सकाळचे ८.०० वाजले होते.महाराष्ट्रभर हुडहुडी जाणवत होती.त्यामुळे सकाळी लवकर उठायला मला थोडा उशीर झाला होता.सकाळी ८.०० ला मी उठलो.उठून सर्व विधी संपवून मी हॉलमध्ये चहाचे घुटके घेत पेपर वाचू लागलो. ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये पहिल्या पानावर निम्या राजकारणाच्या बातम्या भरलेल्या होत्या.पहिले पान वाचून झाल्यावर मी दुसरे पान वाचू लागलो.तिथे कोपऱ्यात एक लहान बातमी होती.
”नोयडा मध्ये एका मोठ्या जगप्रसिद्ध दुचाकी कंपनी च्या आवारात एका काम करणाऱ्या ३५ वर्षीय माणसाने कंपनीच्या एच.आर वर गोळीबार केला.’’
बातमी वाचून मी अक्षरशः हादरलो.कारण ज्या कंपनीमध्ये घटना घडली होती ती कंपनी दुचाकी मध्ये प्रसिद्ध होती.बातमी वाचून मी पेपर बाजूला ठेवला आणि माझा मोबाईल उघडला.मोबाईलवर सोशल मिडिया हाताळत असताना मला फेसबुक वर एक कोट दिसला.
“Don’t pick a job. Pick a Boss. Your first boss is the biggest factor in your career success. A boss who doesn’t trust you won’t give you opportunities to grow.”.
Quote वाचत काही काळ मी भूतकाळात गेलो.
२०१४ चा ‘जानेवारी’ महिना उजाडला होता.नुकतेच माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते.अर्थात हे शिक्षण पूर्ण करायला मला जीवाचे रान करावे लागले होते.पण अखेर माझे शिक्षण पूर्ण झाले होते.ह्याचा मला पुरेपूर आनंद झाला होता.शिक्षण पूर्ण झाल्यावर अखेर ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो क्षण आला होता.नोकरीसाठी माझी धडपड सुरु झाली होती.मी राहत असलेल्या शहरात पूर्ण Mechanical Engineering चा पाया होता.म्हणून मी काही दिवस घरी राहून काम करण्याचा निर्णय घेतला.नोकरीच्या शोधात असताना सहज माझे लक्ष ‘लक्ष्मी इस्टेट’ मध्ये असलेल्या एका मोठ्या ग्रुप च्या फौंड्रीकडे गेले.तिथे मी फिरत फिरत गेलो.फौंड्री चे सी.ई.ओ तिथे होते.योगायोगाने ते संबंधीत निघाल्यामुळे मला फारशी अडचण झाली नाही.मी त्यांच्याशी अर्धा तास गप्पा मारल्या.गप्पा झाल्यावर मला ‘थेट कामावर ये’ अशी सूचना मिळाली.इतक्या पटकन असे काही होईल असे मला वाटले नाही.फारसा न विचार करता मी होकार कळवला आणि फौंड्री मधून बाहेर पडलो.बाहेर आल्यावर माझा आनंद गगनात मावेना.मी लगेचच घरी आलो आणि आई-बाबांना बातमी दिली आणि ०१.०४.२०१४ पासून कामाला जायला सुरवात केली.
ऑफिस चे अंतर घरापासून २६ किलोमीटरवर होते.सकाळी ९.०० ते ५.३० अशी ऑफिसची वेळ होती.फौंड्री चा परिसर पूर्ण निसर्गरम्य होता आणि डोंगराजवळ होता.मी सकाळी ९.०० ला ऑफिसला पोहोचलो.पहिल्याच दिवशी माझा आणि गेट वर असलेल्या सुरक्षा रक्षकाचा फालतू कारणावरून वाद झाला.कंपनी चा ड्रेस कुठे आहे ह्यावरून माझा आणि सुरक्षा रक्षकाच वाद झाला.मी साधे कपडे घालून गेलो होतो.कसेबसे त्याला समजावून मी कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलो.तिथे खोली होती.तिथे माझी sack ठेवून मी निरीक्षण करू लागलो.ऑफिस चा स्टाफ येत होता.त्यांच्या प्रत्येक हालचालींचे मी बारीक निरीक्षण करू लागलो.सर्व स्टाफ आल्यावर मी ऑफिस मध्ये आलो आणि सर्वांची ओळख करून घेतली.पहिला दिवस असल्याने मी थोडा नर्वस आणि घाबरलेलो होतो.
तेवढ्यात कंपनीचे मालक आणि त्यांच्या सौभाग्यवती कंपनी मध्ये आल्या.त्यांनी मला ऑफिस मध्ये पाहिले आणि दोघे आपआपल्या केबिनमध्ये मध्ये गेले.ऑफिसमध्ये ओळख करून झाल्यावर सकाळी ९.३० मिनिटांनी मी फ्लोअर वर गेलो.तिथे सर्व फ्लोअर फिरून मी माहिती घ्यायला सुरवात केली.दोन तास मी पूर्ण माहिती घेतली.फौंड्री मध्ये काम करणे म्हणजे ‘शारीरिक आणि मानसिक’ ह्या दोन्ही गोष्टींची तयारी करावी लागणार असे मला जाणवू लागले.
