१९९८-९९...पोखरण राजस्थान मध्ये गुप्त अशी योजना अमलात आणली जात होती
ज्याची कुणालाही खबर देखील नव्हती.ही योजना अमलात आणल्यावर भारताची सर्व जगामध्ये
मान उंचावणार होती.साक्षात अमेरिकेच्या आणि त्यांच्या शक्तिशाली उपग्रहांना ही
पत्ता लागू न देता पोखरण मध्ये अणुचाचणी यशस्वी पार पाडली होती.अश्या ह्या सत्य
घटनेवर सिनेमा आधारित आहे.
कथेची सुरवात १९९५ च्या आसपास सुरु होते.जॉन अब्राहम(अश्वत राणा)
भारताच्या रिसर्च विंग चा प्रमुख असतो.इतर राष्ट्र अणुचाचणी घेत असताना भारतानेही
त्यामध्ये मागे राहू नये ह्यासाठी तो अणुचाचणी साठी प्रयत्नशील असतो.पण त्याचे
पूर्ण प्लानिंग ऐकून न घेता त्यावर १९९५ च्या आसपास पोखरण मध्ये अणुचाचणी चा
प्रयोग होतो आणि तो प्रयोग बरोबर अमेरिकेच्या उपग्रहांना कळतो.१९९५ चा प्रयोग
अमेरिकच्या दबावामुळे रद्द करावा लागल्यानंतर १९९८ ला पुढचे सरकार आल्यावर पुढे
अणुचाचणी वर पुन्हा काम सुरु होते.सर्व अणुचाचण्या अत्यंत गुप्तपणे पार पाडण्याची
जबाबदारी जॉन अब्राहम आणि त्याच्या टीम वर
येते.मग इथून सुरु होतो अत्यंत गुप्त अश्या न समजणार्या शब्दांचा खेळ...सर्व टीम
आणि उपकरणांना सांकेतिक नावं दिली जातात आणि अत्यंत धूर्तपणे गनिमी कावा खेळत सर्व
टीम अणुचाचणी घेण्यात यशस्वी ठरते.
कथा कुठेही रेंगाळत नाही.सत्य घटना असल्यामुळे कथेमध्ये कुठेही ड्रामा
दिसत नाही.सर्व कलाकारांनी उत्तम रित्या अभिनय साकारला आहे.जॉन अब्राहम ने विषयावर
आणि अभिनयावर बरेच प्रामाणिक काम केल्याचे जाणवते.चित्रपट पाहिल्यावर आपली छाती
अभिमानाने फुलून जाते.अमेरिकेच्या उपग्रहांना चकवा देत आणि सांकेतिक शब्द वापरत सर्व शास्त्रज्ञांनी
कसे काम केले हे पाहताना अंगात रोमांच
निर्माण होतो.भारत जगामध्ये कुठेही कमी नाही ही भावना चित्रपट पाहताना जाणवते.चित्रपटाच्या
शेवटी सर्व तरुणांना स्वप्न पाहायला शिकवणारे श्री.ए.पी.जे.कलाम ह्यांची
प्रकर्षाने आठवण येते.
तर भारत आणि आपले शास्त्रज्ञ मनात आले की काय करू शकतात हे अनुभवण्यासाठी सिनेमा नक्की पाहावा.
4 stars
©
Kaushik Shrotri
No comments:
Post a Comment