Saturday, 20 October 2018
Book Review:- Nijdham(निजधाम); Writer:- Ratnakar Matkari
Wednesday, 3 October 2018
Book Review :- Everyone has a Story-2
Wednesday, 26 September 2018
Its the time to disco
“दिल है मेरा दिवाना क्या.
कहेता है अब घबराना क्या.
ताल पे जब झुमे बदन
हिचकीचाना शर्माना क्या’’
“कल हो ना हो” ह्या सिनेमा चे “इट्स द टाईम टू डिस्को” हे गाणे ऐकू येत होते.हळूहळू हृदयाचे ठोके वाढत जातील असा आवाज वाढत जात होता.आजूबाजूला सुगंधी लेडीज perfume चा घमघमाट पसरलेला होता.हळूहळू ह्या गाण्याचा आवाज वाढू लागला आणि हवेतल्या हवेत चुटक्यांचा आवाज येऊ लागला आणि काही सेकंदानी चुटक्यांचा आवाज आणि गाणे बंद झाले.गाणे बंद झाल्यावर ४५ वर्षाच्या माणसाचा आवाज आला.
“ऑफिस आले.”
“...”
“Madam,ऑफिस आले.’’
Madam ने कानाला लावलेला हेडफोन काढला.
“हो,कळले मला.”
ती कॅब मधून खाली उतरते.
“अहो, दरवाजा तरी बंद करा...”
“हो...मला आज गडबड आहे.”
चालक तावातावाने कॅब मधून बाहेर आला आणि madam च्या सीट चे उघडे असलेले दार त्याने बंद केले आणि आणि परत तो त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि काहीतरी पुटपुटत निघाला.
ती ऑफिसच्या बाहेर उभारलेली होती.ऑफिस चार मजली होते.तिने तिच्या हातात असलेल्या घड्याळात वेळ बघितली.सकाळचे ८.४५ वाजलेले होते.तेवढ्यात तिने तिच्या पर्स मधून बारीकसा आरसा बाहेर काढला आणि त्यात तिने स्वतःचा चेहरा एक मिनिट न्याहाळून पाहिला.चेहरा टापटीप असल्याचे खात्री झाल्यावर तिने आपला आय-फोन सेवन एस पर्स मधून बाहेर काढला.आय-फोन बाहेर काढून तिने तिच्या ओठांचा चंबू केला आणि उभ्या उभ्या एक मिनिटात ५० सेल्फी काढले. त्यातले काही सेल्फी तिने उभ्या उभ्या तिच्या Instagram ला अपलोड करत “Pout a day keeps boyfriend and doctor away” असा विचित्र स्टेटस टाकला.
तिच्याकडे ऑफिसमध्ये जाणारी मंडळी पाहू लागली.सहा फुट उंची,गोरा वर्ण,नजरेला नजर देणारे असे टपोरे आणि बोलके आणि काजळयुक्त असे डोळे,शिडशिडीत अशी झिरो फिगर,उभे नाक,लाल रंगाने रंगवलेले ओठ,कुठलाही तरुण मुलगा तिच्याकडे पाहतच राहील असे ऐश्वर्यसंपन्न रूप,चेहऱ्यावर न संपणारे attitude आणि सर्वांच्या नाकात जाणारा लेडीज सेंट चा स्वाद आणि डोळ्यांना आणि मनाला मोहून टाकणारे असे हास्य असलेल्या कन्येकडे ऑफिसमध्ये जाणारे सर्व मुलं डोळे फाडून पाहत होते आणि काही मुली आणि स्त्री वर्ग मन भरून पाहत होत्या.
फोटो काढून झाल्यावर ती ऑफिसमध्ये जाऊ लागली.ती ऑफिस च्या दिशेने जात असताना तिला हाक ऐकू आली.
“Hi!”
“Hey!”
“Looking good.”
“I always look good Yash darling.”
“Beyond good…”
“Thank you.”
“How was yesterday?”
“Time with you is always golden time for me.”
“Let’s start for work.”
