Wednesday 12 September 2018

Limousine


Vroom…..Vroom…असा आवाज ऐकू येत होता.मधूनच फाडफाड... असा आवाज येऊ लागला.बराच गोंगाट सुरु होता.बर्याच गाण्यांचा आवाज ऐकू येत होता.वर्दळ बरीच वाढत जात होती.मधूनच मोठ्या शिट्टीचा आवाज आला आणि मोठ्या गर्दीतून दोन २८ वर्षाचे तरुण वाट शोधत निघाले होते.खांद्यावर sack, कडक इस्त्री केलेला पांढरा शर्ट,काळ्या रंगाचा चष्मा,अंगभर फवारलेला जेन्ट्स पर्फुम,५ फुट ९ इंच उंची,शर्टाच्या खिशात सर्वांना दिसेल असे लावलेले पारकर चे पेन अश्या पूर्णपणे कॉर्पोरेट अवतारात एका मुलाखतीसाठी निघाले होते.एक किलोमीटर चालून झाल्यावर अखेर ते कंपनी जवळ पोहोचले.


कंपनी जवळ पोहोचल्यावर दोघांनी त्यांच्या हातातले घड्याळ पाहिले.सकाळचे ९.०९ मिनिटे झाली होती.दोघेही वेळेत मुलाखतीसाठी पोहोचले होते.इचलकरंजी मध्ये अत्यंत सुप्रसिद्ध अश्या केल्को नामक कंपनी मध्ये दोघे आले होते.केल्को ही कंपनी पंप तयार करणारी होती आणि त्यांनी नुकतीच ऑटोमोबाईल ह्या क्षेत्रासाठी प्रयोगशाळा सुरु झाली होती.ह्या प्रयोगशाळेत ते ऑटोमोबाईल वर बरेच खोदकाम करणार होते.कंपनी च्या गेट वर दोघांनी आपले नाव लिहिले आणि दोघे कंपनी च्या रिसेप्शन जवळ पोहोचले.कंपनी दोन एकर जागेमध्ये वसलेली होती.आजूबाजूला भरपूर झाडे लावलेली होती.कंपनी च्या बाहेरचे आवार पाहून दोघे चाटच पडले.कंपनी मध्ये पाणी अडवा,पाणी जिरवा ह्या संकल्पनेचा पुरेपूर वापर केला होता.एका बाजूला मोकळी जागा होती जिथे सर्व कामगार आणि ऑफिस स्टाफ मैदानी खेळ खेळू शकत होते.एका बाजूला संगीत क्लब होता जिथे सर्व जण एकत्र बसून काही वेळ एकत्र जेंबे आणि ढोल वाजवून कामाचा ताण हलका करू शकत होते.

दोघे एकत्र रिसेप्शन जवळ बसलेले होते.तेवढ्यात तिथे रिसेप्शन ला असलेल्या २८ वर्षीय मुलीने त्या मुलांना नाव विचारले.


“मी मंगेश जोशी. मी M.E(Mech) from Walchand.’’


“मी संदेश कुलकर्णी. मी M.Tech from IIT Ahmadabad.”


दोघांनी उत्तर दिल्यावर त्या २८ वर्षीय मुलीने त्यांना बसायला सांगितले.दोघांनी घड्याळ पाहिले.सकाळचे ९.३० वाजलेले होते.


भरपूर शिकलेले असल्यामुळे दोघेही निश्चिंत होते.


थोड्या वेळाने त्यांच्याजवळ ती २८ वर्षीय मुलगी परत आली आणि त्यांना तिने शॉप फ्लोअर वर जाण्यास सांगितले.मंगेश ने मुलाखत कोण घेणार असे विचारल्यावर त्या मुलीने मुलाखत shop floor ला होईल असे सांगितले.


दोघे तिचा निरोप ऐकून जरा हबकले.कारण सहसा पहिल्या भेटीमध्ये कुणी शॉप फ्लोअर वर बोलवत नाही.


