॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
ऐक शिष्या
नामकरणी । धन्य धन्य तुझी वाणी ।
तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली परियेसा ॥१॥

तूं मातें
पुसतोसी । होत मन संतोषी ।
गौप्य व्हावया कारण कैसी । सांगेन ऐक एकचित्तें ॥२॥

महिमा
प्रगट जाहली बहुत । तेणें भजती लोक अमित ।
काम्यार्थ व्हावे म्हणूनि समस्त । येती श्रीगुरुच्या दर्शना ॥३॥

साधु
असाधु धूर्त सकळी । समस्त येती श्रीगुरुजवळी ।
वर्तमानीं खोटा कळी । सकळही शिष्य होऊं म्हणती ॥४॥

पाहें पां
पूर्वी भार्गवराम अवतरोनि । निःक्षत्र केली मेदिनी ।
राज्य विप्रांसी देउनी । गेला आपण पश्चिमसमुद्रासी ॥५॥

पुनरपि
जाती तयापासीं । तोही ठाव मागावयासी ।
याकारणें विप्रांसी । कांक्षा न सुटे परियेसा ॥६॥

उबगोनि
भार्गवराम देखा । गेला सागरा मध्योदका ।
गौप्यरूपें असे ऐका । आणिक मागतील म्हणोनि ॥७॥

तैसे
श्रीगुरुमूर्ति ऐक । राहिले गुप्त कारणिक ।
वर मागतील सकळिक । नाना याती येवोनियां ॥८॥

विश्वव्यापक
जगदीश्वर । तो काय देऊं न शके वर ।
पाहूनि भक्ति पात्रानुसार । प्रसन्न होय परियेसा ॥९॥

याकारणें
तया स्थानीं । श्रीगुरु होते गौप्यगुणीं ।
शिष्यां सकळांसि बोलावुनी । निरोप देती तीर्थयात्रे ॥१०॥

सकळ
शिष्यां बोलावोनि । निरोप देती नृसिंहमुनि ।
समस्त तीर्थे आचरोनि । यावें भेटी श्रीशैल्या ॥११॥

ऐकोनि
श्रीगुरुचे वचना । समस्त शिष्य धरिती चरणा ।
कृपामूर्ति श्रीगुरुराणा । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥१२॥

तुमचे
दर्शनमात्रेंसी । समस्त तीर्थे आम्हांसी ।
आम्हीं जावें कवण ठायासी । सोडोनि चरण श्रीगुरुचे ॥१३॥

समस्त
तीर्थे श्रीगुरुचरणीं । ऐसें बोलती वेदवाणी ।
शास्त्रींही तेंचि विवरण । असे स्वामी प्रख्यात ॥१४॥

जवळी
असतां निधान । केवीं हिंडावें रानोरान ।
कल्पवृक्ष सांडून । केवीं जावें देवराया ॥१५॥

श्रीगुरु
म्हणती शिष्यांसी । तुम्ही आश्रमी संन्यासी ।
राहूं नये पांच दिवशीं । एके ठायीं वास करीत ॥१६॥

चतुर्थाश्रम
घेऊनि । आचरावीं तीर्थे भुवनीं ।
तेणें मनीं स्थिर होऊनि । मग रहावें एकस्थानीं ॥१७॥

विशेष
वाक्य आमुचें एक । अंगीकारणें धर्म अधिक ।
तीर्थे हिंडूनि सकळिक । मग यावें आम्हांपाशीं ॥१८॥

'बहुधान्य' नाम संवत्सरासी । येऊं आम्ही
श्रीशैल्यासी ।
तेथें आमुचे भेटीसी । यावें तुम्हीं सकळिक हो ॥१९॥

ऐसेंपरी
शिष्यांसी । श्रीगुरु सांगती उपदेश ।
समस्त लागती चरणांस । ऐक शिष्या नामधारका ॥२०॥

शिष्य
म्हणती श्रीगुरुस तुमचें वाक्य आम्हां परीस ।
जाऊं आम्ही भरंवसें । करुं तीर्थे भूमीवरी ॥२१॥

