सिने परीक्षण :- स्त्री
Director:- अमर कौशिक
कलाकार:- श्रद्धा कपूर,राजकुमार राव,पंकज त्रिपाठी.
कथा:-एका छोट्या गावात अचानक रात्री दहशत पसरलेली असते.रात्री सण सुरु
असताना अचानक एक झपाटलेली स्त्री सणासुदीच्या रात्री गावात फिरत पुरुषांना
विवस्त्र करून पळवून नेत असल्याची वाऱ्यासारखी बातमी पसरते.ही स्त्री सणासुदीच्या काळात रात्री
एकटे फिरणाऱ्या मुलांचा विचित्रपणे पाठलाग करत पळवून नेत असते.पूर्ण गाव भयाने
पछाडलेले असताना विकी(राजकुमार राव) ची गाठ त्याच्या गावात एका अनोळखी मुलगी(श्रद्धा
कपूर) शी पडते.विचित्र बाब म्हणजे ही मुलगी त्याला सणासुदीच्या काळातच भर रात्री
मंदिराच्या बाहेर गाठ पडत असते.ही बाब त्या विकीच्या मित्रांना पटत नाही.मग सुरु
होतो त्या रात्री फिरणाऱ्या स्त्री चा शोध....कोण आहे ती स्त्री...कोण आहे ती
अनोळखी मुलगी...ती स्त्री पुरुषांना का पळवून घेऊन जाते...ती नाव न सांगणारी मुलगी कोण आहे...
पूर्ण कथेमध्ये एकदम वेगळा विषय मांडला आहे.भारतीय समाजात असणार्या
स्त्रियांचे स्थान आणि त्यांना मिळणारी वागणूक ह्यावर हॉरर-कॉमेडी पद्धतीने प्रकाश
टाकला आहे.कथानक सुरवातीपासून वेगवान आहे.महिलांच्या भावना आणि त्यांचा होणारा
कोंडमारा ह्यावर विविध अंगाने प्रकाश टाकण्यात आला आहे.कथेमध्ये असणार्या विनोदी
पण हॉरर वाटणाऱ्या पण पोट धरून हसवणाऱ्या काही प्रसंगांनी पूर्ण कथेमध्ये फुंकर
मारली आहे.पंकज त्रिपाठी ह्यांनी रंगवलेले रुद्र हे पुस्तक विकणाऱ्या मालकाचे
पात्र आणि Delhi Belhi ह्या सिनेमा मध्ये विनोदी काम केलेल्या एका अभिनेत्याचे स्त्रियांना कसे
जाणून घ्यावे हे पात्र पूर्ण धम्माल उडवते.पुअर स्टोरी-टेलिंग असेल तर सिनेमा कसे
बेस्ट होतो ह्याचे हा सिनेमा हे तंतोतंत उदाहरण आहे.राजकुमार चा अभिनय पण जोरदार
हसवतो.श्रद्धा कपूर ने अभिनय करता करता जोरदार धक्के दिले आहेत जे ठरते कथेचे
धक्कादायक असे अनोखे package.रॉक ऑन नंतर श्रद्धा कपूर चा दमदार अभिनय पाहून मनोमन सुखावून जातो तो प्रेक्षक वर्ग.
तर....भीती दाखवत हसवणाऱ्या आणि काही गोष्टींवर प्रकाश पडणार्या अश्या
कथेसाठी बिनधास्त सिनेमा पहा.
दर्जा:-साडेतीन स्टार्स
कौशिक
No comments:
Post a Comment