नुकताच मी पुण्यात भल्यापहाटे ४. ०० ला आलो होतो ,पुणे हे माझं अत्यंत जवळचे व आवडीचे शहर आहे . लवकरच माझ्या पुण्यनगरीत बस्तान बसवण्याच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल . माझा करियर च्या शेवटचा पेपर लीगल आस्पेक्टस ऑफ सप्लाय चैन मॅनॅजमेण्ट हा पेपर सिंबायोसिस ला द्यायला आलो होतो . एव्हाना पुण्यात गुलाबी हुडहुडी थंडी ने पाय पसरायला सुरु केले होते . मी सकाळी ६ ला माझ्या रूम ला पोचलो . पेपर हा सायंकाळी ५ ला असल्यामुळे मला अभ्यास करायला भरपूर वेळ मिळाला होता . सकाळी ८ ला आवरून मी तयार झालो .सिंबायोसिस ला सकाळी ९. ३० ला पोचायचे होते. पुण्यात प्रवास करायला माझ्या जवळ २ चाकी वाहन नव्हते . मग फारसा विचार न करता मी पुणे महानगरपालिका च्या सिटी बस ने जायचे ठरवले . जाताना मी काटा किर्रर्र ह्या सुप्रसिद्ध मिसळ च्या ठिकाणी उतरलो . एव्हाना पुण्याच्या हुडहुडी गुलाबी थंडीत मिसळ व चहा हे अतूट नातं . मिसळीचा आस्वाद घेऊन मी सिंबायोसिस कडे निघालो . अश्या गुलाबी थंडी ने माझा उत्साह आणखी वाढवला . मी तडक कॉलेज गाठले . कॉलेज ला आल्यावर माझा मोर्चा लायब्ररी कडे वळवला . मी माझ्या बॅग मधले पुस्तक काढले व अभ्यासाला लागलो .
मी आजूबाजूला नजर टाकली . १० वाजले होते व लायब्ररी पण अतिशय निरव शांततेत होती . मी वाचायला बसलो. लीगल आस्पेक्टस हा अत्यंत क्लिष्ट असा विषय होता जो मला काही करून करो या मारो च्या अवस्तेत सोडवायचाच होता . मी वाचणार एवढ्यात ५ मुलींचा ग्रुप आला व अचानक शांत असलेली लायब्ररी आवाजांनी गुंजून गेली . माझी एक नजर त्या मुलींवर पडली . पण नंतर मी स्वतःला बजावला की आपण इथे का आलो आहोत ?फक्त पेपर द्यायला . नंतर मी अभ्यासात गढून गेलो .
तब्बल २ तासांनी मी माझे पुस्तक बाजूला ठेवलं व चाहोबाजूला नजर टाकली . एव्हाना १२.०० वाजले होते . मुलींचा ग्रुप नंतर लायब्ररी च्या बाहेर पडला होता . एवढ्यात एक मुलगी लायब्ररी मध्ये आली व माझ्या डेस्क च्या शेजारी येऊन बसली . माझे तिच्याकडे लक्ष गेले . ३ पुस्तके व सॅक व डायरी हे सामान घेऊन ती माझ्या शेजारी अभ्यासाला बसली . तिच्याकडे देखील तीच पुस्तके होती जी माझ्याकडे होती . दिसायला छान देखणी सुंदर गोरीघारी, तिने लावलेला काळा चस्मा मुळे ती अधिकच खुलून दिसत होती . शेजारी एक सुंदर व गोरीपान मुलगी अभ्यासाला बसल्यावर एका मुलाची अवस्था काय होते हे एका मुलालाच माहित ????ती माझा विषय देत आहे हे पाहून मला तिच्याशि निदान चार शब्द बोलायची इच्छा झाली . पण मी हा शाळेपासून शांत शांत लाजरा मुलींशी न बोलणारा व एकटा एकटा राहणारा होतो . मी इथे फक्त माझा विषयात पास व्हायला आलो आहे हे मनाला बजावून मी परत वाचायला लागलो .
१२. ३० ला
ती ,'' हाय कोणता पेपर आहे तुझा ''.
मी पूर्ण आश्चर्यचकित झालो .
मी ,'' हाय माझा लीगल आस्पेक्टस हा पेपर आहे ".
ती ,''मग तयारी कशी सुरु आहे, मी खूप तयारी करत आहे तरीपण मला अजूनही अभ्यास हा अपूर्णच वाटत आहे ''.