गुरुचें
वाक्य जो न करी । तोचि पडे रौरव-घोरीं ।
त्याचें घर यमपुरीं । अखंड नरक भोगी जाणा ॥२२॥

जावें
आम्हीं कवण तीर्था । निरोप द्यावा गुरुनाथा ।
तुझें वाक्य दृढ चित्ता । धरुनि जाऊं स्वामिया ॥२३॥

जे जे
स्थानीं निरोप देसी । जाऊं तेथें भरंवसीं ।
तुझे वाक्येंचि आम्हांसी । सिद्धि होय स्वामिया ॥२४॥

शिष्यांचें वचन । श्रीगुरुमूर्ति प्रसन्नवदन ।
निरोप देती साधारण । तीर्थयात्रे शिष्यांसी ॥२५॥

या
ब्रह्मांडगोलकांत । तीर्थराज काशी विख्यात ।
तेथें तुम्हीं जावें त्वरित । सेवा गंगाभागीरथी ॥२६॥

भागीरथीतटाकयात्रा
। साठी योजनें पवित्रा ।
साठी कृच्छ्र-फळ तत्र । प्रयाग गंगाद्वारीं द्विगुण ॥२७॥

यमुनानदीतटाकेसी
। यात्रा वीस गांव परियेसीं ।
कृच्छ्र तितुकेचि जाणा ऐसी । एकोमनें अवधारा ॥२८॥

सरस्वती
म्हणजे गंगा । भूमीवरी असे चांगा ।
चतुर्विशति गांवें अंगा । स्नान करावें तटाकीं ॥२९॥

तितुकेंचि
कृच्छ्रफल त्यासी । यज्ञाचें फल परियेसीं ।
ब्रह्मलोकीं शाश्वतेसीं । राहे नर पितृसहित ॥३०॥

वरुणानदी
कुशावर्ती । शतद्रू विपाशका ख्याती ।
वितस्ता नदी शरावती । नदी असती मनोहर ॥३१॥

मरुद्वृधा
नदी थोर । असिक्री मधुमती येर ।
पयस्वी घृतवतीतीर । तटाकयात्रा तुम्ही करा ॥३२॥

देवनदी
म्हणिजे एक । असे ख्याति भूमंडळीक ।
पंधरा गांवें तटाक । यात्रा तुम्हीं करावी ॥३३॥

जितुके
गांव तितके कृच्छ्र । स्नानमात्रें पवित्र ।
ब्रह्महत्यादि पातकें नाश तत्र । मनोभावें आचरावें ॥३४॥

चंद्रभागा
रेवतीसी । शरयू नदी गोमतीसी ।
वेदिका नदी कौशिकेसी । नित्यजला मंदाकिनी ॥३५॥

सहस्त्रवक्त्रा
नदी थोर । पूर्णा पुण्यनदी येर ।
बाहुदा नदी अरुणा थोर । षोडश गांवें तटाकयात्रा ॥३६॥

जेथें
नदीसंगम असती । तेथें स्नानपुण्य अमिती ।
त्रिवेणीस्नानफळें असतीं । नदीचे संगमीं स्नान करा ॥३७॥

पुष्करतीर्थ
वैरोचनि । सन्निहिता नदी म्हणूनि ।
नदीतीर्थ असे सगुणी । गयातीर्थी स्नान करा ॥३८॥

सेतुबंध
रामेश्वरीं । श्रीरंग पद्मनाभ-सरीं ।
पुरुषोत्तम मनोहरी । नैमिषारण्य तीर्थ असे ॥३९॥

बदरीतीर्थ
नारायण । नदी असती अति पुण्य ।
कुरुक्षेत्रीं करा स्नान । अनंत श्रीशैल्ययात्रेसी ॥४०॥

महालयतीर्थ
देखा । पितृप्रीति तर्पणें ऐका ।
द्विचत्वारि कुळें निका । स्वर्गासी जाती भरंवसीं ॥४१॥

केदारतीर्थ
पुष्करतीर्थ । कोटिरुद्र नर्मदातीर्थ ।
मातृकेश्वर कुब्जतीर्थ । कोकामुखी विशेष असे ॥४२॥

