गूढकथा म्हणजे नेमके काय? तर आयुष्याच्या एकाद्या मुलुखावेगळ्या पैलूंबाबत लिहिलेली कथा.सदरचा कथासंग्रह हा मतकरींच्या इतर कथासंग्रहांपेक्षा स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवतो.सदरच्या पुस्तकात विविध प्रकारच्या रहस्यमयी कथा आहेत ज्या आपल्याला हळूच चिमटे काढतात. "कबंध" ह्या कथेमध्ये मानवी शरीर आणि विचारांचा कसा आपल्यावर परिणाम होतो ह्याचे उत्तम वर्णन केले आहे."म्हणे कोण मागे आले" ह्या कथेमध्ये भास आणि फँटसी ह्याचा उत्तम वापर केला गेला आहे."श्रीमंत" ह्या कथेमध्ये एका सर्व सामान्य माणसाला श्रीमंत होण्यासाठी कसे ब्रेन वॉश केले जाते ह्याचे रहस्यमयी पद्धतीने वर्णन केले आहे.त्याच बरोबर "लांबणीवर" आणि "ट्रिंग-ट्रिंग-हॅलो-क्लिक" ह्या दोन कथा मस्तपैकी घाबरून सोडतात आणि हळूच चिमटे कडून जातात.
सर्व कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मानवी स्वभाव आणि तर्कशास्त्र ह्यावर आधारित आहेत.सर्व च्या सर्व कथांचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
अवश्य वाचा
अमर्याद स्टार्स
©
Kaushik
सर्व कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मानवी स्वभाव आणि तर्कशास्त्र ह्यावर आधारित आहेत.सर्व च्या सर्व कथांचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
अवश्य वाचा
अमर्याद स्टार्स
©
Kaushik
No comments:
Post a Comment