ते दोघे बोलत असताना ग्राउंड फ्लोअर च्या लिफ्ट जवळ आले.त्यांच्या जवळ एक २९ वर्षाचा तरुण आला.तो तरुण तिच्याकडे पाहू लागला.सर्व तरुणांच्या नजरेची नजर असलेल्या तिने त्याच्या नजरेकडे न पाहताच दुर्लक्ष केले.थोड्या वेळात लिफ्ट आली.तिघे लिफ्ट मध्ये गेले.
तो तरुण तिच्याकडे पाहू लागला.ती मात्र तिच्या मित्राबरोबर गप्पा मारण्यात व्यस्त होती.
“Excuse me. What is the time now?”
त्या तरुणाने तिला प्रश्न विचारला.
तिने परत त्याला आपला attitude दाखवला आणि त्याच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले.
“Its 9.00 A.M”
यश ने त्या तरुणाकडे पाहत उत्तर दिले.
“आभारी आहे.”
त्या तरुणाने यश कडे पाहून स्मितहास्य दिले.काही वेळाने पहिला मजला आला आणि तिघे लिफ्ट च्या बाहेर आले आणि त्यांच्या ऑफिस च्या दिशेने निघाले.ती आणि यश एकत्र जात होते आणि तो एकटा निघाला होता.
ती,’’यश, तो लिफ्ट मध्ये आलेला किती मळकट कपडे घालून आला होता ना...त्यात त्याच्या पायात चक्क चप्पल होती.”
यश,’’ Let’s go for the work.त्याच्याकडे नसतील कपडे.पण मी बघ किती टापटीप आहे! माझे बूट ४००० चे आहेत;पेन ३००० चे;रोजचा सेंट ५०० चा;फोन ७०००० चा...’’
“You are Brandman my boy…”
ती आणि यश गप्पा मारत ऑफिसमध्ये पोहोचले.
सायंकाळी...
ती आणि यश गप्पा मारत लिफ्टमध्ये आले.सायंकाळचे ६.०० वाजलेले होते.ते लिफ्ट मध्ये येत असताना त्यांच्याबरोबर अजून ५ लोकं लिफ्टमध्ये आली.त्यांच्याबरोबर तो देखील आला.लिफ्ट मधून ८ लोकं ग्राउंड फ्लोअर वर येऊ लागली.लिफ्टमध्ये तो तिच्याकडे आणि यश कडे पाहू लागला.ती त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत होती.थोड्या वेळात लिफ्ट ग्राउंड फ्लोअर ला आली.सर्व जण लिफ्ट मधून बाहेर पडले आणि वेगाने चालत बिल्डींग च्या बाहेर पडू लागले.ती आणि यश कॅब ची वाट पाहत बसले.तिला आणि यश ला परत तो दिसला.त्यांच्याकडे पाहत तो चालत निघाला होता.
“कोण असेल रे हा...”
“मला माहित नाही.’’
“सारखा माझ्याकडे पाहत होता.”
“हा..हा..You are the celebrity. तुझ्याकडे पाहणार नाही मग कुणाकडे पाहणार तो?’’
यश ला जोरदार हसू फुटले.
“त्याला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत आहे.”
“कुठे?’’
“आठवत नाही.असू दे...उद्या परवा सुट्टी आहे.Let’s party tonight. Just you and me. What say…’’
“I am always ON for the party. Let’s go at 9.00 P.M”
“I want to tell you something tonight.”
“What?’’
“Not now. I will tell it tonight at pub.”
दोघे बोलत बिल्डींग च्या बाहेर थांबले होते.ऑफिस स्टाफ हळूहळू बिल्डींग च्या बाहेर येत होता.
“Yash. Let’s have selfie till the cab arrives.”
“Common.”
यश ने लगेचच त्याचा आय-फोन एक्स बाहेर काढला आणि दोघांनी ओठांचा चंबू करत सेल्फी काढला.तेवढ्यात त्यांची ऑफिस ची कॅब आली आणि दोघे कॅब मध्ये बसून निघाले.
रात्री...
“Lady hear me tonight.”
