Thursday, 31 May 2018

Film Review:- Parmanu

१९९८-९९...पोखरण राजस्थान मध्ये गुप्त अशी योजना अमलात आणली जात होती ज्याची कुणालाही खबर देखील नव्हती.ही योजना अमलात आणल्यावर भारताची सर्व जगामध्ये मान उंचावणार होती.साक्षात अमेरिकेच्या आणि त्यांच्या शक्तिशाली उपग्रहांना ही पत्ता लागू न देता पोखरण मध्ये अणुचाचणी यशस्वी पार पाडली होती.अश्या ह्या सत्य घटनेवर सिनेमा आधारित आहे.
कथेची सुरवात १९९५ च्या आसपास सुरु होते.जॉन अब्राहम(अश्वत राणा) भारताच्या रिसर्च विंग चा प्रमुख असतो.इतर राष्ट्र अणुचाचणी घेत असताना भारतानेही त्यामध्ये मागे राहू नये ह्यासाठी तो अणुचाचणी साठी प्रयत्नशील असतो.पण त्याचे पूर्ण प्लानिंग ऐकून न घेता त्यावर १९९५ च्या आसपास पोखरण मध्ये अणुचाचणी चा प्रयोग होतो आणि तो प्रयोग बरोबर अमेरिकेच्या उपग्रहांना कळतो.१९९५ चा प्रयोग अमेरिकच्या दबावामुळे रद्द करावा लागल्यानंतर १९९८ ला पुढचे सरकार आल्यावर पुढे अणुचाचणी वर पुन्हा काम सुरु होते.सर्व अणुचाचण्या अत्यंत गुप्तपणे पार पाडण्याची जबाबदारी जॉन अब्राहम  आणि त्याच्या टीम वर येते.मग इथून सुरु होतो अत्यंत गुप्त अश्या न समजणार्या शब्दांचा खेळ...सर्व टीम आणि उपकरणांना सांकेतिक नावं दिली जातात आणि अत्यंत धूर्तपणे गनिमी कावा खेळत सर्व टीम अणुचाचणी घेण्यात यशस्वी ठरते.
कथा कुठेही रेंगाळत नाही.सत्य घटना असल्यामुळे कथेमध्ये कुठेही ड्रामा दिसत नाही.सर्व कलाकारांनी उत्तम रित्या अभिनय साकारला आहे.जॉन अब्राहम ने विषयावर आणि अभिनयावर बरेच प्रामाणिक काम केल्याचे जाणवते.चित्रपट पाहिल्यावर आपली छाती अभिमानाने फुलून जाते.अमेरिकेच्या उपग्रहांना चकवा देत  आणि सांकेतिक शब्द वापरत सर्व शास्त्रज्ञांनी कसे काम केले हे पाहताना  अंगात रोमांच निर्माण होतो.भारत जगामध्ये कुठेही कमी नाही ही भावना चित्रपट पाहताना जाणवते.चित्रपटाच्या शेवटी सर्व तरुणांना स्वप्न पाहायला शिकवणारे श्री.ए.पी.जे.कलाम ह्यांची प्रकर्षाने आठवण येते.

तर भारत आणि आपले  शास्त्रज्ञ मनात आले की काय करू शकतात  हे अनुभवण्यासाठी सिनेमा नक्की पाहावा.
4 stars
©
Kaushik Shrotri

Sunday, 20 May 2018

Book Review:-Kabandha(कबंध);Written by:-Shri.Ratnakar Matkari

गूढकथा म्हणजे नेमके काय? तर आयुष्याच्या एकाद्या मुलुखावेगळ्या पैलूंबाबत लिहिलेली कथा.सदरचा  कथासंग्रह हा मतकरींच्या इतर कथासंग्रहांपेक्षा स्वतःचे वेगळे अस्तित्व ठेवतो.सदरच्या पुस्तकात विविध प्रकारच्या रहस्यमयी कथा आहेत ज्या आपल्याला हळूच चिमटे काढतात. "कबंध" ह्या कथेमध्ये मानवी शरीर आणि विचारांचा कसा आपल्यावर परिणाम होतो ह्याचे उत्तम वर्णन केले आहे."म्हणे कोण मागे आले" ह्या कथेमध्ये भास आणि फँटसी ह्याचा उत्तम वापर केला गेला आहे."श्रीमंत" ह्या कथेमध्ये एका सर्व सामान्य माणसाला श्रीमंत होण्यासाठी कसे ब्रेन वॉश केले जाते ह्याचे रहस्यमयी पद्धतीने वर्णन केले आहे.त्याच बरोबर "लांबणीवर" आणि "ट्रिंग-ट्रिंग-हॅलो-क्लिक" ह्या दोन कथा मस्तपैकी घाबरून सोडतात आणि हळूच चिमटे कडून जातात.
सर्व कथांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मानवी स्वभाव आणि तर्कशास्त्र ह्यावर आधारित आहेत.सर्व च्या सर्व कथांचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
अवश्य वाचा
अमर्याद स्टार्स
©
Kaushik


