उडणार्या गाड्या...सदैव चिरतरुण राहणारा आणि हवेतून जमिनीवर आणि
जमिनीवरून हवेत जाणारा(नाही उडणारा) नायक...कधीच
म्हातारा न होणारा...सदैव आजूबाजूला अप्सारांमध्ये असणारा नायक...वय फक्त नावाला
असते हे ब्रीधवाक्य घेऊन जन्माला आलेला टॉम क्रूज.
मिशन इम्पॉसिबल ही फिल्म सिरीज त्याचे वय
आणि काम ह्याचा काडीमात्र संबंध नाही हे दर्शवत आहे.सिनेमा ची कथा एका plutonium
धातू चोरण्यापासून होते आणि हा धातू काही कट्टर अतिरेक्यांच्या हाती लागून भयानक
विध्वंस घडवण्याचा प्रयत्न सुरु होतो आणि तो प्रयत्न हाणून पाडण्याची जबाबदारी
येते कधीही म्हातारा न होणारा टॉम क्रूज वर.
टॉम क्रूज ;पुरुषाने किती आकर्षक असावे ह्याचे उत्तम उदाहरण.दमदार कथा आणि थरार
ह्या गोष्टी मिशन इम्पोसिबल मध्ये उत्तम रित्या साधल्या गेल्या आहेत.फिल्म मध्ये
तो काय..काय..करतो. स्वतःचा पाय मोडतो,पंचवीस हजार उंचीवरून विमानातून जमिनीवर उडी
मारतो,चक्रीवादळालाही लाजवेल अश्या वेगाने BMW ची मोटारसायकल पॅरिस च्या रस्त्यांवरून
अक्षरशः पळवतो(इतका पळवतो की काही वेळेला रस्तेच टॉम च्या मागून पाळतात की काय असे वाटू लागते).माणूस
पाठलाग करत हेलिकॉप्टर वर सुद्धा ताबा घेऊ शकतो आणि हेलिकॉप्टर वर लटकत शाळेत
शिकवलेले सर्व नियम पायदळी तुडवू शकतो आणि काही सेकंदात वेळेला तीनशे साठ अंशात
फिरवू शकतो हे देखील ह्या सिनेमा मधून नायक दाखवून देतो.फक्त आणि फक्त टॉम क्रूज पूर्ण सिनेमा फिरवतो.
ह्या सर्व सर्कशी करत असताना सिनेमा ची कथा कुठेही रेंगाळत नाही.कथा
उत्तम रित्या बांधलेली असल्यामुळे सिनेमा पाहताना प्रेक्षक इंटर्वल ला सुद्धा हलत
नाही.पाश्वसंगीत देखील क्लास आहे.हॉलीवूड मध्ये कथेला आणि तंत्रज्ञानाला महत्व देत असल्यामुळे
दर्जेदार सिनेमे उगीचंच बनत नाहीत.
तर वय हे फक्त सांगण्यासाठी असते हे पाहण्यासाठी आणि उडणार्या गाड्या
आणि वेग ह्यांचा उत्तम ताळमेळ कसा असतो त्यासाठी सिनेमा नक्की पाहावा.
Rating-5 stars
कौशिक
No comments:
Post a Comment