Tuesday 13 November 2018

राजीनामा

   
दुपारचे एक वाजलेले होते.जोरात fan चा आवाज ऐकू येत होता.अधूनमधून हळूच टिंग...टिंग असा आवाज ऐकू येत होता.मधूनच मच....मच...सुरर...ढूररर....असा आवाज येऊ लागला.काही वेळेनंतर मोठ्या वी.एम.सी मशीनचा आवाज येऊ लागला.वी.एम सी मशीन चा आवाज आल्यावर  बेल चा आवाज आला आणि एका मोठ्या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअर मधून पायांचा आवाज येऊ लागला.तीन मोठ्या पदावरचे अभियंते नुकतेच दुपारचे जेवण करून ग्राउंड फ्लोअर वरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आले आणि तिथे असलेल्या Washroom कडे गेले.
तिथून काही वेळाने बाहेर आल्यावर तिघे शतपावली करायला आपापल्या मिशींना पीळ देत कंपनी च्या आवारात असलेल्या जागेत फिरू लागले.काही वेळ फिरल्यानंतर तिघे परत आपापल्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ऑफिस मध्ये परतले.तिघांचे वेगळे ऑफिस होते.पहिला इंजिनिअर त्याच्या ऑफिस च्या बाहेर येऊन थांबला.तिथे थांबून त्याने त्याचा अवतार पाहिला.दुपारी भर पेट जेवल्यामुळे त्याला सुस्ती आली होती.त्याने त्याचा विस्कटलेला शर्ट परत ईन केला आणि केसांवरून हाथ फिरवत आपली केशरचना व्यवस्थित करत तो त्याच्या केबिन मध्ये शिरला.त्या तिघांपेकी पहिला प्रोडक्शन हेड होता;दुसरा क्वालिटी; आणि तिसरा प्लांट हेड.
तिथे त्याच्या केबिन मध्ये ३ जुनिअर इंजिनिअर बसलेले होते.त्यांच्याजवळ तो पहिला इंजिनिअर जाऊन बसला.
“जेवण झाले काय?”
पहिल्या इंजिनिअर ने प्रश्न विचारला.
कुणीच उत्तर दिले नाही.
सर्व जण तोंड पडून बसले आहेत हे त्याच्या लक्षात आले.
“अरे...काय झाले?”
सर्व जुनिअर इंजिनिअर लोकांचे पडलेली तोंडे पाहून त्यांच्या साहेबांना काळजी वाटू लागली.
“साहेब..आपल्या जुन्या maintainance इंजिनिअर ने राजीनामा दिला.”
पहिला जुनिअर इंजिनिअर ने उत्तर दिले.
“का...”
“माहित नाही.”
“कुठे आहे राजीनामा...”
“हा माझ्या हातात...”
“मला दाखव...”
जुनिअर इंजिनिअर ने त्याच्या साहेबांना राजीनामा दाखवला.साहेब तो राजीनामा वाचू लागले.
 
“आदरणीय मालक
मी 'मन्सूर खान' आपल्या कंपनीत सुरवातीपासून आहे.सुरवातीपासून मी अत्यंत शिस्तबद्ध;कर्तव्यदक्ष;आणि कामाप्रती निष्ठा असलेला माणूस आहे.तथापि गेल्या काही वर्षापासून मला खूप त्रास होत आहे.माझे साहेब मला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत.ते मला 'ए नाग्या,,,बोक्या....ह्रिथिक...अंडी घालणारा कोंबडा' असे म्हणतात.कधीकधी मला ते 'गड्डापाव' असे म्हणतात.मला भर मिटिंग मध्ये ते 'नाम लावलेला गणपती' असे म्हणतात.मी सिनिअर असून सुद्धा साहेब असे का करतात ह्याचा मला प्रश्न पडतो.कधीकधी ते आम्हाला केबिन मध्ये बोलावतात आणि उगाचच आमच्यावर रागावतात.रागवत असताना आम्हाला हसू आले का हसलास; म्हणून पुन्हा रागावतात.रागवत असताना माणूस मान खाली घालून उभा राहतो.तसा मी मान खाली घालून  उभा राहिलो की, माझ्याकडे बघ; खाली मान घालू नकोस असे परत म्हणतात आणि रागावतात.कधीकधी ते मला 'शार्कमासा' म्हणतात.कधीकधी मला 'बदक' म्हणतात.कधीकधी मला बुट्टीने मारीन असे म्हणतात.कधीकधी मला ते सकाळी ६.०० वाजता फोन करतात आणि अजून झोपला आहेस म्हणून रागावतात.त्यांना राग अनावर झाला कि मला ते बोक्या;टग्या...मासा...नाग्या...ह्रिथिक असे म्हणतात.

मालक;एक वेळ ह्रिथिक ठीक आहे पण मासा...बोक्या...नाग्या....गड्डापाव..ह्याला काय म्हणावे.

मालक; कधी कधी मला असे वाटते की मी माणूस नाही प्राणी आहे.नाग्या...बोक्या....असे शब्द मला आता स्वप्नात पण ऐकू येत आहेत.मालक; मला आता फक्त मांजर आणि उंदीर म्हणायचे तेवढेच शिल्लक राहिले आहे.काम करून सुद्धा साहेब ह्या सर्व नावांनी मला हाक मारत असतात.त्यामुळे मी मानसिक रित्या खचलेलो आहे.कधीकधी मला आपण प्राणी आहोत की काय असे उगीचच वाटू लागत आहे.म्हणून मी माझ्या साहेबांच्या मानसिक त्रासाला कंटाळून राजीनामा देत आहे.
स्वीकार करावा.
आपला नम्र
मन्सूर”


राजीनामा पूर्ण वाचून त्या पहिल्या इंजिनिअर ने तो टेबल वर ठेवला.काही सेकंद त्यांनी दीर्घ श्वास घेतला.श्वास घेऊन त्यांनी केबिन मध्ये असलेल्या इंजिनिअर लोकांकडे पाहिले आणि काही सेकंदात सर्वांचा सुरु झाला जोराचा आणि न थांबणारा हास्यस्पोट...
©

kaushik


No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...