सकाळचे ८.०० वाजले होते.महाराष्ट्रभर हुडहुडी जाणवत होती.त्यामुळे सकाळी लवकर उठायला मला थोडा उशीर झाला होता.सकाळी ८.०० ला मी उठलो.उठून सर्व विधी संपवून मी हॉलमध्ये चहाचे घुटके घेत पेपर वाचू लागलो. ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये पहिल्या पानावर निम्या राजकारणाच्या बातम्या भरलेल्या होत्या.पहिले पान वाचून झाल्यावर मी दुसरे पान वाचू लागलो.तिथे कोपऱ्यात एक लहान बातमी होती.
”नोयडा मध्ये एका मोठ्या जगप्रसिद्ध दुचाकी कंपनी च्या आवारात एका काम करणाऱ्या ३५ वर्षीय माणसाने कंपनीच्या एच.आर वर गोळीबार केला.’’
बातमी वाचून मी अक्षरशः हादरलो.कारण ज्या कंपनीमध्ये घटना घडली होती ती कंपनी दुचाकी मध्ये प्रसिद्ध होती.बातमी वाचून मी पेपर बाजूला ठेवला आणि माझा मोबाईल उघडला.मोबाईलवर सोशल मिडिया हाताळत असताना मला फेसबुक वर एक कोट दिसला.
“Don’t pick a job. Pick a Boss. Your first boss is the biggest factor in your career success. A boss who doesn’t trust you won’t give you opportunities to grow.”.
Quote वाचत काही काळ मी भूतकाळात गेलो.
२०१४ चा ‘जानेवारी’ महिना उजाडला होता.नुकतेच माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते.अर्थात हे शिक्षण पूर्ण करायला मला जीवाचे रान करावे लागले होते.पण अखेर माझे शिक्षण पूर्ण झाले होते.ह्याचा मला पुरेपूर आनंद झाला होता.शिक्षण पूर्ण झाल्यावर अखेर ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण आला होता.नोकरीसाठी माझी धडपड सुरु झाली होती.मी राहत असलेल्या शहरात पूर्ण Mechanical Engineering चा पाया होता.म्हणून मी काही दिवस घरी राहून काम करण्याचा निर्णय घेतला.नोकरीच्या शोधात असताना सहज माझे लक्ष ‘लक्ष्मी इस्टेट’ मध्ये असलेल्या एका मोठ्या ग्रुप च्या फौंड्रीकडे गेले.तिथे मी फिरत फिरत गेलो.फौंड्री चे सी.ई.ओ तिथे होते.योगायोगाने ते संबंधीत निघाल्यामुळे मला फारशी अडचण झाली नाही.मी त्यांच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या.गप्पा झाल्यावर मला ‘थेट कामावर ये’ अशी सूचना मिळाली.इतक्या पटकन असे काही होईल असे मला वाटले नाही.फारसा न विचार करता मी होकार कळवला आणि फौंड्री मधून बाहेर पडलो.बाहेर आल्यावर माझा आनंद गगनात मावेना.मी लगेचच घरी आलो आणि आई-बाबांना बातमी दिली आणि ०१.०४.२०१४ पासून कामाला जायला सुरवात केली.
ऑफिस चे अंतर घरापासून २६ किलोमीटरवर होते.सकाळी ९.०० ते ५.३० अशी ऑफिसची वेळ होती.फौंड्री चा परिसर पूर्ण निसर्गरम्य होता आणि डोंगराजवळ होता.मी सकाळी ९.०० ला ऑफिसला पोहोचलो.पहिल्याच दिवशी माझा आणि गेट वर असलेल्या सुरक्षा रक्षकाचा फालतू कारणावरून वाद झाला.कंपनी चा ड्रेस कुठे आहे ह्यावरून माझा आणि सुरक्षा रक्षकाच वाद झाला.मी साधे कपडे घालून गेलो होतो.कसेबसे त्याला समजावून मी कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलो.तिथे खोली होती.तिथे माझी sack ठेवून मी निरीक्षण करू लागलो.ऑफिस चा स्टाफ येत होता.त्यांच्या प्रत्येक हालचालींचे मी बारीक निरीक्षण करू लागलो.सर्व स्टाफ आल्यावर मी ऑफिस मध्ये आलो आणि सर्वांची ओळख करून घेतली.पहिला दिवस असल्याने मी थोडा नर्वस आणि घाबरलेलो होतो.
