सकाळचे ११.३० वाजले होते.कोल्हापूर ला रॉयल प्लाझा ला मी पुण्याला जाणारी कोंडुसकर गाडीची वाट पाहत उभा होतो.वैशाखाचा वणवा जोरदार पेटला होता.कोल्हापूर मध्ये तापमान चाळीस अंश होते.सुर्यनारायण शरीर पिळून काढत होते.अखेर ११.४५ ला कोंडुसकर आली आणि अखेरचं मला हुश्य झाले.लगेचच समान घेऊन मी गाडीमध्ये चढलो आणि माझ्या जागेवर जाऊन बसलो.खिडकीकडेला माझी जागा होती.गाडीमध्ये ए.सी असल्याने उन्हापासून माझी सुटका झाली.कानात हेडफोन घालून मी गाणी ऐकत गाडी सुटण्याची वाट पाहत बसलो.
बरोबर १२.०० वाजता कोंडुसकर निघाली.मी खिडकीतून कोल्हापूर न्याहाळत आणि गाणी ऐकत बसलो होतो.बरोबर १२.१० वाजता बस शिरोली जवळ थांबली आणि दोन मिनिटांनी लगेचच निघाली.मी गाणी ऐकत बसलो असताना मला लेडीज पर्फुम चा गारेगार सुगंध चा स्वाद येऊ लागला.बस सुसाट वेगाने निघाली होती.बरोबर १२.३० ला मला मी ऐकत असलेल्या गाण्यांचा आवाज कमी ऐकू येऊ लागला आणि मला कुणीतरी अखंड चिवचिव करत असल्याचा आवाज ऐकू आला.मी कानातून हेडफोन बाजूला काढला.माझ्या सीट च्या शेजारी एक मुलगी आणि तिच्या शेजारच्या सीट वर कोल्हापूरच्या दोन मुली अखंड चिवचिव करत बसलेल्या होत्या.त्यांनी मारलेल्या पर्फुम चा स्वाद एव्हाना सर्व बस मध्ये पसरलेला होता आणि माझ्या नाकात सहज रित्या जात होता.त्या मुलींकडे मी हळूच नजर फिरवली.तिघीही गोऱ्या घार्या होत्या.लाल रंगाचा ड्रेस आणि ब्लू जीन्स मध्ये तिघींनी बस चे वातावरण पूर्ण उजळून टाकले होते आणि बस मध्ये एव्हाना महाबळेश्वरचे प्रणयरम्य वातावरण निर्माण केले होते.एव्हाना बस मध्ये असलेल्या सर्व तरुण हृदयांची नजर त्या मुलींवर पडलेली होती.
थोड्याच वेळात तिघींची चिवचिव थांबली आणि दोघींनी सेल्फी काढायला सुरवात केली.ओठांचा चंबू करत आणि चेहऱ्यावर विविध प्रकारचे भाव आणत दोघींनी सेल्फी काढायला सुरवात केली.पाच मिनिटात दोघींनी १०० सेल्फी काढले आणि सर्व सेल्फी त्या दोघी माझ्या शेजारी बसलेल्या त्यांच्या मैत्रिणीला दाखवले.१०० सेल्फी नंतर दोघींनी त्यांचे जुने फोटो पाहायला सुरवात केली.
“ए, हा बघ ना किती सुंदर फोटो आहे....’’
“ह्या फोटोत आय-लायनर ची शेड किती सुंदर आहे...’’
“हा फोटो काही खास नाही आला डिलीट कर...’’
“हा कोण ग हिरो...तुझा...’’
“माझी पाउट पोज तुझ्यापेक्षा भारी आहे...’’
दोघींची बडबड अखंड चालू होती.माझ्या शेजारी बसलेली तिसरी शांतपणे तिच्या शेजारच्या मुलींच्या फोटोंना भारी भारी म्हणत दाद देत होती.
अखेर तिघींची चिवचिव थांबली आणि तिघीं झोपल्या.
तिघी झोपल्यावर मी कानाला हेडफोन लावला आणि गाणी ऐकत मी देखील झोपलो.
दुपारी १.३० ला मला जाग आली.गाडी कराड च्या जवळ आली होती.मी शेजारी पाहिले तर त्या तिघींचे जोरदार भांडण सुरु होते.
“मी काढलेले सेल्फी कुठे गेले?’’
“असतील ना...’’
“नाही आहेत.’’
माझ्या शेजारी बसलेल्या मुलीने उत्तर दिले.
“सॉरी,चुकून डीलीट झाले.’’
“डिलीट...’’
पहिली मुलगी उत्तर ऐकून चिडली.
“तुझा फोन मी तू झोपली होतीस तेव्हा पाहत होते.तेव्हा चुकून डिलीट झाले.Sorry.’’
“Sorry…disgusting.किती सुंदर फोटो आले होते...I am not talking to you. We are no more best friends.’’
तिच्या वाक्याने तिघींचे चेहरे वेगवेगळ्या दिशेने गेले आणि बस मध्ये सुरु झाला जोरदार हास्यस्फोट...
No comments:
Post a Comment