संजय दत्त...विक्षिप्त कारणांसाठी वीस वर्षे अखंड चर्चेत असणारे...ललनी आयुष्य जगणारे आणि विषारी आणि कडू घोट प्यायलेले व्यक्तिमत्त्व.एका आयुष्यात अनेक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीवर सिनेमा आल्यावर तो पाहण्याची उत्सुकता प्रत्येक सिने रसिकांच्या मनात नैसर्गिक रित्या निर्माण होते.
तर...संजू हा सिनेमा संजय दत्त च्या पूर्ण आयुष्यावर बेतलेला आहे.त्याचे तरुणपणीचे आयुष्य,त्याच्या गलफ्रेंड्स,वडील सुनील दत्त ह्यांचा त्याच्यावर असलेला प्रभाव ह्या गोष्टींपासून सिनेमा ची सुरवात होते.पाचही बोटे तुपात अश्या घरात जन्म झाल्यावर त्याचे तरुणपण भरकटायला सुरू होते.मित्रांची वाईट संगत, ड्रग्स चे सेवन आणि अतिरेक आणि बॉम्ब ब्लास्ट व इतर गोष्टींवर प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे.तरुणपणी कोणत्या गोष्टी करू नयेत हे सिनेमा पाहून जाणवते.
रणबीर कपूर ने संजय दत्त चा रोल करत असताना पूर्णपणे स्वतःला झोकून दिले आहे.संजय दत्त ची प्रत्येक गोष्ट,हालचाल,चालणे आणि बोलणे ह्या सर्व गोष्टी त्याने हुबेहूब साकारल्या आहेत.
रणबीर कपूर, परेश रावल, दिया मिर्झा आणि विकी कौशल यांनी दर्जेदार अभिनय केला आहे. रणबीर हा कसलेला अभिनेता आहे हे परत सिद्ध झालेले आहे.गाणी ठीक आहेत.लेखन आणि दिग्दर्शन च्या बाबतीत राजकुमार हिरानी ह्यांचा कुणीही हात धरू शकत नाही.स्टोरीटेलर कसा असावा ह्याचे उत्तर म्हणजे राजकुमार हिरानी.
काही प्रश्न?संजय दत्त किती इनोसंट आहे ह्यावर सिनेमा मध्ये भर का दिला गेला?वास्तवता का दाखवली नाही.?नेमका काय संदेश देणार होते सिनेमा मधून...आणि बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात.पण सिनेमा कुठेही बोअर करत नाही.
म्हणून संजय दत्त कसा होता?... डोक्याला त्रास न घेता कोल्ड ड्रिंक आणि सामोसे खात एकदा सिनेमा पाहावा.
2.99 स्टार्स
कौशिक
No comments:
Post a Comment