सारे अगदी शांतशांत असते. रात्र बरीच झालेली होती.
समुद्रकिनाऱ्यावर त्या दोघांशिवाय दुसरे चिटपाखरू नव्हते.
नजर पोहोचेल तिथवर वाळूचा लांबच लांब करडा पट्टा पसरलेला होता. त्या दोघांच्या दोन्ही बाजूंना मिट्ट काळोखात त्या पट्ट्याची दोन्ही टोके बुडून गेली होती.एका बाजूला लांबवर एका दगडाची रास होती. तिला बिलगुन गर्द झुडपे वाढलेली होती. किंचितही हालचाल न करता, अगदी श्वास रोखून दबा धरून बसलेल्या माणसांच्या टोळीसारखी दिसत होती. कुणीही येत नव्हते अथवा जात नव्हते. एखाद्या अजगरासारख्या काढून टाकलेल्या कातेप्रमाणे तो वाळूचा प्रचंड पट्टा सुन्न,निश्चिल पडून होता. समुद्रावरही कसलीही हालचाल दिसत नव्हती. लाटा नव्हत्याच.नुसते काळेभोर पाणी इकडून तिकडून पसरलेले होते. खंगलेली चंद्रकोर आभाळात उगवली होती. तिचा फिकट प्रकाश त्या काळ्या पाण्यावर एखाद्या कोडाच्या चट्यासारखा उठला होता. पाणी किनाऱ्यावर भिडत होते तिथे कान देऊन ऐकले तरच ऐकू येईल असा चोरट्या कुजबुजीसारखा चुळूकचुळूक आवाज फुटत होता.
ती .....
बोलावणे... जेवणावळ...निजधाम... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी मध्ये नवीन वाट तयार केली आहे. ह्या कथांमध्ये वातावरण,चित्रदर्श वर्णन,माणसाच्या मनातल्या मनात गूढाचा घेतलेला वेध,वेगळी रचना आणि हादरून सोडणार शेवट, ह्या साऱ्यांनी मराठी कथेमध्ये अस्तित्वात नसलेले कथाविश्व निर्माण केले आहे.
सर्व लेखकांनी अवश्य वाचावे आणि आपले लेखन समृद्ध करावे.
©
kaushik
No comments:
Post a Comment