तेवढ्यात कंपनीचे मालक आणि त्यांच्या सौभाग्यवती कंपनी मध्ये आल्या.त्यांनी मला ऑफिस मध्ये पाहिले आणि दोघे आपआपल्या केबिनमध्ये मध्ये गेले.ऑफिसमध्ये ओळख करून झाल्यावर सकाळी ९.३० मिनिटांनी मी फ्लोअर वर गेलो.तिथे सर्व फ्लोअर फिरून मी माहिती घ्यायला सुरवात केली.दोन तास मी पूर्ण माहिती घेतली.फौंड्री मध्ये काम करणे म्हणजे ‘शारीरिक आणि मानसिक’ ह्या दोन्ही गोष्टींची तयारी करावी लागणार असे मला जाणवू लागले.
पूर्ण शॉप फ्लोअर फिरून झाल्यावर दुपारचे १२.०० वाजले.तेव्हा मला फौंड्री च्या साहेबांचा ‘भेटायला ये’ असा फोनवर निरोप आला.मी पळत पळत ऑफिसमध्ये गेलो.थोडासा घाबरत मी साहेबांना भेटलो.साहेबांविषयी मी खूप ऐकून होतो.साहेब वल्ली आहेत...चिडके आहेत....तापट आहेत...विचार करत करत मी त्यांच्या केबिन मध्ये गेलो.योगायोगाने साहेबांच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये ५ वर्षाचे अंतर होते.मला साहेबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.मी घाबरत घाबरत उत्तरे द्यायला सुरवात केली.उत्तर दिल्यावर मला साहेबांनी बसायला सांगितले.मी बसल्यावर मला साहेबांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि गोड शब्दांमध्ये मार्गदर्शन करायला सुरवात केली.मी भरल्यासारखा ऐकत बसलो.मी कल्पना केलेले साहेब हे मुळीच नव्हते.खासगी आणि व्यावसाईक आयुष्य कसे जगावे ह्याबद्दल साहेब मला सांगत होते.व्यावसाईक आयुष्यात सुरवातीला चांगला मालक आपले आयुष्य कसे बदलू शकतो ते मला जाणवत होते.मी मनोमन प्रार्थना केली की प्रत्येक तरुण मुलांना असा बॉस हवाच जो बॉस कमी मित्र असेल.
अर्ध्या तासांनी मी केबिन मधून साहेबांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.नंतर मी साहेबांच्या सौभाग्यवती ‘पूजा madam’ ह्यांना भेटायला गेलो.त्यांची केबिन लहान होती.मी केबिन मध्ये गेल्यावर काही काळ उभाच राहिलो.Madam कामात होत्या.नंतर त्यांनी मला ‘खुर्चीवर बस’ असा आदेश दिला.मी घाबरत घाबरत बसलो.मला madam खूप कडक वाटल्या.प्रथम मला त्या हेडमास्तरीन वाटू लागल्या.चेहऱ्यावर ते कडक भाव...त्यांचा ड्रेसिंग सेन्स पाहून मी थोडासा बावरलो.कदाचित मी बावरलो आहे असे त्यांच्या लक्षात आले असावे.मग त्यांनी माझ्याशी अतिशय प्रेमळ आणि गोड आवाजात गप्पा मारायला सुरवात केली.मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो.त्या कडक वाटत असल्या तरी त्या अतिशय साध्या...शांत..होत्या.त्यांचे आणि माझे वय एकच होते त्यामुळे मी त्यांच्यासमोर लगेचच मोकळा झालो. त्या मला beauty with brain वाटत होत्या कारण त्या अतिशय सुंदर होत्या आणि हुशार देखील होत्या.त्यांच्याशी आणि साहेबांशी बोलून आणि गप्पा मारून झाल्यावर माझ्यात नवीन जोश तयार झाला.कारण पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला मोठे काम दिले होते.
