प्रचंड चर्चेत असलेला सिनेमा पद्मावत पाहायचा योग आला.ह्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचा मी खूप मोठा चाहता कधीच नव्हतो.पण कलाकारांसाठी सिनेमा कडे मोर्चा वळवला.तेराव्या शतकातली पूर्ण कथा आहे. मेवाड चे महाराज राजा रतन सिंग ह्यांची शिकारीच्या दरम्यान राणी पद्मावतीची भेट होते. नैसर्गिक सौंदर्याची भरभरून देणगी असलेली राणी पद्मावती राजा रतन सिंग ह्यांच्याबरोबर विवाह करून चित्तोर ला येते. दिल्ली मध्ये असलेला अत्यंत क्रूर असा अल्लाउद्दीन खिलजी च्या कानावर राणी पद्मावती च्या सौंदर्याबद्दल बातमी पोहोचते. अत्यंत क्रूर आणि प्रत्येक गोष्टीची हाव सुटलेला असा अल्लाउद्दीन खिलजी राणी पद्मावती ला भेटण्यासाठी मेवाड कडे कूच करतो आणि युद्धाची सुरवात होते.अभिनयाच्या बाबतीमध्ये रणवीर सिंग जिंकला आहे. क्रूर आणि महाभयंकर असा खिलजी त्याने पूर्णपणे झोकून देऊन पडद्यावर उतरवला आहे.शाहिद कपूर देखील मेवाड चा राजा च्या भूमिकेत उत्तम फिट्ट बसला आहे.दीपिका ने राणी पद्मावती ला आपल्या पूर्णपणे देहबोली मध्ये आणि अभिनयामध्ये तंतोतंत उतरवले आहे. तिचा अभिनय शेवटपर्येंत थेट परिणाम कारक ठरतो.
आता काही खटकणाऱ्या गोष्टी
१. चित्रपटाच्या सुरवातीला एक चित्रविचित्र पक्षी येतो जो पाहून पोट धरून हसू येते.
२. पूर्ण सिनेमा हिंदी मध्ये असताना त्यात काही मराठी शब्द घुसवण्याचा केलेला प्रयत्न...
३. काही प्रसंगांमध्ये तर सिनेमाची कथाच बेपत्ता होते.
४. VFX,Special Effects हे जरा ओरिजिनल वाटले असते तर कथेमध्ये अजून फुंकर मारता आली असती. २०१७ ला आलेल्या एका मेगा ब्लॉक बास्टर च्या सिनेमाच्या VFX ची पद्धत आहे अशी उचलण्याची काय गरज होती?
५. गाण्यांची गरज होती का...
६. संगीत अजून चांगलं होऊ शकलं असतं जर ते दुसऱ्या संगीतकाराने जर का दिले असतं तर...
काही जमलेल्या गोष्टी
१. भव्यता
२. Cinematography
३.तिन्ही कलाकारांचा अभिनय विशेषतः दीपिका ने पूर्ण बाजी मारली आहे.
४. राणी पद्मिनी आणि समस्त राजपुतांचा गौरव.
सिनेमा पूर्ण पाहून झाल्यावर मला एक म्हण आठवली.Engineering च्या भाषेत ''Quality comes first''सर्व क्षेत्रात ही म्हण प्रचिलित आहे.कुठल्याही परिस्थितीमध्ये दर्जा(Quality) ह्या गोष्टीची आपण तडजोड करता कामा नये.Quality शी तडजोड केली की Product चे काय होते ह्याचा अनुभव मी नुकताच सिनेमा हॉल मध्ये घेतला.
दर्जा:-पाहायचा असेल तर पहा नाहीतर नका पाहू.
समीक्षण:-कौशिक
©
1 comment:
Wynn Slots for Android and iOS - Wooricasinos
A free wooricasinos.info app for slot https://septcasino.com/review/merit-casino/ machines from WRI Holdings Limited that lets you play the popular novcasino games, such as goyangfc.com free video slots, https://jancasino.com/review/merit-casino/ table games and live casino
Post a Comment