हा वीकएंड माझा २ दिवसांचा असल्यामुळे मी जाम खुश होतो . मी सकाळी अगदी आरामात उठलो . रोजच्या सारखी आज मला गडबड नव्हती . सकाळच्या वातावरणाचा मी मनसोक्त आनंद घेत होतो सुट्टी चा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आठवड्यात ५ दिवस जोमाने काम करतो . सकाळचा कडक चहा व इचलकरंजी च्या मधुरा हॉटेल ची मिसळ हा योग क्वचितच येतो .घरी आल्यावर मी संगीत चालू केले . मी पक्का कडवट कलाप्रेमी संगीतप्रेमी आहे . संगीत ह्या विषयाने माझी साथ कधीच सोडली नाही .मी तबला बाहेर काढला व माझं रियाज सुरु केला .
एव्हाना सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. सकाळी १० ला पाऊस जोरात सुरु झाला व त्याबरोबर माझं रियाज सुरु झाला . एकदा का रियाज सुरु झाला की मी वेळ काळ सर्व काही विसरलो व त्या संगीतमय वादनात पूर्णपणे बुडून गेलो . त्या वादनातून निघणारे धा धिं धिं धा हे तबल्याचे बोल मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होते . जसे माझा रियाज हा वाढत होता तसे मी आणखी खोलात जाऊन तबला वंदन करत होतो . त्या वादनातून निगणारे स्वर आवाज ऊर्जा मला कधीच न मिळालेला आनंद देत होते . कला हि जगायला शिकवते ,कला हि कायम शेवटपरेंत आपली साथ सोडत नाही ,कला राग दुःख ताण नैराश्य एकटेपणा अबोलपणा सर्व काही विसरायला लावते ,कला हे कालांतराने जगायचे साधन बनते ,कला हि आहे त्या परिस्थितीत जगायला शिकवते,आपल्या विचार करायच्या पद्धतीला चालना देते. कला व वादन हे जर समूहाबरोबर व समूहात राहून केले तर ते सोन्ह्याहून पिवळे . कला हि अधिकाधिक सकारात्मक ऊर्जा देणारे एक नैसर्गिक रित्या मिळालेली ईश्वरी देणगी आहे .
माझं संगीत तबला वंदन हे सुरु होतो त्या दरम्यान माझंही वेळ काळ ह्या कडे जरा देखील लक्ष गेले नाही . माझ्या मोबाइलला असलेले गिटार च संगीत व तबल्याचे बोल असे अतूट असे श्रवणीय वंदन सुरु होते . तबला मध्ये येणारे ताल धुमाळी व समुद्राच्या लाटे प्रमाने चढ उतार होणारे संगीत हे आपल्याला पूर्ण बदलून टाकते . जसा पाऊस वाढत होता तसा माझा वादन हे वाढत होते . कलात्मय माणसाला वेळ काळ दुपारचे जेवण ह्याचे कधीच भान राहत नाही . अखेर शेवटी त्रिताल झपताल व एकताल ह्यांचे एकत्रीकरण करत दुपारी १ ला तबला वादनाची सांगता केली .
तर मित्रानो एक तरी कला आपल्याला यायलाच हवी स्वतःसाठी ;
प्रतिक्रिया नक्की कळवा
वितरणाचे सर्व हक्क राखीव
कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
No comments:
Post a Comment