Friday 2 September 2016

नयनरम्य पन्हाळगड

नुकताच माझा वीकएंड सुरु होता . जसा रोजचा दिवस धावपळीचा असतो तसा हा नव्हता . धावपळीचा दिवस कसा जातो ते कळत  नाही व सुट्टीचा दिवस कसा संथ गतीनं सुरु होतो ते समजत नाही . अतिशय संथ व कासवाच्या गतीने माझा दिवस सुरु होता . कासवाच्या गतीने आवरल्यावर आता माझ्यासमोर प्रश्न होता आता दिवसभर काय करायचं ?हा प्रश्न कामात असताना कधीच येत नाही .
नुकताच पाऊस देखील काही दिवस विश्रांती घेऊन परत आला होता . माझ्यासारखा भटक्या सुट्टीला घरात बसणं शक्यच नव्हत. नुकताच मी एक मोठी रोडट्रीप करून आलो होतो जुलै २०१६ मध्ये . आत्ता मी परत रोडट्रीप करायची म्हणल्यावर घरातून काय प्रतिक्रिया येईल ह्याचा मी विचार करत होतो . मी घरी बाबांना विचारणार एवढ्यात आई बाबानी मला विचारला आज बाहेर जाऊया काय ?मला तर जास्तच आनंद झाला . घरच्यांबरोबर फिरण्याच्या आनंद काही औरच असतो . एक शॉर्ट ट्रिप करायची ह्या हिशोबाने आम्ही पन्हाळा ला निघालो . 

जाताना घाटात पावसाने आमचे दिलखुलास स्वागत केले . आजूबाजूच्या हिरव्यागार पर्वतरांगा,हिरवीगार झाडे 
पिसारा फुलवलेला मोर न्याहाळत आम्ही पन्हाळा ला पोचलो . धुक्यात हरवलेला पन्हाळा पाहणे हे मला अतिशय आनंदित करून गेले . पाऊस सुसाट सुटलेला होता . कोल्हापूर जिल्ह्यात  ज्यांना जम्मू काश्मीर कुलू मनाली ला जायला जमत नाही त्यांनी पन्हाळा हेच आपले जम्मू समजावे .मी बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याजवळ थांबलो . पुतळा पूर्णपणे धुक्यात हरवलेला होता . पण बाजीप्रभू देशपांडेंच्या इतिहास माझ्यात रोमांच उभा करत होता ,
तसाच मी पुढे पुसाटी बुरुजाकडे गेलो . झिंगाट करत असलेला पाऊस ,हुडहुडी लावणारा गारवा सुसाट सुटलेला गार वारे अशा वातावरणात गरम चहा,कांदा भाजी,गरमगरम कणिस,व अस्स्सल कोल्हापुरी मिसळ चा मोह कुणाला नाही आवडणार ?मनसोक्त आस्वाद घेऊन मी  आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत बसलो . एका शांत सुरात कोसळणारा पाऊस ,पक्षांचा किलबिलाट ,चहूबाजूस पसरलेली हिरवळ मला परमोच असा आनंद देऊन गेले . मी पाऊसात अर्धा भिजलो होतो पण मी जास्त काळजी करत बसलो नाही . अश्या मुक्त पाऊसात भिजायचे  भाग्य कधीच लाभत नाही . धुक्यात हरवलेले डोंगर ,त्यात एखादी हळूच दिसणारी पायवाट,एका बाजूला दिसणारे कोल्हापूर जिल्हा व दुसऱ्या बाजूला दिसणारे नयनरम्य कोंकण हि दृश्य मी माझ्या नजरेत कैद करत होतो . रात्री आमचा पिटले ,खर्डा ,भाकरी असा बेत ठरला . आम्ही जिथे बेत ठरवलं त्या हॉटेल पासून रात्रीचा कोल्हापूर चे विहंग दृश्य दिसत होते . बरेच आंतर पायी फिरल्यामुळे मला खूप भूक लागली होती . मी खात असलेले भाकरीची चव हि ५ स्टार हॉटेल ला हि फिकी पडावी अशी होती. रात्री पाऊस पूर्ण थांबला होता . मी निसर्ग न्याहाळत होतो .शांत वाहणारे वारे ,ती निरव शांतता ,लांबून दिसणारे वाहनांचे दिवे व एका बाजूस उगवणारा चंद्र ,जस काळोख आणखीन गडद होत होता तस आणखीन मुक्तीच्या दिशेने उगवणारा चंद्र मला जणू एक शिकवण व  ताजेतवाने करून गेले
 . परत पन्हाळा ला यायचेच असा बेत आखून मी परत निघालो . 

तर मित्रानो हा होता माझा छोटा आनंदायी प्रवास .आपल्या प्र्यत्येकाच्या आनंददायी कल्पना ह्या वेगळ्या असतात. हि होती माझी कल्पना एका हिलस्टेशन गावी केलेला अचानक प्रवास , व एका झाडाखाली ठेवलेली खुर्ची व त्यावर बसलेलो मी व माझा सोबती वही पेन आणि संगीत व समोर असलेला निसर्ग !! कशी वाटली कल्पना ?

प्रतिक्रिया नक्की कळवा . 

वितरणाचे सर्व हक्क  आहेत 

कौशिक श्रोत्री 
९९२१४५५४५३

3 comments:

pankaj said...

😂😂👌

Unknown said...

श्रोत्री,बॅचलर असेपर्यंत सर्वच छान असते.त्यासाठी पन्हाळ्यालाही जयायची गरज नसते.

Storytellerkaushik said...

:)

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...