आणि... अश्यारितीने माझ्या व्यावसाईक आयुष्याची सुरवात झाली.पहिल्या दिवसापासून मला साहेबांचे भरपूर मार्गदर्शन मिळाले.कुणाशी कसे वागावे....कुणाशी कसे political वागावे...ह्याचे मला पुरेपूर मार्गदर्शन मिळाले.काम करत असताना माणसांची कशी पारख करावी ह्याचे देखील मला साहेबांकडून मार्गदर्शन मिळत गेले.काम करताना मला अवघड वाटणारे Mechanical Engineering साहेबांनी एका झटक्यात सोप्पे करून टाकले आणि त्यांनी माझी समूहामध्ये काम करत असताना वाटणारी मला अनामिक भीती एका क्षणात घालवली.त्यामुळे माझा आत्मविश्वास आणि उत्साह वाढत गेला.
साहेबांबरोबर काम करत असताना अंगात वेगळाच जोश असायचा.आपल्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास टाकणारा आणि त्यांच्याशी थेट बोलणारा मालक मी जवळून पाहत होतो.मालकाने विश्वास टाकल्यामुळे काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव होत होती.फौंड्री मध्ये मला पूर्णपणे empowerment मिळाली होती.मी काम करत चुका पण करत होतो.त्याचबरोबर शिकत पण गेलो.साहेब काम करताना बऱ्याचदा चीडचीड करत असत पण madam एकदाही चिडत नसत.अतिशय गोड शब्दात त्या समजावून सांगत असत.त्यांच्याकडे पाहून मला मनोमन आपली भावी साथीदार कशी असावी ह्याचे मनोमन चित्रण होत असे.अशीच त्यांच्यासारखी साधी....सरळ...Decent…गोरीगोरीपान...Attitudeनसणारी...समजावून घेणारी असावी असे मला कधीकधी वाटत होते.
काही महिन्यानंतर साहेब आणि madam आणि माझ्यात सुंदर असे मैत्रीचे नाते निर्माण झाले.ते दोघे माझे बॉस कमी मित्र आणि मैत्रीण झाले.म्हणून मी दोघांना माझ्या आयुष्यातले सारे काही सांगत असत.बघता बघता मी फौंड्री मध्ये दीड वर्ष पूर्ण केले.
मी विचार करत बसलो.बातमी वाचून एक गोष्ट मला पटली होती.आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणारा मालक असला की सहकाऱ्यांचा विश्वास वाढतो आणि त्यांना आपलेपणाची जाणीव होती.असा बॉस कुणाला नको???
विचार करत मी आवरलो.सकाळचे १०.३० वाजले होते.लगेचच मी गाडीची किल्ली घेतली आणि माझ्या त्या साहेबांना भेटायला घराबाहेर पडलो आणि सुसाट वेगाने लक्ष्मी इस्टेटकडे सुटलो.
