Friday, 26 August 2016

गूढरम्य गणपतीपुळे


सध्या  सर्वत्र  हिवाळा अगदी फॉर्मात आहे. अश्या मस्त व हुडहुडी हिवाळ्यात २ दिवस एकाद्या हिल स्टेशन ला भेट द्यायचा विचार मनात आला नाही तर नवलच .  हिवाळ्यात मी गणपतीपुळे ला निघालो .गणपतीपुळे हे अगदी बालपणापासून आवडीचे ठिकाण व  गणपतीवर प्रचंड श्रद्धा असल्यामुळे मी गणपतीपुळे कधीच चुकवत नाही . मी सकाळी इचलकरंजी हुन निघालो व सायंकाळी पर्येंत आंबा घाट व कोकणातल्या निसर्गाचा पाहत  गणपतीपुळे ला पोचलो .गणपती ची दुसऱ्यादिवशी भल्यापहाटे पूजा असल्याने मी मुक्काम करणार होतो  
रात्री हॉटेल वर सामान ठेऊन व फ्रेश होऊन  मी पायी चालत मोदकाचा प्रसाद घ्यायला निघालो . जशी रात्र वाढत होती तशी थंडी मी म्हणत होती . कोकणात थंडी नसावी ह्या विचाराने मी आलो होतो पण थंडी पडत होती . मग मी अंगावर जाकीट चढवले व प्रसाद ला निघालो . 
प्रसाद व जेवण करुण  तृप्त होऊन  मी मंदिराकडे निघालो . रात्रीचे ८ वाजले होते . मंदिर आणि समुद्र कधी एकदा पाहीन असे झाले होते . पटकन सस्याच्या गतीने  मंदिरात आलो . दुसऱ्यादिवशी पहाटे ५. ला पूजा होती त्याची तयारी,सूचना करून व गणपती चे दर्शन करून मी बाहेर आलो व माझा मोर्चा समुद्राकडे वळवला. पण रात्र झाल्यामुळे मला समुद्र पाहता आला नाही . पण मी काही काळ तिथे एका बाकड्यावर बसलो . मला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत होता . एका विशिष्ट सुरांमध्ये लाटा चा आवाज येत होता .मी व काही पर्यटक सोडल्यास तिथे कुणीच नव्हते .एकेक जहाजांचे दिवे मला समुद्रामध्ये दिसू लागले . आजूबाजूची शांतता आणखीनच गडद होत होती . एक गूढरम्य वातावरण पसरलेले होते . त्या गूढते मध्ये एका बाजूने उगवणारा चंद्र व नौदलाचा नॅव्हिगेटवर आणखी भर घालत होता . पौर्णिमा ला अजून ५  दिवस असल्याने मी उगवता चंद्र पाहत होतो . लेखकांचे व निरवशांततेचे एक वेगळेच नातं आहे . असे वातावरण कधीच शहरात अनुभवायला मिळत नाही. सर्वदूर पसरलेली गूढ शांतता मनाला वेगळ्याच जगात घेऊन जात होती. मी परत हॉटेल कडे निघालो पण माझा पाय काय हालत नव्हता . ,एका शांत सुरात येणारा लाटांचा आवाज ,सर्वत्र,सर्वदूर पसरलेली गूढरम्य शांतता, व  फोन मधील जगजीत सिंग ह्यांचे गाणे ह्या सर्व गोष्टी मला परिपूर्ण चार्जे करत होत्या. परत येताना मला काही अस्सल कोकणी टुमदार घर दिसली जिथे पुढे अंगण ,मध्ये नारळाची झाडे ,अंगणात गाय चा गोठा व त्यात २ गाय व १ झोपलेले वासरू ह्या गोष्टी मला पुरेपूर आनंद देऊन गेल्या . अश्या घरात गेलेल बालपणाची मजा फ्लॅट व बंगल्यात अजिबातच नाही . मी दुसऱ्यादिवशी लवकर पूजा असल्याने निद्राधीन झालो . दुसऱ्या दिवशी पहाटे ५.. ००ला  पूजेचा अनुभव पण मला शब्दात सांगता येणार नाही.गाभाऱ्यात मी ,पुजारी व समोर असलेली शांत व तेजस्वी व जागरूक असलेली गणपतीची मूर्ती ;पूजे नंतर माझ्या मनातल्या शंकाकुशंका चिंता भीती सर्व काही नाहीसा झाला व निशंक होऊन करियर च्या पुढील वाटचालीसाठी मी परत इचलकरंजी चा रास्ता धरला . 
तर मित्रानो असा आहे गणपतीचं महिमा .
 गणपती बाप्पा मोरया 

कसा वाटलं लेख कळवा . 
वितरणाचे सर्व हक्क राखीव आहेत . 

कौशिक श्रोत्री 









No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...