दोघे शर्टाची इस्त्रीची घडी जरा देखील न मोडता शॉप फ्लोअर वर गेले.शॉप फ्लोअर वर एका बाजूला CNC,VMC,HMC machine दिसत होते तर दुसर्या बाजूला काही दोन चाकी आणि चार चाकी गाड्या दिसत होत्या आणि २०-२५ काम करणारे लोकं दिसत होते.एका बाजूला बराच scrap दिसत होता.शॉप फ्लोअर बराच मोठा होता.तिथे काम करणारी माणसे आणि त्यांचे मळकट असलेले कपडे पाहिल्यावर दोघांना आपण ह्या लोकांचे साहेब होणार म्हणून पुरेपूर आनंद झाला होता.


दोघेही शॉप फ्लोअर पाहत असताना एक ५४ वर्षाची व्यक्ती त्यांच्याजवळ आली.त्या व्यक्तीकडे दोघांनी पाहून न पाहिल्यासारखे केले.


“तुम्ही मुलाखतीसाठी आला आहात.’’


त्या व्यक्तीने विचारल्यावर दोघांनी मान डोलावली.


“माझ्या बरोबर या” असा निरोप त्या व्यक्तीने त्यांना दिला.दोघे त्याच्या मागून चालू लागले.मागून जात असताना शॉप फ्लोअर वरच्या काही काम करणाऱ्या कामगारांनी ते मालक असल्याचे मंगेश आणि संदेश ला हाताच्या खुणेने सांगितले आणि मंगेश आणि संदेश चक्रावून गेले आणि त्या ५४ वर्षीय व्यक्तीकडे पाहू लागले. काही अंतर चालून दोघे शॉप फ्लोअर च्या अगदी मधोमध उभे राहिले.मंगेश आणि संदेश त्या ५४ वर्षाच्या व्यक्तीकडे निरखून पाहू लागले.


६ फुट उंची,पिळदार दंड,गोरा वर्ण,डाव्या हातात कडे,करारी नजर,गौतम गंभीर असलेला चेहरा,डाव्या हातात असलेली पाईप,उजव्या हातात असलेला Spanner,बोक्याची नजर असलेले डोळे,मळकटलेले शर्ट आणि जीन्स आणि apron आणि डाव्या हातावर गोंदवून घेतलेला विचित्र Tattoo पाहून ही व्यक्ती १०० cr turnover असलेल्या कंपनी चा मालक असू शकते ह्यावर मंगेश आणि संदेश चा विश्वास बसेना.हेच का ते आपण ऐकलेले ते...डी.के साहेब...काही सेकंद दोघे डी.के साहेबांकडे पाहतच राहिले.


“Hello sir. I am……”


मंगेश आणि संदेश स्वतःबद्दल डी.के.साहेबांना माहिती देऊ लागले.पण साहेबांनी फक्त काय शिकलात एवढेच विचारले आणि बाकीचे नाव,गाव काही विचारले नाही.थोड्या वेळाने साहेबांनी दोघांना apron दिला आणि तो घालून शॉप फ्लोअर वर येण्यास सांगितले.


नाक मुरडत मंगेश आणि संदेश दोघे शॉप फ्लोअर वर आले.डी.के साहेब मंगेश आणि संदेश ला शॉप फ्लोअर वर ठेवलेल्या दोन चाकी आणि चार चाकी गाड्यांजवळ घेऊन गेले आणि तिथे असलेल्या एका थंडर बर्ड कडे बोट करत सांगू लागले.


“ही गाडी पूर्णपणे disassemble करायची आहे.तुमच्याबरोबर २ कामगार देतो आणि इतर साहित्य देतो.मला ३० मिनटात ही  बुलेट खोलून झालेली पाहिजे.’’


