॥ श्रीगणेशाय नम: ॥
श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
नामधारक
शिष्यराणा । लागे सिध्दाचिया चरणां ।
करसंपुट
जोडून । विनवीतसे तया वेळी ॥१॥
जय जया
सिध्द योगीश्वरा । तूंचि ज्योति अंधकारा ।
भक्तजनांच्या
मनोहरा । भवसागरतारका ॥२॥
अज्ञानतिमिररजनींत
। निजलों होतों मदोन्मत्त ।
गुरुचरित्र
मज अमृत । प्राशन करविलें दातारा ॥३॥
त्याणें
झालें मज चेत । ज्ञानसूर्यप्रकाश होत ।
तुझे
कृपेने जागृत । जाहलों स्वामी सिध्दमुनि ॥४॥
पुढील
कथाविस्तारा । निरोपावा योगीश्वरा ।
कृपा करी
गा दातारा । म्हणोनि लागला चरणांसी ॥५॥
ऐकोनि
शिष्याचें वचन । संतोषला सिध्द आपण ।
सांगतसे
विस्तारुन । श्रीगुरुमहिमा अनुपम्य ॥६॥
शिष्योत्तमा
नामंकिता । सांगेन ऐके गुरुची कथा ।
औदुंबरतळी
अतिप्रीता । होते श्रीगुरु परियेसा ॥७॥
ऐकोनी
सिध्दाचें वचन । नामधारक करी प्रश्न ।
अनेक
पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीति औदुंवरी ॥८॥
अश्वत्थ्वृक्ष
असे थोर । म्हणोनि सांगती वेद शास्त्र ।
श्रीगुरुप्रीति
औदुंबर । कवण कारण निरोपावें ॥९॥
सिध्द
म्हणे नामंकिता । सांगेन याचिया वृतांता ।
जधीं
नरसिंह अवतार होता । हिरण्यकश्यप विदारिला ॥१०॥
नखेंकरूनि
दैत्यासी । विदारिलें कोपेसीं ।
आंतडीं
काढूनियां हषीं । घालती माळ गळां नरहरीनें ॥११॥
त्या
दैत्याचे पोटी विष होतें काळ्कूटी ।
जैसी
वडवाग्नि मोठी तैसें विष परियेसा ॥१२॥
विदारण करितां
दैत्यासी । वेधलें विष त्या नखांसी ।
तापली
नखें बहुवसी । ऐक शिष्या एकचित्तें ॥१३॥
तये समयी
महालक्ष्मी । घेऊनि आली अतिप्रेमी ।
औदुंबरफळ
नामी । शांतीकारणें नखांसी ॥१४॥
तये वेळी
शीतलार्थ । नखें रोविलीं औदुंबरात ।
विषाग्नि
झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ॥१५॥
शांत
जाहला नृसिंहदेव । देता झाला लक्ष्मीसि खेंव ।
संतोषोनि
उभय देव । वर देती तये वेळीं ॥१६॥
तया समयिं
औदुंबरासी देती वर हृषीकेशी ।
" सदा फळित
तूं होसी । 'कल्पवृक्ष
' तुझे नाम ॥१७॥
जे जन
भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं ।
तुज
देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥
जे
सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक ।
फळ
प्राप्त होय निके । पापावेगळा होय नर ॥१९॥
वांझ नारी
सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता ।
जे नर
असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥
तुझी
छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान ।
अनंत फळ
होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥
तुझे
छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत ।
भागीरथीस्नान
करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥
तुज
सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं ।
ब्रह्महत्यादि
महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥
जें जें
कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं ।
कल्पना
पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥
सदा वसों
तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी " ।
म्हणोनि
वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥
ऐसा वृक्ष
औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु ।
नरसिंहमूर्ति
होतां उग्र । शांत झाली तयापाशी ॥२६॥
याकारणे
श्रीगुरुमूर्ति नृसिंहमंत्र उपासना करिती ।
उग्रत्वाची
करावया शांति । औदुंबरी वास असे ॥२७॥
अवतार आपण
तयाचे स्थान आपुलें असे साचें ।
शांतवन
करावया उग्रत्वाचे । म्हणोनि वास औदुंबरी ॥२८॥
सहज वृक्ष
तो औदुंवर । कल्पवृक्षसमान तरु ।
विशेषें
वास केला श्रीगुरु । कल्पिली फळे तेथे होती ॥२९॥
तया
कल्पद्रुमातळी । होते श्रीगुरुस्तोममौळी ।
ब्रह्मा-विष्णु-नेत्रभाळी
। देह मानुषी धरोनियां ॥३०॥
भक्तजनां
तारणार्थ । पावन करिती समस्त तीर्थ ।
अवतार
त्रयमूर्ति गुरुनाथ । भूमीवरी वर्तत असे ॥३१॥
वृक्षातळी
अहर्निशीं । श्रीगुरु असती गौप्येसी ।
माध्यान्हकळसमयासी
। समारंभ होय तेथें ॥३२॥
अमरेश्वर्संनिधानीं
। वसई चौसष्ट योगिनी ।
पूजा
करावया माध्यान्ही । श्रीगुरुजवळी येती नित्य ॥३३॥
नमन करूनि
श्रीगुरूसी । नेती आपुले मंदिरासी ।
पूजा
करिती विधीसीं । गंधपरिमळ-कुसुमें ॥३४॥
आरोगोनि
तयां घरी । पुनरपि येती औदुंबरी ।
एके समयी
द्विजवरी । विस्मय करिती देखोनियां ॥३५॥
म्हणती
अभिन याति कैसा । न क्री भिक्षा ग्रामांत ऐसा ।
असतो सदा
अरण्यवासा । कवणेपरी काळ कंठी ॥३६॥
पाहूं
याचें वर्तमान । कैसा क्रमितो दिनमान ।
एखादा नर
ठेवून । पाहो अंत यतीश्वराचा ॥३७॥
ऐसं
विचारूनि मानसी । गेले संगमस्थानासी ।
माध्यान्हसमयी
तयांसी । भय उअपजलें अंत:करणीं ॥३८॥
पाहूं
म्हणती श्रीगुरूचा अंत । तेचि जाती यमपंथ ।
ऐसे विप्र
मदोन्मत्त । अधोगतीचे तेचि इष्ट ॥३९॥
उपजतां भय
ब्राह्मणांसी । गेले आपुलें स्थानासी ।
गंगनुज
थडियेसी । होता वृत्ति राखीत ॥४०॥
त्याणें
देखिले श्रीगुरुसी । आल्या योगिनी पूजेसी ।
गंगेमध्ये
येतां कैसी । मार्ग जाहला जळांत ॥४१॥
विस्मय
करी तो नरु । म्हणे कैसा यतीश्वरु ।
द्विभाग
झाला गंगापूरु । केवी गेले गंगेंत ॥४२॥
श्रीगुरुतें
नेऊनि। पूजा केली त्या योगिनी।
भिक्षा
तेथें करूनि आले मागुती बाहेर ॥४३॥
पहात होता
गंगानुज । म्हणे कैसे जाहले चोज ।
अवतार
होईल ईश्वरकाज । म्हणोनि पूजिती देवकन्या ॥॥४४॥
येरे
दिवसीं मागुती । हाती घेऊन आरति ।
देवकन्या
ओंवाळिती । श्रीगुरूतें नमूनियां ॥४५॥
पुन्हा
गंगाप्रवाहांत । श्रीगुरु निघाले योगिनीसहित ।
हो कां नर
होता पहात । तोही गेला सर्वेचि ॥४६॥
नदीतीरी
जातां श्रीगुरु । द्विभार जाहलें गंगेत द्वारु ।
भीतरी
दिसे अनुपम्य पुर । रत्नखचित गोपुरेसीं ॥४७॥
अमरावतीसमान
नगर जैसी तेजें दिनकर ।
श्रीगुरु
जातांचि समस्त पुर। घेऊनि आलें आरति ॥४८॥
ओवाळून
आरति ।
नेलें
आपुले मंदिराप्रति सिंहासन रत्नखचिती । बैसो घालिती तया समयीं ॥४९॥
पूजा करिती
विधीसीं । जे कां उपचार षोडशी ।
अनेकापरी
षड्रसेसीं । आरोगिलें तये वेळीं ॥५०॥