तिला माझ्याशी बोलायचे होते . कुठल्याही मुलाची अवस्था अवघड होते जेव्हा लायब्ररी मध्ये एक सुंदर गोरीपान मुलगी तुमच्या शेजारी येते आणि बोलते व तुम्हीएक परीक्षेचे पुस्तक वाचत असता .
मी ,''माझी पण तशीच अवस्था आहे . मी देखील तयारी करत आहे गेली ६ दिवस माझं काम सांभाळत पण अजूनही अपूर्णच वाटत आहे .''
ती अखंड बोलत होती . सुदैवानं ती अतिशय हळुवार आवाजात बोलत असल्यामुळे तिचा आवाज ग्रंथपाल पर्येंत पोचत नव्हता . तिला पाहिल्यावर एव्हाना सिने अभिनेत्री कतरीना व दीपिका ह्यांचीच आठवण यावी ,दिसायला गोरीपान ,मोहक व बोलके डोळे ,सुंदर व मोहून टाकणारे हास्य ,गालावर खळी व अतिशय मधुर व गोड आवाज अश्या सर्व परिपूर्ण गुणसंपन्न एका पुण्याच्या मुलीशी बोलताना मला खूपच अप्रूप वाटत होत.
ती,''हाय मी प्रियांका मी टाटा कन्सल्टन्सी ला मेकॅनिकल इंजिनेर म्हणून जॉईन झाली आहे ''.
मी ,''हाय मी कौशिक मेकॅनिकल इंजिनेर मी इचलकरंजी ला राहतो . ''
ती ,'' वाह तू पण मेकॅनिकल इंजिनीयर आहेस ".
हस्तांदोलन करून तिच्या पुढच्या गप्पा सुरु झाल्या .
"कोल्हापूर उसाचा जिल्हा बरोबर ''.
मी ,'' हो तुला माहिती आहे? ''.
ती,'' हो माझे येणे असते कोल्हापूर इचलकरंजी ला ''.
मी ,''खरंच वाह ''.
ती ,'' तू कुठे काम करतो ?
एका बाजूला ती अखंड बोलत होती व मला अभ्यासात गुंग व्हायचे होते. तिच्या प्रश्नांनी मी शेवटी वैतागून गेलो .
मी,'' मी फाय ग्रुप मध्ये काम करतो सध्या थोडा वाचूया आपला पेपर आहे सायंकाळी ''.
ती ,'' हो हो रे चल मी पण वाचते.''
ती एका बाजूला वाचत होती व मी तिच्या शेजारी वाचत होतो . मी दुपारी एक वाजेपरेंत वाचत बसलो . एक नंतर मी पुस्तक बाजूला ठेवले व कॅन्टीन ला जेवायला गेलो .
दुपारी १. ३० ला मी परत डेस्क ला आलो तेव्हा मला ती अभ्यास करताना दिसली . मला पाहताच तिने मोहक हास्य दिले .
मी,'' दुपारचे जेवण केले नाही का ?.
ती ,'' आत्ताच मी पण करून आले .
मी ,'' कुठे ? मी पण कॅन्टीन ला होतो .
ती ,'' माझे घर कॉलेज च्या जवळ आहे .
ती परत अभ्यासात गुंतली व मी पण माझ्या अभ्यासात गुंतलो .
सायंकाळी ४. ५०
मी,'' झाली का तयारी ''.
ती ,''हो जवळपास''.
मी ,'' ऑल बेस्ट ''.
ती ,'' थँक्स तुला पण फिंगर्स क्रोस्ज्ड ''.
आम्ही दोघे अत्याधुनिक अश्या एक्साम हॉल मध्ये गेलो जिथे माझी परीक्षा होती .
सायंकाळी ६. ००
ती ,'' हाय कौशिक कसा होता पेपर ,''
मी,''मस्त पास होईन पाहू काय होते तुला कसा गेला?,''
ती,'' मला डिस्टींकशन मिळेल अशी आशा ठेवते सध्या ,''
मी ,'' अभिनंदन ''.
मुलींना जिंकायचे असेल तर त्यांना कॉम्प्लिमेंट्स कायम द्याव्यात .
ती ,'' थँक्स ''
आम्ही रेसेपशन एरिया जवळ बसलो .