“Cause my feeling is just so right”
“As we dance by the moonlight”
Enrique चे गाणे चार तरुण मुले गिटार आणि ड्रम च्या मदतीने गात होते.रात्रीचे १०.०० वाजलेले होते.एकएक ग्लास रंगीत पाण्यांनी भरले जात होते.आजूबाजूला अनेक तरुण आणि तरुणी हातात काचेचा प्याला घेऊन गाण्याच्या ठेक्यावर डान्स करत होते.चारही बाजूला चित्र-विचित्र दिव्यांचा पाऊस पडत होता.चार तरुण मुलांमध्ये दोघे गिटार वाजवत होते आणि एकटा ड्रम वाजवत होता आणि त्याच्याबरोबर एक २८ वर्षाची मुलगी पिआनो वाजवत होती.
ती आणि यश दोघेही गाण्यावर ठेका धरत होते.तिच्या आणि यश च्या हातात ग्लास होते.काही वेळ डान्स करून झाल्यावर आणि हातातला प्याला ची झिंग उतरल्यावर दोघेही एका टेबलावर शांत गाणी ऐकत बसले होते.
“I love this song.”
“Me too.”
“They are good musicians Yash. Aren’t they?
“Yes.”
“I love this place and…”
ती यश कडे एकटक पाहत होती.डोळ्यांमध्ये काजळाची अंघोळ केली असल्यामुळे रात्रीच्या चित्रविचित्र लाईट आणि प्रकाशात ती सुंदर दिसत होती.काळा top आणि ब्लू जीन्स घातली असल्यामुळे तिच्याकडे तो देखील एकटक पाहू लागला.तेवढ्यात ती तिच्या टेबलच्या शेजारी बसलेल्या एका २८ वर्षाचा मुलाकडे पाहू लागली.
“Hey.!Is that same guy we had seen today in lift?”
यश ने त्या तरुणावर बारीकशी नजर टाकली.
“हो.”
“किती विचित्र असतात ना लोकं! ऑफिसमध्ये येताना पायात चप्पल घालतात आणि पब मध्ये येऊन बसतात.कुठली मुलगी बघणार ह्याच्याकडे...”
ती त्याच्याकडे पाहून उपहासात्मक हसू लागते.तो देखील तिच्याकडे आणि यश कडे पाहू लागतो आणि एक-एक पेप्सी चे घुटके घेऊ लागतो.
“Yash. I want to talk to you about something.”
“बोल ना..”
“Do you have any GF?”
“Never at all. Did you had any BF?’’
“Never. I had one friend from Ichalkaranji 10 years ago. He was nice guy. We never meet face to face .We used to talk a lot on the phone. He was Mech guy.”
“Oh! So what happened next?’’
“He was very poor guy. He had very low life style. Along with it he failed in the Engineering. He was writer. So I decided to leave him behind. He was not my kind of guy.”
“Oh! Poor guy. Where is he now?
“Don’t know…”
“Listen Yash. Have you ever thought about our relationship?”
तिचा प्रश्न ऐकताच यश जागचा उठला.त्याच्याबरोबर ती पण बाहेर पडली.दोघे बिल पेड करून त्यांच्या पार्किंग मध्ये असलेल्या गाडीजवळ आले.
“Say something Darling. Don’t you love me…?”
ती त्याला पार्किंग मध्ये तिच्या जवळ ओढू लागली आणि त्याच्या खूप जवळ जाऊ लागली.पण तो तिच्यापासून लांब जाऊ पाहत होता.
“आपले लग्न होऊ शकत नाही.”
“का?”
“कारण माझे लग्न झाले आहे.”
“काय?मग माझ्यापासून का लपवून ठेवलास....”
रागाने तिने यश ला कानाखाली मारले.
“You slapped me. You only need bunch of money. You are with me since I have lots of branded things. If I didn’t had them would be with me? I am married guy and I have my wife that doesn’t mean that I should always be with you. My wife had married me when I was not in a good financial condition. Now I give her full credit for my prosperous life that I had achieved in past 5 years. I thought we are good friends. Real fact is that you are money hungry girl. Run away before I give you back.”
ती ताडताड चालत बाहेर आली.ती बाहेर आल्यावर यश त्याच्या अलिशान ऑडी मधून तिच्यासमोरून निघून गेला.तिच्या डोळ्यांमधून पाणी येत होते.तिने घड्याळात पाहिले.रात्रीचे १२.०० वाजले होते. हार्ड रॉक पब जवळ एकही कॅब थांबत नव्हती.तिने तिच्या मोबाईलवर कॅब बुक करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन सेल्फी काढून आणि चोवीस तास नेट चालू ठेवून बंद पडला होता.ती रिक्षा ची वाट पाहत थांबलेली होती.