Sunday, 6 May 2018

सेल्फी-क्विंस

सकाळचे ११.३० वाजले होते.कोल्हापूर ला रॉयल प्लाझा ला मी पुण्याला जाणारी कोंडुसकर गाडीची वाट पाहत उभा होतो.वैशाखाचा वणवा जोरदार पेटला होता.कोल्हापूर मध्ये तापमान चाळीस अंश होते.सुर्यनारायण शरीर पिळून काढत होते.अखेर ११.४५ ला कोंडुसकर आली आणि अखेरचं मला हुश्य झाले.लगेचच समान घेऊन मी गाडीमध्ये चढलो आणि माझ्या जागेवर जाऊन बसलो.खिडकीकडेला माझी जागा होती.गाडीमध्ये ए.सी असल्याने उन्हापासून माझी सुटका झाली.कानात हेडफोन घालून मी गाणी ऐकत गाडी सुटण्याची वाट पाहत बसलो.


बरोबर १२.०० वाजता कोंडुसकर निघाली.मी खिडकीतून कोल्हापूर न्याहाळत आणि गाणी ऐकत बसलो होतो.बरोबर १२.१० वाजता बस शिरोली जवळ थांबली आणि दोन मिनिटांनी लगेचच निघाली.मी गाणी ऐकत बसलो असताना मला लेडीज पर्फुम चा गारेगार सुगंध चा स्वाद येऊ लागला.बस सुसाट वेगाने निघाली होती.बरोबर १२.३० ला मला मी ऐकत असलेल्या गाण्यांचा आवाज कमी ऐकू येऊ लागला आणि मला कुणीतरी अखंड चिवचिव करत असल्याचा आवाज ऐकू आला.मी कानातून हेडफोन बाजूला काढला.माझ्या सीट च्या शेजारी एक मुलगी आणि तिच्या शेजारच्या सीट वर कोल्हापूरच्या दोन मुली अखंड चिवचिव करत बसलेल्या होत्या.त्यांनी मारलेल्या पर्फुम चा स्वाद एव्हाना सर्व बस मध्ये पसरलेला होता आणि माझ्या नाकात सहज रित्या जात होता.त्या मुलींकडे मी हळूच नजर फिरवली.तिघीही गोऱ्या घार्या होत्या.लाल रंगाचा ड्रेस आणि ब्लू जीन्स मध्ये तिघींनी बस चे वातावरण पूर्ण उजळून टाकले होते आणि बस मध्ये एव्हाना महाबळेश्वरचे प्रणयरम्य वातावरण निर्माण केले होते.एव्हाना बस मध्ये असलेल्या सर्व तरुण हृदयांची नजर त्या मुलींवर पडलेली होती.


थोड्याच वेळात तिघींची चिवचिव थांबली आणि दोघींनी सेल्फी काढायला सुरवात केली.ओठांचा चंबू करत आणि चेहऱ्यावर विविध प्रकारचे भाव आणत दोघींनी सेल्फी काढायला सुरवात केली.पाच मिनिटात दोघींनी १०० सेल्फी काढले आणि सर्व सेल्फी त्या दोघी माझ्या शेजारी बसलेल्या त्यांच्या मैत्रिणीला दाखवले.१०० सेल्फी नंतर दोघींनी त्यांचे जुने फोटो पाहायला सुरवात केली.


“ए, हा बघ ना किती सुंदर फोटो आहे....’’


“ह्या फोटोत आय-लायनर ची शेड किती सुंदर आहे...’’


“हा फोटो काही खास नाही आला डिलीट कर...’’


“हा कोण ग हिरो...तुझा...’’


“माझी पाउट पोज तुझ्यापेक्षा भारी आहे...’’


दोघींची बडबड अखंड चालू होती.माझ्या शेजारी बसलेली तिसरी शांतपणे तिच्या शेजारच्या मुलींच्या फोटोंना भारी भारी म्हणत दाद देत होती.


अखेर तिघींची चिवचिव थांबली आणि तिघीं झोपल्या.


तिघी झोपल्यावर मी कानाला हेडफोन लावला आणि गाणी ऐकत मी देखील झोपलो.


