मागच्या आठवड्यात ११ नोव्हेंबर ला रॉक ऑन २ सिनेमा आला होता आता फोर्स २ आला आहे . एखाद्या सिनेमा चा २रा भाग बनवताना बऱ्याचदा कथेवर जास्त लक्ष दिले जात नाही . सध्या प्रदर्शित झालेला फोर्स २ च्या बाबतीत असेच काही अंश पाहायला मिळते .२०११ ला आलेला फोर्स चा हा २रा भाग . सिनेमा ची सुरवात होती ACP यशवर्धन (जॉन अब्राहम ) च्या पिळदार,८ बिस्कीट असलेल्या दणकट ,४ चाकी वाहन व बुलेट दोन्ही हातानी कवेत घेणाऱ्या शरीराने जे पाहताच आपल्यात शरीर तंदुरुस्ती ची जागरूकता परत निर्माण होते व जिम ला न जाणारे मुले परत जिम ला जायचा विचार करायला लागतात . भारतीय गुप्तहेर संघटनेचा एक गुप्तहेर असलेला यशवर्धन ला त्याच्या साथिदारांच्या अचानक बेपत्ता होणे हि बातमी समजते . त्याच्या शोधात तो व के के (सोनाक्षी सिन्हा )परदेशात बुडापेस्ट ला जातात . तिथे त्या दोघांना बेपत्ता होण्यामागचं कारण व त्याचा सूत्रधार कळतो . त्यानंतर सुरु होते जॉन अब्राहम व त्या सूत्रधाराच्या गोळ्यांचा व बुक्यांचा आवाज व सिनेमा ची समाप्ती होती .
जॉन अब्राहम चा अभिनय नक्कीच पाहायच्या लायक आहे . एक पिळदार शरीरयष्टीचा ,एक थंड डोक्याचा पोलीस अधिकारी व देशविरोधी शत्रुंना शोधून काढायची त्याची धडपड नक्की पाहण्याजोगी आहे . सोनाक्षी सिन्हा चा अभिनय पण छान आहे . पण बोलके डोळे असल्याने तिचा अभिनय अधिक डोळ्यांमधून दिसून येतो . सिनेमा चा खलनायक असलेला ताहीर नक्कीच आपल्याला खिळवून ठेवतो . सिनेमा मधून गुप्तहेर व त्यांचे देशासाठी केलेले प्रामाणिक योगदान ह्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यात आला आहे . ह्या सिनेमा ची कथा हि अतिशय उत्कृष्ट आहे पण डायरेक्टर ह्यांनी ती मध्यांतरानंतर ती पळवली . सिनेमा च्या शेवटी केलेले शूटिंग पाहताना आपण COUNTERSTRIKE पाहतो काय असा प्रश्न पडतो ???सिनेमा मध्ये असलेला जेनेलिया देशमुख चा वावर हा सुखावतो .
जॉन अब्राहम चे फॅन ,त्याची शरीर तंदुरुस्ती ,जेनेलिया चे फॅन व गुप्तहेर ची आवड ज्यांना आहे त्यांनी हा सिनेमा नक्की पाहावा .
२. ५ स्टार्स
लेखन - कौशिक श्रोत्री
©
९९२१४५५४५३
No comments:
Post a Comment