्याकुळित । चिंतेने
वेष्टिला बहुत ।
गुरुदर्शना जाऊ म्हणत । निर्वाणमानसे निघाला ॥७५॥
गुरुदर्शना जाऊ म्हणत । निर्वाणमानसे निघाला ॥७५॥
अति निर्वाण अंतःकरणी । लय
होवोनि गुरुचरणी ।
जातो शिष्यशिरोमणी । विसरोनिया क्षुधातृषा ॥७६॥
जातो शिष्यशिरोमणी । विसरोनिया क्षुधातृषा ॥७६॥
निर्धार करोनि मानसी । म्हणे
पाहीन श्रीगुरुसी ।
अथवा सांडीन देहासी । जडस्वरूपे काय काज ॥७७॥
अथवा सांडीन देहासी । जडस्वरूपे काय काज ॥७७॥
ज्याचे नामस्मरण करिता ।
दैन्यहानि होय त्वरिता ।
आपण तैसा नामांकिता । किंकर म्हणतसे ॥७८॥
आपण तैसा नामांकिता । किंकर म्हणतसे ॥७८॥
दैव असे आपुले उणे । तरी का भजावे
श्रीगुरुचरण ।
परिस लावता लोहा जाण । सुवर्ण केवी होतसे ॥७९॥
परिस लावता लोहा जाण । सुवर्ण केवी होतसे ॥७९॥
तैसे तुझे नाम परिसे । माझे
ह्रदयी सदा वसे ।
माते कष्टी सायासे । ठेविता लाज कवणासी ॥८०॥
माते कष्टी सायासे । ठेविता लाज कवणासी ॥८०॥
या बोलाचिया हेवा । मनी धरोनि
पहावा ।
गुरुमूर्ती सदाशिवा । कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥
गुरुमूर्ती सदाशिवा । कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥
अतिव्याकुळ अंतःकरणी । निंदास्तुति
आपुली वाणी ।
कष्टला भक्त नामकरणी । करिता होय परियेसा ॥८२॥
कष्टला भक्त नामकरणी । करिता होय परियेसा ॥८२॥
राग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे ।
आजि पाहुणे पंढरीचे रावे ।
वंदू विघ्नहरा भावे । नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥
वंदू विघ्नहरा भावे । नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥
गुरूची त्रैमूर्ति । म्हणती
वेदश्रुति ।
सांगती दृष्टान्ती । कलियुगात ॥८४॥
सांगती दृष्टान्ती । कलियुगात ॥८४॥
कलियुगात ख्याति ।
श्रीनृसिहसरस्वती ।
भक्तांसी सारथी । कृपासिंधू ॥८५॥
भक्तांसी सारथी । कृपासिंधू ॥८५॥
कृपासिंधु भक्ता । वेद वाखाणिता।
त्रयमूर्ति गुरुनाथा । म्हणोनिया ॥८६॥
त्रयमूर्ति गुरुनाथा । म्हणोनिया ॥८६॥
त्रयमूर्तीचे गुण । तू एक निधान
।
भक्तांसी रक्षण । दयानिधि ॥८७॥
भक्तांसी रक्षण । दयानिधि ॥८७॥
दयानिधि यती । विनवितो मी
श्रीपती ।
नेणे भावभक्ति । अंतःकरणी ॥८८॥
नेणे भावभक्ति । अंतःकरणी ॥८८॥
अंतःकरणी स्थिरु । नव्हे बा
श्रीगुरु ।
तू कृपासागरु । पाव वेगी ॥८९॥
तू कृपासागरु । पाव वेगी ॥८९॥
पाव वेगी आता । नरहरी अनंता ।
बाळालागी माता । केवी टाकी ॥९०॥
बाळालागी माता । केवी टाकी ॥९०॥
तू माता तू पिता । तूचि सखा
भ्राता ।
तूचि कुळदेवता । परंपरी ॥९१॥
तूचि कुळदेवता । परंपरी ॥९१॥
वंशपरंपरी । धरूनि निर्धारी ।
भजतो मी नरहरी । सरस्वतीसी ॥९२॥
भजतो मी नरहरी । सरस्वतीसी ॥९२॥
सरस्वती नरहरी । दैन्य माझे हरी
।
म्हणूनि मी निरंतरी । सदा कष्टे व९३॥
म्हणूनि मी निरंतरी । सदा कष्टे व९३॥
सदा कष्ट चित्ता । का हो देशी
आता ।
कृपासिंधु भक्ता । केवी होसी ॥९४॥
कृपासिंधु भक्ता । केवी होसी ॥९४॥
कृपासिंधु भक्ता । कृपाळू अनंता
।
त्रयमूर्ति जगन्नाथा । दयानिधी ॥९५॥
त्रयमूर्ति जगन्नाथा । दयानिधी ॥९५॥
त्रयमूर्ति तू होसी । पाळिसी
विश्वासी ।
समस्त देवांसी । तूचि दाता ॥९६॥
समस्त देवांसी । तूचि दाता ॥९६॥
समस्ता देवांसी । तूचि दाता होसी
।
मागो मी कवणासी । तुजवांचोनी ॥९७॥
मागो मी कवणासी । तुजवांचोनी ॥९७॥
