आज मला ऑफिस वरून घरी यायला बराच उशीर झाला होता . घरी आल्यावर मी पटकन संगीत लावले . दिवसभराच्या कंमिटमेंट्स मुळे आलेला नैराश्य ,थकवा ,चिडचिड ,राग सर्व काही हे संगीत विसरायला लावते व मला एका वेगळ्याच जगात नेते . १ तास संगीत ऐकल्यावर मी फ्रेश झालो . लवकर रात्री चे जेवण उरकून घेऊन मी अभ्यासाला बसलो .माझं शिक्षण आता अधिकृत रित्या समाप्तीकडे चाललं होत. मी माझ्या करियरच्या शेवटच्या विषयाच्या अभ्यास करायला रात्री च्या ११. च्या ठोक्याला बसलो . कमवा आणि शिका हि पद्धत मला खूप आवडली होती . बरोबर रात्री ११ ला मी विषयाची उजळणी करायला बसलो . विषय हा अभियांत्रिकी व्यवसाय शी संबंधित असल्याने माझा अत्यंत आवडीचा होता. जशी रात्र वाढत होती तसा मी आणखीन त्या विषयाच्या खोलात जाऊन त्याची उजळणी करत होतो .जस जशी रात्र कासवाच्या गतीने पुढे सरकत होती तशी ती आणखीन गूढ होत होती. मी एकटाच माझ्या खोलीत अभ्यास करत बसलो होतो. रिकामे होणारे रस्ते ,रातकिड्यांचा आवाज ,फ्लॅट मधील हळू हळू बंद होणारे दिवे ,मधूनच ऐकू येणारी वॉचमन ची शिट्टी चा आवाज,खरंच ह्या मध्यरात्री व इंजिनियर चे नाते हे अतूट आहे . रात्री १ ला मी पुस्तक बाजूला ठेवला व माझ्या गॅलरी चा दरवाजा उघडला . योगायोगाने ती पौर्णिमा ची रात्र होती.एका बाजूला शांत झोपलेल शहर ,शांत झालेले रस्ते व दुसऱ्या बाजूला मुक्तीच्या दिशेने उगवणारा चंद्र ते दृश्य ती शांतता मी मनात व कानात साठवून ठेऊ लागलो ,ते दृश्य मी एकटक पाहत होतो. एव्हाना मध्य रात्र झाली होती . अश्या गूढ शांततेत मी स्वतःबद्दल विचार करू लागलो . रात्र स्वप्न पाहायला शिकवते ,त्रास विसरायला शिकवते ,स्वतःबद्दल विचार करायला शिकवते ,भविष्याची आखणी करायला शिकवते ,आपल्या सर्व चुकांची आपल्याला जाणीव करून देते,जास्त कष्ट करायला शिकवते , ,स्वतःकडे लक्ष द्यायला शिकवते ,स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देते ,आपल्याला कामाची जाणीव करून देते ,कधीच कुठलीच गोष्ट कायमची नसते ह्याचीच पारख रात्र करून देते ,रात्री नंतर दिवस आहे तस कुठलीच परिस्तिथी कधीच कायमस्वरूपी राहत नाही . मध्यरात्र व संगीत ह्याचे नातं किती अतूट आहे ह्याचा प्रत्यय मला येत होता . मध्यरात्री १.ला मी अत्यंत हळुवार आवाजात संगीत लावले .घरात सर्व जण झोपलेले होते. गोल्डन सॅक्सओफोन च संगीत एक प्रकारचा हुरहूर लावत होते. ती हुरहूर मला आणखीन स्वतःची स्वप्न पाहायला शिकवत होती . त्या हुरहूर लावणाऱ्या संगीतमय रात्रीच्या वातावरणात ती रात्र मला जणू हेच सांगत होती ,''किती हि त्रास ,कष्ट.अपयश आले तरी खचून जाऊ नको चिकाटीने प्रयत्न करत राहा परिस्तिथी नक्की बदलेल स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालत राहा ,"'
वातावरण इतक शांत,गूढ होते की मला नंतर हळुवार भान आले . शेवटचं पेपर ची कमिटमेंट होती माझी स्वतःशीच . असे वातावरण व हुरहुरी संगीत परत अनुभवायचेच असे ठरवून मी परत अभ्यासाला लागलो .
तर मित्रानो आपल्या दिवसभराच्या कंमिटमेंट्स नि आपण स्वतःचे अस्तित्वच विसरतोय . आपण माणसे आहोत रोबोट नव्हे . प्रत्येकाने स्वतः साठी नक्की वेळ काढावा .
तर मित्रांनी कसा वाटलं लेख नक्की कळवा .
वितरणाचे हक्क अबाधित .
कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
No comments:
Post a Comment