ती ,'' मग कसे चालू आहे तुझे नोकरी व अनुभव इचलकरंजी ला ,''
मी ,'' चालू आहे उद्दिष्ट,तणाव ,त्रास,ग्राहक समाधान हे चक्र थांबत नाही . खासगी क्षेत्रात आयुष्याची मजा उरली नाही .
ती ,''अरे असे काही नसते . मी टाटा ग्रुप मध्ये आहे तो देखील खासगी आहे तरी पण मी काम आणि आयुष्य हे खूप मनसोक्त एन्जॉय करीत आहे .
मी ,'' अतिशय छान पण तू जिथे काम करती तिथे एक ब्रँड काम करतो जो सर्व लोकांचे देखभाल करतो .
ती,'' असे काही नाही . आपल्या कामाची सुरवात व त्याचे नियोजन हे आपल्याला आलेच पाहिजे. आपले काम व आपले आयुष्य हे २ वेगळे घटक आहेत ते कसे संभाळावेत हे मी टाटा मधून शिकते आहे . तुम्ही जिथे काम करता त्या कंपनी चा तुम्हाला अभिमान वाटलंच पाहिजे कारण आपण दिवसातले १२ तास तिथे असतो . ती कंपनी आपले २ रे घर समजावे. मी ऐकलंय कोल्हापूर व इचलकरंजी हे फौंड्री उद्योगात आघाडीवर आहेत बरोबर ??
मी,'' हो अगदी तिथे फौंड्री ला खूपच वाव आहे''.
ती ,'' मग तर तुला फौंड्री मध्ये काम करायला तिथे खूप वाव आहे. मी २ इयर ला METALLERGY ला टॉप होते . तू तिथेच थांबणार काय मग का बाहेर प्रयत्न करणार ???''
आता मी खूप आश्चर्यचकित झालो . एक अनोळखी पुण्याची मुलगी सकाळपासून माझ्याबरोबर असणारी मला म करिअर चे चॉईस ला मदत करीत होती . ती अतिशय हुशार व समंजस होती .
मी ,'' काही वर्ष मी नक्की थांबीन कोल्हापुरात पण मला लेखक बनायचे आहे ''.
मी असे म्हंटल्यावर अशी अपेक्षा केली की ती जोरात हसेल पण झाले उलटेच .
ती ना हसली ना तिला आश्चर्य वाटले .
ती,'' अरे वाह लेखक पण कशातला ?
मी ,'' एक लेखक जो प्रेमकथा, प्रवासवर्णन, प्रेरित करण्याऱ्या कथा, रहस्यमयी कथा लिहिणारा असेल . माझी कथा हीच माझी बलस्थान असेल भले त्यात एकदा हिरो व हेरॉईन नसले तरी चालतील ''.
ती,'' वाह मस्तच अतिशय छान ''.
आम्ही कॉलेज च्या बाहेर आलो .
ती ,'' कौशिक तुझी कल्पना अतिशय सुंदर आहे . मी खूप कमी मुले पाहिलीत जे त्यांच्या हृदयाला पटेल त्याच क्षेत्रात काम करतात . नक्कीच तू पुढे जाशील तुझ्या पहिल्या आर्टिकल व पुस्तकाची मी वाट पाहीन इट वाझ ग्रेट टाईम विथ यू सीन्स मॉर्निंग, चाल बाय''.
तिने तिची ऍक्टिवा गाडी काढली व ति निघाली . मी तिच्याकडे पाहत राहिलो .मला तिचा स्वभाव व सहवास खूप आवडला होता . ती अतिशय हुशार समंजस मुलगी होती . मी पुण्यात खूप मुलींना नोटीस केले आहे . नखरे करण्यात बऱ्याच मुली आघाडीवर असलेल्या मी पाहिल्यात . पण ती अजिबात तशी नव्हती . मला तिच्याशी मैत्री करून वाढवायची होती . जाताना मी तिचा फोन न पण विचारला नाही . हे आहे आपले आयुष्य जिथे कधी व कुठे कशी माणसे भेटत राहतील व आपल्याला पटणाऱ्या गोष्टी सांगतील सांगता येत नाही .
परत प्रियांका ची भेट होईल सिंबायोसिस मध्ये हि आशा मनात ठेऊन मी बाहेर पडलो व रूम कडे निघालो .
तर मित्रानो प्रतिक्रिया नक्की कळवा .
©
लेखक -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३