डोळ्यांमध्ये जरब आणत डी.के साहेबांनी मंगेश आणि संदेश ला फर्मान सोडले आणि दबकत दबकत संदेश आणि मंगेश कामाला लागले.त्यांनी साहित्य घेऊन थंडर बर्ड खोलायला सुरवात केली.गाडी पूर्णपणे खोलत असताना मंगेश शॉप फ्लोअर वर नजर फिरवत होता.शॉप फ्लोअर वर गाणी लावलेली होती.१९८० च्या काळातली गाणी ऐकून इथले कामगार असे काय काम करू शकतात ह्याचा विचार मंगेश करू लागला.दोघे वेगाने गाडी खोलू लागले.अर्ध्या तासात दोघांनी पूर्ण गाडी खोलली.दोघे गाडी खोलत असताना डी.के साहेब त्या दोघांकडे निरखून पाहत होते.पण मंगेश आणि संदेश साहेबांना नजर देऊ शकत नव्हते.


गाडी खोलून झाल्यावर साहेब गाडीच्या जवळ आले आणि गाडीबद्दल त्यांनी प्रश्नांची फेरी सुरु केली.तब्बल २५ प्रश्न विचारून झाल्यावरही शांत बसतील ते साहेब कसले...


“ते समोर टेबलावर इंजिन ठेवले आहे.आता ते इंजिन घ्या आणि ह्या थंडर बर्ड ला जोडा आणि गाडी परत जशी होती तशी जोडा.’’


साहेबांचे हे वाक्य ऐकून मंगेश आणि संदेश वैतागले.आम्ही एवढे शिकलेले आहोत आणि हा माणूस आम्हाला गाडी खोलायला सांगतोय असे मनातल्या मनात म्हणत दोघे वैतागू लागले.पण त्यांना काही इलाज नव्हता.मनातल्या मनात डी.के साहेबांना पुणेरी आणि कोल्हापुरी शिव्या हाणत दोघांनी परत गाडी जोडायला सुरवात केली.


दुपारी १२.०० वाजता दोघांनी गाडी परत जशाच तशी जोडली.दोघे घामेघूम झाले होते.दोघांनी झाले एकदाचे म्हणून निःश्वास सोडला.तेवढ्यात जेवणाची वेळ झाली.मंगेश आणि संदेश दोघे काळे कुट्ट झालेले हात धुवायला गेले आणि हात स्वच्छ करून जेवायला कंपनी च्या कॅन्टीन मध्ये गेले.दोघे आपापले ताट हातात घेऊन टेबलावर बसले.कॅन्टीन हळूहळू भरू लागले.


 दुपारी १२.३० वाजता जेवण आवरून दोघे परत शॉप फ्लोअर वर हजर झाले.त्यांच्याबरोबर डी.के साहेब पण हजर झाले.


“तुम्हाला चार चाकी गाड्यांच्याबद्दल किती माहिती आहे?’’


डी.के साहेबांचा प्रश्न ऐकून मंगेश ला चेव चढला.


“होय सर आहे ना..’’


मंगेश कडे डी.के साहेबांनी वाघाची करारी नजर फिरवली आणि तिघे त्यांच्या एका जुन्या Ambassador जवळ आले.मंगेश ला वाटले आता हे साहेब आता गाडी चे इंजिन खोलायला लावणार.


“ही १९९० ची गाडी आहे.ह्या गाडीला मी डीझेल सिलेंडर हेड केले आहे.सध्या ही गाडी पेट्रोल वर चालत आहे.मला सिलेंडर हेड तुम्ही इंजिन मध्ये बसवून द्यायचे आहे.त्याचबरोबर ही गाडी बरोबर मधोमध कापायची आणि त्याचे रुपांतर ह्या गाडीमध्ये करायचे आहे. त्याचा तुम्ही मला कागदावर प्लान बनवून दाखवायचा पटकन.”


हातात असलेला Limousine चा फोटो दाखवत डी.के सांगत होते आणि मंगेश आणि संदेश भरल्यासारखे ऐकत होते.व्यवहारी शिक्षण हे कुठल्याही कॉलेजमध्ये मिळत नाही हे  त्यांना जाणवू लागले.दोघे कामाला लागले.त्यांच्या मदतीला दोन कामगार होतेच.आयुष्यात पहिल्यांदा मंगेश आणि संदेश स्वतःच्या हाताने गाडी खोलत होते.पेट्रोल आणि डिझेल वर एक गाडी कशी काय धावते ह्याचे मंगेश ला नवल वाटू लागले.