रात्रीचे १२.३० वाजले.तिला एकही रिक्षा मिळत नव्हती.तेवढ्यात तिच्याजवळ एक २८ वर्षाचा तरुण आला.
“Should I drop you?’’
त्याच्याकडे पाहताच ती चपापली.तोच तो मुलगा होता ज्याला ती सकाळपासून attitude दाखवत होती.तिने त्याला मानेने होकार दिला आणि मुकाट्याने त्याच्या Bullet च्या मागे बसून ती निघाली.
३० दिवसांनी....
ठिकाण:-Hard Rock Café Pune
सायंकाळचे ७.०० वाजले होते.भरपूर गर्दी जमलेली होती.स्टेज वाद्यांनी सजलेला होता.तरुण आणि तरुणींनी कॅफे भरलेले होते.प्रचंड गर्दी मधून ती आणि तिची मैत्रीण अर्चना देखील आलेल्या होत्या.तेवढ्यात स्टेज वर काही हालचाली सुरु झाल्या आणि काही क्षणात ड्रम्स आणि गिटार चा सुरेल असा तडका सुरु झाला.तिचे स्टेज वर लक्ष गेले आणि ड्रम वाजवणाऱ्या व्यक्तीकडे पाहताच ती जागची हबकली.तिने attitude दाखवलेला तरुण चक्क तिला ड्रम वाजवताना दिसत होता आणि त्याचे कपडे पाहताच ती हबकली.
पंधरा मिनिटे ड्रम वाजवल्यावर त्याने माईक हातात घेतला आणि तो audience मध्ये आला आणि त्याने “Just wanna be with you” गाणे म्हणायला सुरवात केली.गाणे म्हणत सर्व audience मध्ये फिरत तो शेवटी तिच्याजवळ आला.
ती,“You sing very good.”
तो,’’धन्यवाद.”
ती,’’Friends…”
तिने तिचा नाजूक आणि कापसासारखा असा हात पुढे केला.
“ I am Manasi Lele. I am Mechanical Engineer.”
सर्व तरुण बेशुद्ध पडतील असे मोहक आणि चार्मिंग हास्य तिने त्याच्याकडे पाहत दिले.
त्याने देखील त्याचा हात पुढे केला.
“ I am…..”
त्याचे नाव ऐकून तिला जागचा जोरदार धक्का बसला.ती काम करत असलेल्या कंपनी चा C.E.O आणि दहा वर्षापूर्वी तिने सोडून दिलेला इचलकरंजी चा “तो” तिच्यासमोर उभा होता.सकाळी त्याच्याकडे पाहत असताना तिला व्यवस्थित आठवत नव्हते.Bollywood Superstars ना लाजवेल असा त्याचा ड्रेस पाहून ती खाजील झाली.आपण उगाचच त्याच्या कपड्यांवर शेजेबाजी केली म्हणून तिला गिल्टी वाटू लागले.
तेवढ्यात तिथल्या audience ची दुसऱ्या गाण्याची फरमाईश आली आणि तो परत स्टेज वर गेला आणि काही क्षणात त्याने दुसरे गाणे गायला सुरवात केले आणि त्याच्याबरोबर audience मध्ये असलेल्या काही तरुण मुली देखील join झाल्या आणि काही क्षणात जोरदार डान्स सुरु झाला आणि तो डान्स मानसी निर्विकार होऊन पाहू लागली.
“दिल है मेरा दिवाना क्या.
कहेता है अब घबराना क्या.
ताल पे जब झुमे बदन
हिचकीचाना शर्माना क्या...’’
खुलके झुमो खुलके गाओ
आओ आओ ये खुलके कहो.
इट्स द टाईम टू डिस्को.”
