ब्रह्मकमळ -नुसते नाव आलं की डोळ्यासमोर येते ते मध्यरात्री उमलणारे राजकमळ. बालपणापासून कधीच मी ब्रह्मकमळ पाहिले नसल्यामुळे मला खूपच उत्सुकता लागली होती .ब्रह्मकमळ हे मध्यरात्री १२ ला उमलते हि ऐकून उत्सुकता आणखीनच ताणली गेली . ब्रह्मकमळ हे फक्त १० तास टिकते हे ऐकूनच मी ब्रह्मकमळ घरात लावायचा निर्णय घेतला . आधी मी कल्पना केली होती ब्रह्मकमळ हे कुंडीत येते मग मला माझ्या निसर्गप्रेमी मित्र मयूर कडून कळाले की त्याची पाने लावावी लागतात. लावलेली पाने नंतर वाढू लागतात मग २-३ वर्षांनी फुल येते .घरी पाने लावल्यावर मी आता पाने वाढायची वाट पाहू लागलो . नित्यनेमाने मी पानावर पाणी घालत होतो . कुंडीतल्या पाने वाढून त्यातून फुल येईल मला पूर्ण ३ वर्ष वाट पाहावी लागली . हा काळ म्हणजे पूर्ण माझ्या संयम सहनशक्ती चिकाटी ह्यांची परीक्षाच होती . त्या काळात कासवाच्या गतीने पानाची वाढ होत असे .एकदा तर माझ्या मनांत पूर्ण पान काढायचा विचार आला होता पण एकाद्या सुंदर गोष्टी साठी थोडा काळ संयम ठेवणे म्हणजे काय असते ह्याचा प्रत्यय मला नंतर येत होता .
तब्बल ३ वर्षांनी रात्री ७ -१२ ह्या दरम्यान मला साक्षात ब्रह्मकमळ पाहायचा योग आला . एवढ्या दिवसांनी ब्रह्मकमळ पाहणे हे माझ्यासाठी जणू काही दिवाळीच होती . मी माझ्या हातातील कामे सोडली व त्या उमलणाऱ्या फुलाकडे पाहत होतो. असे फुल मी उमलताना मी ना कधी पहिला ना कधी पाहायला योग आला . मी एकटक पाहतच राहिलो .ब्रह्मकमळ उमलणे ह्याचे वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नव्हते . निसर्गाच्या काही गोष्टी डोळ्यांनी भरभरून पाहाव्यात . तरी पण मी माझ्या परीने मी वर्णन करतोय . लहान कळी मधून कासवाच्या गतीने उमलणारे फुल ,रात्रीबरोबर वाढणारे फुल व त्याचे पदर ,फुलाचा येणारा अद्वितीय अवर्णनीय मानवनिर्मित सुगंध ला देखील लाजवेल असा अस्सल नैसर्गिक ईश्वरनिर्मित सुगंध ,फुलांबरोबर वाढत जाणारा सुगंध ,ब्रह्मकमळाच शांतपणे राजेशाही थाटात उमलणे,वेळेबरोबर वाढत जाणारा त्याचा रमणीय ,हवाहवासा ,शांतमय ,पवित्र सुगंध हा मला एका पवित्र जगात घेऊन गेला जिथे महालक्ष्मी देवी हि हिमालयातून अवतरत आहे आणि माझ्यावर कमळ नि पाण्याचे झरे पडत आहेत ,ब्रह्मकमळाच्या मध्यातून उगवणारे शेषनाग व फणा व त्यामधून येणारे विष्णू हे माझं हे माझे स्वागत करत आहेत ,एका शांत पवित्र धीरगंभीर वातावरणात मी गेलो होतो . एव्हाना १२ वाजले होते व ब्रह्मकमळ पूर्णपणे डौलदार पणे इंद्रपुरीतून उमललेल्या अप्सरेसारखं उमललेले होते .
रात्री हे फुल मी दत्त गुरु ना वाहिला व हे ब्रह्मकमळ मला एकाच गोष्ट सांगत होते जे भगवतगीता मध्ये लिहिल आहे ,''कर्म करीत राहा फळाची चिंता सोडून दे माझ्यासारखा राहा शांत निर्मल तुला चांगली फळ नक्कीच मिळतील .''.
तर मित्रानो प्रतिक्रिया नक्की कळवा .
लेखन -कौशिक श्रोत्री
९९२१४५५४५३
सर्व हक्क अबाधित

No comments:
Post a Comment