Thursday 25 January 2018

पुस्तक परीक्षण :-फाशी बखळ ; लेखक:रत्नाकर मतकरी


सदरच्या पुस्तकाच्या कथा ह्या रत्नाकर मतकरींच्या इतर पुस्तकांच्या कथांशी जराही relate होत नाहीत .सर्व च्या सर्व कथा पूर्णपणे वेगळ्या आहेत.प्रत्येक गूढकथेला मानवी कंगोरे दिले गेले आहेत. सर्व च्या सर्व कथा भीषण ,करुण ,गूढ ,भयंकर अश्या भावनांनी भरलेल्या आहेत. प्रत्येक कथेचे स्वतःचे अस्तित्व आहे. काही कथांमध्ये कल्पनाशक्तीचा कहर म्हणजे काय असतो ह्याचा पुरेपूर अनुभव येतो.
शेवटची बस ह्या कथेचा शेवटच्या टोकाला येणारा ट्विस्ट,फाशी बखळ ह्या कथेमध्ये बोचणारी भीती,फँटॅस्टिक ह्या कथेमधील फँटसी... सर्व च्या सर्व कथा सर्व तरुण कथाकारांना आणि स्टोरीटेलरना जणू मुक्त विद्यापीठ आहे. मानवी निरीक्षण आणि मानसशास्त्र ह्यावर आधारित कथा सुद्धा किती दर्जेदार असू शकतात हे आपल्याला कथा वाचून कळते.
*****
कौशिक 
इचलकरंजी 
लेखक:-रत्नाकर मतकरी 
उपलब्ध:-ऍमेझॉन,बुकगंगा आणि ऑफलाईन बुक स्टोअर्स . 

No comments:

Featured post

सिनेमा

सकाळचे ९.०० वाजलेले होते.बर्‍याच गाड्यांचा आवाज येत होता.बरीच वर्दळ जाणवत होती.कोल्हापूरमध्ये एका मोठ्या मल्टिप्लेक्स मध्ये एक गाजलेला सिनेम...