©
Kaushik
Wednesday, 12 September 2018
Limousine
Vroom…..Vroom…असा आवाज ऐकू येत होता.मधूनच फाडफाड... असा आवाज येऊ लागला.बराच गोंगाट सुरु होता.बर्याच गाण्यांचा आवाज ऐकू येत होता.वर्दळ बरीच वाढत जात होती.मधूनच मोठ्या शिट्टीचा आवाज आला आणि मोठ्या गर्दीतून दोन २८ वर्षाचे तरुण वाट शोधत निघाले होते.खांद्यावर sack, कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट,काळ्या रंगाचा चष्मा,अंगभर फवारलेला जेन्ट्स पर्फुम,५ फुट ९ इंच उंची,शर्टाच्या खिशात सर्वांना दिसेल असे लावलेले पारकर चे पेन अश्या पूर्णपणे कॉर्पोरेट अवतारात एका मुलाखतीसाठी निघाले होते.एक किलोमीटर चालून झाल्यावर अखेर ते कंपनी जवळ पोहोचले.
कंपनी जवळ पोहोचल्यावर दोघांनी त्यांच्या हातातले घड्याळ पाहिले.सकाळचे ९.०९ मिनिटे झाली होती.दोघेही वेळेत मुलाखतीसाठी पोहोचले होते.इचलकरंजी मध्ये अत्यंत सुप्रसिद्ध अश्या केल्को नामक कंपनी मध्ये दोघे आले होते.केल्को ही कंपनी पंप तयार करणारी होती आणि त्यांनी नुकतीच ऑटोमोबाईल ह्या क्षेत्रासाठी प्रयोगशाळा सुरु झाली होती.ह्या प्रयोगशाळेत ते ऑटोमोबाईल वर बरेच खोदकाम करणार होते.कंपनी च्या गेट वर दोघांनी आपले नाव लिहिले आणि दोघे कंपनी च्या रिसेप्शन जवळ पोहोचले.कंपनी दोन एकर जागेमध्ये वसलेली होती.आजूबाजूला भरपूर झाडे लावलेली होती.कंपनी च्या बाहेरचे आवार पाहून दोघे चाटच पडले.कंपनी मध्ये पाणी अडवा,पाणी जिरवा ह्या संकल्पनेचा पुरेपूर वापर केला होता.एका बाजूला मोकळी जागा होती जिथे सर्व कामगार आणि ऑफिस स्टाफ मैदानी खेळ खेळू शकत होते.एका बाजूला संगीत क्लब होता जिथे सर्व जण एकत्र बसून काही वेळ एकत्र जेंबे आणि ढोल वाजवून कामाचा ताण हलका करू शकत होते.
दोघे एकत्र रिसेप्शन जवळ बसलेले होते.तेवढ्यात तिथे रिसेप्शन ला असलेल्या २८ वर्षीय मुलीने त्या मुलांना नाव विचारले.
“मी मंगेश जोशी. मी M.E(Mech) from Walchand.’’
“मी संदेश कुलकर्णी. मी M.Tech from IIT Ahmadabad.”
दोघांनी उत्तर दिल्यावर त्या २८ वर्षीय मुलीने त्यांना बसायला सांगितले.दोघांनी घड्याळ पाहिले.सकाळचे ९.३० वाजलेले होते.
भरपूर शिकलेले असल्यामुळे दोघेही निश्चिंत होते.
थोड्या वेळाने त्यांच्याजवळ ती २८ वर्षीय मुलगी परत आली आणि त्यांना तिने शॉप फ्लोअर वर जाण्यास सांगितले.मंगेश ने मुलाखत कोण घेणार असे विचारल्यावर त्या मुलीने मुलाखत shop floor ला होईल असे सांगितले.
दोघे तिचा निरोप ऐकून जरा हबकले.कारण सहसा पहिल्या भेटीमध्ये कुणी शॉप फ्लोअर वर बोलवत नाही.
दोघे शर्टाची इस्त्रीची घडी जरा देखील न मोडता शॉप फ्लोअर वर गेले.शॉप फ्लोअर वर एका बाजूला CNC,VMC,HMC machine दिसत होते तर दुसर्या बाजूला काही दोन चाकी आणि चार चाकी गाड्या दिसत होत्या आणि २०-२५ काम करणारे लोकं दिसत होते.एका बाजूला बराच scrap दिसत होता.शॉप फ्लोअर बराच मोठा होता.तिथे काम करणारी माणसे आणि त्यांचे मळकट असलेले कपडे पाहिल्यावर दोघांना आपण ह्या लोकांचे साहेब होणार म्हणून पुरेपूर आनंद झाला होता.
