Friday, 25 November 2016

सिने परिक्षण -डिअर ज़िन्दगी

इंग्लिश विंग्लिश सिनेमा आठवतोय ???? काही वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता.गौरी शिंदे ह्यांच्या अफलातून दिग्दर्शनामुळे व् श्रीदेवी ह्यांच्या अभिनयामुळे सिनेमा प्रचंड गाजला होता. सध्या गौरी शिंदे ह्यांचा डिअर जिंदगी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे . बऱ्याच वर्षांनी गौरी शिंदे ह्यांचा सिनेमा येत असल्यामुळं त्याकडून अपेक्षा निश्चित होत्या व हा सिनेमा आपल्या अपेक्षा निश्चित पूर्ण करतो.  सिनेमा च्या कथेची सुरवात होती कायरा (आलिया भट ) पासून जिच्या आयुष्याची उमेदीची सुरवात हि भरकटत जाते . मुळात एक सुशिक्षित व उत्साही असलेली कायरा ला आत्मविश्वास हा नसल्यामुळेतिचे ऐन उमेदीचे आयुष्य हे नियोजन न केल्यामुळे भरकटत जाते . सर्व गोष्टींमध्ये नकार हा बऱ्याच अंशी पचवता न आल्यामुळे व मॉडर्न विचारसरणी असल्यामुळे कायरा चा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक होऊन जातो .निराशा व चिडचिडेपणा नि ग्रासल्यानंतर व आयुष्य एका टोकाला गेल्यावर  तिला जहांगीर खान (शाहरुख खान ) हा मेंटॉर भेटतो. अत्यंत व्यावहारिक असलेला व प्रत्येक प्रश्नांची सहज उत्तर शोधणाऱ्या जहांगीर खान मुळे कायरा च्या  आयुष्याला हि पूर्ण कलाटणी मिळते . सिनेमा हा पूर्णपणे आजची तरुणमुले व मुली व त्यांची विचारसरणी ह्यांचे अतिशय उत्तमरीत्या मांडणी करतो . सिनेमा ची कथा हि अतिशय सरळ ,साधी व उत्कृष्ट रित्या मांडली आहे ज्यात कुठेही फिल्मी थिल्लरपणा व मसाला नाही . बऱ्याच वर्षांनी शाहरुख खान मधला अभिनेता उठून दिसला आहे . एका मानसोपचारतज्ञाच्या भूमिकेला त्याने न्याय दिला आहे . सध्याच्या पिढीची आलिया भट्ट चा अभिनय हा सर्वोत्कृष्ट आहे . एक फॉरवर्ड,अल्लड,उत्साही व काही अंशी चिंतेने ग्रासलेल्या मुली चा अभिनय हा तिने अतिशय उत्कृष्टपणे केला आहे . सिनेमाच्या शेवटी तिचा मेंटॉर जहांगीर खान मुळे तिच्या आयुष्यात झालेला बदल, त्याला निरोप देताना तिचा अभिनय हा नक्कीच पाहण्याजोगा आहे . एका मुलीला कुटुंबाने सहकार्य केल्यावर ती काय करू शकते ह्यावर सिनेमा भाष्य करतो . संगीत हा सिनेमा चा आत्मा आहे . सर्व गाणी व पाश्वसंगीत अतिशय उत्कृष्ट आहेत व  पाश्वसंगीत हे  सिनेमाच्या आशयाशी बरोबर जुळून आले आहे . सिनेमा मध्ये कुणाल कपूर ,आदित्य रॉय कपूर व  अली जफर ह्यांचा अभिनय फक्त चेहरा दाखवण्यापुरताच आहे . आयुष्य हे खूप साधे व सरळ आहे ते सरळपणे मनसोक्त जगा व जगू द्या हा संदेश देण्याऱ्या एक साधा सरळ व आयुष्यावर असलेला सिनेमा नक्की पाहावा . 
३ मिरच्या 
परीक्षण - कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...