प्रसादतीर्थ
विजयतीर्थ । पुरी चंद्रनदीतीर्थ ।
गोकर्ण शंखकर्ण ख्यात । स्नान बरवें मनोहर ॥४३॥

अयोध्या
मथुरा कांचीसी । द्वारावती गयेसी ।
शालग्रामतीर्थासी । शबलग्राम मुक्तिक्षेत्र ॥४४॥

गोदावरीतटाकेसी
। योजनें सहा परियेसीं ।
तेथील महिमा आहे ऐसी । वांजपेय तितुकें पुण्य ॥४५॥

सव्यअपसव्य
वेळ तीनी । तटाकयात्रा मनोनेमीं ।
स्नान करितां होय ज्ञानी । महापातकी शुद्ध होय ॥४६॥

आणिक दोनी
तीर्थे असतीं । प्रयागसमान असे ख्याति ।
भीमेश्वर तीर्थ म्हणती । वंजरासंगम प्रख्यात ॥४७॥

कुशतर्पण
तीर्थ बरवें । तटाकयात्रा द्वादश गांवें ।
गोदावरी-समुद्रसंगमें । षट्त्रिंशत कृच्छ्रफळ ॥४८॥

पूर्णा
नदीतटाकेंसी । चारी गांवें आचरा हर्षी ।
कृष्णावेणीतीरासी । पंधरा गांवें तटाकयात्रा ॥४९॥

तुंगभद्रातीर
बरवें । तटाकयात्रा वीस गांवें ।
पंपासरोवर स्वभावें । अनंतमहिमा परियेसा ॥५०॥

हरिहरक्षेत्र
असे ख्याति । समस्त दोष परिहरती ।
तैसीच असे भीमरथी । दहा गांवें तटाकयात्रा ॥५१॥

पांडुरंग
मातुलिंग । क्षेत्र बरवें पुरी गाणग ।
तीर्थे असती तेथें चांग । अष्टतीर्थे मनोहर ॥५२॥

अमरजासंगमांत
। कोटि तीर्थे असतीं ख्यात ।
वृक्ष असे अश्वत्थ । कल्पवृक्ष तोचि जाणा ॥५३॥

तया
अश्वत्थसन्मुखेंसी । नृसिंहतीर्थ परियेसीं ।
तया उत्तरभागेसी । वाराणसी तीर्थ असे ॥५४॥

पूर्वभागेसी । तीर्थ पापविनाशी ।
तदनंतर कोटितीर्थ विशेष । पुढें रुद्रपादतीर्थ असे ॥५५॥

चक्रतीर्थ
असे एक । केशव देवनायक ।
ते प्रत्यक्ष द्वारावती देख । मन्मथतीर्थ पुढें असे ॥५६॥

कल्लेश्वर
देवस्थान । असे तेथें गंधर्वभुवन ।
ठाव असे अनुपम्य । सिद्धभूमि गाणगापुर ॥५७॥

तेथें जे
अनुष्ठान करिती । तया इष्टार्थ होय त्वरितीं ।
कल्पवृक्ष आश्रयती । कान नोहे मनकामना ॥५८॥

काकिणीसंगम
बरवा । भीमातीर क्षेत्र नांवा ।
अनंत पुण्य स्वभावा । प्रयागासमान असे देखा ॥५९॥

तुंगभद्रा
वरदा नदी । संगमस्थानीं तपोनिधी ।
मलापहारीसंगमीं आधीं । पापें जातीं शतजन्मांचीं ॥६०॥

निवृत्तिसंगम
असे ख्याति । ब्रह्महत्या नाश होती ।
जावें तुम्हीं त्वरिती । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥६१॥

सिंहराशीं
बृह्स्पति । येतां तीर्थे संतोषती ।
समस्त तीर्थी भागीरथी । येऊनियां ऐक्य होय ॥६२॥

कन्यागतीं
कृष्णेप्रती । त्वरित येते भागीरथी ।
तुंगभद्रा तुळागतीं । सुरनदीप्रवेश परियेसा ॥६३॥