©
Kaushik
Wednesday, 30 January 2019
पहिली नोकरी
Friday, 11 January 2019
Amazing Tamilnadu
Amazing Tamilnadu
![]() |
| Morning 08.11.2018 |
८.११.२०१८
अखेर ९.४५ मिनिटांनी बेंगलोर जवळ आले आहे अशी घोषणा झाली आणि आम्ही परत सीट बेल्ट घट्ट बांधून बसलो आणि खिडकीबाहेरचे दृश्य पाहू लागलो.अजस्त्र पसरलेले 'बेंगलोर' मला ठळकपणे दिसत होते.हळूहळू मला बेंगलोर सिटी दिसू लागली आणि आम्ही Kempagauda International Airport वर उतरलो.मी वेळ बघितली.सकाळचे १०.१० वाजले होते.विमान जमिनीवर आल्यावर लगेचच आम्ही सर्वजण उठून विमानातून खाली उतरू लागलो.Airport सुमारे ४००० एकर क्षेत्रात पसरलेले होते.भारतातले सर्वात बिझी एअरपोर्ट म्हणून नावाजलेले होते.विमानतळावर स्वच्छता आणि टापटीपपणा मोठ्या प्रमाणावर जाणवत होता.गर्दीतून आम्ही विमानातून खाली उतरलो.खाली उतरल्यावर सर्व प्रवाश्यांना एअर-इंडिया ची बस रनवे वर घ्यायला आली होती.बस मधून आम्ही लगेचच निघालो.विमानतळावर चेक-इन केल्यावर शांतपणे काही काळ बसलो.कारण आम्ही पुढची 'चेन्नई' ला जाणारी flight लगेचच होती.पण चौकशी केल्यावर विमान एक तास उशिरा म्हणजे दुपारी १.०५ वाजता येणार असल्याचे कळले.मग उरलेला वेळ मी विमानतळावर भटकण्यात आणि विविध प्रकारच्या हिरवळी पाहण्यात घालवला.काही वेळ विमानतळावरचे फ्री वाय-फाय वापरत वेळ घालवला.काही दुकानांमध्ये आम्ही भटकत होतो पण तिथे असलेल्या वस्तू आणि त्यावरच्या असलेल्या किमती पाहून मी काढता पाय घेतला. तिथेच हलके जेवण करून आम्ही विमानाची वाट पाहत आणि फोटो काढत बसलो.
तामिळनाडू चे रस्ते क्लास होते.कुठेही खड्डा दिसत नव्हता.लगेचच ६.१५ मिनिटांनी आम्ही 'महाबलीपुरम' ला पोहोचलो.अंधार पडायला सुरवात झाली होती.तिथे फारशी गर्दी जाणवत नव्हती.जेमतेम १५००० लोकसंख्या असलेले गाव होते.६.१५ मिनिटांनी आम्ही 'कृष्णाचा बटरबॉल' ह्या अनोख्या वस्तुजवळ पोहोचलो.ती वस्तू म्हणजे एक मोठा ५०टण च्या आसपास वजन असलेला दगड होता.गुरुत्वाकर्षण ह्या नियमाचा भंग करून तो दगड एका मोठ्या उताऱ्यावर ३० अंशात चिडीचूप उभा होता.तो दगड कसा काय उभा आहे ह्याचे उत्तर अजून कुणालाही मिळाले नाही.अशे ४-५ दगड होते.पण ते आकर्षणाचे केंद्र ठरत होते.ती वस्तू पाहत असताना सर्वांना अप्रूप वाटत होते.त्यापाठोपाठ तिथे पांडवांची जुन्या काळातली एक जतन करून ठेवलेली खोली आम्ही पाहिली.सर्व पाहून झाल्यावर आम्ही ७.०० वाजता बाहेर पडलो आणि आमचे हॉटेल 'सी ब्रिज' कडे निघालो.हॉटेलमध्ये आम्हाला वेलकम ड्रिंक देण्यात आले.त्याचबरोबर शिंपल्यांचा हार देण्यात आला.हॉटेलमध्ये उतरल्यावर आम्ही लगेच फ्रेश होण्यासाठी रूम कडे गेलो.हॉटेल समुद्राजवळ होते.त्यामुळे भरपूर दमटपणा जाणवत होता.रूम पाहिल्यावर मला 'रामगोपाल वर्मा' चे भीतीदायक सिनेमे आठवू लागले.रूम बरीच भीतीदायक वाटत होती.रूम मध्ये मुंगीएवढे ventilation जाणवत होते.पण हा सुद्धा नवीन अनुभव होता.एक रात्र आम्हाला काढायची होती.लगेचच फ्रेश होऊन आम्ही रात्री ८.०० वाजता हॉटेल च्या restaurant मध्ये जेवायला गेलो.जेवण अतिशय चवदार होते.भरपेट जेवण करून आम्ही लगेचच restaurant मधून बाहेर पडलो आणि शतपावली करायला निघालो.शतपावली करत आम्ही महाबलीपुरम मध्ये फिरत होतो.गाव फारसे मोठे नव्हते.काही वेळ फिरल्यावर लगेचच आम्ही हॉटेल वर आलो.रात्रीचे १०.३० वाजले होते.लगेचच आम्ही रूम कडे निघालो.रूम मध्ये मी आल्यावर लगेचच ए.सी सुरु केला आणि दिवसभराचा प्रवास माझ्या डोळ्यासमोर येऊ लागला.दिवसभर कुठेही धावपळ झाली नव्हती.मग शांतपणे मी ए.सी चे गार वारे खात निद्राधीन झालो.
