"..अर्ध्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबॉम्बचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली.प्रत्येक मजल्यावर पासष्ट बिऱ्हाड धरून एकूण दोनशेसाठ बिऱ्हाडे रमाकांत लघाटेच्या घरी निघाली.अनेक वर्ष ह्या चाळीमध्ये सनसनाटी काही घडलं नव्हते आणि पुढच्या वर्षी घडेल अशी शक्यता नव्हती..."
उघड्या दरवाजातून चिमण एखाद्या तीरासारखा माझ्या खोलीत घुसला.माझा हात अशा काही आवेशाने खेचला, की लहाणपणी मी जर माफक प्रमाणात व्यायाम केला नसता तर माझा तो हात खांद्यापासून निखळून पडला असता.मी त्याच्या त्या आवेशाकडे केवळ पहातच राहिलो.पण त्याला पाहत राहायला सवड नव्हती.मला बाहेरच्या खोलीत ओढीत नेता नेता तो म्हणाला,"बाहेर कोण आलंय बघ."...
सुंदर इमारत,सुंदर सजावट,सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचे प्रतीक असणाऱ्या लेखकाचे सुंदर कथा संग्रह.संसारीसुंदरतेच्या भवती फिरणाऱ्या सर्व कथा आहेत.
बाई,बायको,कॅलेंडर;पांढरा हत्ती तोही लोकांचा;टाईट प्यांट;आयत्या ब्लॉकवर नागोबा;मीच तुमची वहिदा...अश्या एकाहून एक सरस कथा आहेत.सर्व कथांमध्ये सत्याची किनार लाभली आहे.काही कथा वाचत असतांना मनाला शल्य भिडत राहते आणि चटका लावून जाते.
सुंदरतेचे प्रतीक असणाऱ्या लेखकाचे पुस्तक अजिबात चुकवू नये.
*******
कौशिक
No comments:
Post a Comment