मध्यरात्री त्याला अचानक जाग आली.ती कसल्यातरी विचित्र
आवाजाने.अंधारातच त्याने खोलीभर नजर टाकली.आणि एक गोष्ट लक्षात येऊन,त्याच्या
छातीत धस्स झाले.!आवाज झाला होता,तो दरवाज्याच्या कडीचा.त्याने पक्की लावलेली कडी
आपोआप निघाली होती.
-आणि दार सावकाश उघडू लागले होते...
जागच्या जागी खिळल्यासारखा तो ते दृश्य पाहत राहिला.दारात एक म्हातारा
उभा होता.
बोडका.टक्कल पडलेला,चेहरा सुरकुत्यांनी मढलेला.गालावरची हाडे वर
आलेली,आणि अस्थिपंजर शरीर.डोळे मात्र निखाऱ्यासारखे चमकत होते.त्याची नजर भयानक
होती.जगन्नाथने किंकाळी मारली,पण ती ओठांमधून बाहेर फुटलीच नाही.त्या बोडक्या
म्हाताऱ्याने त्याला आपल्याबरोबर चालण्याची खुण केली.
जगन्नाथ चालू लागला.खरेतर त्याला जायचे नव्हते पण स्वतःच्या शक्तींवर
त्याचा ताबा राहिला नाही.सर्व शक्ती एकटवून तिथून पळून जावे,असे वाटत होते,पण
मनाचे सांगणे पाय ऐकत नव्हते.कुठे निघाले होते ते दोघे?
अगदी नेहमीच्या वास्तवातून रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका वेगळ्या
अश्या प्रदेशात घेऊन जातात.गूढ,भयप्रद,अनामिक अश्या जगात.त्याचे बोट धरून वाचक
पाने उलटत राहतो...
दर्ज्यांवर दर्जा.
©
Kaushik
No comments:
Post a Comment