दोघेही शॉप फ्लोअर पाहत असताना एक ५४ वर्षाची व्यक्ती त्यांच्याजवळ आली.त्या व्यक्तीकडे दोघांनी पाहून न पाहिल्यासारखे केले.
“तुम्ही मुलाखतीसाठी आला आहात.’’
त्या व्यक्तीने विचारल्यावर दोघांनी मान डोलावली.
“माझ्या बरोबर या” असा निरोप त्या व्यक्तीने त्यांना दिला.दोघे त्याच्या मागून चालू लागले.मागून जात असताना शॉप फ्लोअर वरच्या काही काम करणाऱ्या कामगारांनी ते मालक असल्याचे मंगेश आणि संदेश ला हाताच्या खुणेने सांगितले आणि मंगेश आणि संदेश चक्रावून गेले आणि त्या ५४ वर्षीय व्यक्तीकडे पाहू लागले. काही अंतर चालून दोघे शॉप फ्लोअर च्या अगदी मधोमध उभे राहिले.मंगेश आणि संदेश त्या ५४ वर्षाच्या व्यक्तीकडे निरखून पाहू लागले.
६ फुट उंची,पिळदार दंड,गोरा वर्ण,डाव्या हातात कडे,करारी नजर,गौतम गंभीर असलेला चेहरा,डाव्या हातात असलेली पाईप,उजव्या हातात असलेला Spanner,बोक्याची नजर असलेले डोळे,मळकटलेले शर्ट आणि जीन्स आणि apron आणि डाव्या हातावर गोंदवून घेतलेला विचित्र Tattoo पाहून ही व्यक्ती १०० cr turnover असलेल्या कंपनी चा मालक असू शकते ह्यावर मंगेश आणि संदेश चा विश्वास बसेना.हेच का ते आपण ऐकलेले ते...डी.के साहेब...काही सेकंद दोघे डी.के साहेबांकडे पाहतच राहिले.
“Hello sir. I am……”
मंगेश आणि संदेश स्वतःबद्दल डी.के.साहेबांना माहिती देऊ लागले.पण साहेबांनी फक्त काय शिकलात एवढेच विचारले आणि बाकीचे नाव,गाव काही विचारले नाही.थोड्या वेळाने साहेबांनी दोघांना apron दिला आणि तो घालून शॉप फ्लोअर वर येण्यास सांगितले.
नाक मुरडत मंगेश आणि संदेश दोघे शॉप फ्लोअर वर आले.डी.के साहेब मंगेश आणि संदेश ला शॉप फ्लोअर वर ठेवलेल्या दोन चाकी आणि चार चाकी गाड्यांजवळ घेऊन गेले आणि तिथे असलेल्या एका थंडर बर्ड कडे बोट करत सांगू लागले.
“ही गाडी पूर्णपणे disassemble करायची आहे.तुमच्याबरोबर २ कामगार देतो आणि इतर साहित्य देतो.मला ३० मिनटात ही बुलेट खोलून झालेली पाहिजे.’’
डोळ्यांमध्ये जरब आणत डी.के साहेबांनी मंगेश आणि संदेश ला फर्मान सोडले आणि दबकत दबकत संदेश आणि मंगेश कामाला लागले.त्यांनी साहित्य घेऊन थंडर बर्ड खोलायला सुरवात केली.गाडी पूर्णपणे खोलत असताना मंगेश शॉप फ्लोअर वर नजर फिरवत होता.शॉप फ्लोअर वर गाणी लावलेली होती.१९८० च्या काळातली गाणी ऐकून इथले कामगार असे काय काम करू शकतात ह्याचा विचार मंगेश करू लागला.दोघे वेगाने गाडी खोलू लागले.अर्ध्या तासात दोघांनी पूर्ण गाडी खोलली.दोघे गाडी खोलत असताना डी.के साहेब त्या दोघांकडे निरखून पाहत होते.पण मंगेश आणि संदेश साहेबांना नजर देऊ शकत नव्हते.
गाडी खोलून झाल्यावर साहेब गाडीच्या जवळ आले आणि गाडीबद्दल त्यांनी प्रश्नांची फेरी सुरु केली.तब्बल २५ प्रश्न विचारून झाल्यावरही शांत बसतील ते साहेब कसले...