कर्काटकासी
सूर्य येतां । मलप्रहरा कृष्णासंयुता ।
सर्व जन स्नान करितां । ब्रह्महत्या पापें जातीं ॥६४॥

भीमाकृष्णासंगमेसीं
। स्नान करितां परियेसीं ।
साठ जन्म विप्रवंशीं । उपजे नर परियेसा ॥६५॥

तुंगभद्रासंगमीं
देखा । त्याहूनि त्रिगुण अधिका ।
निवृत्तिसंगमीं ऐका । चतुर्गुण त्याहूनि ॥६६॥

पाताळगंगेचिये
स्नानीं । मल्लिकार्जुनदर्शनीं ।
षड्गुण फल तयाहूनि । पुनरावृत्ति त्यासी नाहीं ॥६७॥

लिंगालयीं
पुण्य द्विगुण । समुद्रकृष्णासंगमीं अगण्य ।
कावेरीसंगमीं पंधरा गुण । स्नान करा मनोभावें ॥६८॥

ताम्रपर्णी
याचिपरी । पुण्य असंख्य स्नानमात्रीं ।
कृतमालानदीतीरीं । सर्व पाप परिहरे ॥६९॥
कृतमालानदीतीरीं । सर्व पाप परिहरे ॥६९॥
पयस्विनी
नदी आणिक । भवनाशिनी अतिविशेष ।
सर्व पापें हरती ऐक । समुद्रस्कंधदर्शनें ॥७०॥

शेषाद्रिक्षेत्र
श्रीरंगनाथ । पद्मनाभ श्रीमदनंत ।
पूजा करोनि जावें त्वरित । त्रिनामल्लक्षेत्रासी ॥७१॥

तीर्थांसमान । असे आणिक कुंभकोण ।
कन्याकुमारी-दर्शन । मत्स्यतीर्थीं स्नान करा ॥७२॥

पक्षितीर्थ
असे बरवें । रामेश्वर धनुष्कोटी नावें ।
कावेरी तीर्थ बरवें । रंगनाथा संनिध ॥७३॥
कावेरी तीर्थ बरवें । रंगनाथा संनिध ॥७३॥
पुरुषोत्तम
चंद्रकुंडेसीं । महालक्ष्मी कोल्हापुरासी ।
कोटितीर्थ परियेसीं । दक्षिण काशी करवीरस्थान ॥७४॥

महाबळेश्वर
तीर्थ बरवें । कृष्णाउगम तेथें पहावें ।
जेथें असे नगर 'बहें' । पुण्यक्षेत्र रामेश्वर ॥७५॥

तयासंनिध
असे ठाव । कोल्हग्रामीं नृसिंहदेव ।
परमात्मा सदाशिव । तोचि असे प्रत्यक्ष ॥७६॥

भिल्लवडी
कृष्णातीरीं । शक्ति असे भुवनेश्वरी ।
तेथें तप करिती जरी । तेचि ईश्वरीं ऐक्यता ॥७७॥

वरुणासंगमीं
बरवें । तेथें तुम्ही मनोभावें ।
स्नान करा मार्कंडेय-नांवें । संगमेश्वरू पूजावा ॥७८॥

ऋषींचे
आश्रम । कृष्णातीरीं असती उत्तम ।
स्नान करितां होय ज्ञान । तयासंनिध कृष्णेपुढें ॥७९॥

पुढें
कृष्णाप्रवाहांत । अमरापुर असे ख्यात ।
पंचगंगासंगमांत । प्रयागाहूनि पुण्य अधिक ॥८०॥

अखिल
तीर्थे तया स्थानीं । तप करिती सकळ मुनि ।
सिद्ध होय त्वरित ज्ञानी । अनुपम क्षेत्र परियेसा ॥८१॥

ऐसें
प्रख्यात तया स्थानीं । अनुष्ठितां दिवस तीनी ।
अखिलाभीष्ट पावोनि । पावती त्वरित परमार्थी ॥८२॥

जुगालय
तीर्थ बरवें । दृष्टीं पडतां मुक्त व्हावें ।
शूर्पालय तीर्थ बरवें । असे पुढें परियेसा ॥८३॥