Ambassador खोलून त्यात दोघांनी डीझेल सिलेंडर हेड जोडला आणि पूर्ण Ambasdador ला  काळा रंग मारला.काळा रंग मारून दोघांनी लगेचच कागदावर गाडीचे रुपांतर कसे होईल ह्याचे उदाहरण लिहायला सुरुवात केली आणि ते उदाहरण त्यांनी साहेबांना शॉप फ्लोअर वर दाखवले.ते दाखवल्यावर डी.के साहेब मंगेश आणि संदेश कडे एक टक पाहत राहिले....


 


एक दिवसांनी...


Vroom….Vroom…असा आवाज येत होता.मंद असा पर्फुम चा सुगंध येत होता.Vroom……………………..असा एकदम आवाज आला आणि शॉप फ्लोअर वर असलेली Ambassador चे रुपांतर झाले होते.सर्व स्टाफ आणि कामगार वेड लागल्यासारखे गाडीकडे पाहत होते.मंगेश गाडीचा चालक झाला होता आणि संदेश मंगेश च्या शेजारी बसला होता.


काही वेळाने तिघे शॉप फ्लोअर वरून गाडी घेऊन बाहेर पडले आणि थेट कंपनी च्या बाहेर आले आणि drive करत इचलकरंजी शहरात फिरायला गेले.


एक तासानंतर तिघे परत कंपनी च्या गेट जवळ आली.मंगेश गाडीमधून उतरला.जराही न झोपल्यामुळे मंगेश आणि संदेश चे डोळे सुजलेले होते.दोघे उतरल्यावर डी.के साहेब गाडीमधून उतरले. उतरल्यावर त्यांनी limousine मध्ये त्यांचे आवडते गाणे “ जिंदगी ख्वाब है...” लावले आणि त्यांची लाडकी अशी पाईप चा स्वाद घेण्यास सुरवात केली आणि हातात पाईप घेत  ते गाडी मध्ये बसले.त्यांना पाहून गेट जवळ असलेला सुरक्षारक्षक पळत आला.त्याला काहीतरी सूचना देऊन साहेब त्यांच्या रुपांतर केलेल्या गाडीमध्ये बसून निघून गेले.

मंगेश आणि संदेश दोघे आता  डी.के साहेबांना उघड उघड कोल्हापुरी शिव्या हाणू लागले.साधी मुलाखत २४ तास चालेल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नाही.सकाळचे 9.30 वाजलेले होते.दोघे गेट च्या आत गेले आणि त्यांची bag घेऊन ते बाहेर आले.

बाहेर येताना कंपनी ची HR त्यांना भेटायला आली आणि त्यांच्या हातात एक पाकीट देऊन ती निघून गेली.बहुदा आपण नाकारलो गेलो असे दोघांना वाटू लागले.गेट च्या बाहेर येऊन दोघे चालू लागले.चालत असताना दोघांनी त्यांच्या हातातले पाकीट उघडले आणि ते पुतळ्यासारखे उभेच राहिले.


“You have been selected for post of Assistant Engineer- Research and Development in the  KElKO Group. Visit HR department tomorrow for the further discussion.”


दोघांनी पत्र वाचून आपापल्या bag मध्ये ठेवले आणि त्यांच्या खिशात असलेली सिगारेट त्यांनी बाहेर काढली आणि त्यांच्या फोन मध्ये त्यांनी “ मे जिंदगी का साथ निभाता चला गया..” हे गाणे लावले आणि एक एक झुरका हवेत हळू हळू सोडत इंजिनीरिंग चे दिवस आठवत बस stand च्या दिशेने  चालत निघाले.

©

कौशिक श्रोत्री

इचलकरंजी


आवडल्यास अवश्य शेअर करा.

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...