“ते समोर टेबलावर इंजिन ठेवले आहे.आता ते इंजिन घ्या आणि ह्या थंडर बर्ड ला जोडा आणि गाडी परत जशी होती तशी जोडा.’’
साहेबांचे हे वाक्य ऐकून मंगेश आणि संदेश वैतागले.आम्ही एवढे शिकलेले आहोत आणि हा माणूस आम्हाला गाडी खोलायला सांगतोय असे मनातल्या मनात म्हणत दोघे वैतागू लागले.पण त्यांना काही इलाज नव्हता.मनातल्या मनात डी.के साहेबांना पुणेरी आणि कोल्हापुरी शिव्या हाणत दोघांनी परत गाडी जोडायला सुरवात केली.
दुपारी १२.०० वाजता दोघांनी गाडी परत जशाच तशी जोडली.दोघे घामेघूम झाले होते.दोघांनी झाले एकदाचे म्हणून निःश्वास सोडला.तेवढ्यात जेवणाची वेळ झाली.मंगेश आणि संदेश दोघे काळे कुट्ट झालेले हात धुवायला गेले आणि हात स्वच्छ करून जेवायला कंपनी च्या कॅन्टीन मध्ये गेले.दोघे आपापले ताट हातात घेऊन टेबलावर बसले.कॅन्टीन हळूहळू भरू लागले.
दुपारी १२.३० वाजता जेवण आवरून दोघे परत शॉप फ्लोअर वर हजर झाले.त्यांच्याबरोबर डी.के साहेब पण हजर झाले.
“तुम्हाला चार चाकी गाड्यांच्याबद्दल किती माहिती आहे?’’
डी.के साहेबांचा प्रश्न ऐकून मंगेश ला चेव चढला.
“होय सर आहे ना..’’
मंगेश कडे डी.के साहेबांनी वाघाची करारी नजर फिरवली आणि तिघे त्यांच्या एका जुन्या Ambassador जवळ आले.मंगेश ला वाटले आता हे साहेब आता गाडी चे इंजिन खोलायला लावणार.
“ही १९९० ची गाडी आहे.ह्या गाडीला मी डीझेल सिलेंडर हेड केले आहे.सध्या ही गाडी पेट्रोल वर चालत आहे.मला सिलेंडर हेड तुम्ही इंजिन मध्ये बसवून द्यायचे आहे.त्याचबरोबर ही गाडी बरोबर मधोमध कापायची आणि त्याचे रुपांतर ह्या गाडीमध्ये करायचे आहे. त्याचा तुम्ही मला कागदावर प्लान बनवून दाखवायचा पटकन.”
हातात असलेला Limousine चा फोटो दाखवत डी.के सांगत होते आणि मंगेश आणि संदेश भरल्यासारखे ऐकत होते.व्यवहारी शिक्षण हे कुठल्याही कॉलेजमध्ये मिळत नाही हे त्यांना जाणवू लागले.दोघे कामाला लागले.त्यांच्या मदतीला दोन कामगार होतेच.आयुष्यात पहिल्यांदा मंगेश आणि संदेश स्वतःच्या हाताने गाडी खोलत होते.पेट्रोल आणि डिझेल वर एक गाडी कशी काय धावते ह्याचे मंगेश ला नवल वाटू लागले.
Ambassador खोलून त्यात दोघांनी डीझेल सिलेंडर हेड जोडला आणि पूर्ण Ambasdador ला काळा रंग मारला.काळा रंग मारून दोघांनी लगेचच कागदावर गाडीचे रुपांतर कसे होईल ह्याचे उदाहरण लिहायला सुरुवात केली आणि ते उदाहरण त्यांनी साहेबांना शॉप फ्लोअर वर दाखवले.ते दाखवल्यावर डी.के साहेब मंगेश आणि संदेश कडे एक टक पाहत राहिले....
एक दिवसांनी...
Vroom….Vroom…असा आवाज येत होता.मंद असा पर्फुम चा सुगंध येत होता.Vroom……………………..असा एकदम आवाज आला आणि शॉप फ्लोअर वर असलेली Ambassador चे रुपांतर झाले होते.सर्व स्टाफ आणि कामगार वेड लागल्यासारखे गाडीकडे पाहत होते.मंगेश गाडीचा चालक झाला होता आणि संदेश मंगेश च्या शेजारी बसला होता.
