Friday, 19 August 2016

गगनबावडा एक अविस्मरणीय भटकंती

नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे शक्यच नव्हतं.घराबाहेर पडताना आई बाबांच्या भरपूर सूचना आल्या ,"अरे एवढ्या पावसात का जातोस आजारी पडशील ,सर्दी खोकला ताप येईल जाताना हेल्मेट घालून जा गाडी फास्ट मारू नको "वगैरे वगैरे...."
पण माझ्या भटक्या ला मी थांबू शकवत नव्हतो. मी सर्व पावसाळी किट घेऊन "संध्याकाळी लवकर घरी येईन" हे आश्वासन देऊन मी व माझा निसर्गवेडा भटक्या मित्र मयूर इचलकरंजी हुन बाहेर पडलो.बाहेर पडल्यावर पावसाने आमचे खुल्या दिलाने स्वागत केलं. २ चाकी  वरून चाहोबाजूचा निसर्ग न्याहाळत ,राष्ट्रीय महामार्ग वरून आम्ही कोल्हापूर ला आलो . कोल्हापुरात तर पाऊस पुरता सुसाट सुटला होता. साहजिक मनात विचार आला आता कुठे जायचे चोहीकडे ढगांचा गडगडाट ,हिरवीगार झालेले झाडे,गारेगार वारे पाहून माझ्या मनात सहज कोल्हापूर जिल्यातील गगनबावडा आलं . माझा मित्र मयूर पण पक्का निसर्ग प्रेमी,भटक्या. मयूरच्या पण डोक्यात गगनबावडाच होत. 
एका क्षणाचा हि विलंब ना लावता आम्ही गाडीवरून गगनबावडा ला मोर्चा वळवला . गगनबावड्याला हे महाराष्ट्र मधलं २ क्रमांक चे जिथे पाऊस पडतो आणि क्रमांक १ ला महाबळेश्वर .गगनबावडा हे कोल्हापूर पासून ६० KM म्हणजे कोकण ची सुरवात हे वर्णन मला माहिती असल्यामुळे माझी उत्सुकता जास्तच ताणली होती आणि आमच्या गगनबावडा चा प्रवास सुरु झाला .रास्ता,निसर्ग  तोच होता पण काहीतरी वेगळा सांगत होता "माझ्याकडं पहा उघड्याडोळ्यांनी,किती स्वतःला कंमिटमेन्ट मध्ये गुतंवून ठेवशील थोडा वेळ काढ माझ्यासाठी मग तुज्यातला तू कोण आहेस ते कळेल तुला ".  धुवाधार पाऊस,चोहीकडे हिरवळ,हवेतला गारवा ,शेतात भर पावसात जाणारे शेतकरी ,दरी डोंगर,धबधबे  डोंगरांना कवेत घेणारे धुके,आणि अस्सल कोकणातली टुमदार घरे  पाहून आमचे मन पूर्ण चार्जे होत होते .अश्या पावसात गरमागरम चहा,कांदाभजी,मिसळ  चा आस्वाद एका कोल्हापुरी माणसाने नाही घेतला तर नवलच!मस्तपैकी कांदाभजी,गरम चहा वर ताव मारून आम्ही भर पावसात मनसोक्त आनंद घेतला.असा  हा निसर्गरम्य प्रवासात कानाला हेडफोन ना लावता मी तो मनसोक्त अनुभवला . अखेर गगनबावडा आले ,तिथे  तर पाऊस तर बेभान सुटला होता. निसर्ग किती उदार आहे ह्याचा अनुभव मला क्षणक्षणाला येत होता. दुष्काळामुळे पिळून गेलेलो सर्वजण ह्या पावसाची चातकाप्रमाणे वाट वाट पाहत होतो .. निसर्ग पण पदोपदी जाणवून देत होता  "देर हें लेकिन अंधेर नही ". 
डोंगरांना कवेत घेतलेलं धुकं ,धुक्यात हरवलेला रास्ता पाहत आम्ही गगनगिरी गडावर पोचलो . तिथे पोचता पोचता एका क्षणात  शांत,पवित्र  धीरगंभीर जगात आम्ही पोचलो . "चोहीकडे झिंगाट करत असलेला पाऊस ,वाढत जाणारे धुकं ,गारठा ,समोर दिसणारे नयनरम्य कोकण,आम्ही स्तब्ध होऊन पाहत होतो . गगनगिरी गडावर मिळणार तृप्त करणारा शिरा,भात  हा ५ स्टार हॉटेलपेक्षा हि  सर्वात्कृष्ठ होता .. गडावरचे धीरगंभीर वातावरण ,सोसाट्याचा वारा,झिंगाट सुटलेला पाऊस,वाढलेल धुकं,नयनरम्य होऊन दिसणारे धबधबे जणू काही मला आणि माझा मित्र मयूर ला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते. 
पाय हालत नव्हता पण काय करणार दुसऱ्या दिवशी परत आमच्या कंमिटमेंट्स होत्या . तिथे  निसर्गकडे पाहून मला एका सिनेमा मधले एक ओळ आठवली ."दिलो मे तुम अपनी बेताबिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम हवा के झोको जैसे आझाद राहेन सीखो दारियो के लहेरो जैसे लहेरो मे बहेना सॅखो हर लम्हे से तुम मिलो खुल क अपनी बाहे हर पल एक सम देखे निगाहे".. ह्या ओळींन मला तृप्त स्वर्गीय आनंद मिळून दिला .. 
परत यायचे हे मनात ठरवून मी परतीच्या प्रवासाला लागलो. 

तर मित्रानो प्रत्येकाने एकदा तरी रोडट्रीप न प्रवास कराच . तुम्हाला आवडेल त्या ठिकाणे 

ह्या लेखावर प्रतिक्रिया नक्की कळवा...
वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत. 

कौशिक श्रोत्री 






13 comments:

Unknown said...

Chan

Unknown said...

Chan

Unknown said...

Kaushik bhaiya nice one✌��️✌��

Analytics Simplified said...

👍👍

Analytics Simplified said...

👍👍

मीनल said...

छान लिहिलंय!

खरच गगनबावडा खूप सुंदर आहे..

मीनल said...

छान लिहिलंय!

खरच गगनबावडा खूप सुंदर आहे..

Storytellerkaushik said...

THANKS ALL

Unknown said...

Nice dude. Nice blog keep going.

Unknown said...

Nice dude. Nice blog keep going.

Storytellerkaushik said...

TY

Storytellerkaushik said...

TY

Storytellerkaushik said...

TY

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...