![]() |
| Chennai Airport |
![]() |
| Chennai |
![]() |
| Mahabalipuram |
![]() |
| Belgam |
![]() |
| About to Land |
![]() |
| Dakshinchitra |
![]() |
| Top above the Sky |
९.११.२०१८
![]() |
| Beauty in Name:- Paradise Beach |
१०.११.२०१८
'Auroville' पुडुचेरी पासून १५ किलोमीटर वर होते.आम्ही बाय-रोड निघालो.सकाळी ११.१५ वाजता आम्ही तिथे पोहोचलो.पूर्णपणे निसर्गात वसलेले असे ते 'औरोविल्ले' होते. जगभरातील लोकं तिथे राहत होते.आम्ही पायी चालत औरोविले चा पूर्ण परिसर पाहत निघालो.पूर्णपणे निसर्गात वसलेले असे ते अनोखे शहर होते.तब्बल तीन तास निसर्गाची अनोखी रूपं आणि विलोभनीय असे असलेले औरोविले पाहून आम्ही दुपारी ३.०० वाजता बाहेर पडलो आणि चेन्नई च्या दिशेने निघालो.
१२.११.२०१८
Saturday, 8 December 2018
Book Review:-रंगाधळा; लेखक:-रत्नाकर मतकरी
Thursday, 29 November 2018
Film review:-2.0
Film review-2.0
One sentence review:- Perfect entertainer
but it fails to maintain the expectations of part 1 robot.
Stars:-2.5
Story could be elaborated much in detail.
दक्षिण भारतात तयार होणारे सिनेमे म्हणजे अचाट कल्पनाशक्ती.'गुरुत्वाकर्षण' ह्या गोष्टीला छेद देऊन उंच हवेत उडणारी माणसे,सरळ रेषेत उडणाऱ्या पेप्सी च्या बाटल्या, 180 डिग्री मध्ये फिरणारे चिल्लर,हवेत उंच उडी मारून परत जमिनीवर येणारा नायक,सामजिक संदेश,टेक्नॉलॉजी चा वापर करून खुळ लावणारे कथानक...आणि बऱ्याच गोष्टी दक्षिणेत तयार होणाऱ्या सिनेमात पाहायला मिळतात. 'रोबोट' ह्या सिनेमा ने असेच काहीसे खूळ लावले होते आणि 'रजनीकांत' ह्या व्यक्तीला माणसापेक्षा मोठे केले होते.
2.0 हा देखील तसाच सिनेमा आहे.ह्या सिनेमा मध्ये अचाट Vfx ची दृश्य आहेत.पण हा सिनेमा कथेच्या बाबतीत काठावर पास होत आहे.
मोबाईल आणि मोबाईल टॉवर मुळे होणारे परिणाम आणि त्यातून घडणारे कथानक....असा एकूण सिनेमा चा पसारा आहे.संगीताच्या बाबतीत सिनेमा पूर्ण निराश करतो.सिनेमा पूर्णपणे 'अक्षय' आणि 'रजनीकांत' ह्या दोघांच्या कॅरॅक्टर भवती फिरत राहतो.कथा अजून खुलवता आली असती.'अक्षय' लाजवाब.अखेर 'रजनीकांत' नावाचे वादळ हे कथेच्या कमकुवत बाजू पण खाऊन टाकते.
