2008 ला राँक संगीत या विषयावर राँक आँन सिनेमा हा आला होता.अप्रतिम संगीत व अभिनयामुळे हा सिनेमा अविस्मरणीय ठरला होता. फरहान अख्तर व पूरब कोहली ह्यांचा दमदार अभिनय व् शंकर एहसान लॉय ह्यांचे संगीतमुळे हा सिनेमा हा एक लाजवाब कलाकृति ठरली होती त्याचाच पुढचा भाग म्हणजे सध्या आलेला रॉक ऑन २. पहिला भाग हा प्रचंड लोकप्रिय ठरल्यामुळे ह्या सिनेमा कडून खुप अपेक्षा होत्या. पण रॉक ऑन भाग २ हा आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात काही अंश यशस्वी ठरतो.मैजिक बैंड चे सदस्य आदित्य (फरहान ) जो (अर्जुन रामपाल ) के डी (पूरब कोहली ) ह्यांच्या बदलेल्या आयुष्याने सिनेमाचे सुरवात होती मैजिक ची कीर्ति ही जोरदार वाढत असते. मैजिक च्या संगीताचे चाहते हे वाढत असतात. यशाच्या एक मोठ्या शिखरावर असताना ह्या मैजिक बैंड कडून एक नकळत चूक होती व् त्यांची फाटफुट होती. ह्या फाटाफूट ची जबाबदारी मनाला लागल्यामुळे आदित्य (फरहान अख्तर ) हां शिलॉन्ग ला राहायला जातो.संगीत हे ह्या सिनेमा ची उजवी बाजु आहे सुरवातीपासूनचे पाश्वसंगीत हे आपल्या कानात रहते व आपल्याला थेटर मध्ये एका थेट रॉक बँड च्या कॉन्सर्ट चा अनुभव देते . कालांतराने शिलाँग मध्ये आलेल्या एका नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मॅजिक बँड परत एकत्र येतो . फरहान अख्तर च्या अभिनय व गायक ह्या दोन्ही भूमिकेला तोड नाही .अर्जुन रामपाल,प्राची देसाई ह्यांचा अभिनय फक्त चेहरा दाखवण्यापुरताच आहे . सिनेमा ची सर्वात उजवी बाजू म्हणजे श्रद्धा कपूर चा अभिनय व गायन ह्या दोन गोष्टींमध्ये तिने बाजी मारली आहे .
मध्यंतरानंतर कथा जरा वेगवान होते पण संगीत व श्रद्धा कपूर हा वेग सुसह्य करतात . एकंदरीत सिनेमंची कथा आणखीन खुलली जाऊ शकली असती . सिनेमाच्या अखेरीस दाखवलेली थेट कॉन्सर्ट व उषा उत्तप ह्यांच्या गाण्याच्या सुरांची , संगीताची अमर्याद मेजवानी आहे . सर्व गाणी तुम्हाला डोलायला लावतील व तुम्हाला तरतरीत व ऊर्जा देतील .
श्रद्धा कपूर चा अभिनय व गायन , फरहान अख्तर चा अष्टपैलू अभिनय व रॉक संगीतप्रेमी नि हा सिनेमा नक्की पाहावा . संगीतप्रेमींना हा सिनेमा हि एक मेजवानी ठरणार आहे .. नक्की पाहावा .
२. ५ स्टार्स
लेखन - कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
No comments:
Post a Comment