Sunday, 29 July 2018

पुस्तक परीक्षण:- मृत्युंजयी; लेखक:- श्री.रत्नाकर मतकरी


मरणाला जिंकता यायला हवे.हे मरण भयानक असते.या मरणाने मला दोनदा निराधार केले.मी....मी...त्याचा सूड घेईन!मी जिंकेन मरणाला!
मला कैवल्यवाणी येते....
निरामयीने पोथी समोर धरली आणि हाथ जोडले.त्याक्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली.कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदागदा हलला.क्षणमात्र!
आणि..दुसर्या क्षणी घराचे छप्पर कोसळले.आजूबाजूच्या भिंतींना मोठे तडे गेले.निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूने सुटली आणि खाली येऊ लागली.भयचकित होऊन निरामयी पहातच राहिली.त्या क्षणी तिला बाजूला व्हायचे भान राहिले नाही.वरून खाली येणाऱ्या मृत्यूकडे ती डोळे फाडून पहातच राहिली.तिने मृत्यूला डिवचले होते.ती पोथी वाचायची असा निश्चय करून!

रात्रीचे बारा वाजले होते.अमावस्येची रात्र होती
मी गाडीत एकटाच होतो.रस्ता अगदी शांत होता.एका बाजूला काय ती वस्ती.तीदेखील दूरदूर बांधलेल्या बंगल्यांची.मध्ये बरीच जागा रिकामी सोडलेली.काही ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे विटांचे ढीग पडलेले होते.
रस्त्यांच्या दुसर्या बाजूला अशीच मोकळी जागा.त्यापलीकडे खाडी.
खाडीतले पाणी दिसतसुद्धा नव्हते.अंधाराच्या समुद्रात ते मिसळून गेले होते.वारे भन्नाट होते.दूरवरचे बंगले चोरट्या माणसांसारखे गुपचूप उभे होते.पांढर्या रंगाच्या आकृती अमानुष वाटत होत्या.
मी गाडीचा वेग वाढवला.
असल्या वाऱ्यामध्ये गाडी जोरात पळवायला काय मजा येते!
मी वेग वाढवला आणि....अचानक समोर ती उभी राहिली.


रत्नाकर मतकरींच्या सीरीज ची आणखीन एक गूढ कथा.मृत्युंजयी;भक्ष्य;किडे;जंगल;हुशारी;टोक-टोक पक्षी;डायरी..अश्या अनेक सरस कथा आहेत.सर्व कथा अत्यंत वेधक आणि लोभस आहेत.कथा मानवीभाव आणि तर्कशास्त्र ह्यावर आधारित आहेत.योग्य वेळेला कथेला टर्न बसतो आणि कथा जास्ती समृद्ध होत जाते.प्रत्येक कथेमधून मानवी जीवनाचे कांगारे पाहायला मिळतात.कथा वाचत असताना येणारा पुढचा ट्वीष्ट पाहून डोके  अक्षरश्या चक्रावून जाते.कथा वाचत असताना मानवी जीवनाचे खोल दर्शन घडत राहते.सर्व कथा वाचत असताना हुरहूर...भीती...थ्रील...अनामिक...गूढ...ह्या सर्व भावना आपल्याला घेरून टाकतात आणि व्यवहारी जगातून दूर एका अनामिक अश्या जगात घेऊन जातात.

माझ्याकडून अनेक स्टार्स ***********
कौशिक श्रोत्री
©







No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...