श्रीगुरु
दिसती तया स्थानीं । त्रैमूर्ति जैसा शुलपाणि ।
पूजा
घेऊनि तत्क्षणीं । मग परतले तयेवेळी ॥५१॥
देखोनियां
तया नरासी । म्हणती तूं कां आलासी ।
विनवी तो
नर स्वमियासी । सहज आलों दर्शनाते ॥५२॥
म्हणोनि
लागला गुरुचरणीं । तल्लीन होवोनि अंत:करणीं ।
म्हणे
स्वामी गिरिजारमणा । होसी त्रयमूर्ति तुंचि एक ॥५३॥
न कळे
तुझें स्वरूपज्ञान । संसारमाया वेष्टून ।
तूं तारक
या भवाणी । उध्दरावे स्वामिया ॥५४॥
तूं तारक
विश्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी ।
अज्ञान
म्हणिजे रजनीसी । ज्योति:स्वरूप तूंचि एक ॥५५॥
तुझें
दर्शन होय ज्यासी । सर्वाभीष्ट फळ होय त्यासी ।
इहपर
अप्रयासी । जोडे नरा न लागतां क्षण ॥५६॥
ऐशापरी तो
देखा । स्तुति करितो नर ऐका ।
संतोषूनि
गुरुनायकें । आश्वासिले तया वेळी ॥५७॥
श्रीगुरु
म्हणती तयासी । तुझें दैन्य गेलें परियेसी ।
जें जें
तूं इच्छिसी मानसी । सकळाभीष्ट पावशील ॥५८॥
येथील
वर्तमान ऐसी । न सांगावे कवणासी ।
जया दिवशी
प्रगट करिसी । तूतें हानी होईल जाण ॥५९॥
येणेंपरी
तयासी । श्रीगुरु सांगती परियेसी ।
लाले
औदुंबरापाशी । गंगानुज-समागमें ॥६०॥
श्रीगुरूचा
निरोप घेऊन । गेला गंगानुज आपण ।
वृत्तिस्थानीं
जातांचि क्षण । निधान त्यासी लाधलें ॥६१॥
ज्ञानवं
तो झाला नरु । नित्य सेवा करी तो गुरु ।
पुत्रपौत्र
श्रियाकर । महानंदे वर्ततसे ॥६२॥
भक्तिभावें
श्रीगुरुसी । नमन करी प्रतिदिवसीं ।
सेवा करी
कलत्रेंसी । एकोभावेंकरूनियां ॥६३॥
वर्तता
ऐसे एके दिवसी । आली पौर्णिमा माघमासीं ।
नमन करूनि
श्रीगुरूसी । विनवीतसे तो भक्त ॥६४॥
म्हणे
स्वामी जगद्गुरु । माघस्नानी प्रयाग थोरु ।
म्हणोनि
सांगती द्विजवरु । काशीपूर महाक्षेत्र ॥६५॥
कैसे
प्रयाग गयास्थान । कैसें वाराणसी भुवन ।
नेणों आपण
यातिहीन । कृपा करणें स्वामिया ॥६६॥
श्रीगुरु
म्हणती तयासी । पंचगंगासंगमेंसी ।
' प्रयाग ' जाणावें भरंवसी । ' काशीपुर " तें जुगुळ ॥६७॥
दक्षिण ' गया' कोल्हापुर । त्रिस्थळी ऐसें
मनोहर ।
जरी पहासी
प्रत्यक्षाकार । दावीन तुज चाल आतां ॥६८॥
बैसले
होते व्याघ्राजिनीं । धरी गा मागे दृढ करूनि ।
मनोवेगें
तत्क्षणी । गेले प्रयागा प्रात:काळी ॥६९॥
तेथे
स्नान करूनि । गेले काशीस माध्याह्निं ।
विश्वनाथा
दाखवूनि सर्वेचि गेले गयेसी ॥७०॥
ऐसी
त्रिस्थळी आचरोनि । आले परतोनि अस्तमानीं ।
येणेपरी ।
तयास्थानीं । देखता झाला तो नर ॥७१॥
विश्वनाटक
श्रीगुरुमूर्ति । प्रकट झाली ऐसी किर्ति ।
श्रीगुरु
मनीं विचारिती । आतां येथे गौप्य व्हावे ॥७२॥
ऐसेपरी
तयास्थानीं ।
प्रकट
झाले श्रीगुरुमुनि अमरेश्वरातें पुसोनि । निघत झाले तये वेळी ॥७३॥
श्रीगुरु
निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी ।
निनविताति
करूणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥७४॥
नित्य
तुमचे दर्शनासी । तापत्रय हरती दोषी ।
अन्नपूर्णा
तुम्हांपाशी । केवी राहुं स्वामिया ॥७५॥
येणेंपरी
श्रीगुरुसी । योगिनी विनविती भक्तीसीं ।
भक्तवत्सलें
संतोषीं । दिधला वर वेळीं ॥७६॥