तुजवाचोनी आता । असे कवण दाता ।
विश्वासी पोषिता । सर्वज्ञ तू ॥९८॥
विश्वासी पोषिता । सर्वज्ञ तू ॥९८॥
सर्वज्ञाची खूण । असे हे लक्षण ।
समस्तांचे जाणे । कवण ऐसा ॥९९॥
समस्तांचे जाणे । कवण ऐसा ॥९९॥
सर्वज्ञ म्हणोनि । वानिती पुराणी
।
माझे अंतःकरणी । न ये साक्षी ॥१००॥
माझे अंतःकरणी । न ये साक्षी ॥१००॥
कवण कैशापरी । असती भूमीवरी ।
जाणिजेचि तरी । सर्वज्ञ तो ॥१॥
जाणिजेचि तरी । सर्वज्ञ तो ॥१॥
बाळक तान्हये । नेणे बापमाये ।
कृपा केवी होय । मातापित्या ॥२॥
कृपा केवी होय । मातापित्या ॥२॥
दिलियावांचोनि । न देववे म्हणोनि
।
असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥
असेल तुझे मनी । सांग मज ॥३॥
समस्त महीतळी । तुम्हा दिल्हे
बळी ।
त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥
त्याते हो पाताळी । बैसविले ॥४॥
सुवर्णाची लंका । तुवा दिल्ही
एका ।
तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥
तेणे पूर्वी लंका । कवणा दिल्ही ॥५॥
अढळ ध्रुवासी । दिल्हे ह्रषीकेशी
।
त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥
त्याने हो तुम्हासी । काय दिल्हे ॥६॥
निःक्षत्र करूनी । विप्राते
मेदिनी ।
देता तुम्हा कोणी । काय दिल्हे ॥७॥
देता तुम्हा कोणी । काय दिल्हे ॥७॥
सृष्टीचा पोषक । तूचि देव एक ।
तूते मी मशक । काय देऊ ॥८॥
तूते मी मशक । काय देऊ ॥८॥
नाही तुम्हा जरी । श्रीमंत नरहरी
।
लक्ष्मी तुझे घरी । नांदतसे ॥९॥
लक्ष्मी तुझे घरी । नांदतसे ॥९॥
याहोनी आम्हासी । तू काय मागसी ।
सांग ह्रषीकेशी । काय देऊ ॥११०॥
सांग ह्रषीकेशी । काय देऊ ॥११०॥
मातेचे वोसंगी । बैसोनिया बाळ
वेगी ।
पसरी मुखसुरंगी । स्तनकांक्षेसी ॥११॥
पसरी मुखसुरंगी । स्तनकांक्षेसी ॥११॥
बाळापासी माता । काय मागे ताता ।
ऐक श्रीगुरुनाथा । काय देऊ ॥१२॥
ऐक श्रीगुरुनाथा । काय देऊ ॥१२॥
घेऊनिया देता । नाम नाही दाता ।
दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥
दयानिधि म्हणता । बोल दिसे ॥१३॥
देऊ न शकसी । म्हणे मी मानसी ।
चौदाही भुवनासी । तूचि दाता ॥१४॥
चौदाही भुवनासी । तूचि दाता ॥१४॥
तुझे मनी पाही । वसे आणिक काही ।
सेवा केली नाही । म्हणोनिया ॥१५॥
सेवा केली नाही । म्हणोनिया ॥१५॥
सेवा घेवोनिया । देणे हे सामान्य
।
नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥
नाम नसे जाण । दातृत्वासी ॥१६॥
तळी बावी विहिरी । असती भूमीवरी
।
मेघ तो अंबरी । वर्षतसे ॥१७॥
मेघ तो अंबरी । वर्षतसे ॥१७॥
मेघाची ही सेवा । न करिता
स्वभावा ।
उदकपूर्ण सर्वा । केवी करी ॥१८॥
उदकपूर्ण सर्वा । केवी करी ॥१८॥
सेवा अपेक्षिता । बोल असे दाता ।
दयानिधि म्हणता । केवी साजे ॥१९॥
दयानिधि म्हणता । केवी साजे ॥१९॥
नेणे सेवा कैसी । स्थिर होय
मानसी ।
माझे वंशोवंशी । तुझे दास ॥१२०॥
माझे वंशोवंशी । तुझे दास ॥१२०॥
माझे पूर्वजवंशी । सेविले
तुम्हांसी ।
संग्रह बहुवसी । तुझे चरणी ॥२१॥
संग्रह बहुवसी । तुझे चरणी ॥२१॥
बापाचे सेवेसी । पाळिती पुत्रासी
।
तेवी त्वा आम्हासी । प्रतिपाळावे ॥२२॥
तेवी त्वा आम्हासी । प्रतिपाळावे ॥२२॥
माझे पूर्वधन । तुम्ही द्यावे ऋण
।
का बा नये करुणा । कृपासिंधु ॥२३॥
का बा नये करुणा । कृपासिंधु ॥२३॥
आमुचे आम्ही घेता । का बा नये
चित्ता ।
मागेन मी सत्ता । घेईन आता ॥२४॥