कथेच्या बाबतीत:-काठावर पास
2.5स्टार्स
©Kaushik
Tuesday, 13 November 2018
राजीनामा
दुपारचे एक वाजलेले होते.जोरात fan चा आवाज ऐकू येत होता.अधूनमधून हळूच टिंग...टिंग असा आवाज ऐकू येत होता.मधूनच मच....मच...सुरर...ढूररर....असा आवाज येऊ लागला.काही वेळेनंतर मोठ्या वी.एम.सी मशीनचा आवाज येऊ लागला.वी.एम सी मशीन चा आवाज आल्यावर बेल चा आवाज आला आणि एका मोठ्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअर मधून पायांचा आवाज येऊ लागला.तीन मोठ्या पदावरचे अभियंते नुकतेच दुपारचे जेवण करून ग्राउंड फ्लोअर वरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आले आणि तिथे असलेल्या Washroom कडे गेले.
तिथून काही वेळाने बाहेर आल्यावर तिघे शतपावली करायला आपापल्या मिशींना पीळ देत कंपनी च्या आवारात असलेल्या जागेत फिरू लागले.काही वेळ फिरल्यानंतर तिघे परत आपापल्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑफिस मध्ये परतले.तिघांचे वेगळे ऑफिस होते.पहिला इंजिनिअर त्याच्या ऑफिस च्या बाहेर येऊन थांबला.तिथे थांबून त्याने त्याचा अवतार पाहिला.दुपारी भर पेट जेवल्यामुळे त्याला सुस्ती आली होती.त्याने त्याचा विस्कटलेला शर्ट परत ईन केला आणि केसांवरून हाथ फिरवत आपली केशरचना व्यवस्थित करत तो त्याच्या केबिन मध्ये शिरला.त्या तिघांपेकी पहिला प्रोडक्शन हेड होता;दुसरा क्वालिटी; आणि तिसरा प्लांट हेड.
तिथे त्याच्या केबिन मध्ये ३ जुनिअर इंजिनिअर बसलेले होते.त्यांच्याजवळ तो पहिला इंजिनिअर जाऊन बसला.
“जेवण झाले काय?”
पहिल्या इंजिनिअर ने प्रश्न विचारला.
कुणीच उत्तर दिले नाही.
सर्व जण तोंड पडून बसले आहेत हे त्याच्या लक्षात आले.
“अरे...काय झाले?”
सर्व जुनिअर इंजिनिअर लोकांचे पडलेली तोंडे पाहून त्यांच्या साहेबांना काळजी वाटू लागली.
“साहेब..आपल्या जुन्या maintainance इंजिनिअर ने राजीनामा दिला.”
पहिला जुनिअर इंजिनिअर ने उत्तर दिले.
“का...”
“माहित नाही.”
“कुठे आहे राजीनामा...”
“हा माझ्या हातात...”
“मला दाखव...”
जुनिअर इंजिनिअर ने त्याच्या साहेबांना राजीनामा दाखवला.साहेब तो राजीनामा वाचू लागले.