श्रीगुरु
म्हणती तयांसी। सदा असों औदुंबरेसी ।
प्रकटार्थ
जाणे पूर्वेसी । स्थान आमुचें येथेचि असे ॥७७॥
तुम्ही
रहावें येथें औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी ।
अन्नपूर्णा
प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥७८॥
कल्पवृक्ष
औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर ।
अमरापुर
पश्चिम तीर । अमर स्थान हेंचि जाणा ॥७९॥
प्रख्यात
होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत ।
मनकामना
होय त्वरित । तुम्हीं त्यांसी साह्य व्हावे ॥८०॥
तुम्हांसहित
औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी ।
पूजा
करिती जे तत्परी मनकामना पुरती जाणा ॥८१॥
येथे असे
अन्नपूर्णा ।नित्य करिती आराधना ।
तेणें होय
कामना । अतुर्विध पुरुषार्थ ॥८२॥
पापविनाशी
काम्यतीर्थ । सिध्द्तीर्था स्नान करीत ।
सात वेळ
स्नपन करीत तुम्हांसहित औदुंबरी ॥८३॥
साठी
वर्षे वांझेसी । पुत्र होती शतायुषी ।
ब्रह्महत्या
पाप नाशी । स्नानमात्रे त्या तीर्था ॥८४॥
सोमसूर्यग्रहणेसी
। अथवा मास संक्रांतीसी ।
स्नान
करिती फळें कैसी । ऐका श्रोते एकचित्तें ॥८६॥
श्रुंग-खूर-सुवर्णेसी
। अलंकृत धेनूसी । सहस्त्र कपिला ब्राह्मणांसी ।
सुरनदीतीरी
ऐका । भोजन दिल्हें फळ असे ॥८८॥
औदुंबरवृक्षातळीं
। जप करिती जे मननिर्मळी ।
कोटिगुणें
होती फळें । होम केलिया तैसेंचि ॥८९॥
रुद्र
जपोनि एकादशी । पूजा करिती मनोमानसी ।
अतिरुद्र
केले फळसदृशी । एकाचित्तें परियेसा ॥९०॥
मंदगती
प्रदक्षिणा । करितां होय अनंत पुण्य ।
पदोपदीं
वाजपेययज्ञ । फळ तेथें परियेसा ॥९१॥
नमन करितां
येणेंपरीं। पुण्य असे अपरांपरी ।
प्रदक्षिणा
दोन चारी । करूनी करणें नमस्कार ॥९२॥
कुष्ठ
असेल अंगहीन । त्याणें करणें प्रदक्षिणा ।
लक्ष वेळ
करितां जाणा । देवासमान देह होय ॥९३॥
ऐसे स्थान
मनोहरु । सहज असे कल्पतरु ।
म्हणोनि
सांगतति गुरु । चौसष्ठ योगिनींसी ॥९४॥
ऐसा निरोप
देऊन । श्रीगुरु निघाले तेथून ।
जेथें
होतें गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य ॥९५॥
विश्वरूप
जगन्नाथ । अखिल ठायीं असे वसत ।
औदुंबरी
प्रीति बहुत । नित्य तेथें वसतसे ॥९६॥
गौप्य
राहोनी औदुंबरी । प्रकटरूपें गाणगापुरी ।
राहिले
गुरु प्रीतिकरीं । प्रख्यात झाले परियेसा ॥९७॥
सिध्द
म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा आहे ऐसी ।
प्रकट
झाले बहुवसी । गाणगापुरी परियेसा ॥९८॥
म्हणोनि
सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार।
भक्तिपूर्वक
ऐकती नर । लाभे चतुर्विध पुरुषार्थ ॥९९॥
गुरुचरित्र
कामधेनु । जे ऐकती भक्तजनु ।
त्यांचे
घरी निधानु । सकळाभीष्टें पावती ॥१००॥
इति
श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिध्द-नामधारकसंवादे औदुबरवृक्षमहिमानं – योगिनीप्रतिदिनदर्शनं तथा वरप्रदानं नाम
एकोनविशोऽध्याय: ॥१९॥
॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॐ ॥ ॐ ॥ ॐ ॥
॥ ओवी
संख्या १०० ॥
No comments:
Post a Comment