दुपारी १.३० ला मला जाग आली.गाडी कराड च्या जवळ आली होती.मी शेजारी पाहिले तर त्या तिघींचे जोरदार भांडण सुरु होते.


“मी काढलेले सेल्फी कुठे गेले?’’


“असतील ना...’’


“नाही आहेत.’’


माझ्या शेजारी बसलेल्या मुलीने उत्तर दिले.


“सॉरी,चुकून डीलीट झाले.’’


“डिलीट...’’


पहिली मुलगी उत्तर ऐकून चिडली.


“तुझा फोन मी तू झोपली होतीस तेव्हा पाहत होते.तेव्हा चुकून डिलीट झाले.Sorry.’’


“Sorry…disgusting.किती सुंदर फोटो आले होते...I am not talking to you. We are no more best friends.’’


तिच्या वाक्याने तिघींचे चेहरे वेगवेगळ्या दिशेने गेले आणि बस मध्ये सुरु झाला जोरदार हास्यस्फोट...


Wednesday, 2 May 2018

पुस्तक परिचय:-तू भ्रमत आहासी वाया ;लेखक:- व.पू.काळे

सदरचे कथानक आयुष्याचे एक कडवट सत्य सांगून जाते.सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान नाचू नये आणि दुःखाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये.Dont get attached to any things हे तत्व खूप सुंदररित्या कथा सांगून जाते.मनातल्या अंतर्मनात सुद्धा लाभ आणि हानी ह्यांची चित्र उमटू देऊ नयेत, हे तत्व पळणारी माणसे देखील ह्या जगात आहेत.कथेमधली सायरा ह्या तत्वात बर्यापेकी दडलेली आहे.दिव्याने दिवा लावला की सर्वच दिवे उजळू लागतात आणि मग ह्या प्रकाशाच्या वाटेवर पहिला दिवा कोणता हेच पटकन समजत नाही.तसे कृष्णभक्ती मध्ये सर्वस्व बुडालेला अर्जुन शेवटी श्रीकृष्णरूप होऊनच उरतो.वपुंनी सायरा ह्या पात्रामधून हाच संदेश दिला आहे.सायरा जिथे जिथे जाते तिथे ती त्या प्रसंगाचा भाग होऊन जाते.
कथेमध्ये सायरा, ओंकारनाथ आणि मांडलिक असे तीन पत्र आहेत.आयुष्याचे कडवट डोस पिऊन जगणारी सायराची आणि भौतिक सुखाच्या मागे पळणाऱ्याओमकारनाथ ची भेट होते आणि तिथून सुरु होतो आयुष्याच्या कडवट गोष्टींचा शब्दांचा खेळ.
सायरा हे एक परिपूर्ण वैचारिक वादळ आहे.ह्या वादळावर काही परिणाम होत नाही.मध्यबिंदू च्या भवती फिरणारी ही कथा आहे ज्यात ना द्वेष आहे ना आकस आहे ना हिंसा आहे. इथे आहे फक्त समुद्राच्या लाटांसारखे वाहणारे निरपेक्ष प्रेम.सुखापलीकडे दुख आहे आणि दुखापलीकडे सुख आहे.सदरच्या कथेमध्ये सायरा न बोलताच बरेच काही मिळवते आणि नायक बरेच काही गमवून बसतो.
तर फार खोलात न जाता आस्वादापलीकडे आनंद मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचावीच.
अमर्याद स्टार्स
©
kaushik

Tuesday, 1 May 2018

Film Review:-Avengers:Infinity War

 Frankly speaking, I haven't seen any of the previous movies of characters of Avengers from the movie.Avengers: Infinity War, is longer but it is enjoyable.
The story is about typical Good and Bad Evil fights.The movie brings all these good guys together – against a bad guy, namely Thanos, who’s been a looming threat to Universe which is played by Josh Brolin in a terrific motion-capture performance that doesn’t miss a nuance. Thanos is a 12-feet-tall, purple-skinned mega-villain reminding great Khali who’s bent on acquiring all six of the Infinity Stones from all Avengers and wiping out half of the galaxy’s population to save the other half. Every superhero is given their respective stomping grounds, must do what they can to stop him.
 But because there are so many of them in the mix, it’s practically impossible for every significant character to get a huge amount of screen-time here.One thing I couldn't digest was the end of the movie.Entire CGI and Visual Effects needs a big shout out.Villan of the movie gets much more attention than the Avengers of the movie who makes all the Avengers fight till there last blood.
Take a Pop-Corn and Pepsi and enjoy the movie.
One time watch.
Two stars from my side.
©

kaushik

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...