पूर्ण शॉप फ्लोअर फिरून झाल्यावर दुपारचे १२.०० वाजले.तेव्हा मला फौंड्री च्या साहेबांचा ‘भेटायला ये’ असा फोनवर निरोप आला.मी पळत पळत ऑफिसमध्ये गेलो.थोडासा घाबरत मी साहेबांना भेटलो.साहेबांविषयी मी खूप ऐकून होतो.साहेब वल्ली आहेत...चिडके आहेत....तापट आहेत...विचार करत करत मी त्यांच्या केबिन मध्ये गेलो.योगायोगाने साहेबांच्या वयामध्ये आणि माझ्या वयामध्ये ५ वर्षाचे अंतर होते.मला साहेबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.मी घाबरत घाबरत उत्तरे द्यायला सुरवात केली.उत्तर दिल्यावर मला साहेबांनी बसायला सांगितले.मी बसल्यावर मला साहेबांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये आणि गोड शब्दांमध्ये मार्गदर्शन करायला सुरवात केली.मी भरल्यासारखा ऐकत बसलो.मी कल्पना केलेले साहेब हे मुळीच नव्हते.खासगी आणि व्यावसाईक आयुष्य कसे जगावे ह्याबद्दल साहेब मला सांगत होते.व्यावसाईक आयुष्यात सुरवातीला चांगला मालक आपले आयुष्य कसे बदलू शकतो ते मला जाणवत होते.मी मनोमन प्रार्थना केली की प्रत्येक तरुण मुलांना असा बॉस हवाच जो बॉस कमी मित्र असेल.
अर्ध्या तासांनी मी केबिन मधून साहेबांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.नंतर मी साहेबांच्या सौभाग्यवती ‘पूजा madam’ ह्यांना भेटायला गेलो.त्यांची केबिन लहान होती.मी केबिन मध्ये गेल्यावर काही काळ उभाच राहिलो.Madam कामात होत्या.नंतर त्यांनी मला ‘खुर्चीवर बस’ असा आदेश दिला.मी घाबरत घाबरत बसलो.मला madam खूप कडक वाटल्या.प्रथम मला त्या हेडमास्तरीन वाटू लागल्या.चेहऱ्यावर ते कडक भाव...त्यांचा ड्रेसिंग सेन्स पाहून मी थोडासा बावरलो.कदाचित मी बावरलो आहे असे त्यांच्या लक्षात आले असावे.मग त्यांनी माझ्याशी अतिशय प्रेमळ आणि गोड आवाजात गप्पा मारायला सुरवात केली.मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो.त्या कडक वाटत असल्या तरी त्या अतिशय साध्या...शांत..होत्या.त्यांचे आणि माझे वय एकच होते त्यामुळे मी त्यांच्यासमोर लगेचच मोकळा झालो. त्या मला beauty with brain वाटत होत्या कारण त्या अतिशय सुंदर होत्या आणि हुशार देखील होत्या.त्यांच्याशी आणि साहेबांशी बोलून आणि गप्पा मारून झाल्यावर माझ्यात नवीन जोश तयार झाला.कारण पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला मोठे काम दिले होते.
आणि... अश्यारितीने माझ्या व्यावसाईक आयुष्याची सुरवात झाली.पहिल्या दिवसापासून मला साहेबांचे भरपूर मार्गदर्शन मिळाले.कुणाशी कसे वागावे....कुणाशी कसे political वागावे...ह्याचे मला पुरेपूर मार्गदर्शन मिळाले.काम करत असताना माणसांची कशी पारख करावी ह्याचे देखील मला साहेबांकडून मार्गदर्शन मिळत गेले.काम करताना मला अवघड वाटणारे Mechanical Engineering साहेबांनी एका झटक्यात सोप्पे करून टाकले आणि त्यांनी माझी समूहामध्ये काम करत असताना वाटणारी मला अनामिक भीती एका क्षणात घालवली.त्यामुळे माझा आत्मविश्वास आणि उत्साह वाढत गेला.
साहेबांबरोबर काम करत असताना अंगात वेगळाच जोश असायचा.आपल्या सहकाऱ्यांवर डोळे झाकून विश्वास टाकणारा आणि त्यांच्याशी थेट बोलणारा मालक मी जवळून पाहत होतो.मालकाने विश्वास टाकल्यामुळे काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव होत होती.फौंड्री मध्ये मला पूर्णपणे empowerment मिळाली होती.मी काम करत चुका पण करत होतो.त्याचबरोबर शिकत पण गेलो.साहेब काम करताना बऱ्याचदा चीडचीड करत असत पण madam एकदाही चिडत नसत.अतिशय गोड शब्दात त्या समजावून सांगत असत.त्यांच्याकडे पाहून मला मनोमन आपली भावी साथीदार कशी असावी ह्याचे मनोमन चित्रण होत असे.अशीच त्यांच्यासारखी साधी....सरळ...Decent…गोरीगोरीपान...Attitudeनसणारी...समजावून घेणारी असावी असे मला कधीकधी वाटत होते.
काही महिन्यानंतर साहेब आणि madam आणि माझ्यात सुंदर असे मैत्रीचे नाते निर्माण झाले.ते दोघे माझे बॉस कमी मित्र आणि मैत्रीण झाले.म्हणून मी दोघांना माझ्या आयुष्यातले सारे काही सांगत असत.बघता बघता मी फौंड्री मध्ये दीड वर्ष पूर्ण केले.
मी विचार करत बसलो.बातमी वाचून एक गोष्ट मला पटली होती.आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणारा मालक असला की सहकाऱ्यांचा विश्वास वाढतो आणि त्यांना आपलेपणाची जाणीव होती.असा बॉस कुणाला नको???
विचार करत मी आवरलो.सकाळचे १०.३० वाजले होते.लगेचच मी गाडीची किल्ली घेतली आणि माझ्या त्या साहेबांना भेटायला घराबाहेर पडलो आणि सुसाट वेगाने लक्ष्मी इस्टेटकडे सुटलो.
©
Kaushik
Wednesday, 30 January 2019
पहिली नोकरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे म...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
I had just arrived in Pune at 4.00 A.M.It's always good to be back in your favourite city.I had my paper Legal Aspects of Supply Cha...
No comments:
Post a Comment