काही वेळाने तिघे शॉप फ्लोअर वरून गाडी घेऊन बाहेर पडले आणि थेट कंपनी च्या बाहेर आले आणि drive करत इचलकरंजी शहरात फिरायला गेले.
एक तासानंतर तिघे परत कंपनी च्या गेट जवळ आली.मंगेश गाडीमधून उतरला.जराही न झोपल्यामुळे मंगेश आणि संदेश चे डोळे सुजलेले होते.दोघे उतरल्यावर डी.के साहेब गाडीमधून उतरले. उतरल्यावर त्यांनी limousine मध्ये त्यांचे आवडते गाणे “ जिंदगी ख्वाब है...” लावले आणि त्यांची लाडकी अशी पाईप चा स्वाद घेण्यास सुरवात केली आणि हातात पाईप घेत ते गाडी मध्ये बसले.त्यांना पाहून गेट जवळ असलेला सुरक्षारक्षक पळत आला.त्याला काहीतरी सूचना देऊन साहेब त्यांच्या रुपांतर केलेल्या गाडीमध्ये बसून निघून गेले.
मंगेश आणि संदेश दोघे आता डी.के साहेबांना उघड उघड कोल्हापुरी शिव्या हाणू लागले.साधी मुलाखत २४ तास चालेल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नाही.सकाळचे 9.30 वाजलेले होते.दोघे गेट च्या आत गेले आणि त्यांची bag घेऊन ते बाहेर आले.
बाहेर येताना कंपनी ची HR त्यांना भेटायला आली आणि त्यांच्या हातात एक पाकीट देऊन ती निघून गेली.बहुदा आपण नाकारलो गेलो असे दोघांना वाटू लागले.गेट च्या बाहेर येऊन दोघे चालू लागले.चालत असताना दोघांनी त्यांच्या हातातले पाकीट उघडले आणि ते पुतळ्यासारखे उभेच राहिले.
“You have been selected for post of Assistant Engineer- Research and Development in the KElKO Group. Visit HR department tomorrow for the further discussion.”
दोघांनी पत्र वाचून आपापल्या bag मध्ये ठेवले आणि त्यांच्या खिशात असलेली सिगारेट त्यांनी बाहेर काढली आणि त्यांच्या फोन मध्ये त्यांनी “ मे जिंदगी का साथ निभाता चला गया..” हे गाणे लावले आणि एक एक झुरका हवेत हळू हळू सोडत इंजिनीरिंग चे दिवस आठवत बस stand च्या दिशेने चालत निघाले.
©
कौशिक श्रोत्री
इचलकरंजी
आवडल्यास अवश्य शेअर करा.
Sunday, 9 September 2018
Film Review :- Stri
Sunday, 19 August 2018
Movie Review:- Satyameva Jayate
Movie deals with the theme of anti-corruption and misuse of the power more and often. Movie works on the emotions of angry young man fighting against the system.Movies with themes of anti-corruption and misuse of power are relevant to our times, now more than ever before.
Movie tells very hard to sell the age-old idea but audience is smart enough to know it. With John on screen, I expected it has good action but sometimes it was worst and bloody. Straight a way, story writer and director fail to write proper script and they have wasted talented actors like John and Manoj. Showing John Abraham in six packs doesn't make your product defect free.Audience don't always like new recipe in the old bottle.
It is excruciating film.Director should be thought that you cannot put anything and show it in the film. It should have a flow. It should have at least minimum basics of storytelling.
Please John and Manoj. You are such a talented creative guys. Don't do such crap films.
0.25 Stars
©
Kaushik Shrotri
Sunday, 5 August 2018
Movie Review: Mission Impossible- Part 6
Featured post
सिनेमा
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...
-
नुकताच पावसाळ्याची सुरवात झाली आहे.ह्या वीकएंड ला रोडट्रीप करायचं बेत आखून मी बाहेर पडलो.धुवाधार पावसात माझ्यासारख्या भटक्या ला घरात बसणे श...
-
प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे म...
-
सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...