Thursday 1 November 2018

बहिणी...

सायंकाळचे ४.०० वाजलेले होते.इचलकरंजी मध्ये रस्त्यावर बरीच वर्दळ सुरु होती.बऱ्याच सरकारी बसेस रोड वरून जात होत्या.बुलेट आणि यामाहा वरून २५-२७ वर्षाचे तरुण ट्रीपल सीट वरून बेफिकीर होऊन गाडी चालवत जात होते.अधूनमधून ट्राफिक पोलिसांच्या शिट्टीचा आवाज येत होता.बऱ्याच गृहिणी गाडी वरून रोड वरून जात होत्या.
दुपारी ४.१५ ला एक मोठी शाळेची बस आली.ती बस रस्त्याच्या कडेला असलेल्या कॉलनी जवळ थांबली.त्या बस चे दार उघडले गेले आणि त्यातून ४ मुली आणि आणखीन काही मुली खाली उतरल्या.चारही मुली आणि इतर मुली १० ते ११ वर्षाच्या होत्या.त्या त्यांच्या कॉलनीत असलेल्या घरी चालत निघाल्या होत्या.त्यांचे घर जेमतेम ५० मीटर अंतरावर होते.कॉलनीत थोडीफार वर्दळ जाणवत होती.आजूबाजूला कॉलनीमध्ये बऱ्याच टोलेजंग इमारती आणि गर्भश्रीमंतीने सजलेले असे बंगले होते.त्या ४ मुली एकमेकींशी गप्पा मारत निघाल्या होत्या.बहुदा शाळेतल्या गप्पा मारत असाव्यात असे त्यांच्या हावभावावरून दिसत होते.चारही मुली एकमेकींच्या चुलत बहिणी होत्या.पहिल्या मुलीचे नाव अनन्या;दुसरीचे स्वप्ना;तिसरीचे संजना;चौथीचे जान्हवी.चौघींच्या मम्मा शेजारी शेजारी उभ्या राहून त्यांची वाट पाहत लांब थांबल्या होत्या.अनन्या आणि स्वप्ना एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या आणि संजन,जान्हवी देखील एकमेकींच्या सख्या बहिणी होत्या.त्याचबरोबर अनन्या.स्वप्ना ह्या संजना आणि जान्हवी च्या मामेबहिणी होत्या आणि संजना,जान्हवी ह्या अनन्या आणि स्वप्ना च्या आत्तेबहिणी होत्या.
काही वेळानंतर अनन्या,स्वप्ना,संजना आणि जान्हवी एकमेकींशी भांडायला लागल्या.अनन्या ने संजना ची चेष्टा-मस्करी केली.त्याच्या बदल्यात जान्हवी ही अनन्या शी भांडू लागली आणि त्याचे रुपांतर हळूहळू जोरदार भांडणात होऊ लागले.
संजना,’’ए ढमे!तू का माझे केस ओढत होतीस?.’’
संजना अनन्या कडे पाहत चिडली.
अनन्या,’’तू मला काल का चिडवत होतीस?.’’
स्वप्ना,’’संजे...अनन्या शी भांडायचे नाही.”
लहान बहिण म्हणून स्वप्ना ही संजना शी भांडू लागली.
जान्हवी,’’ए खुळे! कशाला भांडत आहात...चला ना घरी.”
अनन्या,’’कोण खुळी?शाळेत सारखे संजना मला ड्रेस वरून चिडवत असती.सारखे माझे पेन्सिल आणि रब्बर मागून घेती.तू खुळी...संजना पण खुळी...”
जान्हवी ने अनन्या ला रस्त्यावर जोरदार ढकलून दिले.चार बहिणी आपापसात शुल्लक कारणावरून भांडू लागल्या. चौघींचा आवाज वाढू लागला.त्यांचे भांडण रस्त्यावरून जाणारे लोकं पाहू लागले.त्यातले काही जेष्ठ व्यक्ती चौघींना रागवू लागल्या.चौघींचे भांडण पाहून त्यांच्या मम्मा त्यांच्यापर्येंत धापधाप पळत गेल्या.
अनन्या,’’मम्मा,जान्हवी मला खुळी म्हणाली.”
संजना,’’मम्मा,अनन्या ने माझे केस ओढले.”
स्वप्ना,’’मम्मा,संजना माझ्या दीदी शी भांडत होती.”
चौघींच्या मम्मा त्यांच्या कन्यांना धरून आपआपल्या घरी घेऊन गेल्या आणि घरी जात असताना एकमेकींकडे डोळे वटारून पाहत मनातल्या मनात बोलू लागल्या.योगायोगाने दोघी शेजारी-शेजारी होत्या.
अनन्या आणि स्वप्ना ची आई जान्हवी च्या आईकडे पाहत,’’काय ही संजना आणि जान्हवी....असे रस्त्यावर कोण भांडत असते का....काय शिकवलेच नाही हिने हिच्या पोरींना.नुसते लाडावून ठेवले आहे.तिच्यापेक्षा माझ्या मुली खूप सिन्सिअर आहेत.मी बोलणारच नाही हिच्याशी.”
संजना आणि जान्हवी ची आई अनन्या च्या आई कडे पाहत,’’माझ्या मुली खूप साध्या आणि सरळ आहेत.त्या कशाला भांडत असणार?.ह्या अनन्या ने नक्कीच संजना ची चेष्टा केली असणार.थांब आता मी पण बोलणारच नाही हिच्याशी.”
चौघी एकमेकींच्या घरी गेल्या आणि त्यांच्या घराचे दार फा$ड असा आवाज करत बंद झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता...
अनन्या आणि स्वप्ना शाळेसाठी आवरून तयार होत्या.त्यांची मम्मा त्यांची वेणी घालत होती.
शेजारी असलेल्या जान्हवी आणि संजना आवरून तयार होत्या.त्यांची मम्मा त्यांची bag भरत होती.
अनन्या आणि स्वप्ना आवरून bag घेऊन घराबाहेर आल्या.तेवढ्यात अनन्या आणि स्वप्ना च्या मम्मा ने त्यांना थांबायला सांगितले आणि ती घरात काहीतरी आणायला गेली.
शेजारी संजना आणि जान्हवी देखील तयार होऊन बाहेर आल्या.त्यांची मम्मा देखील “थांबा मी बस पर्येंत सोडायला येते” असे म्हणत परत घरात गेली.
दोन मिनिटांनी दोन्ही मम्मा घराबाहेर आल्या.सकाळचे ७.१२ वाजले होते.दोघींनी बाहेर नजर फिरवली.दोघींना आपआपल्या मुली दिसल्या नाहीत.दोघींनी शेजारी-शेजारी डोळे वटारून पाहिले.त्यांना स्वतःची कन्या कुठेच दिसत नव्हत्या.दोघीही पळतपळत घराबाहेर पडल्या आणि कॉलनीत असलेल्या बस stop जवळ जाऊ लागल्या.तिथे गेल्यावर त्यांना दृश्य दिसले.
काल भांडत असणार्या चौघी बहिणी आज सकाळी एकमेकींचा हात हातात धरून बस stop च्या दिशेने जात होत्या.त्यांच्या मम्मा पळतपळत बस stop पर्येंत आल्या.तेवढ्यात बस आली आणि चौघी बहिणी एकमेकींना हात देत बस मध्ये चढल्या आणि “बाय मम्मा” असे म्हणत त्या बस मध्ये बसल्या आणि त्यांच्या मम्मा ते दृश्य आश्चर्यचकित होऊन एकमेकींकडे बघत पाहू लागल्या.
©
#Kaushik Shrotri
#Ichalkaranji#Feelfreetoshare#


No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...