मी एक पक्का कलाप्रेमी मुलगा आहे .आठवड्यात मी एखादा सिनेमा हा नक्की पाहतो . इंजिनीरिंग हे माझं पहिल प्रेम व कला हे २ रे . नुकताच मी सुप्रसिद्ध सिनेकलावंत सिल्वेस्टर स्टॉलीने ह्यांचा रॉकी सिनेमा, दिल चाहता हें ,अग्नीपथ व नुकताच आलेला धोनी हा सिनेमा पहिला . सिनेमे हे अतिशय उत्कृष्ट होते . त्यातल्या त्यात मला भावलेला सिनेमा म्हणजे रॉकी . धोनी व दिल चाहता है अग्नीपथ हे सिनेमे पण उत्कृष्ट होते . हे सध्या आलेले सिनेमे मी थेटर ला जाऊन पहिले . थेटर मध्ये जाऊन सिनेमा पाहताना काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या . एकाद्या सिनेमा चा आशय हा आपल्या रोजच्या आयुष्याशी निगडित असेल तर आपण तो खूप आतुरतेने पाहतो . एखादी व्यक्ती हि शून्यातून सुरवात करून पुढे आयुष्यात धक्के खात यश मिळवत जाते हे जेव्हा एका सिनेमा मध्ये येते तेव्हा आपण तो सिनेमा मनापासून पाहतो . अग्नीपथ मधला टिचून भिडणारा ह्रितिक रोशन असो , रॉकी मधला एक सामान्य मुलगा जो काही काळाने प्रचंड चिकाटीने व ध्येयाने पछाडून जाऊन बॉक्सिंग चा सामना जिंकतो . सिनेमा पाहताना आपल्या अंगात येणारे रोमांच,अग्नीपथ मध्ये एक अबोल असा तरुण जो स्वतःचे ध्येय हे शेवटपरेंत न सांगता गाठणारा ह्रितिक ला पाहून आपल्या अंगात येणारे बळ ,रॉकी मधल्या शरीर तंदुरुस्ती ला प्रथम महत्व देऊन त्यात झोकून देणारा सिल्वेस्टर स्टॅलोनन ला पाहून आपल्यात येणारे शरीर तंदुरुस्ती विषयी येणारे महत्व, धोनी सिनेमा मध्ये थंड डोक्याने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारा सुशांत सिंग ला पाहून आपला नकळत आपल्या स्वप्नांवर विश्वास अधिक जास्त बसतो .ह्या सिनेमा नि आपले पूर्ण जीवन व्यापून टाकले आहे . सध्या जीवनशैली हि चक्रीवादळाच्या हि गतीपेक्षा सुसाट झाली आहे . सर्वत्र स्पर्धा ,पैसा ,मानसन्मान ,नाव ,कीर्ती वाढत जात आहे . रोजचा तणाव ताण उद्दिष्ट हे वाढत जात आहेत . ह्या सर्व गीष्टींमध्ये सामान्य माणूस गुरफटला गेला आहे . रोज घरगुती तणाव व ऑफिस मधले तणाव ह्यांनी आपल्याला वेढले आहे. अश्या परिस्तिथीमध्ये सिनेमा हाच आधारस्तंभ आहे . आपल्याला प्रेरित करेल , ताण तणाव नाहीसा करेल ,आपल्याला ऊर्जा देईल , आपल्याला लढाऊ बनवणारा ,आपल्याला संगीतप्रेमी बनवेल ,आपल्याला चिकाटी देणारा ,आपल्याला प्रेम कसे व कसे करू नये हे शिकवणारा ,आपले जीवनमान बदलणारा ,एक सिनेमा प्रत्येक कलाप्रेमी नि नक्की पाहावा .
सर्व सिने प्रेमींसाठी
लेखन - कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
©
No comments:
Post a Comment