विश्वामित्रऋषि
ख्याति । तप 'छाया' भगवती ।
तेथें समस्त दोष जाती । मलप्रहरासंगमीं ॥८४॥

कपिलऋषि
विष्णुमूर्ति । प्रसन्न त्यासि गायत्री ।
श्वेतशृंगीं प्रख्याति । उत्तरवाहिनी कृष्णा असे ॥८५॥

स्थानीं स्नान करितां । काशीहूनि शतगुणिता ।
एक मंत्र तेथें जपतां । कोटीगुणें फळ असे ॥८६॥

आणिक असे
तीर्थ बरवें । केदारेश्वरातें पहावें ।
पीठापुरीं दत्तात्रेयदेव – । वास असे सनातन ॥८७॥
पीठापुरीं दत्तात्रेयदेव – । वास असे सनातन ॥८७॥
आणिक असे
तीर्थ थोरी । प्रख्यात नामें मणिगिरि ।
सप्तऋषीं प्रीतिकरीं । तप केलें बहु दिवस ॥८८॥

वृषभाद्रि
कल्याण नगरी । तीर्थे असतीं अपरंपारी ।
नव्हे संसारयेरझारी । तया क्षेत्रा आचरावें ॥८९॥

अहोबळाचें
दर्शन । साठी यज्ञ पुण्य जाण ।
श्रीगिरीचें दर्शन । नव्हे जन्म मागुती ॥९०॥
श्रीगिरीचें दर्शन । नव्हे जन्म मागुती ॥९०॥
समस्त
तीर्थे भूमीवरी । आचरावीं परिकरी ।
रजस्वला होतां सरी । स्नान करितां दोष होय ॥९१॥

संक्रांति
कर्काटक धरुनि । त्यजावे तुम्हीं मास दोनी ।
नदीतीरीं वास करिती कोणी । त्यांसी कांहीं दोष नाहीं ॥९२॥

तयांमध्यें
विशेष । त्यजावें तुम्हीं तीन दिवस ।
रजस्वला नदी सुरस । महानदी येणेंपरी ॥९३॥
रजस्वला नदी सुरस । महानदी येणेंपरी ॥९३॥
भागीरथी
गौतमीसी । चंद्रभागा सिंधूनदीसी ।
नर्मदा शरयू परियेसीं । त्यजावें तुम्हीं दिवस तीनी ॥९४॥

ग्रीष्मकाळीं
सर्व नदींस । रजस्वला दहा दिवस ।
वापी-कूट-तटाकांस । एक रात्र वर्जावें ॥९५॥

नवें उदक
जया दिवसीं । येतां ओळखा रजस्वलेसी ।
स्नान करितां महादोषी । येणेंपरी वर्जावें ॥९६॥

साधारण
पक्ष तुम्हांसी । सांगितलीं तीर्थे परियेसीं ।
जें जें पहाल दृष्टीसीं । विधिपूर्वक आचरावें ॥९७॥

श्रीगुरुंचें वचन । शिष्य सकळ करिती नमन ।
गुरुनिरोप कारण । म्हणोनि निघती सकळिक ॥९८॥

सिद्ध
म्हणे नामधारकासी । निरोप घेऊनि श्रीगुरुसी ।
शिष्य गेले यात्रेसी । राहिले श्रीगुरू गौप्यरुपें ॥९९॥

म्हणे
सरस्वतीगंगाधर । पुढील कथेचा विस्तार ।
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्टें साधती ॥१००॥

गुरुचरित्र
कामधेनु । श्रोते होवोनि सावधानु ।
जे ऐकती भक्तजनु । लाधती चारी पुरुषार्थ ॥१॥

ब्रह्मरसाची
गोडी । सेवितों आम्हीं घडोघडी ।
ज्यांसी होय आवडी । साधे त्वरित परमार्थ ॥१०२॥

इति
श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्ध-नामधारकसंवादे तीर्थयात्रा निरुपणं नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥
॥
श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १०२ ॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥
No comments:
Post a Comment