“आदरणीय मालक
मी 'मन्सूर खान' आपल्या कंपनीत सुरवातीपासून आहे.सुरवातीपासून मी अत्यंत शिस्तबद्ध;कर्तव्यदक्ष;आणि कामाप्रती निष्ठा असलेला माणूस आहे.तथापि गेल्या काही वर्षापासून मला खूप त्रास होत आहे.माझे साहेब मला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत.ते मला 'ए नाग्या,,,बोक्या....ह्रिथिक...अंडी घालणारा कोंबडा' असे म्हणतात.कधीकधी मला ते 'गड्डापाव' असे म्हणतात.मला भर मिटिंग मध्ये ते 'नाम लावलेला गणपती' असे म्हणतात.मी सिनिअर असून सुद्धा साहेब असे का करतात ह्याचा मला प्रश्न पडतो.कधीकधी ते आम्हाला केबिन मध्ये बोलावतात आणि उगाचच आमच्यावर रागावतात.रागवत असताना आम्हाला हसू आले का हसलास; म्हणून पुन्हा रागावतात.रागवत असताना माणूस मान खाली घालून उभा राहतो.तसा मी मान खाली घालून उभा राहिलो की, माझ्याकडे बघ; खाली मान घालू नकोस असे परत म्हणतात आणि रागावतात.कधीकधी ते मला 'शार्कमासा' म्हणतात.कधीकधी मला 'बदक' म्हणतात.कधीकधी मला बुट्टीने मारीन असे म्हणतात.कधीकधी मला ते सकाळी ६.०० वाजता फोन करतात आणि अजून झोपला आहेस म्हणून रागावतात.त्यांना राग अनावर झाला कि मला ते बोक्या;टग्या...मासा...नाग्या...ह्रिथिक असे म्हणतात.
मालक;एक वेळ ह्रिथिक ठीक आहे पण मासा...बोक्या...नाग्या....गड्डापाव..ह्याला काय म्हणावे.
मालक; कधी कधी मला असे वाटते की मी माणूस नाही प्राणी आहे.नाग्या...बोक्या....असे शब्द मला आता स्वप्नात पण ऐकू येत आहेत.मालक; मला आता फक्त मांजर आणि उंदीर म्हणायचे तेवढेच शिल्लक राहिले आहे.काम करून सुद्धा साहेब ह्या सर्व नावांनी मला हाक मारत असतात.त्यामुळे मी मानसिक रित्या खचलेलो आहे.कधीकधी मला आपण प्राणी आहोत की काय असे उगीचच वाटू लागत आहे.म्हणून मी माझ्या साहेबांच्या मानसिक त्रासाला कंटाळून राजीनामा देत आहे.
स्वीकार करावा.
आपला नम्र
मन्सूर”
राजीनामा पूर्ण वाचून त्या पहिल्या इंजिनिअर ने तो टेबल वर ठेवला.काही सेकंद त्यांनी दीर्घ श्वास घेतला.श्वास घेऊन त्यांनी केबिन मध्ये असलेल्या इंजिनिअर लोकांकडे पाहिले आणि काही सेकंदात सर्वांचा सुरु झाला जोराचा आणि न थांबणारा हास्यस्पोट...
©
kaushik
Sunday, 4 November 2018
हाय जम्प
सायंकाळचे ५.०० वाजले होते.आजूबाजूला जोरदार वारे सुटले होते.पक्षांच्या किलबिलाट ऐकू येत होता.अधूनमधून गारेगार वाऱ्याची झुळूक जाणवत होती.लांबून सूर्यास्त दिसत होता.मधूनच स$रररर... असा आवाज ऐकू येत होता.अजस्त्र आणि भयावह वाटणाऱ्या पर्वतरांगा आजूबाजूला गुपचूप उभ्या होत्या.पर्वतरांगांमधून दिसणारी दरी अधिकच भयावह वाटत होती.लांबून एखादी गाडी आणि एखादी बस दिसत होती.मधूनच वाऱ्याचा वेग वाढत होता आणि कमी होत होता.जसजसे वेळ वाढत होता तसे आजूबाजूला भयावह वाटणारी अशी निःशब्द... अशी शांतता पसरत होती.पक्षांच्या किलबिलाट हळूहळू वाढत होता.
अजस्त्र अश्या असणाऱ्या पर्वतांमधून पायवाट दिसत होती.तिथून हळूहळू पायांचा आवाज येऊ लागला.२८ वर्षाचा तरुण तिथे असणाऱ्या पायवाटेवरच्या लहान झाडांवर पाय देत पुढे जात होता.पायवाटेवरून वाट काढत आजूबाजूला असणाऱ्या दगडांना धरत तो डोंगराच्या टोकाशी गेला आणि तिथे असणाऱ्या एका मोठ्या दगडाला टेकून उभा राहिला.त्याने वेळ पाहिली.सायंकाळचे ५.४५ वाजले होते.तो बराच उदास वाटत होता. त्याचा चेहरा बराच उदास आणि त्रासिक झाला होता.तो काही वेळ जमिनीवर विसावला आणि मनातल्या मनात विचार करू लागला.