मागेन मी सत्ता । घेईन आता ॥२४॥
आता मज जरी । न देसी नरहरी ।
जिंतोनि वेव्हारी । घेईन जाणा ॥२५॥
जिंतोनि वेव्हारी । घेईन जाणा ॥२५॥
दिसतसे आता । कठिणता गुरुनाथा ।
दास मी अंकिता । सनातन ॥२६॥
दास मी अंकिता । सनातन ॥२६॥
आपुले समान । असेल कवण ।
तयासवे मन । कठिण कीजे ॥२७॥
तयासवे मन । कठिण कीजे ॥२७॥
कठीण कीजे हरी । तुवा दैत्यांवरी
।
प्रल्हाद कैवारी । सेवकांसी ॥२८॥
प्रल्हाद कैवारी । सेवकांसी ॥२८॥
सेवका बाळकासी । करू नये ऐसी ।
कठिणता परियेसी । बरवे न दिसे ॥२९॥
कठिणता परियेसी । बरवे न दिसे ॥२९॥
माझिया अपराधी । धरोनिया बुद्धि
।
अंतःकरण क्रोधी । पहासी जरी ॥१३०॥
अंतःकरण क्रोधी । पहासी जरी ॥१३०॥
बाळक मातेसी । बोले निष्ठुरेसी ।
अज्ञाने मायेसी । मारी जरी ॥३१॥
अज्ञाने मायेसी । मारी जरी ॥३१॥
माता त्या कुमारासी । कोप न धरी
कैशी ।
आलिंगोनि हर्षी । संबोखी पा ॥३२॥
आलिंगोनि हर्षी । संबोखी पा ॥३२॥
कवण्या अपराधेसी । न घालिसी
आम्हासी ।
अहो ह्रषीकेशी । सांगा मज ॥३३॥
अहो ह्रषीकेशी । सांगा मज ॥३३॥
माता हो कोपासी । बोले बाळकासी ।
जावोनि पितयासी । सांगे बाळ ॥३४॥
जावोनि पितयासी । सांगे बाळ ॥३४॥
माता कोपे जरी । एखादे अवसरी ।
पिता कृपा करी । संबोखूनि ॥३५॥
पिता कृपा करी । संबोखूनि ॥३५॥
तू माता तू पिता । कोपसी
गुरुनाथा ।
सांगो कवणा आता । क्षमा करी ॥३६॥
सांगो कवणा आता । क्षमा करी ॥३६॥
तूचि स्वामी ऐसा । जगी झाला ठसा
।
दास तुझा भलतैसा । प्रतिपाळावा ॥३७॥
दास तुझा भलतैसा । प्रतिपाळावा ॥३७॥
अनाथरक्षक । म्हणती तुज लोक ।
मी तुझा बाळक । प्रतिपाळावे ॥३८॥
मी तुझा बाळक । प्रतिपाळावे ॥३८॥
कृपाळु म्हणोनि । वानिती पुराणी
।
माझे बोल कानी । न घालिसीच ॥३९॥
माझे बोल कानी । न घालिसीच ॥३९॥
नायकसी गुरुराणा । माझे
करुनावचना ।
काय दुश्चितपणा । तुझा असे ॥४०॥
काय दुश्चितपणा । तुझा असे ॥४०॥
माझे करुणावचन । न ऐकती तुझे कान
।
ऐकोनि पाषाण । विखुरतसे ॥४१॥
ऐकोनि पाषाण । विखुरतसे ॥४१॥
करुणा करी ऐसे । वानिती तुज पिसे
।
अजुनी तरी कैसे । कृपा न ये ॥४२॥
अजुनी तरी कैसे । कृपा न ये ॥४२॥
ऐसे नामांकित । विनविता त्वरित ।
कृपाळु श्रीगुरुनाथ । आले वेगी ॥४३॥
कृपाळु श्रीगुरुनाथ । आले वेगी ॥४३॥
वत्सालागी धेनु । जैशी ये धावोनु
।
तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥४४॥
तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥४४॥
येतांचि गुरुमुनि । वंदी नामकरणी
।
मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥४५॥
मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥४५॥
केश तो मोकळी । झाडी चरणधुळी ।
आनंदाश्रुजळी । अंघ्रि क्षाळी ॥४६॥
आनंदाश्रुजळी । अंघ्रि क्षाळी ॥४६॥
ह्रदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त ।
पूजा उपचारित । षोडशविधि ॥४७॥
पूजा उपचारित । षोडशविधि ॥४७॥
आनंदभरित । झाला नामांकित ।
ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥४८॥
ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥४८॥
भक्तांच्या ह्रदयांत । राहे
श्रीगुरुनाथ।
संतोष बहुत । सरस्वतीसी ॥४९॥
संतोष बहुत । सरस्वतीसी ॥४९॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥
॥ ओवीसंख्या १४९ ॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
No comments:
Post a Comment