“कधी संपणार हा त्रास...”
“किती प्रयत्न केले पण काही केल्या मार्ग दिसत नाही.आधी शिक्षणात अपयश;मग व्यवसायात अपयश...न संपणारा कर्जाचा डोंगर...”
तो खचून गेला होता.
“आयुष्यात आता काहीच उरले नाही.”
“कशाला जगायचे असे आयुष्य...”
“ह्या सर्व गोष्टींचा मला वैताग आला आहे.मला मुक्तता हवी आहे ह्या सर्वांमधून...”
विचार विचार करून तो पार खचून गेला.हळूहळू त्याच्या डोळ्यांमधून पाणी येऊ लागले.
“मी एवढ्या सर्व धार्मिक गोष्टी करतोय तरी पण माझ्याच वाटेला हा त्रास...”
तो रडू लागला.रडूनरडून त्याचा चेहरा सुजला आणि त्याचे डोळे लालबुंद झाले होते.
त्याला सारेकाही संपले असे वाटत होते.
तो उठून उभा राहिला.त्याच्या मनात हा त्रास आता कायमचा संपवायचा असा भयानक विचार येऊ लागला.त्याने घड्याळ पाहिले.सायंकाळचे ५.५५ वाजले होते.तो हळूहळू डोंगराच्या एकदम टोकापाशी आला.त्याच्या कानावर सु$$$ई अश्या आवाजात गार वारे येऊ लागले.लांबून त्याला एका बाजूला सूर्यास्त दिसू लागला.त्याने आजूबाजूला दगडांवर अनेक प्रेमात बुडालेल्या व्यक्तींचे नाव पाहिले.स्वराजाची आठवण आणि साक्षीदार असलेल्या डोगरांच्या दगडांवर अनेक सैराट प्रेमींची नावं पाहून त्याला खटकले.तो आता दरीच्या अगदी जवळ गेला.त्याने मनातल्या मनात निश्चय केला.लांबून सूर्य त्याला आता लालेलाल दिसू लागला.त्याने आजूबाजूला मनसोक्त शेवटचे पाहिले...आणि त्याने उंच खाली उडी मारायची ठरवली.तो उंच उडी मारणार तेवढ्यात त्याला तिथे एक दगड दिसला.त्याचबरोबर त्याला इतिहासाची साक्ष असणारा असा एक सुप्रसिद्ध गड पर्वतरांगांमधून दिसू लागला.
त्या दगडावर काहीतरी लिहिले होते.त्याने ते पाहिले.
“हे ही दिवस जातील.तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...”
त्याने ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचले.एक ते दोन मिनिटे तो ते वाक्य पुन्हा-पुन्हा वाचू लागला.फिनिक्स पक्षाप्रमाणे त्याची विचारचक्रे बदलू लागली.त्याच्या डोळ्यांमध्ये पुन्हा उमेद दिसू लागली.त्याने परत दरीत पाहिले.त्याला लांबून एक पक्षी उंच आकाशात झेप घेताना दिसला.त्याने परत तो इतिहासाची साक्ष देणारा गड पाहिला.त्याच्या अंगावर रोमांच येऊ लागले.
तो गड पाहून त्याने दीर्घ श्वास घेतला.त्याने खिशातून रुमाल काढला आणि त्याने स्वतःचे डोळे पुसले.परत त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिथे असलेली माती त्याने हातात घेतली आणि कपाळावर लावली आणि पुन्हा नवीन उमेदीने अंगात बारा हातींचे बळ घेऊन तो डोंगर उतरू लागला.
©Kaushik shrotri.
#ichalkaranji
Thursday, 1 November 2018
बहिणी...
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे म...












